➰➿ वळणदार, नक्षीदार मसूरी
(गोष्टी पर्यटनाच्या...)
मसूरी
भौगोलिक स्थान - ३०.४५° उत्तर, ७८.०८° पूर्व, उंची समुद्रसपाटीपासून २००५ मी.
जिल्हा देहराडून, उत्तराखंड , भारत.
डेहराडून शहरापासून ३४ किमी, डेहराडून विमानतळापासून ५८ किमी.
हे एक थंड हवेचे ठिकाण आहे, हे सर्वज्ञात आहेच. तथापि माझ्या मनात विचार आला, मसूरी शब्दाचा अर्थ काय? या गावाला असे नाव का मिळाले? मसूर/मसुरीच्या डाळीशी याचा काही संबंध आहे काय? तथापि थोडा शोध घेतला, तेव्हा असे कळले, या भागात मन्सूर नावाचे एक झुडूप पुष्कळ प्रमाणात आढळते. मन्सूर या शब्दचा अपभ्रंश होऊन तो मसूरी झाला. यामुळे या स्थळाला मसूरी असे नाव मिळाले. या झुडूपाचे शास्त्रीय नाव 'युफोर्बिया नेरीफोलीया' (euphorbia neriifolia) असे असून, याला मराठीत 'त्रिफळा निवडुंग' या नावाने ओळखले जाते. यालाच 'इंडियन स्पर्जट्री' या नावानेही ओळखतात.
'गोष्टी पर्यटनाच्या' असल्या तरी यात मी नेहमीची माहिती देणार नाही, हे शीर्षकावरून स्पष्टच दिसते आहे. तथापि माझ्या पर्यटनातील मला भावलेल्या काही गोष्टींची महिती या लेखात वाचायला मिळणार आहे. तर मी या स्थळाला भेट दिली तेव्हा, इथला मौसम आणि शालेय सुट्ट्या, यामुळे इतकी तोबा गर्दी होती की, आमच्या ४८ तासाच्या मुक्कामात, आमच्या वसतीस्थानाच्या बाजूने असलेल्या रस्त्यावर अखंडपणे निरनिराळ्या चार चाकी गाड्यांची कोंडी झालेली होती. एकही क्षण आम्हाला असा दिसला नाही की या रस्त्यावर एकाला एक लागून गाड्या नाहीत. तसेच मसूरीला पोहोचते वेळी अगदी जवळ आल्यावर, म्हणजे एक किमी बाकी असतांना, हे अंतर पार करायला आम्हाला जवळपास दोन तास लागले.
उपरोक्त परिस्थिती पाहता, आम्ही विचार केला, एखादी गाडी भाड्याने घेऊन, काही पर्यटन ठिकाणे पाहायला जाणे म्हणजे या रहदारीत तासंतास अडकणे होय. त्यापेक्षा चालत जाऊन बघता येतील अशी ठिकाणे शोधावी आणि त्याच स्थळांना भेट द्यावी. मग अशी ठिकाणे हुडकून त्या ठिकाणी चालत चालत जाऊन भेटी दिल्या. या सगळ्यामुळे आम्हाला बरेच फायदे झाले. १.रहदारीत अडकलो नाहीत. २.गाडीच्या भाड्याचे पैसे वाचले. ३.निसर्गाच्या कुशीत तेव्हढेच प्रदूषण कमी झाले. ४.चालणे आमचा छंद आहे, त्यामुळे...😇😍 ५.चालल्यामुळे आमचा छान व्यायाम झाला. ६.चालत गेल्याने जाण्या-येण्याच्या रस्त्यावरील सर्व गोष्टी बारकाईने बघता आल्या. ७.तिथल्या निसर्गाचा भाग म्हणजे डोंगर-दऱ्या, झाडे-झुडुपे, निरनिराळी दुकानं, विक्रीसाठी असलेली फळं; हे आणि असे सारे तपशिलात जाऊन बघायला मिळाले. काही निराळे फळ असेल तर ते चाखून सुद्धा बघितले. आवडले म्हणून सरळ विकत घेतले आणि रस्त्याने चालता चालता खाता सुद्धा आले. ८.तसेच स्ट्रीट फर्निचर म्हणजेच रस्त्यावर असलेली विविध प्रकारची उपकरणे म्हणजे विविध प्रकारचे बाक, कठडे, विविध नक्षीची सजावट असलेले दिव्यांचे खांब, निरनिराळ्या आकाराचे आणि रचनेचे, छत आणि कठडे असलेल्या रचना म्हणजे विसावा छत्र्या, ज्यात बसण्यासाठी बाकांची सोय असते, तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी असलेले त्रिमितीय भित्तीचित्रं (म्युरल) इत्यादी छान वेळ घेऊन सविस्तर बघता आले.
यातील एक माझ्या अत्यंत आवडीचा आणि माझे लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे नक्षीदार, वळणदार धातू. मग तो कुठल्याची प्रकारचा असतो. यात रस्त्यावरील सर्व प्रकारची उपकरणे येतात. ही सर्व उपकरणे राॅट आयर्न पासून बनवलेली असतात. रॉट आयर्न म्हणजे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार असतो. ज्यावर उन्हा-पावसाचा परिमाण होत नाही. म्हणजे हे गंजत नाही, याची लवचिकता अतिशय उत्कृष्ट असल्याने, त्यात कितीही किचकट नक्षी असली तरी बनवता येते. अशा त्याच्या विविध गुणधर्मामुळे यातून अतिशय सुंदर नक्षी साकारता येतात. तर अशा प्रकारची निरनिराळी उपकरणे पुष्कळ प्रमाणात बघायला मिळाली. अगदी स्वर्गीय आनंद!
अशा सर्व प्रकारच्या वळणदार आणि नक्षीदार धातूची भरपूर प्रकशचित्रं टिपली. त्यातील काही खाली जोडली आहेत. जेणे करून आनंदी वाचक सुद्धा हे सगळे बघू शकतील आणि त्याचा आनंद घेऊ शकतील. सोबतीनेच मी टिपलेल्या, या विषयावरील प्रकाशचित्रांचे दस्तावेजीकरण होईल.
तर हे काही नक्षीदार, वळणदार धातू...
वळणदार, नक्षीदार मसूरी...
रस्त्यावरील दिवा-खांब
रात्रीच्या वेळी
रस्त्यावरील दिवा-खांब
दिवसाच्या वेळी
त्याच खांबाचा खालचा भाग
फुलं-पत्तीच्या नक्षीने सुशोभित केलेला.
अष्टकोनी विसावा छत्री
या ठिकाणाचे नाव 'हवा महल'
विसावा छत्री
विसावा छत्रीच्या खांबाचे स्तंभशीर्ष आणि हस्त
खांबाचा स्तंबपाद
रस्त्यावर जागोजागी असे बाक ठेवलेले आहेत.
त्याच बाकाच्या पाठीच्या भागाची नक्षी
कठडे
कठड्यातील नक्षीदार वामन स्तंभ
हा अजून एक प्रकारचा बाक
भित्ती-दिवा
अष्टकोनी विसावा छत्री
सिंह - बाकाच्या बाजूला आणि विसावा छत्र्यांच्या
प्रवेशाच्या दोन्ही बाजूला असलेला सजावटीचा भाग
तिसऱ्या प्रकारच्या नक्षीचे बाक
एका आकाराचे फाटक
एका विसावा छत्रीचे खांब,
स्तंभ हस्त आणि तुळई
एक फाटक
एके ठिकाणी असलेली वर्तुळाकार जाळी
खांब, स्तंभ तरंग, तुळई
नक्षीदार कठडे, खांब
खांबावरील वळणदार वल्लरीची नक्षी
आयताकृती विसावा छत्री
रस्त्यावरी विजेरी दिवा आणि त्याचा नक्षीदार खांब
रस्त्यावर असलेले धातूचे झाकण
झंडा ऊंचा रहे हमारा!
जयहिंद!
©️®️ आनंदी पाऊस
(गोष्टी पर्यटनाच्या...)
२१ जून २०२६

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)

.jpg)
.jpg)
.jpg)













मस्तच, अप्रतीम. आम्ही पण 2014 साली गेलो होतो मसुरी, नैनीताल, जिम कॉरबेट.
ReplyDeleteवर्णन छानच केलेय 😄
ReplyDeleteछान माहिती दिली आहे 👍👍
ReplyDeleteWow!
ReplyDeleteNice!
अप्रतीम लेख. वेगळी माहिती मिळाली
ReplyDeleteSunder
ReplyDeleteखुप छान माहितीपूर्ण लेख
ReplyDelete👍👍
ReplyDeleteलेखाची रचना खूपच छान...
आवडले...
😍😍
👌😄 मस्त
ReplyDeleteखूप छान लेख आहे माहीत छान आहे
ReplyDeleteवा वा छान माहिती, वर्णन, आणि नक्षीदार धातू चे प्रकाशचित्रे 👌👌👍
ReplyDeleteसुंदर नक्षीदार धातूंचे फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणेच खूप छान
ReplyDeleteमसुरी आम्ही पाहिली पण तुझी नजर वेगळी
ReplyDeleteमसुरीला आम्ही गेलो होतो..त्या घरांचा विचार मी केला...पण हे असं नाही ग...अनोखी माहिती दिलीस
ReplyDeleteसुंदर वर्णन नेहमीप्रमाणेच photo's पण 👌👌
ReplyDeleteतुझ्या निरिक्षण शक्ति la सलाम
ReplyDeleteछान ,सुंदर👌
ReplyDeleteखूप सुंदर माहिती, फोटो तसेच सादरीकरण उत्तम 👌👌👌
ReplyDeleteछान, सुंदर आणि उपयुक्त माहिती,
ReplyDeleteवाचून खूप आनंद झाला.
नक्षीदार धातूचे प्रकाशचित्रे व माहिती छान आहे
ReplyDeleteभारीच & रीच कलाकुसर ओतीव लोखंडाची ब्रिटिश कालीन कला-कृपा ...आपण टिपलेले प्र चि अलंकारीकच...सिलावूट फोटोग्राफी पण छानदिसेल...पाऊस, स्नोफाँल चेdroplets अजून नक्षीदार खांब कठडे इ.मध्ये अधिक सौंदर्य खुलवत असेल हे अगदी नक्कीच...
ReplyDeleteमी मात्र डलहौसी परिसरपाहिलाय ..
जस्ट remembered...संजिता