आकाशी झेप घेई...
(चित्रं मालिका)
चू चू!
चिऊ!
चिमणी!
चिऊताई!
मला वाटते आता आता पर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात पक्षी जगतातील सगळ्यात पहिली ओळख म्हणजे चिऊताईची!
चू चू ये
इथे इथे बस
चारादाणा खा
पाणी पी
बाळाच्या डोक्यावरून
भर्रकन उडून जा...
या बडबड गीतातून प्रत्येक बाळाला चिमणी ची ओळख होते.
मलाही तशीच झाली असावी हे नक्की. कारण मी माझ्या कितीतरी लहान भावंडांना आणि भाचे मंडळींना हे बडबड गीत शिकविल्याचे आणि त्या बरोबरच घास भरवल्याचे लख्ख आठवते आहे.
गाण्या-गोष्टीतच नाही तर प्रत्यक्षात सुद्धा अवती भवती चिमण्या आणि चिवचिवाट कायमच असे, अगदी आत्ता आत्ता पर्यंत...
पण अचानक लक्षात आलं अरे बाकी बरेच पक्षी दिसतात पण चिमणी गायबच झाली आहे...
लहानपणी सतत अवतीभवती असलेली चिमणी अशी एकदम दिसेनाशी होईल असे वाटलेच नाही.
पण लक्षात आले, तेव्हा प्रचंड वाईट वाटले, खुप सैरभैर झाले...
चिमणी संख्या वाढावी म्हणून अनेक जण अनेक प्रयत्न करू लागले, करत आहेत. हे बघून बराच दिलासाही वाटतो.
तथापि चिमणी वाचवा मोहीम, प्रकल्प सुरू झाल्याने जीथे तिथे चित्रं रूपात चिमणी दिसू लागली. अशाच एका चित्रातील चिमणी बघून मलाही चिमणीचे चित्रं काढावेसे वाटले. त्या चित्राचे प्रकाशचित्रं काढून घेतले आणि घरी येऊन ही चिऊताई साकारली...
बाकी चित्रं नक्की कधी काढली हे नक्कीचे आठवत नाही. अर्थातच प्रत्येक चित्रावर तारीख आहेच, पण अशी प्रसंगानीशी आठवण नाही.
Beautiful drawings...
ReplyDeleteचिमणी या विषयावरील कविता व लेखन आवडलं! हा गुबगुबीत आणि सुखी चिमणा फार आवडला.. याची जीवनसाथी देखील चीतारा...
ReplyDeleteBeautiful drawings 👌 👌👌😍🥰
ReplyDeleteThe sparrow is so cute....
ReplyDelete👌🏻👌🏻👌🏻मोर खूप मस्त आहे 😊
ReplyDeleteहल्ली क्वचित दिसणारी चिऊताई मनात भरली. पोपट तर आपल्या सगळ्यांचाच लाडका. हाँर्नबील चे चित्र बघून नागालँड फेस्टीवलची आठवण आली. मोर फारच मनमोहक उतरले आहेत. अगदी राधा-कृष्णाची मूर्तीच मनात साकार होते. खूप छान. आनंदी पाऊस मनात झिरपला. 👍👌
ReplyDeleteit's beautiful .
ReplyDeleteचिमणी अन् मोर 👌👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर आहेत सगळेच पक्षी 👌👌चिमणी एक नंबर 😄👍
ReplyDelete😊chiu tai waril lekh aani saglech Chita moor Chitre khoop sunder kadhli aahet
ReplyDeleteNantahala chiu tai nehmich dakhwte aani maza mulga lahan bal hota teva angnat basun ek ghas chiucha karun tela bharwat aase
Magil aathwanina ujala milala 😊
चिमणी व कलरफुल पक्षीचित्रे पाहून,अगदी प्रसन्न वाटले.सारेच चित्रे तोल व पोतांनी सुरेख रेखाटलेली आहेत..."गुबगुबीत गुब्बी".
ReplyDelete"चिव चिव चिमणे" हे गाणं आठवलं
आमच्याकडे बाल्कनीतून चिमण्या किचनमध्ये येतात...अता त्या चिमण्यांना टेरेसवर आणण्याचा प्रयास करतोय.
पोपटांवरही लेख लिहाल अशी नम्र उत्सुक विनंती.
-संजू
चिमणी व मोर खरच खूप सुंदर आहे 👌👌
ReplyDeleteचित्रे छानच 👌👌चिमणी आणि मोर
ReplyDeleteचिमणी विषयी वर्णन 👌
चिमणी मस्त
ReplyDeleteAkdam mast
ReplyDeleteसुंदर...मोर तर फारच छान
ReplyDeleteचित्रकला छानच आहे.सुंदर आणि सुबक आली आहेत सगळी चित्रं.
पक्ष्यांची चित्रं सुंदर रेखाटली व रंगवली आहेत. आमच्या घराच्या खिडकीतून कधी कधी हाॅर्नबिल दिसतात. बुलबुल पण!
ReplyDelete