Skip to main content

काही हजार आनंदी टाके (काही अनुभवलेलं...)

काही हजार आनंदी टाके 
(काही अनुभवलेलं...)


थंडी 
गुलाबी थंडी 
बोचरी थंडी
खूप थंडी
थंडी...थंडी...थंडी...
आणि
थंडी
फक्त थंडी!

थंडी म्हटली की साऱ्यांनाच आठवते ती म्हणजे गोधडी!
त्यातल्या त्यात आई-आजीच्या जुन्या साडी-पातळाची शिवलेली!
थंडी तर पळूनच जाते, त्या गोधडी मुळे पण एक प्रेमळ, मायाळू ऊब सुद्धा मिळते...
त्यातून मिळणारे सुख, आनंद केवळ अवर्णनीय...

त्या गोधडीत पडून आवडते पुस्तकं वाचणे म्हणजे तर बहारच!
माझे तर वाचन सतत चालूच असते.
एकदा असेच एक पुस्तक आणले होते.
त्याचे नाव आठवत नाही की लेखकाचे नाव सुद्धा आठवत नाही.
तथापि त्या पुस्तकाचे मुखपृष्ठावर एका हाताने शिवेलेल्या गोधडीचे चित्र होते.
ते बघून, मनात असलेली एक इच्छा सारखेच वर डोके काढू लागली.
ती म्हणजे अश्या एका गोधडीचे चित्र काढण्याची इच्छा!
काही समजण्याच्या आताच एका गोधडीचे चित्र काढून सुद्धा झाले!
त्यानंतर काही काळाच्या अंतराने एकेक करत तीन-चार चित्रं काढून झालीत.
आणि मी हे विसरूनही गेले. 


बऱ्याच काळाने माझ्या सख्ख्या मैत्रिणीने एक शिबीर घेतले.
गोधडी शिवण-कला या विषयावर.
या शिबिरात तिने स्वतः सुद्धा एक छोटीशी गोधडी शिवली!
मला दाखवली...
अर्थातच छायाचित्राच्या माध्यमातून...

ती पाहून मला परत गोधडीचे चित्र काढण्याची इच्छा झाली.
मग काय,
मैत्रिणीच्या गोधडीचे छायाचित्र समोर ठेवले,
आणि त्यात जसे आकार आणि रंग होते...
अगदी तशीच्या तशी गोधडी माझ्या चित्रांतून साकारली!
तिला दाखवली,
अगदी मनापासून आनंदली ती...!


सरते शेवटी,
मनात आले,
या गोधडीची चित्रं,
त्यांच्या गोष्टी सहित,
आनंदी पावसात असायलाच हवीत!
आनंदी पावसात,
हे 
थंडीचे 
झळाळते रंग!
झळाळत्या रंगांचा,
झळाळता रंगीत आनंद...

या छान गुलाबी थंडीत...
आनंदी पावसाच्या वाचकांसाठी...!

गोधडी-१

गोधडी-२

ही सख्ख्या मैत्रिणीने प्रत्यक्ष शिवलेली गोधडी! 

ही माझ्या मैत्रिणीने केलेल्या गोधडीच्या 
छायाचित्रावरून काढलेली गोधडी 

गोधडी-३


मी रेखाटलेली सर्वात पहिली गोधडी 
©®आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेलं...)
१८ डिसेंबर २०२५


Comments

  1. अशोक पाटीलDecember 19, 2025 8:09 am

    🌷ताई खूपच सुंदर, अप्रतिम लेख वाचला, वाचताना लहानपण आठवले माय आठवली 🌼

    ReplyDelete
  2. उषा पाटीलDecember 19, 2025 9:52 am

    वर्षा मस्त मस्त गोधड्या बनवल्या आहेत, आवडल्या,

    ReplyDelete
  3. उदय बोरगावेDecember 19, 2025 9:53 am

    छान !!...उबदार लेख 👌

    ReplyDelete
  4. डॉ मनीष चौधरीDecember 19, 2025 9:53 am

    छान ऊबदार गोधडी!!

    ReplyDelete
  5. डॉ दीपक शिरसाठDecember 19, 2025 10:11 am

    सुंदर
    👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  6. किसन वराडेDecember 19, 2025 11:38 am

    आमच्या लहानपणी खेड्यापाड्यात सर्वत्र गोधडीच पांघरायचे...चादर क्वचितच कोणा घरी असायची!
    --सुंदर आठवण जागी झाली!

    ReplyDelete
  7. Nice article! 👍

    ReplyDelete
  8. काही हजार आनंदी टाके वा छान 👌👍सुदंर नाव आणि लेख
    गोधडीचे चित्रे 👌

    ReplyDelete
  9. नलिनी चाफळकरDecember 19, 2025 2:28 pm

    छान.👌👌👌

    ReplyDelete
  10. Mayechi ubh. Aathavali ......🙏🙏🌹💐🌹💐🌹 Sundar......

    ReplyDelete
  11. डॉ रा श्री मोरवंचीकरDecember 19, 2025 6:49 pm

    👌👌👣

    ReplyDelete
  12. रमेश शिवडेकरDecember 19, 2025 6:54 pm

    मस्त, उबदार व वाचनीय गोधडी.....👍👍👌👌😀😀

    ReplyDelete
  13. सायली पाटीलDecember 20, 2025 9:07 am

    गोदद्दीच्या डिझाईन्सचे नमुने सुंदर आहेत 👌

    ReplyDelete
  14. सुनिता देशपांडेDecember 20, 2025 9:47 am

    खूप छान लेख 👌🏼👌🏼

    ReplyDelete
  15. सुधा मूर्ती यांचे 1000 टाके पुस्तक ,खूप छान कथासंग्रह

    ReplyDelete
  16. प्रा ए पी पाटीलDecember 23, 2025 9:13 am

    तुझ्या "आनंदी पावसा"तील यादों की बारात मध्ये बऱ्याच आठवणी संग्रहित केलेल्या दिसत आहेत. मागे सुंदर ते घर, खाट विणण्याची कला त्यानंतर आता उबदार आणि रंगीबेरंगी गोधडी! खरंच अशा थंडीच्या दिवसात जुन्या काळातील स्मृतीं मधील उबदारपणाही मनाला एक वेगळाचआनंद देऊन जातो.
    य:कश्चित गोधडी ती काय, पण, यावरही तू लिहिलेली आणि चित्रीत केलेली कलाकृती खूपच सुंदर आहे. अशावेळी मला देखील आमच्या आईची आठवण झाली नाही तरच नवल! आईला काटकसर, पाठांतर, टाकाऊतून टिकाऊ निर्माण करण्याची कला, माणसे जोडण्याची कला, विनोदबुद्धी, स्मरणशक्ती, मेहनत इत्यादींचे वरदानच होते जणू! बाबांच्या तुटपुंज्या पगारामध्ये आणि भाड्याच्या घरामध्ये पाच-सहा जणांचा संसार कसा चालवणार? मूळचीच कलाकार असल्यामुळे परवडणारी अशी शिवणकलाही तिच्याजवळ होती. आई शेजाऱ्या पाजाऱ्या बायांच्या चोळ्या शिवून देत असे. सुंदर अशी गोधडी शिवण्याची कलाही तिला अवगत होती. घरातील वापरून झालेले कपडे ती धुवून त्यांच्या घड्या करून ठेवत असे. एखादे लुगडे बऱ्यापैकी वापरून झाले म्हणजे आता गोधडी शिवायची तयारी झाली म्हणून समजावे. लुगडे व्यवस्थित मापाचे कापून त्याच्या अर्ध्या भागावर घड्या सरळ केलेले कपड्यांचे तुकडे मांडून हवे तेवढे थर झाले म्हणजे लुगड्याचा उरलेला अर्धा भाग त्यांवर ठेवून गोधडी शिवायला सुरुवात होत असे. आधी बाउंडरी शिवून झाली म्हणजे तिच्यावर अलगद बसून कुठलाही कंटाळा न करता टाके मारत राहायचे. बऱ्याच वेळानंतर छानशी गोधडी तयार होत असे. मग आम्ही ती अंथरायला किंवा पांघरायला वापरत असू. आईच्या कष्टांची ऊब काय असते हे तेव्हापासून आम्हाला समजत आले आहे.
    मग गप्पा मारताना आई 'आत चाराचुरा, वर कारागिरी, नाही मिळणार श्रीमंताच्या घरी ' अशा प्रकारची स्वरचित कोडी आम्हाला टाकत असे.
    आता तर गोधडीच्याच परंपरेतील रजई, बेडशीट, चादर, ब्लॅंकेट, ही मंडळी यांचा बोलबाला आहे. ऐतिहासिक अशा बिचाऱ्या 'गोधडी'ला आज शोकेसमध्येही स्थान उरले नाही. असो, कालाय तस्मै नमः! दुसरे काय? लवकरच आता हिवाळा संपेल, पुढे उन्हाळ्यात तुझ्या आनंदी पावसाच्या ढगांची पायाभरणी होईल, मग पुनश्च एकदा आनंदी पावसाचे आगमन!! या सर्वांसाठी तुला हार्दिक शुभेच्छा.🌹

    ReplyDelete
  17. किती गोड गोधडी रेखाटलेली...सारेच "गोधडीपट" आवडले..मायेची ऊबदार गोधडी कडाक्याच्या "थंडी" ला पण सहन करते.हस्तकौशल्यरूपी रंगीत कापडाच्या तुकड्यातून ,वीणून‌ साकारलेल्या कलाकृतीमूळे मायेची ऊब आणखी जरा‌ वाढते...अशीच मायेची" रंगीत गोधडी" ची "वीण' कायम All Seasons मध्ये राहो... संजिता

    ReplyDelete
  18. आईची गोधडी आठवली...आई अजूनही प्रत्येकीला दरवर्षी एक गोधडी शिवून पाठवते!
    तिची ऊब काही निराळीच!

    👌👌

    ReplyDelete
  19. Dr Manasi PahadeJanuary 10, 2026 3:09 pm

    बौद्धांच्या पाली साहित्यात,
    गोधडीच्या ठिगळकामाचा उल्लेख आहे.
    भिक्षुनी आपली वस्त्रं,फाटके तुकडे जोडून,(गोधडीसारखी)सुरेख शिवावीत, भाताची शेती जशी हारीत एकात एक जोडलेली असतात तसेच हे तुकडे आधी चौकोनी करून,सरळ,उभ्या व चांगल्या टाक्यांनी शिवावेत असा गौतम बुद्धाचा आदेश आहे.

    त्यांच्या अंगुत्तरनिकाया त यावर एक गोष्ट ही आहे.
    ☺️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...