Skip to main content

आकाशी झेप घेई... (चित्रं मालिका)

आकाशी झेप घेई... 

(चित्रं मालिका) 


चू चू! 

चिऊ! 

चिमणी! 

चिऊताई! 

मला वाटते आता आता पर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात पक्षी जगतातील सगळ्यात पहिली ओळख म्हणजे चिऊताईची! 

चू चू ये

इथे इथे बस

चारादाणा खा

पाणी पी 

बाळाच्या डोक्यावरून 

भर्रकन उडून जा... 

या बडबड गीतातून प्रत्येक बाळाला चिमणी ची ओळख होते. 

मलाही तशीच झाली असावी हे नक्की. कारण मी माझ्या कितीतरी लहान भावंडांना आणि भाचे मंडळींना हे बडबड गीत शिकविल्याचे आणि त्या बरोबरच घास भरवल्याचे लख्ख आठवते आहे. 

गाण्या-गोष्टीतच नाही तर प्रत्यक्षात सुद्धा अवती भवती चिमण्या आणि चिवचिवाट कायमच असे, अगदी आत्ता आत्ता पर्यंत...

पण अचानक लक्षात आलं अरे बाकी बरेच पक्षी दिसतात पण चिमणी गायबच झाली आहे... 

लहानपणी सतत अवतीभवती असलेली चिमणी अशी एकदम दिसेनाशी होईल असे वाटलेच नाही. 

पण लक्षात आले, तेव्हा प्रचंड वाईट वाटले, खुप सैरभैर झाले... 

चिमणी संख्या वाढावी म्हणून अनेक जण अनेक प्रयत्न करू लागले, करत आहेत. हे बघून बराच दिलासाही वाटतो. 

तथापि चिमणी वाचवा मोहीम, प्रकल्प सुरू झाल्याने जीथे तिथे चित्रं रूपात चिमणी दिसू लागली. अशाच एका चित्रातील चिमणी बघून मलाही चिमणीचे चित्रं काढावेसे वाटले. त्या चित्राचे प्रकाशचित्रं काढून घेतले आणि घरी येऊन ही चिऊताई साकारली...

बाकी चित्रं नक्की कधी काढली हे नक्कीचे आठवत नाही. अर्थातच प्रत्येक चित्रावर तारीख आहेच, पण अशी प्रसंगानीशी आठवण नाही.




हीला बघुन आमचा कलाकार मित्र म्हणाला, 
"धष्टपुष्ट चिमणी"
😀यातुन आपल्या कुवतीनुसार अर्थ समजून घ्या! 







हाॅर्नबील 
याला मात्र आधी पक्षी संग्रहालय/प्राणी संग्रहालयात पाहिले. पण वाटले हा परदेशी पक्षी आहे.
दांडेली!
तिथे गेल्यावर मात्र नीट कळले, हा परदेशी नाहीच, आपलाच आहे!
तिथे उडतांना, झाडावर बसलेले, पिल्लांना भरवितांना अशा वेगवेगळ्या रुपात याला पाहिले आणि त्याच्या आकंठ प्रेमात बुडुन गेले. मग काय तो कागदावर उतरणार!

काय योगायोग म्हणावा.. 
आत्ताच गुगलने आठवण करून दिली, 
आजच्याच तारखेला, काही वर्षांपूर्वी मी 
हाॅर्न बील ला भेटले होते, दांडेली! 😍 








एका मैत्रिणीने हे मोर एका दिवाळीला रांगोळीतुन साकारले होते. तेच मी कागदावर साकारले!
माझे चित्र साकारले गेले आणि तिच्या रांगोळीची आठवण सुद्धा जपली गेली!











Comments

  1. Beautiful drawings...

    ReplyDelete
  2. लक्ष्मीकांतJune 02, 2023 10:01 am

    चिमणी या विषयावरील कविता व लेखन आवडलं! हा गुबगुबीत आणि सुखी चिमणा फार आवडला.. याची जीवनसाथी देखील चीतारा...

    ReplyDelete
  3. Beautiful drawings 👌 👌👌😍🥰

    ReplyDelete
  4. The sparrow is so cute....

    ReplyDelete
  5. दिनेशJune 02, 2023 10:17 am

    👌🏻👌🏻👌🏻मोर खूप मस्त आहे 😊

    ReplyDelete
  6. प्रतिभा अमृतेJune 02, 2023 10:23 am

    हल्ली क्वचित दिसणारी चिऊताई मनात भरली. पोपट तर आपल्या सगळ्यांचाच लाडका. हाँर्नबील चे चित्र बघून नागालँड फेस्टीवलची आठवण आली. मोर फारच मनमोहक उतरले आहेत. अगदी राधा-कृष्णाची मूर्तीच मनात साकार होते. खूप छान. आनंदी पाऊस मनात झिरपला. 👍👌

    ReplyDelete
  7. it's beautiful .

    ReplyDelete
  8. ज्ञानेश्वर कातुरेJune 02, 2023 10:51 am

    चिमणी अन् मोर 👌👌👌👌

    ReplyDelete
  9. नरेंद्रJune 02, 2023 10:59 am

    खूपच सुंदर आहेत सगळेच पक्षी 👌👌चिमणी एक नंबर 😄👍

    ReplyDelete
  10. 😊chiu tai waril lekh aani saglech Chita moor Chitre khoop sunder kadhli aahet
    Nantahala chiu tai nehmich dakhwte aani maza mulga lahan bal hota teva angnat basun ek ghas chiucha karun tela bharwat aase
    Magil aathwanina ujala milala 😊

    ReplyDelete
  11. चिमणी व कलरफुल पक्षीचित्रे पाहून,अगदी प्रसन्न वाटले.सारेच चित्रे तोल व पोतांनी सुरेख रेखाटलेली आहेत..."गुबगुबीत गुब्बी".
    "चिव चिव चिमणे" हे गाणं आठवलं
    आमच्याकडे बाल्कनीतून चिमण्या किचनमध्ये येतात...अता त्या चिमण्यांना टेरेसवर आणण्याचा प्रयास करतोय.
    पोपटांवरही लेख लिहाल अशी नम्र उत्सुक विनंती.
    -संजू

    ReplyDelete
  12. स्मिता मनोज पाटीलJune 03, 2023 1:07 pm

    चिमणी व मोर खरच खूप सुंदर आहे 👌👌

    ReplyDelete
  13. चित्रे छानच 👌👌चिमणी आणि मोर
    चिमणी विषयी वर्णन 👌

    ReplyDelete
  14. चिमणी मस्त

    ReplyDelete
  15. अनिता पाठकAugust 04, 2023 7:33 am

    सुंदर...मोर तर फारच छान
    चित्रकला छानच आहे.सुंदर आणि सुबक आली आहेत सगळी चित्रं.

    ReplyDelete
  16. रंजना वांबुरकरNovember 16, 2024 6:59 am

    पक्ष्यांची चित्रं सुंदर रेखाटली व रंगवली आहेत. आमच्या घराच्या खिडकीतून कधी कधी हाॅर्नबिल दिसतात. बुलबुल पण!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...