Skip to main content

वस्तु - पाळणा (माझा वारसा )

 

वस्तू - पाळणा 

(माझा वारसा )


                              खरंतर हा पाळणा खूप काही कलात्मक वगैरे अजिबातच नाही . पण एका दृष्टीने फारच विशेष आहे . कसा ते पुढे कळेलच . तर हा पाळणा माझ्या वडिलांचा , त्यांच्या जन्माच्या वेळी , त्यांच्या आजोळहुन आलेला . म्हणजे त्यांचाच वयाचा , ऐशीं वर्षाचा ! ते त्यांच्या बालपणी याच पाळण्यात झोपले . त्यांनतर त्याचे दोन्ही धाकटे भाऊ सुद्धा यातच झोपले . आमचे त्याकाळापासून एकत्र कुटुंब . आजोबा आणि त्यांचे धाकटे भाऊ , दोघांची कुटुंब एकत्र . त्यामुळे धाकट्या आजोबांच्या दोन मुली आणि चार मुलं , ही सगळी मंडळी सुद्धा यातच झोपली आपापल्या बाळपणी . 
                              त्यानंतर आमची पिढी . परत तिन्ही भावांचे एकत्र कुटुंब . सगळे मिळुन आम्ही सात बहिणी आणि दोन भाऊ . आम्ही सगळे सुद्धा आमच्या बालपणी या पाळण्यातच झोपलो . तसेच थोरल्या आत्याच्या दोन मुली सुद्धा याच पाळण्यात झोपल्या त्यांचा बालपणी . शिवाय धाकट्या आत्याची मुलगी सुद्धा यातच झोपली तिच्या बालपणी !
                                आमच्या नंतर आमची मुलं , म्हणजे त्यांची नातवंड . त्यापैकी सात नातवंड आपापल्या बालपणी या पाळण्यातच झोपली . अशी जवळ जवळ अठ्ठावीस बाळं आपापल्या बालपणी या पाळण्यात झोपली आहेत . आम्ही तर मोठे झालो पण घरात एक नी एक बाळ असेच , त्यामुळे पाळणा बऱ्यापैकी कायम टांगलेलाच असे . मग आमचा धाकटा काका आम्हा सगळ्यांना त्या पाळण्यात  बसवायचा स्वतः पाळण्याच्या समोरच्या दांडीवर बसायचा किंवा उभा राहायचा आणि जोरात झोका घ्यायचा . पोटात जाम डचमळत असे आमच्या , मग आम्ही जोरात आरडा ओरडा करत असु , मग तो अजुनच मोठ्ठा झोका घेत असे , एकदम धम्माल !
                           याच्या तळाला खाटेसारखी दोरीची वीण होती . ती मात्र वेळोवेळी खराब झाल्याने नवीन दोरीने वेळोवेळी विणावी लागत असे . आता तर दोरीने न विणता नवार आणुन विणलेली आहे . विणायला सोप्पी आणि झोपणाऱ्या बाळालाही टोचणार नाही अशी . तसेच त्याचा रंग पण खराब होत असे , मग अधुन मधुन काही वेळा त्याला रंग सुद्धा दिलेला आहे . याच्या चारही बाजूच्या आडव्या लाकडी दांड्यांच्या(बार) मध्ये छोटे छोटे थोडे कलात्मक उभे दांडे(बार) सुद्धा होते . ते एक एक करत निघून गेले , तुटून गेले , ते मात्र परत नाही बसविले . 
                         हा पाळणा छताला असलेल्या कड्यांना टांगला जात असे . तो टांगण्यासाठी त्याला लोखंडी छोटे छोटे बार होते , एकमेकांत अडकवलेले . यापैकी काही एकमेकांत कायमचे अडकवलेले होते , तर काही काढून वेगळे करता येत होते . पण अलीकडे बऱ्याच वर्षात मला हे दिसले नाहीत . स्टीलच्या कड्यांनी किंवा सुताच्या दोरीनेच पाळणा टांगलेला आठवतोय . बहुतेक ते खराब झाले असावेत . आता सध्या हा पाळणा वापरात नसल्याने , घरातील एका माळ्यावर आहे . 

©आनंदी पाऊस 
माझा वारसा (वस्तू)
२६जून २०२०





हाच तो आमचा पाळणा !
बाळाचे फोटो नीट येतील असेच सगळे फोटो आहेत . 
खास पाळण्याचा असा फोटो नाही . 
पण शक्य होईल तेव्हा नक्की फोटो काढेन 
आणि इथे प्रकाशित करीन 




Comments

  1. ������khajina gharatil gamti aani palna lekhane punha maherche aathwani jage zaliya
    Palna pic mast

    ReplyDelete
    Replies
    1. सुंदर आठवणींचा सुंदर ठेवा !
      मनःपुर्वक सप्रेम धन्यवाद !!🙏😇

      Delete
  2. पूजा पाटीलFebruary 05, 2021 12:57 pm

    खूपच छान वर्णन अगदी बालपणात गेल्यासारखे वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद !!🙏🥰

      Delete
  3. Kharter palna ha vishai kalatmak vaigare kharach nahi pan Tu tyache varnan karun banavalas .80 varsh juna, 27 balanche balpan tyat gele kharach to palna vashisjtpurn

    ReplyDelete
    Replies
    1. एक पाळणा आणि इतक्या सगळ्या बाळांचे बालपण ! एक सुंदर आणि अमूल्य अनुभव !🤩🥰💃

      Delete
  4. जनार्दन चौधरीFebruary 06, 2021 2:25 pm

    वारसा जपण्याचा चंग बांधलेला दिसतो आहे

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेम !🥰🤩💃😍😇

      Delete
  5. Palanyachi mahiti farch chan yevdhya balana tyat zualvle gele he vishesh aahe �� v tu kelele tyache varanan pan sunder aahe ����

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच तेव्हा पाळणा घेतांना कुणाच्या मनातही आले नसेल की हा पाळणा इतक्या बाळांचे बालपण अनुभवेल !🤩😍

      Delete
  6. रंजना राणेFebruary 09, 2021 9:47 am

    खरच किती छान वर्णन करतात तुम्ही सगळ्या आठवणी पाळणा तर खूपच छान काहीतरी नवजीवन वाटते जीवनात

    ReplyDelete
    Replies
    1. वावा ! किती सुंदर अभिप्राय ! खूपच आनंद झाला वाचून ! प्रेमळ धन्यवाद !🙏😇

      Delete
  7. मस्त खूप छान

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपुर्वक धन्यवाद !🙏😇

      Delete
  8. The description is very nice....i liked this blog alot

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद !!🙏🤩

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...