Skip to main content

मनोहारी माणिक-पैंजण (घरातील गमती जमती)

 मनोहारी माणिक-पैंजण 

(घरातील गमती जमती)

                          आता आजचे शीर्षक वाचून कुणाच्याही लगेचच मनात येईल, आजची गोष्ट कुठल्यातरी पैंजणाशी संबंधित आहे किंवा एखाद्या पैंजण घालून केलेल्या नृत्याशी संबंधित आहे. पण तसे अजिबातच नाहीये. आजच्या गोष्टीचा अगदी दूरदूरपर्यंत पैंजण किंवा नृत्याशी कुठल्याही प्रकारचा काहीही संबंध नाही. तर आजची गोष्ट आहे एका खाद्य पदार्थाची! शीर्षकातच त्या पदार्थाची दोन नावं दडली आहेत. एक नाव अस्सल खान्देशी आहे आणि दुसरे नाव मला अलीकडेच आभासी सामाजिक माध्यमावर म्हणजेच सोशिअल मीडिया वर समजले आहे. नक्की कुठल्या भागात वापरले जाते ते नाही माहीती, पण गम्मत वाटली आणि आवडलेही. तसे नाव का पडले असावे हा मात्र विचार करण्यासारखा विषय आहे. तर आजची गोष्ट आहे मनोहरा/ मनोहर म्हणजेच माणिक पैंजणाची. पैकी पहिला शब्द म्हणजे मनोहरा/मनोहर शब्द अस्सल खान्देशी. अगदी सोप्प्या शब्दात सांगायचे तर आजची गोष्ट आहे फोडणीच्या पोळीची! 
                    हा पदार्थ आवडत नाही अशी एकही व्यक्ती मला अजून तरी भेटलेली नाही. प्रत्येकाच्याच या पदार्थाशी निगडीत काही ना काही छान अविस्मरणीय अशा आठवणी असतातच. आमचे म्हणजे इतके मोठ्ठे एकत्र कुटुंब. त्यातच येणाऱ्या-जाणाऱ्यांचा कायम राबता चालूच असे. सकाळी जास्त येणारे जाणारे असतं, कारण यावेळी बाबा(आजोबा) आणि घरातील इतर पुरुष मंडळी घरात असत. सकाळीच गरमागरम स्वयंपाक तयार असे आणि सगळ्यांची जेवणाची वेळ सुद्धा. मग येणाऱ्या प्रत्येकाला ताटावर बसवलेच जात असे. तसेच दिवसभरात सुद्धा कुणीही आले तर त्यांना ताटावर बसलेच जात असे. बऱ्याचदा परत कणिक/पीठ भिजवून पोळ्या-भाकरी कराव्या लागत असतं. किंवा काही वेळा गोष्टी पापड खाण्याच्या या लेखात उल्लेख आल्याप्रमाणे पोळी-भाकरी कमी पडली तर पापड आमच्या जेवणाची लज्जत वाढवायला धावून येत आणि आम्ही मुलं एकदम खुश होऊन जात असू. त्यामुळे शिळ्या पोळ्या-भाकरी शिल्लक राहायचा फारसा प्रश्नच येत नसे. 
                   तसेच आजच्या सारखे कधीतरी बाहेर गेलोय आणि सगळ्यांनी तिथेच काही खाल्ले, त्यामुळे घरात भरपूर पोळ्या-भाकरी शिल्लक राहील्या असे होण्याची शक्यताच नव्हती. कारण तेव्हा बाहेर खाण्याची लहर आणि सोय तर नव्हतीच, पण सारखेच कुठे बाहेर जाण्याची सुद्धा लहर नव्हती. तसेच आज घरात केलेलं खायचा कंटाळा आलाय आणि बाहेरचे खायची इच्छा झाली आहे म्हणून बाहेरून काहीतरी मागवून घेतले अशी स्वप्न सुद्धा पडायची अगदी लांब लांब पर्यंत शक्यता नव्हती. थोडक्यात भरपूर पोळ्या-भाकरी शिळ्या राहण्याची फारशी शक्यताच नसे. अगदीच एखादी पोळी/भाकरी शिल्लक राहत असे. पण अन्न फार शिळे करून खाऊ नये. जास्त वेळ ठेवले तर ते नासेल आणि तसे अन्न खाल्लेच तर आरोग्य बिघडणार. तसेच तेव्हा शीत कपाट वगैरे प्रकार नसल्याने, लगेचच पुढच्या सांजेला शिळे अन्न खाऊन संपवून टाकले जात असे. पोट बिघडण्याची शून्य शक्यता! किती आरोग्यदायक!
                       या सर्व कारणांनी हा साधासा पदार्थ फार वेळा घरात होत नसे. आम्हा सगळ्याच मुलांचा हा अतिशय आवडता पदार्थ. त्यामुळे जेव्हा केव्हा होत असे, तेव्हा आम्हा भावंडांची खाण्यासाठी भांडण सुद्धा होत असतं. प्रत्येकालाच पोटभर जेवण मनोहरा खाऊनच करायचे असायचे . बरं, मनोहरा मिळाला खायला की झाले असेही नव्हते. त्यावर लिंबू पिळूनच कालवून खायला आवडे सगळ्यांना. म्हणजे लिंबाशिवाय मनोहर ही गोष्टच आमच्या पचनी पडत नसे. त्यामुळे एखादेवेळी घरात लिंबू नसले घरात की त्याबद्दल परत मम्मीवर चिडचिड करत असू. बरं लिंबू आहे आणि ते पिळून, कालवून घेतले आणि खाल्ले असेही माझे नव्हते. मनोहर भरून ताटली मम्मीने दिली की मी ती तिला तशीच परत करणार आणि सांगणार, मम्मी लिंबू पिळून कालवून दे. का कोण जाणे पण मला स्वतः लिंबू पिळणे अजिबात आवडत नसे. एकतर ते बरोबर पिळता येईल, याची खात्री वाटत नसे. म्हणजे एकतर ते लिंबू पिळतांना रस कुठेतरी तिसरीकडेच उडेल किंवा ते लिंबूच हातातून सटकून कुठेतरी उडेल असे वाटे. अजून एक कारण म्हणजे लिंबू कितीही व्यवस्थित पिळले तरी त्याचा रस बोटांना लागतोच. ते मला खपतच नसे. यामुळे ज्या चमच्याने खाणार तो चमचाही चिकट होणार आणि ती विचित्र जाणीव सगळा मनोहरा खाऊन संपेपर्यंत रहाणार. मग खातांना पूर्ण वेळ ती अस्वस्थता. बरं, लिंबू पिळून दिल्यावर स्वतः कालवून घेणे सुद्धा मला नको असे. कारण मनोहर तर ताटली भरून हवा असे, पण कालवणे तितकेच कठीण. म्हणजे कालवतांना शंभर टक्के सांडला जाणार याची पूर्ण खात्री. त्यामुळे, मम्मी, लिंबू पिळून कालवून दे. हा मंत्रच होता जणू, काही खास पदार्थ खातांनाचा! बाकी पदार्थांचा मुद्दाम इथे उल्लेख करत नाही. त्या-त्या पदार्थाच्या लेखात मात्र उल्लेख करेलच या संदर्भात . 
                         आता या झाल्या सगळ्या तांत्रिक अडचणी. प्रत्येक पदार्थ मम्मीच करत असल्याने त्यात तिचे प्रेम, माया मिसळलेली असेच. पण ताटातील अन्नाला तिच्या हाताचा स्पर्श झालेल्या  पदार्थाची लज्जत शब्दांत मांडणे केवळ अशक्य! अगदी स्वर्गीय चवीच्या सुद्धा पलीकडे जात असे... 
                           पुढे काहीवेळा योगायोगाने मनोहरा केलेला असतांना घरात कढी सुद्धा होती. मग ताटलीत मनोहरा आणि सोबत उकळत्या कढीची वाटी. एक चमचा मनोहरा खायचा आणि एक चमचा कढी प्यायची. अगदी परमोच्च आनंद! पुढे पुढे एक चमचा कढी घेऊन ती मनोहऱ्यावर टाकायची आणि तो घास कालवून खायचा. याची शेवटची पायरी म्हणजे पोळी भाजीचा जसा काला करून खाल्ला जातो, तसा चक्क मनोहरा आणि कढी चा काला करायचा आणि खायचा. या सगळ्या प्रकारात हळू हळू करत लिंबू कधी गायब झाले माझे मलाच कळले नाही, हे ही माझे या लिखाणाच्या निमित्ताने लक्षात आले. मग आपोआपच माझा लहानपणीचा मंत्र सुद्धा माझ्याही नकळत, गायबच झाला. एका अर्थी बरेच झाले. कारण बारावी झाल्यापासून घराबाहेर पडले आहे, त्यामुळे मम्मी सोबत असण्याचा प्रश्नच नाही. मग त्या मंत्राचाही काही उपयोग झाला नसताच. आता कधीतरीच मम्मीचा सहवास मिळतो. त्यातही मनोहरा खाण्याची वेळच येत नाही, कारण कधीतरीच घरी येणाऱ्या लेकीचा जंगी पाहुणचार चालू असतो! 
                             माझे लग्न झाल्यावर लक्षात आले, त्यालाही मनोहरा म्हणजे अगदी जीव की प्राण! बरं आम्ही दोघेच, दोघांची नौकरी. सगळेच मोजकेच केले जात असे. पण आम्हाला मनोहरा तर खायचा असे. अशावेळी मी ठरवून भरपूर शिल्लक राहतील अशा बेताने पोळ्या करत असे. मग या शिल्लक राहिलेल्या शिळ्या पोळ्यांचा मनोहरा करायचा आणि मग हल्ला बोल! भावाचे लग्न झाले, वहिनी सुद्धा मनोहरा वेडी! पण तिची युक्ती भारी एकदम. तोपर्यंत तांत्रिक प्रगती झालेली होती . उत्तम प्रकारची शीत कपाटं सुद्धा बाजारात, घराघरात आलेली होती. तरी सुद्धा अन्न शिळे करू नये. त्यातही शिल्लक राहिलेली पोळी-भाकरी लगेच पुढच्या सांजेला खाऊन संपवली जात असे. खरंतर शिळी पोळी खायला बऱ्याचदा नको वाटते. तर तिची युक्ती एकदम मस्त! त्यामुळे ही शिळी पोळी खावी तर लागतच नाही, पण लाडका मनोहरा सुद्धा खायला मिळतो. तर तिची युक्ती म्हणजे, रोजच्या रोज शिल्लक राहिलेली एखाद-दुसरी पोळी-भाकरी शीत कपाटात ठेऊन द्यायची, मग तीन-चार दिवसांनी मनोहरा करण्या इतक्या पोळ्या सहजच जमतात. मस्त मनोहरा करायचा आणि त्याचा फडशा पाडायचा. मला तर इतकी आवडली तिची ही युक्ती की, मी कायमच या युक्तीचा वापर करू लागले. त्यातच हल्ली जास्तच तांत्रिक प्रगती झाल्याने अजूनच उत्तम प्रतीची शीत कपाटं उपलब्ध आहेत, त्यात मी थोड्या थंड प्रदेशात राहते. मग काय बरेचदा माझ्या कडे वीकएंड मेजवानी म्हणजे मनोहरा आणि कढी!
                             आम्ही दररोज भात खात नाही. पण काही घरात रोज भात खातात. मग यांच्याकडे अजूनच विचित्र परिस्थिती असते. एखादी पोळी आणि लिंबा एव्हढा पासून वाटीभर पर्यंत कितीही भात शिल्लक राहतो. मग याचे काय करायचे मोठ्ठा प्रश्न उभा राहतो. माझी मैत्रिणी त्यावर तिचीच एक युक्ती करते. पोळी छान बारीक मोडून टाकते, भात छान मोकळा करते. दोन्ही एकत्र करून त्याला फोडणी घालते. मला जरा विचित्र वाटले आणि त्याची चव कशी लागेल असेही वाटून गेले. पण खाऊन पाहिल्यावर, फारच आवडला मला तो प्रकार सुद्धा! मग मीही करते असे, जेव्हा थोडा भात आणि पोळी दोन्हीही शिल्लक राहिले असेल तेव्हा ! आणि अगदी प्रेमाने खाते. थोडक्यात काय, गृहिणी सारखी क्रिएटिव्ह, रिसायकल, रियुज आणि रिड्युस करणारी व्यक्ती या जगात दुसरी नाही!   
                             हल्लीच, मी सगळ्या शारीरिक तपासण्या करून घेतल्या. त्यात काही गोष्टी थोड्या इकडे तिकडे आल्या. मग डॉक्टरांनी सांगितले थोडे भाज्यांचे प्रमाण वाढावा आणि पोळी-भाताचे प्रमाण कमी करा. मग काय घेवडा, उटी गाजर, ढोबळी मिरची, मटार, कोबी, टोमॅटो, कांदा अशा सगळ्या भाज्या अगदी प्रेमाने बारीक चिरते आणि या भाज्या घालून मनोहरा करते. ढोबळी मिरची मुळे एक छान चव तर येतेच, पण त्यामुळे घरंभर एक छानसा सुगंध दरवळतो. लेक अगदी विचारतेच, अरे व्वा! छान वास येतोय, काय केलेय आज? भाज्या न घालता केलेला मनोहरा थोडा कोरडा वाटतो खायला, त्यामुळे त्याच्या बरोबर कढी लागतेच. पण भरपूर भाज्या घातल्यावर मनोहरा अजिबातच कोरडा होतं नाही आणि खातांनाही कोरडा वाटतं नाही, अगदी खात्रीने. त्यामुळे कढीची बिलकुल आवश्यकता वाटतं नाही. आणि लिंबू आणि त्यासोबतचा 'आंबटपणा देणारा गोड' मंत्र तर मी केव्हाच विसरून गेलेय. या लिखाणाच्या निमित्ताने त्याची आठवण झाली आणि ते चविष्ट मायाळू क्षण परत अनुभवायला मिळाले!  
ll लिंबू टाकून, कालवून दे ll 
ll इति मनोहारी माणिक पैंजण पुराणम् ll 
©आनंदी पाऊस 
 (घरातील गमती जमती)
१२/२/२०२२


मस्त कढई भरून केलेला 
मनोहरा !



ताटलीत वाढून तय्यार 



हा सगळ्यात हल्लीचा प्रकार 
सगळ्या भाज्या 🥕🧅🍅🥔☘☘
घालून केलेला मनोहरा !



एका बहू तारांकित हॉटेल मध्ये 
लिंबू असे वाढले होते !
मला फारच आवडला हा प्रकार ,
जाळीदार कापडात गुंडाळल्याने 
बिया अन्नात पडणार नाही फक्त रस पडणार 
आणि 
कापड असल्याने लिंबू सटकणे तसेच 
बोटांना रस लागण्याच्या शक्यता 
जवळ जवळ शून्य !🤩😍😇








Comments

  1. Mastach मलाही खूप आवडतो. शिल्लक nasel tr ताज्या पोळ्यांचा करून खातो

    ReplyDelete
    Replies
    1. आनंदी धन्यवाद!! 😇
      फारच दर्दी!!

      Delete
  2. मनिषा कोल्हेFebruary 18, 2022 8:49 am

    Khup chaan ��������������
    Amhi pan shit कपाटात ठेवतो मग मनोहरा करतो ��
    मस्त lihales सर्व डोळ्यासमोर येत होते��

    ReplyDelete
  3. आ.मँडम, सर्व प्रथम धन्यवाद, आपल्या स्वतःस आवडणारे इतके मनोहारी पध्दतीने माडता येते.
    दैनंदिन स्वतःच्या खाद्मकामकाजात आवडीची व्यंजने व त्यावर आपणास आवडनारी चव अधीक केल्यावरची लज्जत इ. वयक्तीक मनोहरीतेला दिलेली दाद.

    ReplyDelete
  4. खुप छान लेख! मला गायत्री नगरच्या घराची आठवण झाली. संध्याकाळी पोटभर मनोहरा आणि कढी.....

    ReplyDelete
  5. रंजना राणेFebruary 18, 2022 11:30 am

    वाह क्या बात है... फोडणीच्या पोळ्यांची बिर्याणी

    ReplyDelete
    Replies
    1. वाह.... बिर्याणी ची उपमा फारच आवडली.
      आनंदी धन्यवाद!! 🙏

      Delete
  6. Mala pan khup avadato manohara..��

    ReplyDelete
  7. तुमचा manohara आणि amcha पोळी चा कुस्करा, अतीशय चविष्ट झाला आहे. लिहिताना भाषा इतकी स्वाद पूर्ण वापरली आहेस की त्या kuskaryachi चव अगदी जिभेवर जाणवते.
    आणि एकंदरीत आई कडून भरपूर लाड करून घेतलेले दिसताहेत. साध लिंबू पण आपल आपण पिळायच नाही म्हणजे काय. पण तू म्हणल्याप्रमाणे हा कुस्करा लहान थोर सगळ्याना आवडतो. लहानपणी काय अगदी हल्ली पर्यंत माझी pinu शी आणि नाना shi पण भांडण व्हायची. मला स्वतः la त्यात दही घालून खायला खूप आवडत. आणखी एक gammat आहे. मला वाटायच की जगात असा मीच एकटा आहे. मला फोडणीचा भात आणि kuskara ekatra मिक्स करून खायला फार आवडत, तुला पण आवडत हे वाचून मस्त वाटल. Gammat म्हणजे ह्या पदार्थाचे नाव एवढे musical कशामुळे ठेवले गेले? ते तू लिहिल नाहीस.

    ReplyDelete
  8. प्रा वैशाली चौधरीFebruary 18, 2022 12:04 pm

    माझाही मनोहरा खूप आवडता. सध्या दोघच असल्याने मोोजून पेाळ्या केल्या जातात पण मनोहरा करायचा असल्यास मुद्दाम त्या दिवशी जास्त पोळ्या करते . मी पण सगळ्या भाज्या टाकते म्हणजे पूर्ण जेवण त्या एका पदार्थात सामावते.

    ReplyDelete
  9. नीलू चौधरीFebruary 18, 2022 1:55 pm

    खूप छान मला pan खूप आवडतो
    मस्त��

    ReplyDelete
  10. Masta�� kharch manohahryachya aathvani jagrut zalaya mala pan manohara khup aavadato

    ReplyDelete
  11. ज्योती पाटीलFebruary 18, 2022 6:49 pm

    खुप छान लिखाण ,मला पण खूप आवडतो मनोहरा ��

    ReplyDelete
  12. Manoharache manohari varnan chanch
    Vishesh karun vegetable manohara wa navin receipe manohara ter awadatoch pan atta navin veg manihara mi try karel

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की करून बघ, आवडेल सगळ्यांना!
      आनंदी धन्यवाद!

      Delete
  13. खुपच छान आहे लेख..मनोहर्याचे नावमाणिक पैंजण कधी ऐकलेले नाही. पण मस्त आहे नाव मनोहर्याचे. .खुपच जुन्या आठवणी छान आहे. सौ. मंदा चौथरी.

    ReplyDelete
    Replies
    1. रसाळ लिंबा सारखे खूप सारे रसाळ प्रेम!!! 😇😇

      Delete
  14. माझी आई अध्यापका विद्यालय, डी एड कॉलेज जळगाव येथे 1954 - 55 ला शिकत होती तेव्हा ती होस्टेलला राहायचं ग्रामीण भागातून आलेली एके दिवशी सकाळच्या ला नाश्ता म्हणून मनोहरा आहे अशी वार्ता पूर्ण होस्टेलमध्ये पसरली आईला वाटलं बापरे मनोहरा म्हणजे खूप छान पदार्थ असणार तिच्या मैत्रिणी ना ही तसंच वाटत होतं मग जेव्हा त्या नाश्ता करायला गेल्या तेव्हा ताटात वाढलेलं बघतात तर काय शिळ्या पोळ्यांचा काला. शिळ्या पोळ्यांचा काला किंवा कुसकरा हा शब्द ग्रामीण भागात परिचित होता त्या काळात आणि अगदी इथे मनोहरा म्हणजे आईला वाटलं खूप छान मिष्ठान्न वगैरे मिळतंय
    की काय? मनोहर आणि माझ्या आईचा पहिला असा कुतूहलात्मक पद्धतीने जुळला.

    ReplyDelete
  15. खूप छान 👌🏻. मला कधी वाटलंच नव्हतं की मनोहर्यवार पण इतकं छान कुणी लिहू शकत . मी तर सकाळच्या पोलीचा दुपारी करते कधी कधी. शिळी चं कशाला हवी पोळी. भाजी आवडली नाही की पोळीला फोडणी द्यायची 😄

    ReplyDelete
    Replies
    1. वावा छान युक्ती!
      आनंदी धन्यवाद! 😍👌

      Delete
  16. डॉ सुवर्णा नारखेडेFebruary 18, 2022 10:33 pm

    मस्त लिहिलंय. मला कधी वाटलं नव्हतं मनोहऱ्यावर पण एवढं लिहिता येऊ शकत. आणि पोळी शिळीच कशाला पाहिजे? मी तर सकाळच्या पोळीचा दुपारी पण करते. भाजी आवडली नाही की पोळीला फोडणी द्यायची ����

    ReplyDelete
  17. व पु होले सरFebruary 19, 2022 10:20 am

    व्वा!खरोखरीच सर्वांचा आवडीचा पदार्थ .मी ब-याचदा मुद्दाम करायला लावतो. अभिनंदन

    ReplyDelete
  18. Manohara var pan yevhde chan lekhan vachun khup aanad zala. Sarvanach aawdanara padarth v tu kele varan pan sunder����

    ReplyDelete
  19. ..मनोहरा उर्फ पोळीचा चिवडा खमंग झालाय...ह्याला "माणिक-पैंजण म्हणतात ह्या लेखातून कळलं.खुपच खुसखुशीत वर्णिले."पैंजणाच्या मंजुळ स्वराप्रपमाणे एक rhythmic चव आहे मनोहराला.माला ती फोटोतून दिसते.आहाहा!!😍

    ReplyDelete
  20. वर्षाली ताई 👍
    मनोरा माणिक पैंजण खूपच सुंदर लेख मांडला.
    एक पूर्वीच्या पारंपारिक दागिनाच जसा
    आज कालच्या पंचतारा का हॉटेलमधल्या बिर्याणीला सुद्धा हीच चव नाही आमच्याकडे पण आम्ही पोळीचा चुर्मा मोठ्या आवडीने खात असू
    आणि मला पण माझ्या आईची आठवण झाली मी पूर्ण स्वयंपाक करून ठेवायची पण वाढायला आईच पाहिजे तुमच्यामुळे माझ्या पण आठवणी ताज्या झाल्या आणि मनोहरा कढी चा विचारांचा बेत खूप रुचकर छान झाला.
    आणि तो मी अगदी वाचतांना टेस्ट घेऊन वाचला अशाच नवीन नवीन मेजवानी यांचा बेत पाठवत जा
    👏👏👍😊🙋

    ReplyDelete
  21. लिंबाच्या पोटली ची तर खूपच नवीनच बघायला मिळाले
    हे कुठे हॉटेलला देतात का 👍😊

    ReplyDelete
    Replies
    1. एका प्रसिद्ध बहु तारांकित हॉटेल मध्ये पाहिले मी!

      Delete
  22. Manohari manik pie janar name jilted chan tasech padarthache warnan hi chan
    Aai kalwun dete
    Aani aaiche Hitachi chav te padarthat utarte
    Koni panch pakwan samor thewle tari aaine kalavleli phodnichi poli ch pasant karu
    Aamhi school warun aalo ki bhakri Phodni aasech banwun khat aasu
    Sadhech pan ruchkar padarth aaple kalatil techi tula burger pizzashi hou shakat nahi
    Mast leka punha mage lahanpani che jagat gele
    Aaple manache kappiyat khoop sare gosti dadlelita aastat
    Tuze lekh lekh too aanand mala milto

    ReplyDelete
    Replies
    1. वावा किती छान अनुभव अणि भावना व्यक्त केल्या आहेत काकु तुम्ही! फारच आवडले मला!
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😍😇🙏

      Delete
  23. .खुप छान मनोरा माणिक पैंजण अप्रतिम लेख मनोहरा आणि कढी माझी आवडती.खुप छान वर्णन केले आहे👌👌

    ReplyDelete
  24. मनिष चिरमाडेFebruary 28, 2022 11:40 am

    वा...��
    ताई तुझ्या प्रत्येक लेख वाचताना तोंडाला पाणी सुटते...
    आपल्याला पण भारी आवडतो मनोहरा...
    फक्ट कडी टाकून कधी खालला नाही आता नक्की try करतो...��
    मनोहारी माणिक पैंजण��������
    आणि तो लिबूचा पीक आणि आयडिया पण मस्त हॉटेल मधली

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😍

      Delete
  25. Aamhal pan khupch aavadto ������ chhan

    ReplyDelete
  26. Seemantini chaphalkarFebruary 09, 2023 9:48 am

    Title 👌👌

    ReplyDelete
  27. डॉ दीपक शिरसाठNovember 25, 2024 7:24 am

    खुप सुंदर👍

    ReplyDelete
  28. सीमा बोंडेNovember 25, 2024 9:33 am

    खूप छान

    ReplyDelete
  29. उषा पाटीलNovember 25, 2024 7:34 pm

    मनोहरा एक असे खाद्य आहे की रोज ही खायला दिलं तर कोणी नाही म्हणणार नाही, माझी एक भाची आहे तिच्या आजी सासऱ्यांचं जळगावला मनोहर असं हॉटेल होतं त्यात पोळ्या उरल्या की दुसऱ्या दिवशी त्याचा कुस्करा बनवायचे आणि लोक खूप आवडीने खायचे तेव्हा त्याचं नाव मनोहर पडलं असं माझ्या ऐकण्यात आहे, लिंबू साखर घातलेला मनोरा खूपच छान लागतो, वर कोथिंबीर पेरायची की मग wow असा हा मनोहर नाष्टा, तुला काय ग काही पण सुचत तू लिहायचं आणि आम्ही वाचायचं, मस्त

    ReplyDelete
  30. Mastch manohara...
    Aani painjan naav ter prathamch aikale.....limbu chi potali idea ter farch chhan....👌🏻👍🏻🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...