Skip to main content

शेवपुरी (अनुभवलेलं काही...)

 शेवपुरी 

(अनुभवलेलं काही...)


                                ही गोष्ट आहे , मी एका खाजगी कार्यालयात काम करत होते , तेव्हाची . मुख्य कार्यालय अगदी हमरस्त्यावर , तेही माझ्या अगदी आवडत्या ! जायला यायला सोयीचे , कार्यालयाची वेळ संपली की त्याच भागात भाजारहाट करून घरी परतता येत असे . त्यातच तिथे छान मैत्रिणी पण मिळाल्या , त्यामुळे एकदम खुश होते मी . पण माझ्याच पाय गुणामुळे 😄 की काय कार्यालयातील प्रकल्पांची संख्या वाढली . त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढवावी लागली . कार्यालयाची जागा तशी फारशी मोठी नव्हती . म्हटलं या नवीन कर्मचाऱ्यांना बसवणार तरी कुठे ? तर आम्हा सगळ्यांचीच बसण्याची सोय एका दुसऱ्या जागेत करण्यात आली . 
                          आता आमच्यासारख्या कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्यांचा खूपच राबता असतो , तसाच आमच्या कार्यालयात सुद्धा होताच . क्लायंट , कंत्राटदार , मजूर , माल पुरवणारे वगैरे वगैरे . त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला जेवण सुद्धा शांततेत करता येत नव्हते . पण एकदम झालेल्या या बदलाचा खूपच परिणाम झाला . आम्हाला काम आणि जेवण दोन्हीही शांततेत करता येऊ लागले . कारण ही सगळी मंडळी मुख्य कार्यालयात जात असत , इकडे फारसे कुणी फिरकत नसे . क्वचितच कुणी इकडे फिरकत असे . एखाद्याला दिलेला नकाशा नीट समाजाला नाही , तर ते समजून घेण्यासाठी किंवा एखाद्या क्लायंट ना काही काम चालू असलेले नकाशे पाहायचे असतील तर ते , अशी मोजकीच मंडळी या कार्यालयात येत असत . 
                          जेवायलाही छान शांतता मिळे . रोजच डब्यातील सुकी भाजी पोळी खाऊन कंटाळा येत असे बऱ्याच वेळा . मग यावर उपाय आणि थोडा बदल म्हणून माझ्या मैत्रिणींच्या डोक्यात एक भारी कल्पना आली . म्हणाल्या आपण एक दिवस कार्यालयातच शेवपुरी करू या आणि खाऊ या ! मला आधी दडपणच आले , बापरे , कसे करणार आणि कसे खाणार ? वेळेची सांगड घालता येईल का ? वगैरे वगैरे . पण माझ्या मैत्रिणींनी छान नियोजन आणि वाटणी केली . शेवपुरी साठी काय काय साहित्य लागणार हे बघून , प्रत्येकीने घरून काय काय आणि किती आणायचे हे नीट ठरवून घेतले . म्हणजे पुदिना चटणी , आंबट चटणी , गोड चटणी , उकडलेला बटाटा , कांदे , टमाटे , कोथिंबीर , बारीक शेव आणि पुऱ्या . सगळं अगदी तयार करून आणायचे , फक्त कांदे आणि टमाटे वेळेवर कापायचे . कारण घरून कापून आणले तर ते खराब होऊन जाणार . शक्य तितका वेळ कमी लागेल याची संपूर्ण काळजी घेतली गेली . 
                          फारच मजेशीर आणि उत्साही वाटत होते त्या दिवशी , कार्यालयात नेहमीप्रमाणे डबा न नेता कांदे , बटाटे , टमाटे वगैरे घेऊन जायचे म्हणजे ! थोडी भीती , धाकधूक होती सोबतच , सगळे नीट पार पडेल ना ? काही गडबड होणार नाही ना? वगैरे वगैरे . कार्यालयात पोचल्याबरोबर सोबतच्या पिशव्या जागेवर ठेऊन , नेहमीप्रमाणे कामाला लागलो . दुपारी जेवणाची वेळ होईपर्यंत सगळे सुरळीत झाले , कुणीही आले नाही . जेवणाची वेळ झाल्या बरोबर मात्र आम्ही अगदी चपळाईने कामाला लागलो . खरंतरं मला तेव्हा माहिती नव्हते , नीटसे , शेवपुरी कशी करायची ते . कारण या पूर्वी घरी कधीही केलेली तर नव्हतीच , पण बाहेर सुद्धा अगदी मोजून एक-दोन वेळाच खाल्लेली होती . बाहेरचे सगळे चाट सारखेच दिसते आणि चवीलाही थोड्याफार फरकाने सारखेच असते . मग माझ्या मैत्रिणींनी मला सांगितले/शिकविले . त्याप्रमाणे मी करत गेले . 
                         इथे थोडक्यात सांगते शेवपुरी कशी करायची ते . कारण आता इतक्या वर्षात मी एकदम तरबेज झालेय शेवपुरी बनवण्यात ! तर सगळ्यात आधी ताटलीत एक एक पुऱ्या छान रचून घ्यायच्या . मी शेव पुरीच्या पुऱ्या च्या ऐवजी पाणीपुरीच्या पुऱ्या वापरून सुद्धा करते . या पुऱ्या वापरल्या तर फार सोयीचे होते . कारण या पुऱ्यातून वर घातलेले साहित्य खाली सांडून जात नाही , त्यामुळे जरा मोकळेपणे खाता येतात छान . मग या पुऱ्यांवर बटाटा घालायचा , थोडा पसरट करून . (उकडलेला बटाटा कुस्करून त्यात थोडा चाट मसाला , काळ मीठ आणि साधं मीठ घालून परत छान कुस्करून घ्यायचा ) बटाटा असा पसरट घातल्याने , नंतर घालाव्या लागणाऱ्या साहित्याला छान पक्का पाया तयार होतो . यामुळे ते पडून जाण्याची शक्यता कमी असते . मग यावर एक थर बारीक कापलेल्या कांद्याचा घालावा . (कांद्यात थोडे मीठ घालावे) त्यानंतर बारीक चिरलेल्या टमाट्याचा एक थर घालावा , यात सुद्धा थोडे मीठ घालावे . मग त्यावर आवडीप्रमाणे थोडी थोडी पुदिना चटणी आणि आंबट-गोड चटणी घालावी . वरून छान बारीक शेव घालावी , थोडी दाबावी . शेव वरून थोडी दाबली तर , ती तर पडून जात नाहीच , पण त्या खाली असलेला कांदा आणि टमाटे सुद्धा छान जागच्याजागी बसतो आणि पडून जाण्याची शक्यताच राहत नाही . सरते शेवटी कोथिंबीर . ही तय्यार शेवपुरी , मग हल्ला बोल !
                         सगळे हात पटापट कामाला लागले . एकीकडे करण्याचा उत्साह , तर दुसरीकडे मनात थोडी धाकधूक , कुणी येईल का ? वगैरे . वाटत होते , कमीत कमी आमचे खाऊन होईपर्यंत तरी कुणी येऊ नये . थोड्याच वेळात सगळ्या पुऱ्या लावून तय्यार झाल्या . मग काय हल्ला बोल . मनावर ताबा राहणे शक्यच नव्हते . पहिली पुरी तोंडात टाकली आणि अहाहा ! स्वर्गसुख !! इतकी सुंदर , चविष्ट , स्वादीष्ट , शेवपुरी मी त्याआधी कधीच खाल्ली नव्हती . त्यानंतर तर मी बाकी पदार्थां बरोबर शेव पुरी सुद्धा नियमित करू लागले .  पण त्या दिवशीची चव आणि मजा कधीच आली नाही शेव पुरी खायला ! कारण पदार्थाला त्याची  चव असतेच पण त्यात सोबतच्या माणसांची , त्या वातावरणाची आणि कष्टांची सुद्धा चव त्यात मिसळली जाते . मग काय मस्त पोटभर आणि मनसोक्त शेवपुरीचे जेवण केले . त्यानंतर सगळी आवरा आवर करून मी खुर्चीवर टेकतच होते आणि माझे लक्ष मुख्य प्रवेश द्वारा कडे गेले .  दार काचेचे होते . बाहेर सर आलेले दिसले आणि माझ्या चेहऱ्यावरील भाव बदलेले माझ्या मैत्रिणींच्या लक्षात आले . त्या सावध झाल्या आणि भराभर आपल्या जागेवर जाऊन बसल्या . ते आत आले आणि सगळे कामकाज नेहमीसारखे सुरळीत चालू झाले . 
                           त्या दिवशी तर मी शिकलेच शेवपुरी करायला , पण घरी सगळ्यांना आणि बाकी मैत्रिणींना सुद्धा शिकविली शेवपुरी करायला . या आधी आम्ही घरी फक्त भेळ , पाणीपुरी आणि कचोरी बनवून खात होतो . या दिवसापासून चाटच्या यादीत शेवपुरी हा एक पदार्थ अजून आला आणि सगळ्यांच्याच खूप आवडीचा होऊन गेला . बऱ्याचवेळा अगदी उत्साहाने आणि आवडीने बनवला आणि खाल्ला जातो , अगदी पोटभर . म्हणजे एक जेवण शेवपुरीचेच ! 
                          कार्यालयातील या शेवपुरीच्या प्रसंगानंतर मात्र अशी एखादीच संधी मिळाली , असे करून खाण्याची . कारण त्यानंतर मुख्य कार्यालयाच्या बाजूचीच जागा मिळाल्याने , तिथेच प्रशस्त कार्यालय झाले आणि आम्ही कालांतराने परत मुख्य कार्यालयात स्थलांतरित झालो . पुढे हळूहळू करत एकेकीने तिथली नौकरी सोडली , ते शहरही सोडले . पण आमची मैत्री अजून सुद्धा तशीच छान घट्ट आहे , किंबहुना दिवसेंदिवस छान फुलतेय . तंत्रज्ञान विकसित झाल्याचा , आमच्या मैत्रीला खूपच फायदा झाला . अन्यथा एकमेकींच्या संपर्कात राहणे केवळ अशक्य होते . अगदी नियमित विडिओ कॉल करतो , कमीत कमीत दीड दोन तास तरी चालतो आमचा कॉल . यात बोलण्यापेक्षा खळखळून हसण्यातच आमचा जास्त वेळ जातो ! आम्ही नावच ठेवून टाकले , हास्य क्लब !

  ©आनंदी पाऊस 
(काही अनुभवलेलं...)
५जूलै२०२१




टी स्केवर , बोर्ड वर काम करणे म्हणजे अक्षरशः स्वर्गीय सुख !



शेवपुरी ! 


शेवपुरी !






Comments

  1. Shevpuri pan mast banvili aahes
    Wa sunder!

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप सप्रेम धन्यवाद !😍🤩

      Delete
  2. Shevpuri chi recipe hi Samazli.....Shevpuri 😋😋

    ReplyDelete
  3. मस्तच पाणी आल तोंडाला ����

    ReplyDelete
  4. Very nice��
    Mouth watering shevpuri
    Ab hm bhi banayenge

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  5. Waw shevpuri thondala tar pani sutale

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !🙏🤩

      Delete
  6. खुप छान नवनवीन पदार्थ शिकायला मिळाले.👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊

      Delete
  7. Wow खुपच छान. शेवपुरी तोंडाला पाणी सुटले. मलापण खूप आवडते. मुलं शिकायला बाहेर गावी गेल्यापासून शेवपुरी खाणं बंदच झाले

    ReplyDelete
    Replies
    1. आठवणीने आपल्याला आवडते म्हणून , आपल्या स्वतः साठी करायची ! त्यात सुद्धा अगदी आतून आनंद मिळतो . एकदा अनुभव घेऊन बघ !

      Delete
  8. एल झेड कोल्हेAugust 20, 2021 9:19 pm

    शेवपुरी हा प्रकार मला नवीन आहे. तू घेतलेला आनंद तुझ्या कायम लक्षात राहील असाच दिसत आहे.��������

    ReplyDelete
    Replies
    1. हो का ? मी तिकडे आली की आपण बनवू या आणि मिळून खाऊ या , धमाल येईल एकदम !

      Delete
  9. स्वाती प्रभुणेAugust 20, 2021 9:22 pm

    ��mast सर्वांनाच खूप आवडते��

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !🙏😍

      Delete
  10. Aaj parat ek receipe 👍
    Tondala panich sutale 😋

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !🙏😍🤩

      Delete
  11. वर्षाली ताई अगदी👍🏻
    चविष्ट झाली शेवपुरी अगदी नखाता ही टेस्टस समजली इतके सुंदर वर्णन केले आहे
    आणि परत ऑफिस मध्ये आलेल्या अशाच गमतीजमती ची आठवण झाली😊😋

    ReplyDelete
    Replies
    1. वावा छानच ! मनःपूर्वक धन्यवाद ! 🤩😍😄

      Delete
  12. अग किती छान..असे गुपचूप बनवायला आणि खायला किती उत्साह येतो..आणि खायला तर एकदम टेस्टी लागते.. भन्नाट..👍

    ReplyDelete
    Replies
    1. एकदम धमाल ! आणि आठवण आयुष्यभराची !

      Delete
  13. एवढे सुंदर वर्णन तोंडाला पाणी तर सुटले पण असा आत्मविश्वास वाटतो आहे कि आता मी पण शेवपुरी घरी करू शकेल धन्यवाद छान रेसिपी सांगितली

    ReplyDelete
    Replies
    1. वावा छानच ! आता मी आली की तू मला शेव पुरीचाच पाहुणचार कर , तुझ्या हाताने बनवलेल्या !मनःपूर्वक धन्यवाद !😍😉

      Delete
  14. शेवपुरी चा ‌लेख चटपटीत ‌झालाय.elipsoid फुगीर अशा‌ शेवपुरी रेसिपी भारीच..मसाला‌भरल्यनंतर गोंडस दिसणाऱ्या पु्रयांचे वर्णन छान केलें ‌आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. चटपटीत , गोंडस धन्यवाद !!🤩😍😇

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...