नंदी दुर्ग (नंदी बेट्टा /नंदी हिल्स)
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
नंदी दुर्ग, नंदी बेट्टा, नंदी हिल्स ही तिन्ही नावं एकाच ठिकाणाची आहेत.
बंगळुरू पासुन साधारण ६० कि मी
बंगळुरू विमानतळापासुन ३९ कि मी
चिक्कबल्लापूर पासुन २४ कि मी
हा एक टेकडी किल्ला आहे. गंगा राजवटीत बांधला गेलेला. अजूनही सगळे बुरुज मजबुत आहेत.
समुद्र सपाटीपासुन साधारण ४८५१ फुट उंचीवर आहे.
त्यानंतर टीपू सुलतान ने त्याचा उन्हाळी महाल इथे बांधला आहे.
तष्क-ए-जन्नत.
रंगवलेल्या भिंती, किचकट आणि अवघड अश्या कमानी, अत्यंत सुंदर कलाकुसर केलेले छत.
अशा या सुंदर महालात टिपू सुलतान उन्हाळ्यात इथे येत असे. थंड हवेचे ठिकाण असल्याने.
नंतर ब्रिटिश काळात सर मार्क कब्बन ने (कमिशनर ऑफ म्हैसुरू) कलोनिअल आर्किटेक्टर पद्धतीचा एक बंगला बांधला (१८००).सर कब्बन चे उन्हाळी घर हे.
सगळ्यात पहिली SAARC इथेच भरली होती.
नंतर नेहरू सुद्धा येथे राहून गेलेले आहेत.
आता ही इमारत आणि सभोवताल, हॉर्टिकल्चर विभागाकडे आहे. देखभाली साठी.
त्याचे गेस्ट हाऊस मध्ये रूपांतर केलेलं आहे . तुम्ही इथे खोली घेऊन राहू शकता.
सभोवताली वेगवेगळी सुंदर सुंदर फुलझाडं लावलेली आहे आणि त्याची उत्तम देखभाल केली जाते.
अर्कावती नदीचा उगम सुद्धा नंदी दुर्ग येथे आहे .
तसेच मुख्य कमानीतुन आता शिरल्यावर समोरच एक पायऱ्यांची कल्याणी आहे. कायम पाणी असते त्यात.
हेच पाणी त्याच्या आजुबाजुच्या परिसरातील फुलझाडांना देण्यासाठी वापरले जाते.
मागच्या बाजुला गेले तर एक भव्य नंदी आहे, एका अखंड दगडातुन कोरलेला.
तिथुनच थोडे पुढे गेले की एक गुहा आहे. एकदम शांत आणि एकांतात असलेल्या भागात.
येथे ऋषी रामकृष्ण परमहंस यांनी ध्यान केलेले आहे.
अजुन एक शिव मंदिर आहे. तिथे काही प्रमाणात पूजाअर्चा चालते आणि काही भाविक येत असतात.
या व्यतिरिक्त, टेकडी असल्याने, तुम्ही ट्रेकिंग करू शकता. या टेकडी वरून खाली किंवा खालुन वर ट्रेकिंग करत येऊ शकता.
स्वतःची दुचाकी किंवा चार चाकी ने वरपर्यंत जाऊ शकता. मुख्य प्रवेश द्वारातुन आता आले की तिथेच वाहन तळ आहे.
किंवा तिथून वर सुद्धा गाडी नेता येता . बस मात्र इथेच पार्क करावी लागते.
एव्हढी सगळी बांधकाम आधीची आणि अजुन नवीन नवीन होताच आहे. तरी बऱ्यापैकी दाट जंगल सुद्धा आहे.
आणि भरपुर चढ उत्तर सुद्धा.
त्यामुळे जंगल भटकंती आणि ट्रेकिंग करत करत छान वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुल, पक्षी, कीटक बघण्याचा आनंद लुटता येतो.
सूर्योदय आणि सूर्यास्त सुद्धा फार सुंदर दिसतो. बरेच लोक खास ते बघण्यासाठी लवकर सूर्योदया आधी जातात.
पावसाळ्यात सुद्धा खूप सुंदर वातावरण असते. पाऊस आणि थंडीही. शक्यतो एखादे जाकीट, टोपी, शाल असे कायम जवळ ठेवावेच लागते.
सभोवताली थोडे खालच्या बाजूला ढगच ढग असतात. आणि तुम्ही ढगांच्या वर असतात.
अगदी स्वर्गसुख! स्वप्नांच्या दुनियेत असल्यागत वाटते!
बऱ्याच वेळा कुठल्या कुठल्या सिनेमाचे चित्रीकरण सुद्धा चालू असते इथे.
खाण्यापिण्याची सगळी चांगलं आहे इथे. काय पाहिजे ते उपलब्ध असते इथे. पण हे सगळे खातांना एक काळजी घ्यावी लागते त्या त्या ठिकाणीच ते ते पदार्थ खावे लागतात.
किंवा तुमच्या गाडीत बसुन. कारण प्रचंड प्रमाणात माकडं आहेत इथे. एखादी खाण्याची वस्तू घेऊन एखाद्या दुकानातुन किंवा हॉटेल मधुन हातात घेऊन बाहेर पडलात तर, ती अगदी खात्रीने तुम्हाला खाता येत नाही. कारण तुम्हाला समजायच्या आतच ती वस्तु माकडांनी तुमच्या हातून लांबविलेली असते. 😆😅😂🤣
©आनंदी पाऊस
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ...)
नोव्हेंबर २०२०
एक बुरुज
एक व्हिव पॉईंट
कल्याणी
शंखाची गोगलगाय
वेगवेगळी फुल झाडं
वेगवेगळी फुल झाडं
दाट झाडी
सूर्यास्त
असेच एका कानडी चित्रपटाचे
चित्रीकरण मी पाहीलेले !
🙈🙉🙊
वाचून नंदि हिलला भेट द्याविशि वाटते
ReplyDeleteखरचं प्रत्येकाने भेट द्यावी असेच आहे ते ठिकाण !
DeleteWaah mastach
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद !
DeleteNandi hill chi visit rahun geli aahe. Khup chhan varnan. Tymule tithe visit karavi bataye.
ReplyDeleteहो ना , खरंच , त्यावेळी थोडक्यात राहून गेली , इथली भेट ! पुढच्या वेळी नक्की भेट देऊ या !
Deleteखूप मस्त वर्णन केले आहे नांदी hills che मला आवडेल भेट द्यायला
ReplyDeleteनक्कीच ये इकडे , म्हणजे आश्रमात पण जाणे होईल आणि या सगळ्या छान छान ठिकाणांना भेट सुद्धा देता येईल !
DeleteKhupach chan vachun bhet dyavishi vatate
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !!
Deleteवर्णन एकदम मस्त.लिहीत रहा.
ReplyDeleteअसा छान पाठींबा आणि आशीर्वाद असले म्हणजे झाले ! हे लिखाण कधीच थांबणार नाही ! सप्रेम धन्यवाद !
DeleteNandi hills ek tripch zhali ase vattale tu etke sunder varnan keles
ReplyDeletePics👌👌
खूप सारे धन्यवाद आणि प्रेम !
Deleteमस्तच वर्णन ..आपल्या lenseमधुन टिपलेली छायाचित्रं नंदी hillsचसाैंदर्य आणखी खुलवतं..British colonial building and tipu's "tashk-e-jannat" che snapshot add करा... आम्हास पाहयाला मिळेल..
ReplyDeleteहो नक्कीच , काही गोष्टींचे फोटो काढलेच नाहीत . नेहमीच जातो त्यामुळे सगळे फोटो नीट काढलेच नाहीत गेले . पण गेले आवर्जून तुम्हा सगळ्यांना दाखवायला सगळे फोटो काढीन .
DeleteKhup mast
ReplyDeleteखूप मनःपूर्वक धन्यवाद !
Deleteखूपच छान माहिीपूर्ण लेख ताईने कानडी भाषा पण अवगत केली असेल असे वाटते
ReplyDelete😄😄😄हा थोडी फार केलीय कानडी भाषा सुद्धा अवगत , धन्यवाद !
Deleteलिखाणासोबत फोटो सुद्धा अतिशय सुंदर.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद !
ReplyDeleteखूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !
ReplyDelete