शेवपुरी
(अनुभवलेलं काही...)
ही गोष्ट आहे , मी एका खाजगी कार्यालयात काम करत होते , तेव्हाची . मुख्य कार्यालय अगदी हमरस्त्यावर , तेही माझ्या अगदी आवडत्या ! जायला यायला सोयीचे , कार्यालयाची वेळ संपली की त्याच भागात भाजारहाट करून घरी परतता येत असे . त्यातच तिथे छान मैत्रिणी पण मिळाल्या , त्यामुळे एकदम खुश होते मी . पण माझ्याच पाय गुणामुळे 😄 की काय कार्यालयातील प्रकल्पांची संख्या वाढली . त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढवावी लागली . कार्यालयाची जागा तशी फारशी मोठी नव्हती . म्हटलं या नवीन कर्मचाऱ्यांना बसवणार तरी कुठे ? तर आम्हा सगळ्यांचीच बसण्याची सोय एका दुसऱ्या जागेत करण्यात आली .
आता आमच्यासारख्या कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्यांचा खूपच राबता असतो , तसाच आमच्या कार्यालयात सुद्धा होताच . क्लायंट , कंत्राटदार , मजूर , माल पुरवणारे वगैरे वगैरे . त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला जेवण सुद्धा शांततेत करता येत नव्हते . पण एकदम झालेल्या या बदलाचा खूपच परिणाम झाला . आम्हाला काम आणि जेवण दोन्हीही शांततेत करता येऊ लागले . कारण ही सगळी मंडळी मुख्य कार्यालयात जात असत , इकडे फारसे कुणी फिरकत नसे . क्वचितच कुणी इकडे फिरकत असे . एखाद्याला दिलेला नकाशा नीट समाजाला नाही , तर ते समजून घेण्यासाठी किंवा एखाद्या क्लायंट ना काही काम चालू असलेले नकाशे पाहायचे असतील तर ते , अशी मोजकीच मंडळी या कार्यालयात येत असत .
जेवायलाही छान शांतता मिळे . रोजच डब्यातील सुकी भाजी पोळी खाऊन कंटाळा येत असे बऱ्याच वेळा . मग यावर उपाय आणि थोडा बदल म्हणून माझ्या मैत्रिणींच्या डोक्यात एक भारी कल्पना आली . म्हणाल्या आपण एक दिवस कार्यालयातच शेवपुरी करू या आणि खाऊ या ! मला आधी दडपणच आले , बापरे , कसे करणार आणि कसे खाणार ? वेळेची सांगड घालता येईल का ? वगैरे वगैरे . पण माझ्या मैत्रिणींनी छान नियोजन आणि वाटणी केली . शेवपुरी साठी काय काय साहित्य लागणार हे बघून , प्रत्येकीने घरून काय काय आणि किती आणायचे हे नीट ठरवून घेतले . म्हणजे पुदिना चटणी , आंबट चटणी , गोड चटणी , उकडलेला बटाटा , कांदे , टमाटे , कोथिंबीर , बारीक शेव आणि पुऱ्या . सगळं अगदी तयार करून आणायचे , फक्त कांदे आणि टमाटे वेळेवर कापायचे . कारण घरून कापून आणले तर ते खराब होऊन जाणार . शक्य तितका वेळ कमी लागेल याची संपूर्ण काळजी घेतली गेली .
फारच मजेशीर आणि उत्साही वाटत होते त्या दिवशी , कार्यालयात नेहमीप्रमाणे डबा न नेता कांदे , बटाटे , टमाटे वगैरे घेऊन जायचे म्हणजे ! थोडी भीती , धाकधूक होती सोबतच , सगळे नीट पार पडेल ना ? काही गडबड होणार नाही ना? वगैरे वगैरे . कार्यालयात पोचल्याबरोबर सोबतच्या पिशव्या जागेवर ठेऊन , नेहमीप्रमाणे कामाला लागलो . दुपारी जेवणाची वेळ होईपर्यंत सगळे सुरळीत झाले , कुणीही आले नाही . जेवणाची वेळ झाल्या बरोबर मात्र आम्ही अगदी चपळाईने कामाला लागलो . खरंतरं मला तेव्हा माहिती नव्हते , नीटसे , शेवपुरी कशी करायची ते . कारण या पूर्वी घरी कधीही केलेली तर नव्हतीच , पण बाहेर सुद्धा अगदी मोजून एक-दोन वेळाच खाल्लेली होती . बाहेरचे सगळे चाट सारखेच दिसते आणि चवीलाही थोड्याफार फरकाने सारखेच असते . मग माझ्या मैत्रिणींनी मला सांगितले/शिकविले . त्याप्रमाणे मी करत गेले .
इथे थोडक्यात सांगते शेवपुरी कशी करायची ते . कारण आता इतक्या वर्षात मी एकदम तरबेज झालेय शेवपुरी बनवण्यात ! तर सगळ्यात आधी ताटलीत एक एक पुऱ्या छान रचून घ्यायच्या . मी शेव पुरीच्या पुऱ्या च्या ऐवजी पाणीपुरीच्या पुऱ्या वापरून सुद्धा करते . या पुऱ्या वापरल्या तर फार सोयीचे होते . कारण या पुऱ्यातून वर घातलेले साहित्य खाली सांडून जात नाही , त्यामुळे जरा मोकळेपणे खाता येतात छान . मग या पुऱ्यांवर बटाटा घालायचा , थोडा पसरट करून . (उकडलेला बटाटा कुस्करून त्यात थोडा चाट मसाला , काळ मीठ आणि साधं मीठ घालून परत छान कुस्करून घ्यायचा ) बटाटा असा पसरट घातल्याने , नंतर घालाव्या लागणाऱ्या साहित्याला छान पक्का पाया तयार होतो . यामुळे ते पडून जाण्याची शक्यता कमी असते . मग यावर एक थर बारीक कापलेल्या कांद्याचा घालावा . (कांद्यात थोडे मीठ घालावे) त्यानंतर बारीक चिरलेल्या टमाट्याचा एक थर घालावा , यात सुद्धा थोडे मीठ घालावे . मग त्यावर आवडीप्रमाणे थोडी थोडी पुदिना चटणी आणि आंबट-गोड चटणी घालावी . वरून छान बारीक शेव घालावी , थोडी दाबावी . शेव वरून थोडी दाबली तर , ती तर पडून जात नाहीच , पण त्या खाली असलेला कांदा आणि टमाटे सुद्धा छान जागच्याजागी बसतो आणि पडून जाण्याची शक्यताच राहत नाही . सरते शेवटी कोथिंबीर . ही तय्यार शेवपुरी , मग हल्ला बोल !
सगळे हात पटापट कामाला लागले . एकीकडे करण्याचा उत्साह , तर दुसरीकडे मनात थोडी धाकधूक , कुणी येईल का ? वगैरे . वाटत होते , कमीत कमी आमचे खाऊन होईपर्यंत तरी कुणी येऊ नये . थोड्याच वेळात सगळ्या पुऱ्या लावून तय्यार झाल्या . मग काय हल्ला बोल . मनावर ताबा राहणे शक्यच नव्हते . पहिली पुरी तोंडात टाकली आणि अहाहा ! स्वर्गसुख !! इतकी सुंदर , चविष्ट , स्वादीष्ट , शेवपुरी मी त्याआधी कधीच खाल्ली नव्हती . त्यानंतर तर मी बाकी पदार्थां बरोबर शेव पुरी सुद्धा नियमित करू लागले . पण त्या दिवशीची चव आणि मजा कधीच आली नाही शेव पुरी खायला ! कारण पदार्थाला त्याची चव असतेच पण त्यात सोबतच्या माणसांची , त्या वातावरणाची आणि कष्टांची सुद्धा चव त्यात मिसळली जाते . मग काय मस्त पोटभर आणि मनसोक्त शेवपुरीचे जेवण केले . त्यानंतर सगळी आवरा आवर करून मी खुर्चीवर टेकतच होते आणि माझे लक्ष मुख्य प्रवेश द्वारा कडे गेले . दार काचेचे होते . बाहेर सर आलेले दिसले आणि माझ्या चेहऱ्यावरील भाव बदलेले माझ्या मैत्रिणींच्या लक्षात आले . त्या सावध झाल्या आणि भराभर आपल्या जागेवर जाऊन बसल्या . ते आत आले आणि सगळे कामकाज नेहमीसारखे सुरळीत चालू झाले .
त्या दिवशी तर मी शिकलेच शेवपुरी करायला , पण घरी सगळ्यांना आणि बाकी मैत्रिणींना सुद्धा शिकविली शेवपुरी करायला . या आधी आम्ही घरी फक्त भेळ , पाणीपुरी आणि कचोरी बनवून खात होतो . या दिवसापासून चाटच्या यादीत शेवपुरी हा एक पदार्थ अजून आला आणि सगळ्यांच्याच खूप आवडीचा होऊन गेला . बऱ्याचवेळा अगदी उत्साहाने आणि आवडीने बनवला आणि खाल्ला जातो , अगदी पोटभर . म्हणजे एक जेवण शेवपुरीचेच !
कार्यालयातील या शेवपुरीच्या प्रसंगानंतर मात्र अशी एखादीच संधी मिळाली , असे करून खाण्याची . कारण त्यानंतर मुख्य कार्यालयाच्या बाजूचीच जागा मिळाल्याने , तिथेच प्रशस्त कार्यालय झाले आणि आम्ही कालांतराने परत मुख्य कार्यालयात स्थलांतरित झालो . पुढे हळूहळू करत एकेकीने तिथली नौकरी सोडली , ते शहरही सोडले . पण आमची मैत्री अजून सुद्धा तशीच छान घट्ट आहे , किंबहुना दिवसेंदिवस छान फुलतेय . तंत्रज्ञान विकसित झाल्याचा , आमच्या मैत्रीला खूपच फायदा झाला . अन्यथा एकमेकींच्या संपर्कात राहणे केवळ अशक्य होते . अगदी नियमित विडिओ कॉल करतो , कमीत कमीत दीड दोन तास तरी चालतो आमचा कॉल . यात बोलण्यापेक्षा खळखळून हसण्यातच आमचा जास्त वेळ जातो ! आम्ही नावच ठेवून टाकले , हास्य क्लब !
©आनंदी पाऊस
(काही अनुभवलेलं...)
५जूलै२०२१
टी स्केवर , बोर्ड वर काम करणे म्हणजे अक्षरशः स्वर्गीय सुख !
शेवपुरी !
शेवपुरी !
Shevpuri pan mast banvili aahes
ReplyDeleteWa sunder!
खूप खूप सप्रेम धन्यवाद !😍🤩
DeleteShevpuri chi recipe hi Samazli.....Shevpuri 😋😋
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद !😍
Deleteमस्तच पाणी आल तोंडाला ����
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !💐
DeleteVery nice��
ReplyDeleteMouth watering shevpuri
Ab hm bhi banayenge
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !
DeleteWaw shevpuri thondala tar pani sutale
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !🙏🤩
Deleteखुप छान नवनवीन पदार्थ शिकायला मिळाले.👌👌
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
DeleteWow खुपच छान. शेवपुरी तोंडाला पाणी सुटले. मलापण खूप आवडते. मुलं शिकायला बाहेर गावी गेल्यापासून शेवपुरी खाणं बंदच झाले
ReplyDeleteआठवणीने आपल्याला आवडते म्हणून , आपल्या स्वतः साठी करायची ! त्यात सुद्धा अगदी आतून आनंद मिळतो . एकदा अनुभव घेऊन बघ !
Deleteशेवपुरी हा प्रकार मला नवीन आहे. तू घेतलेला आनंद तुझ्या कायम लक्षात राहील असाच दिसत आहे.��������
ReplyDeleteहो का ? मी तिकडे आली की आपण बनवू या आणि मिळून खाऊ या , धमाल येईल एकदम !
Delete��mast सर्वांनाच खूप आवडते��
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !🙏😍
DeleteAaj parat ek receipe 👍
ReplyDeleteTondala panich sutale 😋
मनःपूर्वक धन्यवाद !🙏😍🤩
Deleteवर्षाली ताई अगदी👍🏻
ReplyDeleteचविष्ट झाली शेवपुरी अगदी नखाता ही टेस्टस समजली इतके सुंदर वर्णन केले आहे
आणि परत ऑफिस मध्ये आलेल्या अशाच गमतीजमती ची आठवण झाली😊😋
वावा छानच ! मनःपूर्वक धन्यवाद ! 🤩😍😄
Deleteअग किती छान..असे गुपचूप बनवायला आणि खायला किती उत्साह येतो..आणि खायला तर एकदम टेस्टी लागते.. भन्नाट..👍
ReplyDeleteएकदम धमाल ! आणि आठवण आयुष्यभराची !
Deleteएवढे सुंदर वर्णन तोंडाला पाणी तर सुटले पण असा आत्मविश्वास वाटतो आहे कि आता मी पण शेवपुरी घरी करू शकेल धन्यवाद छान रेसिपी सांगितली
ReplyDeleteवावा छानच ! आता मी आली की तू मला शेव पुरीचाच पाहुणचार कर , तुझ्या हाताने बनवलेल्या !मनःपूर्वक धन्यवाद !😍😉
Deleteशेवपुरी चा लेख चटपटीत झालाय.elipsoid फुगीर अशा शेवपुरी रेसिपी भारीच..मसालाभरल्यनंतर गोंडस दिसणाऱ्या पु्रयांचे वर्णन छान केलें आहे.
ReplyDeleteचटपटीत , गोंडस धन्यवाद !!🤩😍😇
Delete