पऱ्यांच्या देशाचे झळाळते रंग
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
रंग मला सतत, कायम आकर्षित करत असतात. मी कुठेही असले तरी ते माझे लक्ष वेधून घेतात आणि मग मला त्यांची छायाचित्रं काढावीशी वाटली नाही तरच नवल! अगदी माझ्याही नकळत मी या रंगांची छायाचित्रं काढत असते. मध्यंतरी मी चेहरा-पुस्तिकेवर अशा या झळाळत्या रंगांच्या पन्नास छायाचित्रांची मालिका प्रकाशित केली होती. परंतु हे सगळे फारच दमवणारे काम आहे. त्यामुळे पुढे ती मालिका तिथेच थांबवली.
तथापि मी स्वतःला कितीही थांबविले तरीही, कुठे हे झळाळते रंग दिसले की, मला ते माझ्या क्यामेऱ्यात कैद केल्याशिवाय चैन पडत नाही. मग विचार केला, थोडी-थोडी गोळा झाली की, आनंदी पावसांत, ती छायाचित्रं आणि त्यासंबंधी थोडी माहिती अशा स्वरुपात प्रकाशित करावी.
काही दिवसांपूर्वी मी पऱ्यांच्या देशाची सफर करून आले. अर्थातच, तिथे सुद्धा हे झळाळते रंग माझी वाटच बघत होते. मग काय, त्याचा मी भरभरून आनंद लुटला आणि आनंदी पावसाच्या वाचकांसाठी इथे प्रकाशित करत आहे. तुम्हीही त्यांचा मनसोक्त आनंद लुटा...
आईसक्रीम, जीलाटोच्या दुकानातील ही सजावट.
कोन मध्ये ठेवलेले निरनिराळ्या रंगांचे आईसक्रीम
छतावरून उलटे लटकवलेले होते.
त्यात विजेरी दिवे लावलेले होते, त्यामुळे ते
छान उजळून निघाले होते.
त्याच दुकानातील विविध चवीचे जीलाटो!
आईसक्रीम म्हणजे माझा जीव की प्राण.
तथापि तेथील थंडीत आरोग्य सांभाळणे गरजेचे होते.
त्यामुळे मी फक्त चव घेतली...
एका दुकानाच्या दर्शनी भागात, ह्या विविध रंगांच्या आणि नक्षीच्या
मोज्यांचे प्रदर्शन भरविले होते.
हल्लीची पिढी असल्या पीन, कपड्यांवर लावतात.
एका सुपर मार्केट मध्ये मांडलेल्या
भाज्या आणि फळे
विविध रंगांच्या, परंतु सारख्या आकाराच्या
मेणबत्त्या
क्रीमच्या सहाय्याने सजवलेली बिस्किटे
तिथे एक खास प्रकारचे आईसक्रीम मिळते.
ते आईसक्रीम नेहामी प्रमाणे कुरकुरीत कोन मध्ये न देता,
दंडगोलाकार परंतु आतून पोकळ असलेल्या पावात देतात.
तोच हा पाव, परंतु बाहेरच्या बाजूने बारीक-बारीक रंगीत गोळ्यांनी सजविलेला.
एका उपवनाजवळ फिरत असतांना पाहिले,
तर तिथे कसलेसे चित्रीकरण चालू होते.
त्यात काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांनी छान
झळाळत्या रंगांचे पोशाख परिधान केलेले होते.
त्या हवामानांत अनेक प्रकारच्या बेरी पिकतात.
सगळ्या प्रकारच्या थोड्या थोड्या बेरीज एकत्र
करून एक फळांचे वाडगे तयार केले जातात.
तेच हे विक्री साठी ठेवलेले वाडगे!
निरनिराळ्या प्रकारचे आकर्षक रंगांचे मलम
छान फिक्या रंगांच्या छटांचे कपडे.
बॉडी डीओ
लहान-मोठे सगळ्यांच्याच आवडीच्या गोळ्या
चिंच तत्सम आंबट चवीच्या फळांच्या तार
गोळ्या
याही गोळ्याच आहेत. रंगीत सजावटीचे दगड वाटतात.
काही खेळणी, त्यांची नावे काही लक्षात नाहीत माझ्या
हे परत बिस्कीट आणि क्रीम
नाव आहे याचे सुद्धा काहीतरी.
©️®️ आनंदी पाऊस
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
२३जुन २०२६
.jpg)
.jpg)




.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
Sundar
ReplyDeleteSuperb 💃💃🌈🌺🌸🌼🌹🪷🌷💐
ReplyDeleteरंगाची उधळण वाचली.
ReplyDeleteखूप आनंद झाला.
रंगाची उधळण मला पण आवडते.
पण
अशी प्रवास करत असताना टिपलेली विविध छायाचित्रे रंग उधळून आगळीवेगळी च.
I salute you
ReplyDeleteBeautiful 😍
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteColourful दुनिया
Very nice. 👍👍👌👌
ReplyDeleteरंगा मुळे मानवी जीवनात आनंद येतो.मन प्रसन्न होते.लेखातील रंग पाहून मन प्रसन्न झाले
ReplyDelete