Skip to main content

नंदी दुर्ग (नंदी बेट्टा / नंदी हिल्स ) (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ...)

 नंदी दुर्ग (नंदी बेट्टा /नंदी हिल्स)

(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  नंदी दुर्ग, नंदी बेट्टा, नंदी हिल्स ही तिन्ही नावं एकाच ठिकाणाची आहेत. 
  बंगळुरू पासुन साधारण ६० कि मी 
  बंगळुरू विमानतळापासुन ३९ कि मी 
  चिक्कबल्लापूर पासुन २४ कि मी 
 हा एक टेकडी किल्ला आहे. गंगा राजवटीत बांधला गेलेला. अजूनही सगळे बुरुज मजबुत आहेत. 
 समुद्र सपाटीपासुन साधारण ४८५१ फुट उंचीवर आहे. 
त्यानंतर टीपू सुलतान ने त्याचा उन्हाळी महाल इथे बांधला आहे. 
तष्क-ए-जन्नत. 
 रंगवलेल्या भिंती, किचकट आणि अवघड अश्या कमानी, अत्यंत सुंदर कलाकुसर केलेले छत. 
  अशा या सुंदर महालात टिपू सुलतान उन्हाळ्यात इथे येत असे. थंड हवेचे ठिकाण असल्याने. 
                         
 नंतर ब्रिटिश काळात सर मार्क कब्बन ने (कमिशनर ऑफ म्हैसुरू)  कलोनिअल आर्किटेक्टर पद्धतीचा एक बंगला बांधला (१८००).सर कब्बन चे उन्हाळी घर हे. 
 सगळ्यात पहिली SAARC इथेच भरली होती. 
 नंतर नेहरू सुद्धा येथे राहून गेलेले आहेत. 
आता ही इमारत आणि सभोवताल, हॉर्टिकल्चर विभागाकडे आहे. देखभाली साठी. 
त्याचे गेस्ट हाऊस मध्ये रूपांतर केलेलं आहे . तुम्ही इथे खोली घेऊन राहू शकता.
सभोवताली वेगवेगळी सुंदर सुंदर फुलझाडं लावलेली आहे आणि त्याची उत्तम देखभाल केली जाते. 
अर्कावती नदीचा उगम सुद्धा नंदी दुर्ग येथे आहे . 
तसेच मुख्य कमानीतुन आता शिरल्यावर समोरच एक पायऱ्यांची कल्याणी आहे. कायम पाणी असते त्यात. 
हेच पाणी त्याच्या आजुबाजुच्या परिसरातील फुलझाडांना देण्यासाठी वापरले जाते. 
मागच्या बाजुला गेले तर एक भव्य नंदी आहे, एका अखंड दगडातुन कोरलेला. 
तिथुनच थोडे पुढे गेले की एक गुहा आहे. एकदम शांत आणि एकांतात असलेल्या भागात. 
 येथे ऋषी रामकृष्ण परमहंस यांनी ध्यान केलेले आहे. 
 अजुन एक शिव मंदिर आहे. तिथे काही प्रमाणात पूजाअर्चा चालते आणि काही भाविक येत असतात. 
                          
या व्यतिरिक्त, टेकडी असल्याने, तुम्ही ट्रेकिंग करू शकता. या टेकडी वरून खाली किंवा खालुन वर ट्रेकिंग करत येऊ शकता. 
स्वतःची दुचाकी किंवा चार चाकी ने वरपर्यंत जाऊ शकता. मुख्य प्रवेश द्वारातुन आता आले की तिथेच वाहन तळ आहे. 
 किंवा तिथून वर सुद्धा गाडी नेता येता . बस मात्र इथेच पार्क करावी लागते. 
 एव्हढी सगळी बांधकाम आधीची आणि अजुन नवीन नवीन होताच आहे. तरी बऱ्यापैकी दाट जंगल सुद्धा आहे. 
 आणि भरपुर चढ उत्तर सुद्धा. 
  त्यामुळे जंगल भटकंती आणि ट्रेकिंग करत करत छान वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुल, पक्षी, कीटक बघण्याचा आनंद लुटता येतो. 
  सूर्योदय आणि सूर्यास्त सुद्धा फार सुंदर दिसतो. बरेच लोक खास ते बघण्यासाठी लवकर सूर्योदया आधी जातात. 
  पावसाळ्यात सुद्धा खूप सुंदर वातावरण असते. पाऊस आणि थंडीही. शक्यतो एखादे जाकीट, टोपी, शाल असे कायम जवळ ठेवावेच लागते. 
  सभोवताली थोडे खालच्या बाजूला ढगच ढग असतात. आणि तुम्ही ढगांच्या वर असतात. 
  अगदी स्वर्गसुख! स्वप्नांच्या दुनियेत असल्यागत वाटते! 
   बऱ्याच वेळा कुठल्या कुठल्या सिनेमाचे चित्रीकरण सुद्धा चालू असते इथे. 
                  
  खाण्यापिण्याची सगळी चांगलं आहे इथे. काय पाहिजे ते उपलब्ध असते इथे. पण हे सगळे खातांना एक काळजी घ्यावी लागते त्या त्या ठिकाणीच ते ते पदार्थ खावे लागतात. 
  किंवा तुमच्या गाडीत बसुन. कारण प्रचंड प्रमाणात माकडं आहेत इथे. एखादी खाण्याची वस्तू घेऊन एखाद्या दुकानातुन किंवा हॉटेल मधुन हातात घेऊन बाहेर पडलात तर, ती अगदी खात्रीने  तुम्हाला खाता येत नाही. कारण तुम्हाला समजायच्या आतच ती वस्तु माकडांनी तुमच्या हातून लांबविलेली असते. 😆😅😂🤣

©आनंदी पाऊस 
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ...)
नोव्हेंबर २०२०


एक बुरुज 



एक व्हिव पॉईंट 



कल्याणी 



शंखाची गोगलगाय 




वेगवेगळी फुल झाडं 



वेगवेगळी फुल झाडं 



दाट झाडी 




सूर्यास्त 



असेच एका कानडी चित्रपटाचे 
चित्रीकरण  मी पाहीलेले !



🙈🙉🙊








Comments

  1. जनार्दन चौधरीFebruary 20, 2021 3:22 pm

    वाचून नंदि हिलला भेट द्याविशि वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. खरचं प्रत्येकाने भेट द्यावी असेच आहे ते ठिकाण ! 

      Delete
  2. Nandi hill chi visit rahun geli aahe. Khup chhan varnan. Tymule tithe visit karavi bataye.

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना , खरंच , त्यावेळी थोडक्यात राहून गेली , इथली भेट ! पुढच्या वेळी नक्की भेट देऊ या !

      Delete
  3. खूप मस्त वर्णन केले आहे नांदी hills che मला आवडेल भेट द्यायला

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच ये इकडे , म्हणजे आश्रमात पण जाणे होईल आणि या सगळ्या छान छान ठिकाणांना भेट सुद्धा देता येईल !

      Delete
  4. Khupach chan vachun bhet dyavishi vatate

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !!

      Delete
  5. वर्णन एकदम मस्त.लिहीत रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. असा छान पाठींबा आणि आशीर्वाद असले म्हणजे झाले ! हे लिखाण कधीच थांबणार नाही ! सप्रेम धन्यवाद !

      Delete
  6. Nandi hills ek tripch zhali ase vattale tu etke sunder varnan keles
    Pics👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे धन्यवाद आणि प्रेम !

      Delete
  7. मस्तच वर्णन ..आपल्या lenseमधुन टिपलेली छायाचित्रं नंदी hillsचसाैंदर्य आणखी खुलवतं..British colonial building and tipu's "tashk-e-jannat" che snapshot add करा... आम्हास पाहयाला मिळेल..

    ReplyDelete
    Replies
    1. हो नक्कीच , काही गोष्टींचे फोटो काढलेच नाहीत . नेहमीच जातो त्यामुळे सगळे फोटो नीट काढलेच नाहीत गेले . पण  गेले  आवर्जून तुम्हा सगळ्यांना दाखवायला  सगळे फोटो  काढीन . 

      Delete
  8. Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  9. खूपच छान माहिीपूर्ण लेख ताईने कानडी भाषा पण अवगत केली असेल असे वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. 😄😄😄हा थोडी फार केलीय कानडी भाषा सुद्धा अवगत , धन्यवाद !

      Delete
  10. लिखाणासोबत फोटो सुद्धा अतिशय सुंदर.

    ReplyDelete
  11. मनःपूर्वक धन्यवाद !

    ReplyDelete
  12. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...