Skip to main content

हत्ती - २ (चित्रं मालिका)

हत्ती - २ 

(चित्रं मालिका) 


🐘🐘🐘🐘

🐘🐘🐘🐘


आने बंथोंदू आने - हत्ती आला हत्ती 
याव उरू आने?- कुठला आहे हा हत्ती 
बिजापूरदा आने - बिजापुरचा हत्ती 
इलिगेके बंतू? - तो इथे का आला आहे?
दारी टप्पी बंतू - तो वाट चुकला आहे
कोबरी बेल्ला तंतू - त्याने खोबर आणि गुळ खाल्ला  
मकळीगेल्ला हंचतु - त्याने खाऊ मुलांबरोबर वाटला  
आने ऊदी होइतु - हत्ती पळून गेला  
आने ऊदी होइतु - हत्ती पळून गेला

https://youtu.be/GtUGZpSolhc

ही वर असलेल्या बडबड गीताची you tube link आहे.
गेल्या वेळेला दिलेले बडबड गीत आवडल्याचे पुष्कळ वाचकांनी कळविले होते.
म्हणून आज हे माझे लाडके दुसरे बडबड गीत!


आज वरील बडबड गीता प्रमाणेच एक-एकटे हत्ती, आपापल्या व्यक्तीगत तंद्रीत असलेले! 



याला काय दिसले काय माहिती, 
एकदम आश्चर्य चकित झालाय! 




हा चाललाय आपल्याच तंद्रीत कुठे तरी.... 




हा उगाचच कसल्या तरी काळजीचे ओझे 
वाहात असल्या सारखा वाटतोय....
(गोंड कला)
 
 


याचा चेंडू ⚽ खेळता खेळता पाण्यात गेलाय, 
तो काढण्याच्या प्रयत्नात आहे 





हा एकदम कुतुहलाने बघतोय मागे वळून! 




आनंदी पाऊस 
(चित्रं मालिका) 
 २४ फेब्रुवारी २०२३







Comments

  1. मंजुषाMarch 17, 2023 10:44 am

    😝😝 किती cute आहे सगळे हत्ती मला तर सगळेच आवडले आणि बडबड गीत cute आहे मला पाठव ना जसे आहे तसे 🥰

    ReplyDelete
  2. व पु होले सरMarch 17, 2023 3:24 pm

    सर्वच हत्ती आवडले.खुपच सुंदर आहेत👌👌🙏🙏

    ReplyDelete
  3. Pahila wala cute aahe. Pan saglech awadle

    ReplyDelete
  4. त्याचा चेंडू पाण्यात पडला आहे तो मला खूप आवडला 🥰

    ReplyDelete
  5. कुतुहल हत्ती छान 👏🏻👏🏻👏🏻😃

    ReplyDelete
  6. सर्व हत्ती छान आहेत .प्रत्येक हत्तीचे हावभाव 👌👌

    ReplyDelete
  7. चेंडू शोधणारा...आणी मागे वळून‌ पाहाताना च्या‌ हत्तीचं चित्र..फारच आवडलय...हाथी मेरे साथी...

    ReplyDelete
  8. मस्तय की...चेंडू शोधणारा...आणी मागे वळून‌ पाहाताना च्या‌ हत्तीचं चित्र..फारच आवडलय...हाथी मेरे साथी...खूपच गोड आहेत..ही चित्रें रेखाटलेली...स न वि वि.-संजू

    ReplyDelete
  9. खूप मस्त.. असे कन्नड शिकायला पण सोपे वाटतेय..
    हत्ती आणि गीत दोन्ही मस्त

    ReplyDelete
  10. सर्वच हत्ती मस्त आहेत . प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. कालच ॲास्कर विजेती ‘elephant whispering’ ही फिल्म पाहिली . त्यामुळे तुमचे हत्ती पण त्या ‘रघू’ शी corelate केला.

    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete
  11. भारती फेगडेMarch 18, 2023 11:00 am

    मला पाण्यात चेंडू शोधणारा हत्ती आवडला. लहान मुलांसारखा निरागस वाटतो.
    चेंडू हरवल्याची दुःखही त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

    ReplyDelete
  12. Sarv hatti khuch god aahet. Mala tar khupch aawdale👌👌
    Chendu kadhnara very good🥰

    ReplyDelete
  13. Rigorventure@gmail.comMarch 23, 2023 9:50 pm

    हत्ती 1.0 वाचतानाच कल्पना होतीच की ह्या नंतर हत्ती 2.0 येणारच. कारण हत्ती हा विषाय आणी त्याच्या आकारातली वेगवेगळी गोलाई हे चित्रकारीतेला एकदम आवडता विषय आहे. हत्ती 2.0 त्या प्रमाणेच छानच झाला आह़े. दुसरे बडबड गीत पण गोड आहे. पण चित्रे बडबड गीताच्या पंक्ती पेक्शा थोडी वेगळी दिसताहेत. आपल्या तंद्रीत चाललेल्या हत्ती पेक्षा पिल्लू हत्ती जास्त गोड वाटताहेत. विशेषता पाण्यात खेळणारा आणी आश्चर्य चकित झालेला जास्त गोड आह़े. शेवटच्या पिल्लाची झूल मस्त आहे. सगळीच रेखाचित्रे एकदम सफाईदार आणी रेखीव झाली आहेत.एकंदरीत सगळेच तंद्रीत असलेले हत्ती आणि त्यांस समर्पक असलेले बडबड गीत , भट्टी छान जमली आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...