Skip to main content

सुचलेलं काही ६- (काही अनुभवलेलं ...)


सुचलेलं काही - ६ 

(काही अनुभवलेलं ...)








 




















 

Comments

  1. अगदी खरे आहे . प्रत्येक पोस्ट जीवनाचे मर्म सांगते

    ReplyDelete
  2. अगदी खरे आहे. प्रत्येक पोस्ट जीवनाचे मर्म सांगते.

    ReplyDelete
  3. सारेच "सुविचार"आल्हाददायक आहे.त्यांची " मागची Background "भित्तिचित्रे सुबकरित्या मांडलीय.

    ReplyDelete
  4. खरच छान आहे

    ReplyDelete
  5. प्रत्येकात हिरवागार निसर्ग दडलाय वा खरच आहे

    ReplyDelete
  6. खरय ताई...
    सोशियल मीडिया मुले संवाद सुरूआहे..
    आणि त्या मुळेच का होईना आपल्यात हिरवा निसर्ग ही बाहेर येतोय😊🙏🏻

    ReplyDelete
  7. हा एका कुठल्या विषयावरचा लेख नसल्यामुळे त्यावर अभिप्राय लिहिणे जरा कठिणच आहे. तुला जसे सुचले तसे मुद्दे आणी त्यावरची तुझी मतं मांडली आहेस. Anyway आपण एक एक मुद्द्याचा समाचार घेऊया.

    प्रत्येकाच्या मानात नक्कीच अनेक निसर्ग दडलेले असतात, पण तो व्यक्ति सापेक्ष वेगवेगळा असतो. शिवाय एका व्यक्तीला पण वेगवेगळ्या मूड मध्ये वेगवेगळा निसर्ग अनुभवायला येतो. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या आवडीनुसार आपल्या मनातील निसर्ग फुलवावा .

    सोशल मीडिया हा एक विवादास्पद मुद्दा आहे. निश्चितपणे सध्याच्या काळात जी अखंड संवाद क्रांती होते आहे, त्याच्या मुळाशी सोशल मीडियाच आहे. अनेक लांब असलेले मित्र किंवा नातेवाईकांना ह्या मीडिया ने संवादासाठी जवळ आणले आहे. पण त्याच्या अतिरेकी उपयोगाने माणसं फार आत्मकेंद्रित आणी एकलकोंडी पण झाली आहेत

    प्रेम हे कुठल्याही स्वरूपाचे का असेना अद्वैतच असते यात शंका नाही. प्रेम ह्या विषयावर इतके लेखन आणी चर्चा झाल्या आहेत व मानवी स्वभावाचा हा एक आवश्यक आणी अनिवार्य भाग आहे हे सिद्ध पण झालं आहे. सोशल मीडिया मुळे त्याची व्यक्तता वाढली आहे हे मात्र नक्की.

    जबाबदारी आणी हक्क ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बेजबाबदार हक्क आणी बेजबाबदार अपेक्षा पण एकत्र नांदू शकत नाहीत. असो, हा एक एक मोठ्ठाच विषय आहे. ज्याला जबाबदारी कळते तो हक्क गाजवेलच असं नाही आणी काही जण जबाबदारीची तमा न बाळगता अपेक्षांचं ओझं लादतात ते पण आक्षेपार्ह आहेच .

    दुर्दैवाने अजून पर्यंत तरी ज्ञानेश्वरीच्या वाचनाचा किंवा ज्याने ती अभ्यासली आहे त्याचा सहवास घडायचा योग काही आला नाही, त्यामुळे तो अनुभव माझ्या बाबतीत तरी रिता आहे. पण एकदा वाचन करायचा मानस तर आहेच, तेंव्हा माझा अनुभव कथन करेनच

    ही विविध मुद्द्यांची किंवा विचारांची मांडणी अगदी वेगळी वाटली बुवा.

    ReplyDelete
  8. व पु होले सरFebruary 08, 2023 8:58 am

    १००%सत्य विचार. त्यांच्या नुसार वैचारीक प्रगती व्हायला हवी.🙏🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...