दळण (घरातील गमती जमती) या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही. ...
अगदी खरे आहे . प्रत्येक पोस्ट जीवनाचे मर्म सांगते
ReplyDeleteअगदी खरे आहे. प्रत्येक पोस्ट जीवनाचे मर्म सांगते.
ReplyDeleteखरं आहे. छानच 👍
ReplyDeleteसारेच "सुविचार"आल्हाददायक आहे.त्यांची " मागची Background "भित्तिचित्रे सुबकरित्या मांडलीय.
ReplyDeleteखरच छान आहे
ReplyDeleteप्रत्येकात हिरवागार निसर्ग दडलाय वा खरच आहे
ReplyDeleteखरय ताई...
ReplyDeleteसोशियल मीडिया मुले संवाद सुरूआहे..
आणि त्या मुळेच का होईना आपल्यात हिरवा निसर्ग ही बाहेर येतोय😊🙏🏻
हा एका कुठल्या विषयावरचा लेख नसल्यामुळे त्यावर अभिप्राय लिहिणे जरा कठिणच आहे. तुला जसे सुचले तसे मुद्दे आणी त्यावरची तुझी मतं मांडली आहेस. Anyway आपण एक एक मुद्द्याचा समाचार घेऊया.
ReplyDeleteप्रत्येकाच्या मानात नक्कीच अनेक निसर्ग दडलेले असतात, पण तो व्यक्ति सापेक्ष वेगवेगळा असतो. शिवाय एका व्यक्तीला पण वेगवेगळ्या मूड मध्ये वेगवेगळा निसर्ग अनुभवायला येतो. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या आवडीनुसार आपल्या मनातील निसर्ग फुलवावा .
सोशल मीडिया हा एक विवादास्पद मुद्दा आहे. निश्चितपणे सध्याच्या काळात जी अखंड संवाद क्रांती होते आहे, त्याच्या मुळाशी सोशल मीडियाच आहे. अनेक लांब असलेले मित्र किंवा नातेवाईकांना ह्या मीडिया ने संवादासाठी जवळ आणले आहे. पण त्याच्या अतिरेकी उपयोगाने माणसं फार आत्मकेंद्रित आणी एकलकोंडी पण झाली आहेत
प्रेम हे कुठल्याही स्वरूपाचे का असेना अद्वैतच असते यात शंका नाही. प्रेम ह्या विषयावर इतके लेखन आणी चर्चा झाल्या आहेत व मानवी स्वभावाचा हा एक आवश्यक आणी अनिवार्य भाग आहे हे सिद्ध पण झालं आहे. सोशल मीडिया मुळे त्याची व्यक्तता वाढली आहे हे मात्र नक्की.
जबाबदारी आणी हक्क ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बेजबाबदार हक्क आणी बेजबाबदार अपेक्षा पण एकत्र नांदू शकत नाहीत. असो, हा एक एक मोठ्ठाच विषय आहे. ज्याला जबाबदारी कळते तो हक्क गाजवेलच असं नाही आणी काही जण जबाबदारीची तमा न बाळगता अपेक्षांचं ओझं लादतात ते पण आक्षेपार्ह आहेच .
दुर्दैवाने अजून पर्यंत तरी ज्ञानेश्वरीच्या वाचनाचा किंवा ज्याने ती अभ्यासली आहे त्याचा सहवास घडायचा योग काही आला नाही, त्यामुळे तो अनुभव माझ्या बाबतीत तरी रिता आहे. पण एकदा वाचन करायचा मानस तर आहेच, तेंव्हा माझा अनुभव कथन करेनच
ही विविध मुद्द्यांची किंवा विचारांची मांडणी अगदी वेगळी वाटली बुवा.
१००%सत्य विचार. त्यांच्या नुसार वैचारीक प्रगती व्हायला हवी.🙏🙏🙏🙏
ReplyDelete