Skip to main content

ही श्रींची इच्छा! (चित्रं मालिका)

ही श्रींची इच्छा!

(चित्रं मालिका)



"हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा!"

छत्रपती शिवरायांचे उद्गार. नुकतेच शिव राज्याभिषेक सोहळ्यास साडे तीनशे वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. आज माझा हा छोटासा प्रयत्न, हा खास दिवस अधोरेखित करण्याचा. 
शिवाजी महाराजांची आठवण झाली की आठवण होते ती त्यांच्या खास जीरेटोपाची! मोत्याच्या लडी असलेल्या! त्यांच्या प्रत्येक हालचाली बरोबर, त्याच लयीत हिंदकळणाऱ्या! एकदा असेच कधीतरी मनात आले आणि महाराजांचे दोन जिरेटोप मी रेखाटले! सोबतच मावळ्यांची पगडी सुद्धा! दोन्हीही अतिशय खास! स्वाभिमान, शौर्य, धाडस, प्रामाणिकपणा इत्यादींनी ओतप्रोत भरलेले! 




जिरेटोप!




जिरेटोप आणि मावळा पगडी!


तसेच काही काळ पूर्वी "ओम" रेखाटले होते, वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शित केले होते. त्यानंतर मनात आले, असेच "श्री" सुद्धा रेखाटावे. पण थोडे वेगळ्या पद्धतीने! भारत हा अतिशय विविधतेने नटलेला देश आहे हे काही नव्याने सांगायला नको. या विविधतेचा एक भाग म्हणजे भिन्न-भिन्न भागात लेखनासाठी वापरत असलेल्या विविध लिपी! मीही सगळ्यांप्रमाणेच देवनागरी आणि नंतर इंग्रजी लिपी शिकले. शैक्षणिक आयुष्य संपल्यासारखे भासले. त्यानंतर त्यावर कधी काही विचार सुद्धा झाला नाही. पण नंतर कन्नड लिपी शिकले.(आता बऱ्यापैकी विसरले आहे.) अलीकडे खूप मोठ्ठ्या काळानंतर मोडी आणि ब्राह्मी लिपी सुद्धा शिकले. पण आता आंतरजाल मदतीला असल्याने बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. याचीच मदत घ्यावी आणि थोडे वेगळे काही करावे असे मनात आले. लगेचच कामाला लागले. "श्री" वेगवेगळ्या लिपीत कसा लिहिला जातो ते पाहिले. ती-ती लिपी ज्यांना नीट माहिती आहे, त्यांच्या कडून चूक-बरोबर तपासून पाहिले. आणि घेतलेच रेखाटायला. पांढऱ्या कागदावर काळ्या पेनने रेखाटन करण्याचा माझा अगदी आवडता छंदच आहे. ती मूळ अक्षरे, निरनिराळ्या लिपीत रेखाटून त्यांना छान अशा नक्षीने सुशोभित करून प्रदर्शित केले. 
तेच चार लिपीतील चार "श्री" आज तुमच्यासाठी!
ही श्रींची इच्छा!   




 ll श्री ll -कन्नड लिपी 




श्री-तमिळ लिपी 




श्री-मल्ल्याळम् लिपी 




श्री-तेलगु लिपी 


आनंदी पाऊस 
(चित्रं मालिका)
८ जुन२०२३ 












Comments

  1. छान आहेत, जिरेटोप आणि श्री चे रेखाटन

    ReplyDelete
  2. नरेंद्रJune 09, 2023 10:48 am

    वाह सुंदरच 👌👌पहिला तर असा आहे की महाराज आहेत असं वाटतं

    ReplyDelete
    Replies
    1. मला दिसलेच होते! आपणास ही दिसले...
      खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  3. भाग्यश्री ताईJune 09, 2023 10:48 am

    किती गोड चित्रं काढली आहेत. लेखनातली सहजताही तितकीच भावते! 👌🏻

    ReplyDelete
    Replies
    1. सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶

      Delete
  4. Replies
    1. सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 🪄 🫶

      Delete
  5. सुंदर

    ReplyDelete
  6. सुंदर, मनाला भावणारे ,

    ReplyDelete
  7. मस्तच👍
    जिरेटोप आणि पगडीसुध्दा सुंदरच👌
    चार लिपींमधे श्री असले तरी ते आमच्या सारख्यांना कसे कळणार?आम्ही काहीतरी कोणत्यातरी भाषेतील अक्षरे दिसत आहे असे म्हणू😛
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete
    Replies
    1. 😄😄
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨

      Delete
  8. एक नंबरच...orange जिरेटोप+ पगडी मस्तच रेखाटलीय...."श्री" लिपी आवडलेली आहे हया सर्व दख्खनी भाषेतल्या...व नक्षीकाम अप्रतिमच.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  9. एक नंबरच...orange जिरेटोप+ पगडी मस्तच रेखाटलीय...."श्री" लिपी आवडलेली आहे हया सर्व दख्खनी भाषेतल्या...व नक्षीकाम अप्रतिमच.
    असेच स्मॉल स्मॉल courseच जरा आपल्याला जरा जास्त आकलनमय शिकवून जातात.Creativity आवडली.- स.न.वि.वि.संजिता

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  10. जय श्रीराम...!!! 🙏🏻🙏🏻
    जय हिंद...!!!
    तेलगु लिपीतला 'श्री' म्हणजे दुपट्यामध्ये गुंडाळून पहुडलेला छोटासा गोंडस बाळ वाटतो. 😆😆

    ReplyDelete
    Replies
    1. 😄😄😄
      खूप आनंदी धन्यवाद 🙏 🪄

      Delete
  11. अनिता पाठकAugust 04, 2023 7:33 am

    👌👌 जरा वेगळा विषय..मस्त..

    ReplyDelete
  12. छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...