Skip to main content

Posts

नामा म्हणे आता लोपला दिनकर l (featured)

नामा म्हणे आता लोपला दिनकर l बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ... (featured)  जलसंवाद विशेषांक - लेख                आपण सारेच अगदी नकळत्या वयापासून रामायण-महाभारतातील कथा ऐकत असतो. या कथांत मौजीबंधन झाले, की गुरूगृही म्हणजे ऋषींच्या आश्रमांत जाऊन शिक्षा ग्रहण करण्याची प्रथा होती. तथापि सर्वसाधारणपणे सारेच ही एक भूतकाळातील गोष्ट आहे म्हणून त्याकडे बघतात. परंतु माझ्या मनाला मात्र नेहमीच या शिक्षण पद्धतीचा, त्या प्रकारच्या गुरूंचा ध्यास लागलेला असे. आपल्यालाही असे ऋषी, गुरु म्हणून लाभावे आणि त्यांच्याकडून विद्या ग्रहण करण्याची संधी मिळावी असे मनापासून वाटे. एक मन सांगे, हे कलीयुग आहे, या युगात असे गुरु लाभणे अतिशय दुरापास्त. तथापि दुसरे मन या गोष्टीचा ध्यास सोडायला तयार नव्हते.                आणि चमत्कारच झाला जणू! सर्वसाधारणपणे गुरूंकडे जाऊन अभ्यास केला जातो. परंतु विरोधाभास असा, की मला अभ्यास ध्यासातून गुरु प्राप्ती झाली. कलियुगात ऋषीतुल्य गुरु लाभले. अर्थातच हे ऋषीतुल्य गुरु म्हणजे  आंतरराष्ट्रीय क...

वळणदार, नक्षीदार मसूरी

 ➰➿ वळणदार, नक्षीदार मसूरी (गोष्टी पर्यटनाच्या...)  मसूरी भौगोलिक स्थान - ३०.४५° उत्तर, ७८.०८° पूर्व, उंची समुद्रसपाटीपासून २००५ मी. जिल्हा देहराडून, उत्तराखंड , भारत. डेहराडून शहरापासून ३४ किमी, डेहराडून विमानतळापासून ५८ किमी.                          हे एक थंड हवेचे ठिकाण आहे, हे सर्वज्ञात आहेच. तथापि माझ्या मनात विचार आला, मसूरी शब्दाचा अर्थ काय? या गावाला असे नाव का मिळाले? मसूर/मसुरीच्या डाळीशी याचा काही संबंध आहे काय? तथापि थोडा शोध घेतला, तेव्हा असे कळले, या भागात मन्सूर नावाचे एक झुडूप पुष्कळ प्रमाणात आढळते. मन्सूर या शब्दचा अपभ्रंश होऊन तो मसूरी झाला. यामुळे या स्थळाला मसूरी असे नाव मिळाले. या झुडूपाचे शास्त्रीय नाव 'युफोर्बिया नेरीफोलीया' (euphorbia neriifolia) असे असून, याला मराठीत 'त्रिफळा निवडुंग' या नावाने ओळखले जाते. यालाच 'इंडियन स्पर्जट्री' या नावानेही ओळखतात.                           'गोष्टी पर्यटनाच्या' असल्या तरी यात मी नेह...

एका प्रवासाच्या प्रवासाची गोष्ट(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

 एका  प्रवासाच्या प्रवासाची गोष्ट  (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) पऱ्यांच्या देशातील एका उपवनातील बोगदा                          आपल्यापैकी प्रत्येक जण प्रवास करतच असतो. त्याची कारणं प्रत्येकाची निरनिराळी असतात. प्रवासाची माध्यमं सुद्धा वेगवेगळी असतात. प्रवासाचा कालावधी सुद्धा अगदी काही मिनिटा पासून ते काही दिवसांपर्यंत असतो. यासोबतच या प्रवासाच्या नियोजना मध्ये खूप फरक असतो, एखादा प्रवास काही महिने आधी ठरतो तर एखादा प्रवास लगेच ठरतो आणि लगोलग प्रवासाला निघावे सुद्धा लागते. माझेही थोड्या फार प्रमाणांत असेच असते. तथापि एक प्रवास फारच रंजक प्रकारे झाला. इतका की, या 'प्रवासाचा प्रवास' अशी मोठ्ठी गोष्टच तयार झाली. आज ती गोष्ट सांगते.                          तर झाले काय, माझ्या लाडक्या भाचीने शिक्षणासाठी परदेशी जायचे ठरविले. पुढे त्या दृष्टीने गोष्टी सुरु झाल्या. तिचा व्हिसा प्रकरणाची कामं सुरु असतांना मी काही कारणाने त्यांच्याकडे गेले होते, त्यामु...

सीताबनी, काॅर्बेट(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

 सीताबनी सफारी (काॅर्बेट संरक्षक पट्टा) (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) मुख्य प्रवेशद्वार  सीताबनी - भारतातील उत्तराखंड राज्यात असलेले जिम कॉर्बेट या मुख्य जंगलाच्या संरक्षक पट्ट्यात सिताबनी हा भाग आहे. रामनगर येथे पोहोचल्यावर, तिथे या भटकंती साठी आरक्षण करता येते. या भटकंतीची गाडी तुमच्या वसतीस्थानापर्यंत येते आणि तुम्हाला घेऊन जाते. जाण्या-येण्याचा एक-एक तास आणि तिथे दोन तास, असे सर्व मिळून साधारण चार तासाची ही भटकंती असते. रहदारी असेल तर अजून जास्त वेळ. एक महत्वाचे म्हणजे ही भटकंती फक्त १५ ऑक्टोबर ते १५ जून या काळातच असते. या व्यतिरिक्त गेलात तर ही संधी हुकणार.                          सफारी हा शब्द मूळ स्वाहिली भाषेतील आहे. स्वाहिली ही टांझानिया देशाची मुख्य भाषा आहे. सफारी हा शब्द मूळ अरबी भाषेतील सफर या शब्दावरून आलेला आहे. सफर या शब्दचा अर्थ प्रवास असा आहे. तर सफारी या शब्दाचा अर्थ, 'लांबचा प्रवास' किंवा 'एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे'.अर्थातच जंगल सफारी याचा अर्थ जंगलातील लांबचा प्रवास किंवा जंगलातील फ...