आराम खुर्ची
(माझा वारसा)
आराम खुर्ची ! ही खरंतरं शंभर वर्ष वगैरे जुनी नाही . पण साठ वगैरे वर्ष नक्कीच जुनी आहे . पण आम्हा सगळ्यांच्या मनाच्या खूप जवळची आणि तितकीच आदरणीय सुद्धा ! कारण ही खुर्ची आहे आमच्या बाबांची (आजोबांची) . इतकी वर्ष झाली तरी एकदम दणकट , अगदी थोडी सुद्धा खराब झालेली नाही . इतक्या वर्षात फार तर तिला एक-दोन वेळा पॉलिश केले असेल . बाकी काहीही देखभाल करावी लागली नाही तिची ! आराम खुर्ची हेच नाव आहे आमच्या घरात या खुर्चीचे . आमचे बाबा असे पर्यन्त त्या खुर्चीत बसूनच वर्तमानपत्र वाचत . आणि वाचून झाले की बऱ्याचदा त्या खुर्चीवरच ठेवलेला असे . मग कुणी विचारले की आजचा पेपर कुठे आहे , की त्याला उत्तर मिळे , आराम खुर्चीवर असेल , मी तिथेच पाहिला होता वगैरे वगैरे .
पूर्णपणे लाकडाची आहे ही खुर्ची , बनवून घेतलेली . या खुर्चीवर पाठ टेकण्यासाठी एक कापसाचा मोठ्ठा तक्क्या ठेवलेला असे , अजूनही असतो . तसेच बसायच्या जागी सुद्धा एक कापसाची उशी . या दोघांना पांढऱ्या शुभ्र खादीच्या कापडाच्या खोळ घातलेल्या असतं . या निसटून/निघून जाऊ नये म्हणून त्याला प्रत्येकी ठिकाणी बंद असत बांधायला , त्याच कापडाचे . बसायच्या उशीवर एक जाडसर आसन असे . आमचे बाबा स्वच्छतेच्या बाबतीत पारच आग्रही आणि दक्ष असत . आम्ही मुली दिवसभर इकडे तिकडे उंडारणार , खेळणार , हे ना ते उद्योग करणार कायमच . त्यामुळे आम्हाला या खुर्ची जवळ जाण्याची आणि त्यावर बसण्याची नेहमीच भीती वाटे . न जाणो आपल्या हाता-पायाची घाण त्या पांढऱ्याशुभ्र खोळी ला लागून , त्या घाण होतील आणि त्यामुळे ओरडा खावा लागेल . म्हणून आम्ही या खुर्चीच्या जरा लांबच राहत असू . एक आदरयुक्त भीती वाटत होती आम्हाला या खुर्ची बद्दल !
आमचे बाबा छान उंचपुरे आणि सशक्त ! फक्त तेच खऱ्या अर्थाने या खुर्चीत आरामात बसू शकत होते . बाकी कमी उंची आणि किरकोळ अंगकाठी असलेल्या लोकांना त्यात फार आरामदायक वाटतच नाही , नीट बसताच येत नाही . आता अर्थातच ही खुर्ची आमच्या मूळ घरात आहे आणि तिथे राहत असलेली काकू आणि पप्पा (काका) तिचा सांभाळ आणि देखभाल करीत आहे . तिथे गेले की , बाकी काहीही असो , सगळ्यात आधी ती खुर्चीच दिसते माझ्या डोळ्यांना . रिकामी बघून ती फारच एकाकी आणि उदास वाटते मला . पण बाबांची त्या खुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचतांनाची प्रतिमा मनात आणि डोळ्यासमोर आली की ती खुर्ची एकदम जीवंत होऊन जाते आणि ते आजही आमच्यातच असल्याची पूर्ण शास्वती वाटते मनाला !!!
©आनंदी पाऊस
(माझा वारसा)
४जुलै २०२१
थोड्या फार फरकाने असेच
आसन असल्याचे आठवतेय मला .
हीच आमची/आमच्या बाबांची
आराम खुर्ची !
अतिशय सुंदर आरामखुर्ची अगदी आरामात बसल्यासारखे जाणवते
ReplyDeleteजुन्या आठवणींना उजाळा 😀🙋
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteखूप छान 😊
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
DeleteKhup mast
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
Deleteजुने ते सोने म्हणतात ते खोटे नाही मी बघितली आहे आपल्या कडची खुर्ची खूप मस्त आहे ती खूप छान वर्णन सुंदर शब्द रचना शब्द सौंदर्या ची आर्किटेक्ट आहे आमची अक्क
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
Deleteवा खुपच छानच आहे..आराम खुर्चीdetails.. Agreed Old is Gold..
ReplyDeleteअजुन एक गमंत ..मालाही हा लेख वाचताना प्रतिमा दिसलीय ह्या खुर्चीच्या imagमध्ये..khoop मस्त.
Wow!!! That's really great!!
Deleteखूप सारे सप्रेम धन्यवाद 😍
खुप छान लेख खुर्ची बद्दलचे आकर्षण आणि आदर आठवणी जागवल्या गेल्या
ReplyDeleteहो,खरच!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 😊😇
Apratim Likhan ahe.. agadi muddesud mandani asate... adhi chya hi goshti vachalya... kahi drushya agadi amchya gharatach zaleli athavtat.. Thank you very much mala sudha maheracha anganat gheun gelya baddal....
ReplyDeleteThis means a lot to me!! N i really mean it! नाव नाही त्यामूळे आपण कोण आहात ते कळत नाही, नाव कळले तर फार बरे होईल.
Deleteखूप सारे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
��khurchi subak sunder ti june aathwanina ujala dete ����
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 काकू!! 😇😇
DeleteAaramkurchi chi mahiti awdali ����chan aathavali aahet
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺
DeleteBoth blogs superb as usual
ReplyDeleteati uttam rekhatali aahe shabdat aaram khurchi
सप्रेम धन्यवाद 🙏 ☺
Deleteखुप छान लेख👌👌 खुप खुप छान आठवणी आहेत या.👌👌
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 😇😇
Delete