भाग-६
(निवडक रा श्री मो)
🪔🌷🌷🌷🪔
🌷🪔 सामान्य माणूस प्रपंचाचा दिवसेंदिवस बोजड
होत जाणारा गाडा ओढण्यात इतका गुंतलेला असतो
की त्याला अध्यात्म, तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी याकडे पहावयास अवसरच नसतो.
पण जस जसा तो या रगाड्यात पिचला जातो, तस तसा तो भक्तिमार्गाकडे(अध्यात्माकडे) वळण्याचा
विचार करतो.🪔🌷
🪔🌷🌷🌷🪔
🌷🪔 गीता-ज्ञानेश्वरी ही तत्वज्ञान सांगणारी शास्त्रे असल्याने
इंग्रजांनी ती शिक्षण क्षेत्रात येऊच दिली नाहीत.
अध्यात्म आणि शिक्षण यांची सतत फारकत केल्याने
शिक्षण क्षेत्रात तर गोंधळच गोंधळ निर्माण झालेला आहे. 🪔🌷
🪔🌷🌷🌷🪔
🌷🪔 गीतेमधील तत्वज्ञानाला भारतीय तत्वज्ञानाचे सार मानले जाते.
प्रस्तुत तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवावे म्हणजे
दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाणारे होईल.
दिशाहीन वाटचाल संपून
आत्मज्ञानाच्या प्रकाशात भाग्योदयाकडे नेणारी वाटचाल सुरु होईल.
या हेतूने प्रेरित होऊन ज्ञानदेवांनी ही टिका केली आहे. 🪔🌷
🪔🌷🌷🌷🪔
🌷🪔 गीता ही समजण्यास दुर्बोध, परस्पर विरोधी मतांनी भरलेली
म्हणून सामान्याला ती क्लिष्ट वाटते.
म्हणून गीतेच्या तपशिलात खोलवर जाऊन ज्ञानदेवांनी मूळ सातशे श्लोकांचे
नऊ हजार सुलभ ओव्यात भाषांतर करून सामन्यांच्या हातात मोक्ष आणून ठेवला आहे. 🪔🌷
🪔🌷🌷🌷🪔
🌷🪔 वाचनासाठी बाह्यचक्षुंची गरज असते तशीच अंतःचक्षुचीही गरज असते.
हे अंतर पारायणातून नाहीसे व्हावे,
ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून नाहीसे व्हावे
आणि मैत्र जीवाचे या वादातीत भूमिकेपर्यंत मुमुक्षुने पोहोचावे
हा ज्ञानेश्वरीच्या पारायाणामागील हेतू असतो. 🪔🌷
🪔🌷🌷🌷🪔
अती उत्तम आहे .धन्यवाद मॕडमजी
ReplyDeleteहो खरच माऊलींनी उदाहरणे देऊन गीतेचा अर्थ समजावून सांगितले आहे.मी ज्ञानेश्वरीचा online free class करते आहे, त्या ताई अजुन उदाहरण देतात. त्यामुळे ज्ञानेश्वरी किती महान ग्रंथ आहे हे समजले, केवळ वाचुन ज्ञानेश्वरी समजत नाही.
ReplyDeleteरा.श्री.मो...मोरवंचीकर मला फार माहित नव्हते.आल्यामुळे जास्त परिचय झाला.
ReplyDeleteछान लिखाण.माहितीत भर पडली.🙏🙏
खूप सुंदर
ReplyDeleteताई अतिशय सुंदर माऊलींचे वर्णन गीता आणि ज्ञानेश्वरी याचे थोडक्यात ओळख करून अलगद पाने उलगडली 🙏🌹😊
ReplyDeleteमाऊलींना समजून घेणे सोपे नाही. पण रा. श्री. मोरवंचीकरांनी ते अगदी थोडक्या व समर्पक शब्दात मांडले आहे. त्याचबरोबर संत एकनाथ, संत नामदेव आणि समर्थ रामदास यांच्या कार्याचाही परिचय करून दिला आहे. 🙏🙏
ReplyDeleteश्री विवेक सबनीस ज्ञानेश्वरीचे निरूपण पाच वर्षे करीत होते. त्यातील अडीच वर्षे ऑनलाईन असल्यामुळे मी ऐकत होते. आपल्याकडे मोठा ज्ञानाचा साठा आहे. पण या 70 वर्षात मुलांपर्यंत शाळेच्या मार्फत तो पोहोचूच दिला नाही. आता तरी प्रयत्न करायला पाहिजेत. आयुष्यात गीतेतील तत्त्वे अवलंबल्यास फारच उपयोगी पडते.
ReplyDeleteअतिशय साध्या व सोप्या भाषेत गीतामहात्म्य 🙏🏻
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे.
खूपच सुंदर वेचक संत महात्म्यांनी जे ज्ञान आपणास देण्यासाठी त्यांच्या कार्यशाळेतून आणि लेखणीतून आपणास खरोखर खूप उपकृत केले आहे आणि आपण ते वेळात वेळ काढून वाचावे अनुभवावे अतिशय सुंदर याची आठवण करून दिल्याबद्दल आपले आणि श्री मोरचीकरांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद
ReplyDeleteगीतेचं मर्म अगदी समर्पक आहे सांगितलय..गीतेचसार माला आवडतच..बोधवर्धक विचार संच आवडलाय...ह्याच मनन होणेची आता...
ReplyDeleteसाधा आणि सोपा भाषेत गीता आणि ज्ञानेश्वरीचे महात्म
ReplyDeleteछान, आणखी वाचायला आवडेल !
ReplyDeleteछानच लिहिले आहे, वाचायला आवडेल !
ReplyDelete