Skip to main content

Posts

गर्जिया देवस्थान (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

गर्जिया देवस्थान  (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)                 देवस्थान! देवालय! मंदिर! देऊळ! शब्द कितीतरी. मात्र अर्थ एकच. वरपांगी विचार केल्यास देवाचे घर, निवास असलेले स्थान. मात्र सखोल विचार केल्यास किंवा या सर्वांचा खरा अर्थ जाणून घेतला, समजून घेतला, उमगला तर मुक्तीची वाट नक्कीच गवसते. थोडक्यात ज्ञानच मुक्तीचा मार्ग दाखवतो. यासाठीचे एक भौतिक साधन म्हणजे मंदिर! असो.                भारतभर अगदी प्राचीन काळापासून जल आणि स्थलक्षेत्र म्हणजेच देवस्थान यांचा अगदी जवळचा संबंध असल्याचे आढळून येते.  बहुतेक मंदिरे नदी किनारी, नैसर्गिक जलाशयापाशी असते. ते शक्य नसेल तेथे बांधीव तलाव, कुंड, विहीर, पायविहीर असते. जलाचे महत्व ओळखून मानवाने देवस्थानापाशी मानवनिर्मित पाण्याचे साठे तयार केले. शेवटी जल म्हणजेच जीवन आणि जीवन जलाशिवाय अशक्य.                अलीकडच्या एका सहलीत एका देवस्थानाला भेट देण्याचा योग आला. नावाचा वर उल्लेख आलाच आहे. तिथे आम्ही वेगळ्याच हेतूने गेलो...

नृत्य गणेश (अभ्यासातून रंजन...)

  नृत्य गणेश   (अभ्यासातून रंजन...) श्री चन्न केशव मंदिर, बेलूर, हसन, कर्नाटक, भारत गणराज रंगि   नाचतो नाचतो   पायि घागऱ्या करिती रुणझुण   नाद स्वर्गि पोचतो...     कटि पीतांबर कसून भर्जरी   बाल गजाननास नर्तनास करी   तुंदिल तनु तरी चपल साजिरी   लावण्ये साजतो...     नारद तुंबरू करिती गायन   करी शारदा वीणावादन   ब्रह्मा धरितो तालहि रंगून   मृदंग धिमि वाजतो...     देवसभा घनदाट बैसली   नृत्यगायने मने हर्षली   गौरीसंगे स्वये सदाशिव   शिशुकौतुक पाहतो...                         या गाण्यातून गणेशाची नृत्य निपुणता तर दिसतेच , पण त्यातून नृत्य गणेशाचे मुर्तीशास्त्र सुद्धा कळते. शांताबाई शेकळेच त्या , त्यांच्याबद्दल मी काय बोलणार ? शांताबाई सादर प्रणाम तुम्हाला , अगदी वारंवार !                       गणेशाला चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती मानले जाते. ज्ञानेश्वरांनी सुद्ध...