भाग-८ (निवडक रा श्री मो) 🌷🌷🌷 🪔🪔🪔 🌷🌷🌷 🪔ज्ञानदेवांचे नामदेवांकडे जाणे आणि नामदेवांचे ज्ञानदेवांबरोबर प्रवास करणे हा ज्ञान आणि भक्ती या मोक्षमार्गावरील दोन प्रवाहांचा मनोज्ञ संगम होता.🪔 🏵️🏵️🏵️ 🪔ज्ञानदेव आणि नामदेव यांच्यामध्ये, म्हणजेच शिव आणि विष्णू मध्ये असलेले द्वैत संपून शिव विष्णुमय झाला आणि विष्णू शिवमय झाला. म्हणून ज्ञानदेवांनीच म्हटले आहे, "विठूने शिरी वाहिला देवराणा." "देवराणा" म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष महादेव म्हणजे शिवलिंग होय. 🪔 🏵️🏵️🏵️ 🪔आळंदी ते पंढरी हा प्रवास आजच्या महाराष्ट्राच्या आध्यात्माचे नुतनीकरण करण्यात, ज्ञानेश्वरांची चेतना दुःखीतांपर्यंत, आर्तापर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झाला आहे, असे जमणाऱ्या भाविकांच्या सळसळत्या चैतन्यावरून वाटते.🪔 🏵️🏵️🏵️ 🪔काही माता-भगिनींच्या माथ्यावर मानाची तुळस असते. पायातील वाहणांकडे कुणाचे लक्ष नसते. कधी तुटकी वहाण तर कधी अनवाणी अशा उन्मनी अवस्थेतून यांची वाटचाल होत असते. ...