Skip to main content

आराम खुर्ची (माझा वारसा)

 आराम खुर्ची 

(माझा वारसा)


                  आराम खुर्ची ! ही खरंतरं शंभर वर्ष वगैरे जुनी नाही . पण साठ वगैरे वर्ष नक्कीच जुनी आहे . पण आम्हा सगळ्यांच्या मनाच्या खूप जवळची आणि तितकीच आदरणीय सुद्धा ! कारण ही खुर्ची आहे आमच्या बाबांची (आजोबांची) . इतकी वर्ष झाली तरी एकदम दणकट , अगदी थोडी सुद्धा खराब झालेली नाही . इतक्या वर्षात फार तर तिला एक-दोन वेळा पॉलिश केले असेल . बाकी काहीही देखभाल करावी लागली नाही तिची ! आराम खुर्ची हेच नाव आहे आमच्या घरात या खुर्चीचे . आमचे बाबा असे पर्यन्त त्या खुर्चीत बसूनच वर्तमानपत्र वाचत . आणि वाचून झाले की बऱ्याचदा त्या खुर्चीवरच ठेवलेला असे . मग कुणी विचारले की आजचा पेपर कुठे आहे , की त्याला उत्तर मिळे , आराम खुर्चीवर असेल , मी तिथेच पाहिला होता वगैरे वगैरे . 
                पूर्णपणे लाकडाची आहे ही खुर्ची , बनवून घेतलेली . या खुर्चीवर पाठ टेकण्यासाठी एक कापसाचा मोठ्ठा तक्क्या ठेवलेला असे , अजूनही असतो . तसेच बसायच्या जागी सुद्धा एक कापसाची उशी . या दोघांना पांढऱ्या शुभ्र खादीच्या कापडाच्या खोळ घातलेल्या असतं . या निसटून/निघून जाऊ नये म्हणून त्याला प्रत्येकी ठिकाणी बंद असत बांधायला , त्याच कापडाचे . बसायच्या उशीवर एक जाडसर आसन असे . आमचे बाबा स्वच्छतेच्या बाबतीत पारच आग्रही आणि दक्ष असत . आम्ही मुली दिवसभर इकडे तिकडे उंडारणार , खेळणार , हे ना ते उद्योग करणार कायमच . त्यामुळे आम्हाला या खुर्ची जवळ जाण्याची आणि त्यावर बसण्याची नेहमीच भीती वाटे . न जाणो आपल्या हाता-पायाची घाण त्या पांढऱ्याशुभ्र खोळी ला लागून , त्या घाण होतील आणि त्यामुळे ओरडा खावा लागेल . म्हणून आम्ही या खुर्चीच्या जरा लांबच राहत असू . एक आदरयुक्त भीती वाटत होती आम्हाला या खुर्ची बद्दल ! 
                  आमचे बाबा छान उंचपुरे आणि सशक्त ! फक्त तेच खऱ्या अर्थाने या खुर्चीत आरामात बसू शकत होते . बाकी कमी उंची आणि किरकोळ अंगकाठी असलेल्या लोकांना त्यात फार आरामदायक वाटतच नाही , नीट बसताच येत नाही . आता अर्थातच ही खुर्ची आमच्या मूळ घरात आहे आणि तिथे राहत असलेली काकू आणि पप्पा (काका) तिचा सांभाळ आणि देखभाल करीत आहे . तिथे गेले की , बाकी काहीही असो , सगळ्यात आधी ती खुर्चीच दिसते माझ्या डोळ्यांना . रिकामी बघून ती फारच एकाकी आणि उदास वाटते मला . पण बाबांची त्या खुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचतांनाची प्रतिमा मनात आणि डोळ्यासमोर आली की ती खुर्ची एकदम जीवंत होऊन जाते आणि ते आजही आमच्यातच असल्याची पूर्ण शास्वती वाटते मनाला !!!

©आनंदी पाऊस
(माझा वारसा)
४जुलै २०२१


थोड्या फार फरकाने असेच 
आसन असल्याचे आठवतेय मला . 



हीच आमची/आमच्या बाबांची 
आराम खुर्ची !








Comments

  1. अतिशय सुंदर आरामखुर्ची अगदी आरामात बसल्यासारखे जाणवते
    जुन्या आठवणींना उजाळा 😀🙋

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  2. Replies
    1. सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  3. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  4. जुने ते सोने म्हणतात ते खोटे नाही मी बघितली आहे आपल्या कडची खुर्ची खूप मस्त आहे ती खूप छान वर्णन सुंदर शब्द रचना शब्द सौंदर्या ची आर्किटेक्ट आहे आमची अक्क

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  5. वा खुपच छानच आहे..आराम खुर्चीdetails.. Agreed Old is Gold..
    अजुन एक गमंत ..मालाही हा लेख वाचताना प्रतिमा दिसलीय ह्या खुर्चीच्या imagमध्ये..khoop मस्त.

    ReplyDelete
    Replies
    1. Wow!!! That's really great!!
      खूप सारे सप्रेम धन्यवाद 😍

      Delete
  6. खुप छान लेख खुर्ची बद्दलचे आकर्षण आणि आदर आठवणी जागवल्या गेल्या

    ReplyDelete
    Replies
    1. हो,खरच!
      मनःपूर्वक धन्यवाद 😊😇

      Delete
  7. Apratim Likhan ahe.. agadi muddesud mandani asate... adhi chya hi goshti vachalya... kahi drushya agadi amchya gharatach zaleli athavtat.. Thank you very much mala sudha maheracha anganat gheun gelya baddal....

    ReplyDelete
    Replies
    1. This means a lot to me!! N i really mean it! नाव नाही त्यामूळे आपण कोण आहात ते कळत नाही, नाव कळले तर फार बरे होईल.
      खूप सारे मनःपूर्वक धन्यवाद 🙏

      Delete
  8. ��khurchi subak sunder ti june aathwanina ujala dete ����

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 काकू!! 😇😇

      Delete
  9. Aaramkurchi chi mahiti awdali ����chan aathavali aahet

    ReplyDelete
  10. Prajkta DongareJuly 13, 2021 7:27 pm

    Both blogs superb as usual
    ati uttam rekhatali aahe shabdat aaram khurchi

    ReplyDelete
  11. खुप छान लेख👌👌 खुप खुप छान आठवणी आहेत या.👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. सप्रेम धन्यवाद 🙏 😇😇

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...