🪻 कृष्ण-जन्मदिनानिमित्त!
(featured)
कृष्ण!
राधेचा कृष्ण!
मीरेचा कृष्ण!
गोपींचा कृष्ण!
देवकीचा कृष्ण!
यशोदेचा कृष्ण!
सखा कृष्ण!
भारतीय स्त्रियांचा सखा कृष्ण!
सकल भारतीयांचा सखा कृष्ण!
अगदी पुराण काळापासून भेटत आलाय.
अतिशय बाल वयापासून भेटत आलाय.
आई-आजीने सांगितलेल्या पौराणिक कथांतून!
तेव्हा पासूनच मना-हृदयात कृष्णाचे एक अढळ स्थान असते, प्रत्येक भारतीयाच्या. तसेच माझ्याही बाबतीत झाले. नंतर स्वतः वाचन करायला लागल्यावर तर, अजूनच जीवाभावाचा सखा झाला. कर्ण, राधेय, युगंधर, श्रीकृष्ण सारख्या पुस्तकांमधून तर, परत-परत भेटत असतो. वारंवार, अगदी पुन्हा-पुन्हा! तर कधी कधी त्याला भेटायचे असते, म्हणून मी ह्या पुस्तकांमधील काही भाग वारंवार वाचत असते.
मधल्या काळात दूरदर्शनवर महाभारतावर आधारित एक मालिकाच आली, महाभारत! आणि या महाभारताने अगदी खराखुरा, जीता-जगता, चैतन्यमयी कृष्ण दिला, सकल भारतीयांना! नितीश भारद्वाज! वाचनातून कायमच कृष्णाची एक मूर्ती मनांत साकारली होती. पण या महाभारताने, त्या मूर्तीला एक चेहरा दिला, प्रसन्न, हसतमुख, काहीसा खट्याळ! तोपर्यंत वाचनांत आलेल्या कृष्णाला साजेसा!
मग हाच कृष्ण माझ्यासहित, सर्व भारतीयांच्या मनांत कायमचा घर करून राहिला, विशेषतः त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्न पण, काहीसे खट्याळ हास्य! आज ह्या कृष्णाच्या जन्मदिवसाचे निमित्त! ह्या कृष्णाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आजतागायत कधी आला नाही. पण हा योग लवकरच येईल, अशी खात्री वाटते. कारण या कृष्णाचे अगदी जवळचे मित्र, माझेही मित्र आहेत, त्यांनी मला विश्वासपूर्वक सांगितले आहे, त्यांच्याशी माझी भेट घडवून देण्याबद्दल!
तथापि प्रत्यक्ष दर्शनाचा योग मात्र आला, तेही अगदी एका दैवी निमित्ताने, प्रत्यक्ष रथावर सारथ्य करतांना! १९८७ मधील भाद्रपद महिना पहाटेची वेळ. सगळीकडे अजूनही काळोख. सर्वत्र माणसांची गर्दी. नजर जाईल तिकडे माणसच माणसं. जन-सागरच जणू! स्थळ अलका चौक, पुणे. अचानक ती गर्दी चैतन्यमयी झाली. एका वेगळ्याच प्रसन्न आनंदाची लाटच आली जणू! अंधारातून, गर्दीतून एक तेजस्वी रथ समोर आला! हा रथ म्हणजे गणपती विसर्जन मिरवणुकीतील दगडूशेठ हलवाई गणपतीचा रथ! रथ तर तेजस्वी होताच, तथापि त्या रथाचा सारथी अधिकच तेजस्वी! चेहऱ्यावर तेच प्रसन्न, आनंदी आणि काहीसे खट्याळ हास्य! अर्थातच हा सारथी म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका श्री कृष्ण, नितीश भारद्वाज! जणू रथ साक्षात स्वर्गातूनच पृथ्वीवर अवतरला! काही तासांपासून तिथे बसलो होतो, रस्त्यावर. पहाटे तीन-चार वाजल्यापासून. इतका वेळ अलकाच्या चौकात रस्त्यावर बसून वाट बघण्याचे, सार्थक झाल्यासारखे वाटले! डोळ्यांचेच नाही तर मना-हृदयाचे पारणे फिटले! आयुष्यातील एक अतिशय आनंददायी, स्वर्गीय, दैवी क्षण! इतक्या वर्षानंतर सुद्धा डोळ्यासमोर जसाच्या तसा लख्ख तर दिसतोच आहे, तथापि त्या क्षणातील आनंद, प्रसन्नताही अनुभवता येतेय! परत परत जगता येणारा एक चैतन्यमयी क्षण!
चार वर्षांपूर्वी, तुमचा जन्मदिवस होता! तथापि आदल्या दिवशीच्या काही गोष्टींमुळे माझे मन काहीसे अस्वस्थ होते, मनाची उभारी हरविल्या सारखे झाले होते. सकाळीच तुमच्या वाढदिवसानिमित्ताने, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून एका मैत्रिणीने सोशिअल मिडीयावर पोस्ट केलेले तुमचे प्रकाशचित्रं समोर आले. जादूच झाली! मनातील सगळी मरगळ कुठल्या कुठे पळून गेली आणि मन छान प्रसन्न आनंदाने ओतप्रोत भरून गेले! कृष्णाच्या आनंदी, खट्याळ प्रसन्न हास्याची जादू...!
🌿🌼🪻जन्मदिनानिमित्त खूप खूप प्रसन्न आणि आनंदी शुभेच्छा!🪻🌼🌿
अगदी आपल्या हास्य सारख्या!
🪻🪻🪻कृष्णार्पन्मास्तु 🪻🪻🪻
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🍀🍀🍀🍀🍀
🌺🌺🌺
🪻
हेच ते प्रसन्न, आनंदी, जादुई हास्य!
मित्रासोबत सोबत एक निवांत क्षण!
(सर्व प्रकाशचित्र सौजन्य : केशव कुलकर्णी)
आनंदी पाऊस
(featured)
२जुन २०२४
छान अनुभवलय 💐
ReplyDeleteव्वा! छान ! कृष्ण म्हटला की खरच फक्त दोनच चेहरे समोर येतात ते म्हणजे स्वप्नील जोशी व दुसरा नितीश भारव्दाज 👍
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे
छान आत्मप्रचिती🌹🌹🌹
ReplyDeleteसुंदर आत्म प्रचीती . सुंदर लिखाण . खरोखरच एक आनंदाच्या उर्मीचा क्षण.
ReplyDeleteकाही व्यक्तिरेखाच अशा असतात की त्यांच्या दिसण्याचे वातावरण प्रसन्न होऊन जाते. चैतन्य नर्माण होते. मरगळ दूर होते.
ReplyDeleteफार पूर्वी कृष्णाला लोक देव म्हणत होते आणि आदर करत होते पुढे महाभारतातल्या नितीश भारद्वाज ला पाहिल्यावर त्याचा सुंदर अभिनय पाहिल्यावर लोक त्या कृष्णवर प्रेम करू लागले फारच जबरदस्त अभिनय वा लेखन पण खूप सुंदर
ReplyDeleteत्याचे गोड हसणे अगदी मनात बसून गेले
Khup sundar lihile aahe
ReplyDeleteKrushna = nitish Bhardwaj. Madam thanks tumche likhan khup chan aahe शब्द मांडणी khupchan aahe mala vachnyachi aavad lagli नव्याने.
ReplyDeleteअगदी मस्तच...कृष्णमय लेख जालाय...
ReplyDeleteखरोखरच रूक्मिणी ही कृष्णाची पत्नी जरी असली तरी..प्रेयसीचा मान हा राधाचाच!
..
हो नितीश भारद्वाज ह्यांनी महाभारतातील कृष्ण देवांची भूमिका माझ्याही मनात रूजलेली आहेच...त्यांना माला अक्कलकोट दर्शनासाठी गेल्यावर पाहण्याचा योग आलेला...मग कळाले ते एक पशूचिकित्सक डॉक्टर आहेत..आणि काही वर्षांनंतरही मी ठरवलं की माझा architecture ला thesis project mi veterinary hospital घेईन....
काळाशी समरूप होणे म्हणजे कृष्ण होणे हे व पु चं वाक्य कृष्णदेवांच्या मूर्ती कडे पाहून सारखं माला वाटतं - जयश्री कृष्ण संजिता
....
फेब्रुवारीत बंगळूरमधे आम्ही ट्रेनने आलो होतो. संस्कार भारतीच्या कार्यक्रमांमधे डॉ नितीश भारद्वाज आमचे केंद्रीय मार्गदर्शक आहेत. बंगळूरच्या कलासाधक संगमात त्यांच्या नाटकाचा छोटासा प्रयोगही होता. संगीत नाटक अकादमीचे सदस्य आणि ज्येष्ठ अभिनेते संजय पवारही सोबत होते. पन्नासेक कार्यकर्ते आणि हे ज्येष्ठ, लोकप्रिय, मान्यवर अभिनेते सोबत होते.
ReplyDeleteया दोघाही मान्यवरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण सर्वांसोबत सहजतेनं मिसळणं, जेवणं, गप्पा , हास्यविनोद करत ते सर्वांमधे मिसळले.
नितीशजींना बघायला तर किती लोक येत होते. विशेष म्हणजे अगदी तरूण, उच्च शिक्षित मुलंसुद्धा चप्पल काढून त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करत होते. ते सर्वांना जवळ घेऊन, आपुलकीने चौकशी करत होते. "मी साधा माणूस आहे हो! मी भगवान श्रीकृष्ण नाही." असं आवर्जून सांगत होते. पण सगळ्यांनी हेच सांगितलं की आमच्या मनातला श्रीकृष्ण तुम्ही साकार केलात!
एखादी भूमिका करणारा नट आणि श्रीराम, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज अशा व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार यात खूप फरक असतो. डॉ नितीश भारद्वाज यांनी कोणतेही व्यसन केले नाही. वागणं बोलणं नेहमीच मृदू राहील याची काळजी घेतली. योग्य व्यायाम, आराम आणि आहार यांचं गणित बिघडू दिलं नाही. कारण आपल्याकडे 'श्रीकृष्ण' म्हणून लोक बघतात याची जाणीव कायम ठेवली. भारतीय इतिहास, संस्कृती, धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. सर्वांनाच मोहवून टाकणारं स्मितहास्य कायम राहण्यामागे ही साधना आहे! 🙏🏻🌹
Thnx to yr friend who wrote this piece
ReplyDeleteअप्रतिम...
ReplyDeleteखूप छान कृष्णमय लेख झाला आहे.खूप छान पद्धतीने वर्णन केले आहेस.चैतन्यमय व्यक्तिरेखा साकारली होती. अप्रतिम.
ReplyDelete