🎲♟️पारंपरिक पट-खेळ ♟️🎲 (काही अनुभवलेलं..,) आज पट खेळांची संख्या खूपच वाढली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे लोकसंख्या आणि माणसाची संपत्ती हाव. लोकसंख्या वाढीमुळे निवाऱ्याची गरज वाढलीच, तथापि आज मानवाला गरजेपुरता निवारा पुरेसा नाही. त्याला मोठ-मोठ्या शहरात तर आपली घरं असावी असे वाटते, सुट्टी साठी किंवा लहरीनुसार राहायला, थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा घर असावे असे वाटते. यापलीकडे जाऊन शेतावरही घर हवे असते. हे सगळे इथेच थांबत नाही तर, गुंतवणूक म्हणून सुद्धा शक्य तितकी घरं हवी असतात, प्लॉट हवे असतात. कधीही न संपणारी हाव. त्यामुळे मोठ्या शहरापासून लहान गावांपर्यंत मोकळ्या जागांचा, मैदानांचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे मुलांना बाहेर जाऊन खेळायला जागाच शिल्लक नाहीत...असो मुख्य विषय पट खेळ. अगदी एका पिढी पूर्वी असे नव्हते. मोजकेच पट खेळ होते आणि प्रत्येक पट खेळ प्रत्येकाकडे असेच असे...