नृत्य गणेश
(अभ्यासातून रंजन...)
श्री चन्न केशव मंदिर, बेलूर, हसन, कर्नाटक, भारत
गणराज रंगि नाचतो नाचतो
पायि घागऱ्या करिती रुणझुण
नाद स्वर्गि पोचतो...
कटि पीतांबर कसून भर्जरी
बाल गजाननास नर्तनास करी
तुंदिल तनु तरी चपल साजिरी
लावण्ये साजतो...
नारद तुंबरू करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रह्मा धरितो तालहि रंगून
मृदंग धिमि वाजतो...
देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो...
पायि घागऱ्या करिती रुणझुण
नाद स्वर्गि पोचतो...
कटि पीतांबर कसून भर्जरी
बाल गजाननास नर्तनास करी
तुंदिल तनु तरी चपल साजिरी
लावण्ये साजतो...
नारद तुंबरू करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रह्मा धरितो तालहि रंगून
मृदंग धिमि वाजतो...
देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो...
या गाण्यातून गणेशाची नृत्य निपुणता तर दिसतेच, पण त्यातून नृत्य गणेशाचे मुर्तीशास्त्र सुद्धा कळते.
शांताबाई शेकळेच त्या, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?
शांताबाई सादर प्रणाम तुम्हाला, अगदी
वारंवार !
गणेशाला चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती मानले जाते. ज्ञानेश्वरांनी सुद्धा सुरवातीला चौदा विद्यांनी आणि चौसष्ट कलांनी मंडित अशा गणेशाचे स्तवन केले आहे. "चौदा विद्या तुमच्या कृपेने येतील I मुले बोलतील वेदघोष II " संत नामदेव सुद्धा अशा प्रकारे आळवतात .
आदिमानवाच्या अगदी रानटी अवस्थेतही अनेक कला निर्माण झाल्या . त्या म्हणजे उपजीविकेसाठी लागणारी शिकारीची हत्यारं तयार करण्याची कला, शरीर विभूषित करण्याची कला, गुहांमधील चित्रकला वगैरे वगैरे. कारण आहार आणि झोप या शारीरिक मूलभूत गरजा तर आहेतच पण त्या खालोखाल सगळ्यात महत्वाची मानसिक गरज म्हणजे आपल्या भावना व्यक्त करणे आणि या गरजेमधूनच कलांचा जन्म झाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कला या शब्दाची व्यापकता लक्षात घेऊन प्राचीन भारतीयांनी चौसष्ट कला ठरवल्या आहेत. यांची यादी शुक्रयोनीतल्या भागवतात आणि वात्सायनाच्या कामसूत्रात निरनिराळी दिली आहे. प्रबंध कोषात कलांची संख्या बहात्तर दिलेली आहे. या चौसष्ट कलांमध्ये गायन, वादन, नृत्य, चित्रकला, जलतरंग या ठळक कलांचा समावेश होतो.
षोडशा गणपती तत्वज्ञानाप्रमाणे, गणपतीचे सगळ्यात पहिले स्वरूप म्हणजे नृत्य गणेश. गणेश कल्पवृक्षाखाली नृत्य करी असल्याने, कल्पवृक्ष सगळ्या सदिच्छा बहाल करतो. त्यामुळे सगळे नर्तक त्यांची कला सादर करतांना, सगळ्यात आधी गणेशाला आवाहन करतात. त्यामुळे त्यांचे नृत्य विनासायास आणि यशस्वीपणे पार पडते. काही शिल्पांमध्ये गणेश त्याच्या साथीदारांसह आम्र वृक्षाखाली नृत्य करतांना दिसतो. एकोणिसाव्या शतकात म्हैसुरू महाराजांच्या देवांच्या प्रतिमांच्या संकलनात सुद्धा नृत्य गणेश आढळतो. हे संकलन म्हणजे " श्री तत्वनिधी" यादी.
नृत्य गणेशाबद्दल एक मनोरंजक आख्यायिका सांगितली जाते. एकदा गणेश मार्गस्थ असतांना ब्रह्मदेवांवर आदळला. त्यामुळे ब्रह्मदेवांना धक्का बसला आणि ते गणेशावर क्रोधीत झाले. त्यांनी गणेशाला शाप देण्याचा इशारा केला. मग त्यांना खूष करण्यासाठी गणेश नृत्य करू लागला. महाकाय शरीरयष्टी असूनही गणेशाने केलेले आकर्षक नृत्य आणि चपळ हालचाली बघून ब्रह्मदेवांचा राग शांत झाला आणि त्यांनी गणेशाला क्षमा केली आणि गणेशाला नृत्य निष्णात म्हणून जाहीर केले.
नर्तकांना गणेशा संबंधीचे नृत्य अविष्कार प्रस्तुत करतांना त्याच्या ठेंगण्या आणि महाकाय शरीरासोबतच, त्याचे सुबक आणि आकर्षक, पण चपळ नृत्यभाव शिकविले जातात. खरंतर गणेश म्हणजे जन्मतः एक नर्तक आहे, कारण तो शिव आणि पार्वती यांचा पुत्र आहे. शिवाचे तांडव नृत्य आणि पार्वतीचे लास्य नृत्य याचे संयुक्त पण अगदी संतुलित नृत्य म्हणजे गणेश नृत्य. अगदी प्रभावी, जोमदार पण तितकेच नाजूक! गणेशाच्या नृत्य कौशल्याचे वर्णन क्रीडा-खंडात बघायला मिळते. त्यात गणेश नृत्य बघून शिव आनंदीत झाल्याचे पण वर्णन आहे. लिंग पुराणाप्रमाणे तर शिवाने गणेशाला निर्माण केल्याबरोबर, गणेशाने नृत्य करायला सुरुवात केल्याचा उल्लेख मिळतो.
गणेश नृत्य निपुण होताच. त्याने शंकरपार्वती समोर नृत्य करून डोक्यावरचा चंद्र व इतर आभूषणे आणि सर्व गणांचे अधिपत्य मिळविले होते. ब्रह्म पुराणाप्रमाणे आपल्या नुपूरांचा शब्द करूनच त्याने शिवाला प्रसन्न केले होते. परशु, कमळ, अंकुश आणि मोदक घेतलेल्या, घागऱ्या असलेली नुपुरें, वाकी, कुंडले, मुगुट इत्यादींनी नटलेला असा हा नृत्य गणेश आहे. मध्यकाळातील बऱ्याच प्रतिमा मिळतात. हे सहा, आठ, दहा हातांचे दिसतात. कित्येक ठिकाणी गणेश आपले दोन हात डोक्यावर नेऊन त्यात एका मोठ्या सापाला आडवे धरतो. नृत्याचा तोल सांभाळण्यासाठी त्याचा उपयोग होत असावा.
काही ठळक नृत्य गणेश प्रतिमा
बंगळुरू येथील एका संग्रहालयात, एक उत्तर भारतीय दशभुज नृत्य गणेश प्रतिमा आहे. त्यात डोक्यावर दोन साप अशा प्रकारे धरले आहेत की त्यांची तोंड एकमेकांशी जुळलेली दिसतात. येथेच दुसरी गंमत अशीही दिसते की त्याने आपल्या उजवीकडच्या चौथ्या हातात शेपटीच्या बाजूने खाली तोंड केलेला उंदीर धरला आहे. अर्थातच ही मूर्तिकाराची लहर म्हणावी लागेल. काही ठिकाणी नृत्य गणेशाच्या पायात घुंगरू असून आजूबाजूला वाद्य घेतलेले साथीदारही दिसतात.
शेष वाहन नृत्य गणेश
गणपतीचा सहावा अवतार 'विघ्नराज' याला मुद्गल पुराणात 'शेष वाहन' म्हटले आहे. हिमाचल प्रदेशात १७-१८ व्या शतकात मिळालेल्या एका प्रतिमेत हातात घंटा घेऊन सर्पावर नाचणारा चतुर्भुज गणपती दिसतो.
मूषक वाहन नृत्य गणेश
बंगाल मध्ये मिळालेला पाल कलेचा अष्टभुज गणेश उंदरावर नाचत असून पायाजवळ असणारे त्याचे साथीदार लक्षणीय आहेत. उजवीकडचा झांज वाजविणारा उंदराच्या कानाचा आहे तर डावीकडे मृदूंग वाजविणारा हत्तीच्या कानाचा आहे. देवाच्या डोक्यावर पाच फळे असलेली आंब्याची डहाळी आहे.
नृत्य गणेश आणि मातृका
नृत्य गणेश आणि मातृका यांचा जवळचा संबंध दाखवणारी प्रतिहार कालीन नृत्य गणेश प्रतिमा कन्नौज आणि फतेहगढ (उत्तर प्रदेश) येथे आहे. कन्नौज प्रतिमेत सहा हातांचा नृत्य गणेश असून त्याच्या चौकटीत तिन्ही बाजूला निरनिराळ्या देवता आहेत. वरच्या भागात वीणाधर शिवसह सप्तमातृका दिसतात. उजवीकडे वरून सिंह वाहिनी दुर्गा आणि गाईसह लहानशी घागर घेतलेला गोपालकृष्ण आहे. त्यासोबत डाव्याबाजूला पशुमुखी बाळाला मांडीवर घेऊन बसलेली चतुर्भुज वाराही आणि शंख वाजविणारी एक स्त्री उभी आहे. वाराहीचे पशुमुखी बाळ म्हणजे तिचा पुत्र चंडोच्चंड असावा. नृत्यगणेशाच्या या प्रतिमेच्या पृष्ठ भागावर आजूबाजूला विष्णुमूर्ती असलेली तपस्विनी पार्वती उभी आहे.
दुसरे शिल्प फतेहगढ येथे आहे. हे शिल्पं तूर्त येथील चित्रगुप्त मंदिराच्या भिंतीत चिणलेले आहे. अष्टभुज गणेश नाचत आहे. पायाशी दोन साथीदार आहेत. उजव्याबाजूच्या खांबावर चतुर्भुज गजलक्ष्मी, शिव आणि घंटा घेतलेली कौशिकी आहे. डावीकडील खांबावर सरस्वती सिंहावर बसलेली शरसंधान करणारी दुर्गा आणि बाळासह बसलेली एक मातृका आहे. गणपतीजवळ गजलक्ष्मी, सरस्वती, कौशिकी, शरसंधान करणारी दुर्गा यांचे एकत्र अंकन दुर्मिळ आहे.
कुठल्याही मंगलकार्याचा आरंभ गणेश पूजनाने तर होतोच, परंतु नृत्य क्षेत्रात सुद्धा गणेशाला विशेष मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. प्राचीन काळापासून नृत्यामध्ये श्रीगणेशाचे वर्णन केलेले आढळते. मूर्तिशास्त्राप्रमाणेच नर्तनशास्त्रात देखील विविध असे स्थानक, शरीराकृती नृत्यगणेश नर्तक साकारतो. ज्याप्रमाणे गणपतीच्या सोंडेचा कलात्मकरित्या उपयोग अनेक शिल्पातून केलेला पाहायला मिळतो, त्याच प्रमाणे नर्तक देखील सोंडेच्या वेगवेगळ्या अवस्था साकारतांना दिसतो. श्रीगणेशाच्या सोंडेच्या वक्ररचना खूपच आकर्षक वाटतात. एकदंत, शूर्पकर्ण, वक्रतुंड ही श्रीगणेशाची रूपे नर्तक शरीराकृतीतून साकारतांना चारींचा-पदभंगिमांचा वापर करतोच, त्याच प्रमाणे शास्त्रानुसार नमूद केलेल्या मुद्रांचादेखील तो योग्यप्रकारे वापर करतो. दोन्ही हातांनी जेव्हा कपित्थ हस्त वक्षस्थलांवर ठेवलेले असतील, तेव्हा तो 'गणपतीहस्त' म्हटला जातो. नाट्यशास्त्रात 'करिहस्त' नावाच्या हस्तक्रियेत असाच कलात्मक विचार पाहायला मिळतो, ज्यामध्ये हत्तीच्या सोंडेप्रमाणे अत्यंत लवचिक अशी हस्तक्रिया जी कुठेही फिरविता येते ती अपेक्षित आहे. ही हालचाल नाजूक असणे आवश्यक आहे. या हस्तक्रियेच्या साहाय्याने कलाकार श्रीगणेशाच्या मुद्रा विविध पद्धतीने दाखवू शकतो. उद्घृत हस्तमुद्रेबरोबरच 'मूषकहस्ताचा' देखील वापर केला जातो. 'दोलापाद', 'गजगती', 'मोटितमंडल' इत्यादी प्रयोग तसेच 'शकटास्य', 'गजक्रिडित', 'लोलीत' यासारख्या कर्णाचे संकलन केले जाते.
नृत्य गणेशाची मूर्ती घरात ठेवू नये असा गैरसमज आढळतो. या स्वरूपातील गणेश घरात असेल तर तो नाचवतो असे समजतात. मात्र यात तथ्य नाही. कारण असे असेल तर बसलेली मूर्ती ठेवली तर ती बसवते, असा अर्थ होईल. समर्थ रामदासांनी तर दासबोधाच्या प्रारंभीच नृत्य गणेशाला वंदन केले आहे. एव्हढेच नाही तर रायगडावरील राणीवश्याच्या दुसऱ्या दाराच्या चौकटीवर नृत्य गणेशाचे शिल्पांकन केलेलं आहे. गणेशाला नृत्याच्या क्षेत्रात प्रवेश करतांना पाहून लक्ष्मीने त्याला नुपूर आणि अंगद दिल्याचा उल्लेख पुराणात आढळतो.
मंदिर भेट देते वेळी नीट निरीक्षण करून पाहिले तर अशा असंख्य नृत्य गणेश प्रतिमा बघायला मिळतात. उदाहरणच द्यायचे झाले तर, हाळेबिडू येथील होयसाळेश्वर या मंदिराच्या मंडोवरावर अशी एक अतिशय देखणी नृत्य गणेशाची प्रतिमा बघायला मिळते. साधारणपणे पाचव्या सहाव्या शतकानंतरच्या प्रत्येक मंदिराच्या कुठल्या न कुठल्या भागात अगदी लहान पासुन भव्य अशा नृत्य गणेशाची एक तरी प्रतिमा आढळतेच.

II इति श्री नृत्य गणेश पुराणम् II
मंदिर, जवागल, हसन, कर्नाटक, भारत
श्री चन्न केशव मंदिर, सोमनाथपूर, कर्नाटक, भारत
होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडु, हसन, कर्नाटक, भारत
आनंदी पाऊस
(अभ्यासातून रंजन...)

फार सुंदर माहिती दिली आहेस. संग्रहित करून ठेवण्यासारखी.
ReplyDeleteडॉ. ओरोसकर
अभिनंदन!
ReplyDeleteछान आहे आनंद वाटला
Khuff khuff Chan mahiti.....👌🏻👌🏻🙏🙏🌹💐🌹💐🌹💐🌹💐
ReplyDeleteछानच
ReplyDelete👌👌खूपच छान
ReplyDeleteखूप छान माहिती 👌👌
ReplyDelete👌👍🙏
ReplyDeleteChchan Murti
ReplyDeleteउत्कृष्ट माहिती!
ReplyDeleteनृत्य गणेश , अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण लेख . फोटोंसह सखोल माहिती . बऱ्याच गोष्टी माहीती नव्हत्या त्या समजल्यात व ज्ञानात भर पडली .
ReplyDeleteखूपच छान.
ReplyDeleteनृत्य गणेशाची सखोल माहिती दिली आहे छान आहे. नांदेड जिल्ह्यात hottal येथील सिद्धेश्वर मंदिर,मुखेड येथील महादेव मंदिरात, आंबेजोगाई येथे ही नृत्य गणेश प्रतिमा आढळतात
ReplyDeleteI salute you ..
ReplyDelete