थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती) आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट. नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...
सुंदरच 👌
ReplyDeleteसंक्रांतीच्या शुभेच्छा 👍
तिळगूळ घ्या आणि असेच चित्र , काव्य तसेच लेख आनंदी राहूनच लिहित रहा व इतरांच्या आनंदाला कारण होत रहा 😁
प्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे
वा सुंदर👌 सगळा रांगोळी छानच विशेष करून ती ३नंबर ची पूर्ण आंगण भरून
ReplyDeleteमकर संक्रांती निमित्त तू काढलेल्या आणि संग्रहित केलेल्या विशेष रांगोळ्या पाहिल्या. तू कसले कसले छंद बाळगतेस, याचा काही नेम नाही! अगदी कागदाच्या कपट्यांपासून तर पौराणिक वस्तूंपर्यंत आणि लहान मोठ्या उताऱ्यांपासून तर थेट संशोधन पर निबंधांपर्यत! खरंच कुठल्या कुठल्या गोष्टींत आनंद शोधावा ते तूच जाणे! "आनंदी पाऊस" या ब्लॉग चे नाव तू अगदी सार्थ केले आहेस, त्याबद्दल अभिनंदन.
ReplyDeleteरांगोळ्यांचे विविध प्रकार, अगदी पारंपारिक रांगोळ्यांपासून ते थेट संस्कार भारती पर्यंत आणि दक्षिण भारतीय शैलीपर्यंत काढलेल्या रांगोळ्या, छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून तर अंगण भरून काढलेल्या रांगोळ्यांचा संग्रह देखील आवडला.
तसा रांगोळी हा काही माझा प्रांत नाही, तरीही बसल्या बसल्या रिकामपणात काहीतरी चितारण्याचा छंद मी अजूनही बाळगून आहे. म्हणून मी स्वतःही अधून मधून रांगोळ्या काढतो. परंतु "रांगोळी"ची रांगोळी मला जमत नाही. तसा प्रयत्नही केला नाही. मी सरळ खडूने रांगोळी काढतो. दक्षिण भारतीय शैलीतील काढलेल्या रांगोळ्या, म्हणजे ठिपके सोडून काढलेल्या रेषांच्या रांगोळ्या मला खूप आवडतात. अशा रांगोळ्यांचा थोडा संग्रही माझ्याकडे आहे. आपण अगदी मनापासून काढलेल्या रांगोळीकडे बघून जो आनंद होतो, तो मी तुला सांगायला पाहिजे असे नाही. अशाच आनंदामध्ये तू आम्हाला सहभागी करून घेतलेस, त्याबद्दल खूप समाधान वाटले. तुझ्या ह्या आनंदी पावसाला संक्रांतिनिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा.💐
Excellent collection. Very creative. 👌👌
ReplyDeleteProud of the Indian tradition of decorating the 'angan'. ❤️❤️