भाग-४
(निवडक रा श्री मो)
आजची पुढील सर्व वाक्यं डॉ रा श्री मोरवंचीकर लिखीत
"येई परतुनी ज्ञानेश्वरा"
या ग्रंथातील आहेत.
🪔🪔🪔
🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌸💫पारायण हा शब्द परा आणि आयन या शब्दांपासून तयार झालेला आहे. परा म्हणजे परमेश्वर आणि आयन म्हणजे त्याचे अस्तित्व, त्याचे चलनवलन, त्याचे कर्तृत्व. म्हणजे परमेश्वराच्या व्याप्तीचा शोध घेण्याचे कार्य पारायणातून साधावे आणि भक्त व परमेश्वर यांच्यामध्ये असलेले व्दैत दूर व्हावे अशी त्यामागील भूमिका असते. परंतु पारायणाचा संबंध सकाम भक्तिशी जोडला गेला तर तो पारायणाच्या मूळ हेतूपासूनच अभ्यास शेकडो मैल दूर जातो.💫🌸
🪔🪔🪔
🌷🌷🌷
🪔 🪔 🪔
🌸💫महाभारत हे संघर्षाचं प्रतीक आहे, गीता कर्माचे, भक्तीचे, योगाचे, ज्ञानाचे प्रतीक आहे तर उपनिषदे ही जिवा-शिवाच्या मैत्रीची प्रतिके आहेत.💫🌸
🪔🪔🪔
🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌸💫प्रामाणिक वारकऱ्यांच्या दृष्टीकोनातून सर्वात भव्य मंदिर अंतःकरणातच असते.💫🌸
🌷🌷🌷
🪔 🪔 🪔
🌷🌷🌷
🌸💫लोकजीवनाला कल्याणकारी मार्ग दाखविणे, म्हणजेच विश्व मोहरे लावणे, लोकमानसात आत्मविश्वास निर्माण करणे आणि प्राप्त जीवन सुखी जगण्यासाठी समाजासमोर आदर्शमूल्ये ठेवून त्याला जगण्याची प्रेरणा देणे हे कुठल्याही राष्ट्राचे आद्य कर्तव्य ठरते. या निकषावर ज्ञानदेवांचे कार्य तपासून पाहिल्यास त्यांच्या कार्याचे अलौकिकत्व समजण्यास मदत होते.💫🌸
🌷🌷🌷
🪔 🪔 🪔
🌷🌷🌷
🌸💫जोपर्यंत समाजात प्रामाणिकपणा आणि मानवता या मूल्यांचा प्रामाणिकपणे स्वीकार होत नाही, तोपर्यंत समाज भयमुक्त होणार नाही आणि ज्ञानदेवांनी सांगितल्याप्रमाणे या सर्वाचे मूळ कारण म्हणजे प्रत्येकजण स्वधर्म विसरलेला आहे. स्वधर्म ही फार मोठी संकल्पना आहे. तथापि तिचा प्रत्येकाने आपापल्या परीने अर्थ लावून जगण्याची शैली निर्माण केली आहे. जगा आणि जगवा याची जागा केवळ जगा आणि इतरांना जगविण्याचा विचार सोडून द्या. परिणामी खऱ्या आनंदापासून समाज फार दूर गेला आहे.💫🌸
🌷🌷🌷
🪔🪔🪔
🌷🌷🌷
©️आनंदी पाऊस
(निवडक रा श्री मो)
१जाने२०२३
|| निवडक-४ भागातील आनंदीकण वाचताना आम्हास Spiritual ,मार्मिक,Good Thoughts ची Power मिळाल्या सारखी वाटले बरे||
ReplyDelete...पुढिल निवडक -५ वाचण्यासारखं ऊत्सुक.
वारकऱ्यांच्या दृष्टीकोनातून सर्वात भव्य मंदिर अंतःकरणातच असते अगदी खरे
ReplyDeleteसर्वच विचार छान
खूप सुंदर उद्बोधक वाचनीय स्मरणीय खूप छान वेचक नेमके शब्दार्थ असलेले खूप सुंदर परामर्श तयार झालेला आहे असेच ज्ञानवर्धक माहिती करता सतत पुरवठा करून आणखी बौद्धिक पातळी वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteनिवडक रा श्री मोरवंचीकर यांनी विशद केलेले पारायण, महाभारत, उपनिषदे, गीता यांचे मितितार्थ वाचून आपल्या मूढ मतीची कीव करावीशी वाटते. सकाम भक्ति किंवा कर्मकांड आपल्याला मूळ भक्तीपासून वंचित करतात हे मनोमन पटते. तू सुरू केलेला हा उपक्रम आमच्या माहीतीत नुसता भर टाकत नाही तर अंतर्मुख करतो. खूप खूप धन्यवाद. 👍
ReplyDeleteआजचा लेख हा एक अर्थाने लेख नव्हेच. मोरवंचीकरसरांच्या लिखाणातले काही तुला भावलेले आनंदी कण तू वाचून शेअर केलेले आहेत. एक तर मी ज्ञानेश्वरी किवा सरांचं त्या विषयावरचं निरुपण वाचलेलं नाही . त्यामुळे त्यांच्या पैठणीला मी माझी ठिगळं काय लावणार ? शिवाय अध्यात्म ह्या विषयाचं काहीही गम्य किंवा ज्ञान नसल्यामुळे ह्या तुझ्या लेखावर काहीही लिहायला किंवा टिप्पणी करायला मी असमर्थ आहे. त्याबद्दलक्षमस्व....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ReplyDelete