Skip to main content

भाग-६ (निवडक रा श्री मो)

  भाग-६ 

(निवडक रा श्री मो) 





🪔🌷🌷🌷🪔


🌷🪔 सामान्य माणूस प्रपंचाचा दिवसेंदिवस बोजड

 होत जाणारा गाडा ओढण्यात इतका गुंतलेला असतो 

की त्याला अध्यात्म, तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी याकडे पहावयास अवसरच नसतो. 

पण जस जसा तो या रगाड्यात पिचला जातो, तस तसा तो भक्तिमार्गाकडे(अध्यात्माकडे) वळण्याचा

 विचार करतो.🪔🌷


🪔🌷🌷🌷🪔


🌷🪔 गीता-ज्ञानेश्वरी ही तत्वज्ञान सांगणारी शास्त्रे असल्याने 

इंग्रजांनी ती शिक्षण क्षेत्रात येऊच दिली नाहीत. 

अध्यात्म आणि शिक्षण यांची सतत फारकत केल्याने

 शिक्षण क्षेत्रात तर गोंधळच गोंधळ निर्माण झालेला आहे. 🪔🌷


🪔🌷🌷🌷🪔


🌷🪔 गीतेमधील तत्वज्ञानाला भारतीय तत्वज्ञानाचे सार मानले जाते. 

प्रस्तुत तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवावे म्हणजे 

दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाणारे होईल. 

दिशाहीन वाटचाल संपून

 आत्मज्ञानाच्या प्रकाशात भाग्योदयाकडे नेणारी वाटचाल सुरु होईल. 

या हेतूने प्रेरित होऊन ज्ञानदेवांनी ही टिका केली आहे. 🪔🌷


🪔🌷🌷🌷🪔


 🌷🪔 गीता ही समजण्यास दुर्बोध, परस्पर विरोधी मतांनी भरलेली 

म्हणून सामान्याला ती क्लिष्ट वाटते. 

म्हणून गीतेच्या तपशिलात खोलवर जाऊन ज्ञानदेवांनी मूळ सातशे श्लोकांचे 

नऊ हजार सुलभ ओव्यात भाषांतर करून सामन्यांच्या हातात मोक्ष आणून ठेवला आहे. 🪔🌷


🪔🌷🌷🌷🪔


🌷🪔 वाचनासाठी बाह्यचक्षुंची गरज असते तशीच अंतःचक्षुचीही गरज असते. 

हे अंतर पारायणातून नाहीसे व्हावे, 

ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून नाहीसे व्हावे 

आणि मैत्र जीवाचे या वादातीत भूमिकेपर्यंत मुमुक्षुने पोहोचावे 

हा ज्ञानेश्वरीच्या पारायाणामागील हेतू असतो.  🪔🌷


🪔🌷🌷🌷🪔



Comments

  1. गुलाबराव पाथरकरMarch 31, 2023 6:57 am

    अती उत्तम आहे .धन्यवाद मॕडमजी

    ReplyDelete
  2. भारती फेगडेMarch 31, 2023 8:21 am

    हो खरच माऊलींनी उदाहरणे देऊन गीतेचा अर्थ समजावून सांगितले आहे.मी ज्ञानेश्वरीचा online free class करते आहे, त्या ताई अजुन उदाहरण देतात. त्यामुळे ज्ञानेश्वरी किती महान ग्रंथ आहे हे समजले, केवळ वाचुन ज्ञानेश्वरी समजत नाही.

    ReplyDelete
  3. अनिता पाठकMarch 31, 2023 8:22 am

    रा.श्री.मो...मोरवंचीकर मला फार माहित नव्हते.आल्यामुळे जास्त परिचय झाला.
    छान लिखाण.माहितीत भर पडली.🙏🙏

    ReplyDelete
  4. मनिषा जोशीMarch 31, 2023 8:22 am

    खूप सुंदर

    ReplyDelete
  5. ताई अतिशय सुंदर माऊलींचे वर्णन गीता आणि ज्ञानेश्वरी याचे थोडक्यात ओळख करून अलगद पाने उलगडली 🙏🌹😊

    ReplyDelete
  6. प्रतिभा अमृतेMarch 31, 2023 3:56 pm

    माऊलींना समजून घेणे सोपे नाही. पण रा. श्री. मोरवंचीकरांनी ते अगदी थोडक्या व समर्पक शब्दात मांडले आहे. त्याचबरोबर संत एकनाथ, संत नामदेव आणि समर्थ रामदास यांच्या कार्याचाही परिचय करून दिला आहे. 🙏🙏

    ReplyDelete
  7. मनोरमा जोशीMarch 31, 2023 4:34 pm

    श्री विवेक सबनीस ज्ञानेश्वरीचे निरूपण पाच वर्षे करीत होते. त्यातील अडीच वर्षे ऑनलाईन असल्यामुळे मी ऐकत होते. आपल्याकडे मोठा ज्ञानाचा साठा आहे. पण या 70 वर्षात मुलांपर्यंत शाळेच्या मार्फत तो पोहोचूच दिला नाही. आता तरी प्रयत्न करायला पाहिजेत. आयुष्यात गीतेतील तत्त्वे अवलंबल्यास फारच उपयोगी पडते.

    ReplyDelete
  8. अतिशय साध्या व सोप्या भाषेत गीतामहात्म्य 🙏🏻
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete
  9. खूपच सुंदर वेचक संत महात्म्यांनी जे ज्ञान आपणास देण्यासाठी त्यांच्या कार्यशाळेतून आणि लेखणीतून आपणास खरोखर खूप उपकृत केले आहे आणि आपण ते वेळात वेळ काढून वाचावे अनुभवावे अतिशय सुंदर याची आठवण करून दिल्याबद्दल आपले आणि श्री मोरचीकरांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद

    ReplyDelete
  10. गीतेचं मर्म अगदी समर्पक आहे सांगितलय..गीतेच‌सार माला‌ आवडतच..बोधवर्धक विचार संच आवडलाय...ह्याच मनन होणेची आता...

    ReplyDelete
  11. साधा आणि सोपा भाषेत गीता आणि ज्ञानेश्वरीचे महात्म

    ReplyDelete
  12. छान, आणखी वाचायला आवडेल !

    ReplyDelete
  13. छानच लिहिले आहे, वाचायला आवडेल !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...