ही श्रींची इच्छा!
(चित्रं मालिका)
"हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा!"
छत्रपती शिवरायांचे उद्गार. नुकतेच शिव राज्याभिषेक सोहळ्यास साडे तीनशे वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. आज माझा हा छोटासा प्रयत्न, हा खास दिवस अधोरेखित करण्याचा.
शिवाजी महाराजांची आठवण झाली की आठवण होते ती त्यांच्या खास जीरेटोपाची! मोत्याच्या लडी असलेल्या! त्यांच्या प्रत्येक हालचाली बरोबर, त्याच लयीत हिंदकळणाऱ्या! एकदा असेच कधीतरी मनात आले आणि महाराजांचे दोन जिरेटोप मी रेखाटले! सोबतच मावळ्यांची पगडी सुद्धा! दोन्हीही अतिशय खास! स्वाभिमान, शौर्य, धाडस, प्रामाणिकपणा इत्यादींनी ओतप्रोत भरलेले!
जिरेटोप!
जिरेटोप आणि मावळा पगडी!
तसेच काही काळ पूर्वी "ओम" रेखाटले होते, वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शित केले होते. त्यानंतर मनात आले, असेच "श्री" सुद्धा रेखाटावे. पण थोडे वेगळ्या पद्धतीने! भारत हा अतिशय विविधतेने नटलेला देश आहे हे काही नव्याने सांगायला नको. या विविधतेचा एक भाग म्हणजे भिन्न-भिन्न भागात लेखनासाठी वापरत असलेल्या विविध लिपी! मीही सगळ्यांप्रमाणेच देवनागरी आणि नंतर इंग्रजी लिपी शिकले. शैक्षणिक आयुष्य संपल्यासारखे भासले. त्यानंतर त्यावर कधी काही विचार सुद्धा झाला नाही. पण नंतर कन्नड लिपी शिकले.(आता बऱ्यापैकी विसरले आहे.) अलीकडे खूप मोठ्ठ्या काळानंतर मोडी आणि ब्राह्मी लिपी सुद्धा शिकले. पण आता आंतरजाल मदतीला असल्याने बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. याचीच मदत घ्यावी आणि थोडे वेगळे काही करावे असे मनात आले. लगेचच कामाला लागले. "श्री" वेगवेगळ्या लिपीत कसा लिहिला जातो ते पाहिले. ती-ती लिपी ज्यांना नीट माहिती आहे, त्यांच्या कडून चूक-बरोबर तपासून पाहिले. आणि घेतलेच रेखाटायला. पांढऱ्या कागदावर काळ्या पेनने रेखाटन करण्याचा माझा अगदी आवडता छंदच आहे. ती मूळ अक्षरे, निरनिराळ्या लिपीत रेखाटून त्यांना छान अशा नक्षीने सुशोभित करून प्रदर्शित केले.
तेच चार लिपीतील चार "श्री" आज तुमच्यासाठी!
ही श्रींची इच्छा!
ll श्री ll -कन्नड लिपी
श्री-तमिळ लिपी
श्री-मल्ल्याळम् लिपी
श्री-तेलगु लिपी
आनंदी पाऊस
(चित्रं मालिका)
८ जुन२०२३
छान आहेत, जिरेटोप आणि श्री चे रेखाटन
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨
Deletechan
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏
Deleteवाह सुंदरच 👌👌पहिला तर असा आहे की महाराज आहेत असं वाटतं
ReplyDeleteमला दिसलेच होते! आपणास ही दिसले...
Deleteखूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
किती गोड चित्रं काढली आहेत. लेखनातली सहजताही तितकीच भावते! 👌🏻
ReplyDeleteसप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶
Deleteछान चं
ReplyDeleteसप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶
Deleteसुंदर
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏 ✨
Deleteसुंदर, मनाला भावणारे ,
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ✨
Deleteमस्तच👍
ReplyDeleteजिरेटोप आणि पगडीसुध्दा सुंदरच👌
चार लिपींमधे श्री असले तरी ते आमच्या सारख्यांना कसे कळणार?आम्ही काहीतरी कोणत्यातरी भाषेतील अक्षरे दिसत आहे असे म्हणू😛
प्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे.
😄😄
Deleteखूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨
एक नंबरच...orange जिरेटोप+ पगडी मस्तच रेखाटलीय...."श्री" लिपी आवडलेली आहे हया सर्व दख्खनी भाषेतल्या...व नक्षीकाम अप्रतिमच.
ReplyDeleteखूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteएक नंबरच...orange जिरेटोप+ पगडी मस्तच रेखाटलीय...."श्री" लिपी आवडलेली आहे हया सर्व दख्खनी भाषेतल्या...व नक्षीकाम अप्रतिमच.
ReplyDeleteअसेच स्मॉल स्मॉल courseच जरा आपल्याला जरा जास्त आकलनमय शिकवून जातात.Creativity आवडली.- स.न.वि.वि.संजिता
खूप खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫
Deleteजय श्रीराम...!!! 🙏🏻🙏🏻
ReplyDeleteजय हिंद...!!!
तेलगु लिपीतला 'श्री' म्हणजे दुपट्यामध्ये गुंडाळून पहुडलेला छोटासा गोंडस बाळ वाटतो. 😆😆
😄😄😄
Deleteखूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄
👌👌 जरा वेगळा विषय..मस्त..
ReplyDeleteआनंदी धन्यवाद 🙏
Deleteछान
ReplyDelete