💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃 पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃 सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...












सुंदरच 👌
ReplyDeleteसंक्रांतीच्या शुभेच्छा 👍
तिळगूळ घ्या आणि असेच चित्र , काव्य तसेच लेख आनंदी राहूनच लिहित रहा व इतरांच्या आनंदाला कारण होत रहा 😁
प्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे
वा सुंदर👌 सगळा रांगोळी छानच विशेष करून ती ३नंबर ची पूर्ण आंगण भरून
ReplyDeleteमकर संक्रांती निमित्त तू काढलेल्या आणि संग्रहित केलेल्या विशेष रांगोळ्या पाहिल्या. तू कसले कसले छंद बाळगतेस, याचा काही नेम नाही! अगदी कागदाच्या कपट्यांपासून तर पौराणिक वस्तूंपर्यंत आणि लहान मोठ्या उताऱ्यांपासून तर थेट संशोधन पर निबंधांपर्यत! खरंच कुठल्या कुठल्या गोष्टींत आनंद शोधावा ते तूच जाणे! "आनंदी पाऊस" या ब्लॉग चे नाव तू अगदी सार्थ केले आहेस, त्याबद्दल अभिनंदन.
ReplyDeleteरांगोळ्यांचे विविध प्रकार, अगदी पारंपारिक रांगोळ्यांपासून ते थेट संस्कार भारती पर्यंत आणि दक्षिण भारतीय शैलीपर्यंत काढलेल्या रांगोळ्या, छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून तर अंगण भरून काढलेल्या रांगोळ्यांचा संग्रह देखील आवडला.
तसा रांगोळी हा काही माझा प्रांत नाही, तरीही बसल्या बसल्या रिकामपणात काहीतरी चितारण्याचा छंद मी अजूनही बाळगून आहे. म्हणून मी स्वतःही अधून मधून रांगोळ्या काढतो. परंतु "रांगोळी"ची रांगोळी मला जमत नाही. तसा प्रयत्नही केला नाही. मी सरळ खडूने रांगोळी काढतो. दक्षिण भारतीय शैलीतील काढलेल्या रांगोळ्या, म्हणजे ठिपके सोडून काढलेल्या रेषांच्या रांगोळ्या मला खूप आवडतात. अशा रांगोळ्यांचा थोडा संग्रही माझ्याकडे आहे. आपण अगदी मनापासून काढलेल्या रांगोळीकडे बघून जो आनंद होतो, तो मी तुला सांगायला पाहिजे असे नाही. अशाच आनंदामध्ये तू आम्हाला सहभागी करून घेतलेस, त्याबद्दल खूप समाधान वाटले. तुझ्या ह्या आनंदी पावसाला संक्रांतिनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा.💐
Excellent collection. Very creative. 👌👌
ReplyDeleteProud of the Indian tradition of decorating the 'angan'. ❤️❤️