Skip to main content

Posts

😍स्नेहाळ मेळावा!😍 (काही अनुभवलेलं...)

 😍 स्नेहाळ मेळावा!😍 (काही अनुभवलेलं...)                                           अभ्यास सर्वेक्षणाच्या निमित्ताने घरी गेले होते. गेल्यावर कळले, दुसऱ्याच दिवशी मम्मी-दादांचे मित्र-मैत्रिणी जमणार आहेत. मी या सर्वांबद्दल बरेच ऐकून होते. त्यांची काही प्रकाशचित्रं सुद्धा पाहिलेली होती. तथापि त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग मात्र कधी आलेला नव्हता. आता मात्र त्या साऱ्यांनाच भेटता येणार म्हणून आनंद आणि कुतूहल सुद्धा होतेच. ही सगळी मंडळी म्हणजे प्रवासाच्या/सहलींच्या निमित्ताने झालेली ओळख. या सगळ्यांनी बऱ्याच सहली एकत्र केलेल्या आहेत. तथापि तब्बेतीच्या तक्रारींमुळे, गेले दोन-तीन वर्षांपासून मम्मी-दादांना प्रवास करणे शक्य होत नाही. तरीही या सर्वांची मैत्री अबाधित आहे. कायम ते एकमेकांच्या संपर्कात असतात. एकमेव समर्थन प्रणाली(support system) म्हणजे हुशार भ्रमणध्वनी(smart phone)! या हुशार भ्रमणध्वनीच्या नावाने कितीही शंख करा, त्याला बोल लावा, पण तो सगळ्यांसाठीच या ना त्या कारणाने...

🚩राम! मला भेटलेला!-२🚩(featured)

  🚩 राम! मला भेटलेला!-२ 🚩   (featured)                          साऱ्यांप्रमाणे मलाही उत्सुकता होतीच, २२ जानेवारी २०२४ या दिवसाची. मी सुद्धा दूरदर्शन वरील वाहिनी शोधून ठेवली होती, जी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करणार होती. वेळेवर दुरदर्शन संच चालू करून ठेवला आणि बाकी काम करता करता सगळा समारंभ बघत होते. मला हा समारंभ म्हणजे प्राणप्रतिष्ठा विधी तर बघायचेच होते, तथापि मंदिर, त्याचा आतील भाग, बाहेरील भाग, आजूबाजूचा परिसर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गाभारा आणि त्यातील मूर्ती, पीठा सहित बघण्यात जास्त रस होता. पण मूर्तीचे दर्शन दोन दिवस आधीच झाले होते आणि ही मूर्ती बघून मला एक धक्काच बसला! कारण आजतागायत आणि या प्रसंगाच्या निमित्ताने रामाच्या मूर्ती आणि मोठाले कट आउट्स  बघत आले होते, त्या सर्वांत, प्रौढ राम, हातात धनुष्य आणि पाठीवर बाणांचा भाता असेच बघत आले. तसेच सहसा रामाची मूर्ती म्हणजे राम-सीता-लक्ष्मण, सोबत काही वेळा हनुमान अशीच बघायला मिळते. ती मूर्ती बघताच क्षणी डोक्यात विचार सुरु झाले, असे का? ...

राखाडी मनीमाऊ (चित्रं मालिका)

 राखाडी मनीमाऊ  (चित्रं मालिका)  मनीमाऊ मनीमाऊ,  अंग तुझे किती मऊ मऊ...  या सगळ्या मनीमाऊ बर्‍याच दिवसां पासून आपल्या सगळ्यांना भेटायला आतूर झाल्यात.  सगळ्या राखाडी रंगाच्या!  आपापल्याच वेगवेगळ्या  तंद्रीत असलेल्या.  थोडी झोपाळू  काहीशी वैतागलेली, चिडचिडी  बदमाश अणि खोडकर  आपल्या सगळ्यांनाच भेटण्यासाठी वाट बघत असलेल्या... 😍 

😆थोडं(खूप सारं) गोडाचं(लाडू)-६ (घरातील गमती जमती)

 😆 थोडं(खूप सारं) गोडाचं(लाडू)-६  (घरातील गमती जमती)                     आधीच्या भागात म्हणजे थोडं गोडाचं-४   https://www.anandipavus.com/2022/01/blog-post.html   मध्ये जिलेबीच्या मेजवानीचा आस्वाद घेतलाच आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे, याच काळातील म्हणजे हिवाळ्यातील अजून दोन गोड? पदार्थांची मेजवानी आणि गमती जमती (त्या पदार्थांच्या आग्रहाच्या)या भागात बघू या.                      वरील वाक्यात गोड शब्दापुढे प्रश्नचिन्ह चुकून पडले की काय असे वाटण्याची शक्यता आहे, तुम्हा सगळ्यांना. पण ते चुकून पडले नाही, तर अगदी जाणीव पूर्वक घातले आहे. का? ते पुढे समजेलच. आजचे दोन गोडाचे पदार्थ म्हणजे हिवाळा खास आणि अतिशय आरोग्यकारक, पौष्टिक. तर हे दोन पदार्थ म्हणजे दोन प्रकारचे लाडू. तर आधी त्या वरच्या प्रश्नचिन्हाचे उत्तर मिळेल अशा लाडू पासून सुरवात करते.                      अर्थातच तुम्हा चाणाक्ष वाचकांनी आधीच ओळ...

🚩राम! मला भेटलेला-१!🚩(featured)

🚩 राम! मला भेटलेला!-१ 🚩  (featured) जय श्री राम! ऐतिहासिक दिवस! एका आगळ्या अर्थाने स्वातंत्र दिन! या खास दिवसाची खुणगाठ! एका आगळ्या-वेगळ्या अनुभवातून.                                फेब्रुवारी २०२०. शेवटचा आठवडा. धरोहर यात्रा. वारसा यात्रा. एका महान पुरातत्वज्ञांच्या शंभराव्या जयंती निमित्त वर्षभर अनेक कार्यक्रम राबविले गेले. त्यातील एक भाग म्हणजे ही धरोहर यात्रा! ते महान पुरातत्वज्ञ म्हणजे " आदरणीय पद्मश्री डॉ विष्णू श्रीधर वाकणकर!"     या धरोहर यात्रेचा भाग होण्याचे भाग्य मला लाभले. दुसरा आणि अतिशय महत्वाचा भाग म्हणजे ह्या यात्रेला  आदरणीय डॉ गोरक्ष देगलूरकर  यांचे मार्गदर्शन लाभले. म्हणजे त्यांचा सहवास, संपूर्ण एक आठवडा लाभला. या दोन गोष्टी माहितीच्या होत्या. तथापि तिसरी गोष्ट म्हणजे एक स्वर्गीय योगायोग! आज या दैवी योगायोगाची गोष्ट!                         या वारसा यात्रेचा एक भाग होता, भीम बेटका अभ्यास सहल. सकाळीच...

रांगोळ्या - संक्रांती दुसरा दिवस (चित्रं मालिका)

रांगोळ्या - संक्रांती दुसरा दिवस विशेष!  (चित्रं मालिका) ह्या रांगोळीचे प्रकाश चित्रं मैत्रिणीने दिले आहे!  आनंदी धन्यवाद 🙏 किशोरी!  बाकीच्या रांगोळ्यां माझ्या घराच्या  आजुबाजुला पाहिल्या! 

मकर संक्रमण विशेष रांगोळ्या (चित्रं मालिका)

मकर संक्रमण विशेष रांगोळ्या  (चित्रं मालिका)  आनंदी पाऊस  (चित्रं मालिका)  १५ जानेवारी २०२४