Skip to main content

विश्वेश्वरय्या संग्रहालय आणि समाधी (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ....)



विश्वेश्वरय्या संग्रहालय आणि समाधी 
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ....)


     मुद्देनहळ्ळी. 
 चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील छोटंसं खेडं. 
 बंगळुरू पासुन साधारण ६० कि मी 
 बंगळुरू विमानतळापासून ३६ कि मी 
 म्हणजे...
 आदरणीय भारतरत्न, यशस्वी अभियंता, विद्वान, स्टेट्समन आणि दिवाण ऑफ म्हैसुरू,  सर विश्वेश्वरय्या यांचे जन्मगांव. 
  ते १५ वर्षांचे होईपर्यंत याच गावात शिकले. 
  त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण बंगळुरू येथे आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पुणे येथे केले. 
  या गावात त्यांचे घर आहे. 
  त्यांचा जन्म झाला ते घर आणि नंतर त्यांनी बांधले ते घर, दोन्ही एकाच आवारात आहेत. जन्मघर जुन्या पद्धतीचे उतरत्या छपराचे कौलारू आहे, तर त्यांनी बांधलेले त्यामानाने आधुनिक, दुमजली घर आहे.  
 ते स्वतः १०२ वर्षाचे यशस्वी आणि आरोग्यपुर्ण जीवन जगले. 
 यावरून त्यांचे जन्मघर किती जुने आहे हे लक्षात येते. पण अजूनही छान भक्कम आणि देखणे आहे. 
 पण ही इमारत सगळ्यांसाठी खुली नाही, फक्त बाहेरुन बघता येते. 
दुसरी इमारत, म्हणजे त्यांनी बांधलेली. या इमारतीमध्ये संग्रहालय आहे. 
हे सगळ्यांसाठी खुले आहे. 
या संग्रहालयात त्यांचे पुरस्कार, त्यांच्या वैयक्तिक वापरातील गोष्टी जसे, पलंग, मच्छरदाणी, चष्मा, कप, डिक्शनरी, व्हिजीटींग कार्ड ब्लॉक, पासबुक, दरबार पास, पेन. 
 तसेच के आर एस धरणाचे प्लॅन आणि मॉडेल आणि अशा कितीतरी वस्तु! सगळ्यात महत्वाचे म्हणजे भारतरत्न पुरस्कार! ज्याबद्दल मी फक्त ऐकले होते. ते पदक मी सगळ्यात पहिल्याने इथे पाहीले. 
 पुरस्कार खुप मोठ्ठा हा! पण त्याचे एक छोटेसे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे पदक! मन भरून आले ते पदक बघुन!
आवार कायम एकदम लख्ख. टापटीप. भरपूर नवी जुनी फुलझाडं आहेत. 
मागच्या बाजूला एक तुळशी वृंदावन आहे. 
 त्याच्या बाजुलाच छोटेसे बांधीव तळे आहे. फार खोल नाही, एक दीड फुट खोल असेल. 
 त्यात मधोमध एक महादेवाची पिंड आहे . तळ्यात कायम पाणी भरलेले असते आणि त्यात कमळ आहेत. फारच गोड आहे सारं. माझ्या एकदम आवडीचा भाग! खूप वेळ रमते मी या भागात, तिथे गेले  की आणि फोटो बघतांना सुद्धा!
 तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय! आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अगदी स्वच्छ आणि प्रशस्त शौचालयं!
असे सगळे असले तरी प्रवेश शुल्क शून्य!!!
   
या घरापासुन(संग्रहालयापासुन) अगदी हाकेच्या अंतरावर, त्यांच्याच कौटुंबिक मालकीची जागा आहे. 
या जागेत त्यांची समाधी आहे. 
ज्या जागी त्यांना दफन केले आहे, त्यावर एक आयताकृती चौथरा बांधलेला आहे. साधारण दीड दोन फूट उंचीचा चौथरा आहे. 
 थोडं पुढे गेल्यावर, एक थोड्या उंच चौथऱ्यावर त्यांचा अर्ध पुतळा ठेवलेला आहे. 
 या दोन्ही चौथऱ्यांवर प्रत्येकी चार खांबांवर गोलाकार बांधीव छत्र्या आहेत. 
 बाकी सगळी आजुबाजुची जागा वेगवेगळी फुलझाडे लावुन सुशोभित केलेली आहे. 
 मी जेव्हा जेव्हा तिथे भेट देते, तेव्हा तेव्हा मला मंदीरात गेल्यावर जितकी मनःशांती मिळते, त्यापेक्षा कणभर जास्तच मनःशांती मिळाल्याचे अनुभवास येते!
 हे सगळे छान निसर्गाच्या कुशीत आहे , एका छोट्या डोंगराच्या पायथ्याशी, आजूबाजूला काही डोंगर आहेत  त्यापैकी  एक म्हणजे नंदी दुर्ग, याची माहिती पुढच्या एखाद्या भागात  येईलच. त्यामुळे सुंदर आणि शांत अशा निसर्गाच्या सानिध्यात, नैसर्गिक आनंद मिळतो!
 आदर्श असावा तर असा!!!
  सर शतशः साष्टांग नमन...

©आनंदी पाऊस 
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या)
 ३० नोव्हेंबर २०२०               


त्यांचे जन्मघर 




त्यांचे जन्मघर 



त्यांनी बांधलेले घर 



हेच ते छोटंसं तळं आणि ती महादेवाची पिंड 



बाजूलाच असलेला डोंगर 



समाधी 



समाधी 



अर्ध पुतळा 




बांधीव छत्र्या 



काही फुल झाडं 




काही फुलझाडं 






















      

Comments

  1. जनार्दन चौधरीFebruary 12, 2021 11:18 am

    विषयाला हलकिसि कलाटणि आणि वाचतांना असे वाटते कि आपण स्वतः पहात आहोत असे जाणवायला लागते अप्रतिम

    ReplyDelete
  2. pindi aaslele tale sunder
    Mi lekh enjoy karte
    ��khoop shubhecha ashirwad

    ReplyDelete
    Replies
    1. हो ती जागा माझ्या सुद्धा खूप आवडीची ! फार छान वाटते  तिथे !
      खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !!

      Delete
  3. पर्यटन स्थळ खुपच छान आहे. वर्णन पण खुप सुंदर केलेले आहे. मंदा चौथरी

    ReplyDelete
    Replies
    1. tons of love !! feeling so happy n blessed !😇😇😇

      Delete
  4. तुमची लेखण शैली खूप जिवंत आहे.वाचत असताना सगळ्या गोष्टी जाणवत होत्या.i like your blog✍✍.swati shirote

    ReplyDelete
    Replies
    1. स्वाती , तुला इकडे बघून आणि भेटून खूप छान वाटले आणि खूप आनंद झाला ! मनःपूर्वक स्वागत तुझे आणि धन्यवाद !

      Delete
  5. वर्णन छान आहे खूपच सुंदर लीहले आहे तळे त्यात पिंड खूप छान आहे सगळं

    ReplyDelete
    Replies
    1. मला आवडलेला भाग सगळ्या वाचकांनाही आवडतोय हे बघून खूप आनंद झालाय मला ! धन्यवाद !

      Delete
  6. Khup sunder parytan sthal aahe v chan shant disat aahe varnan v photos pan mast ����

    ReplyDelete
    Replies
    1. प्रेम पूर्वक धन्यवाद !

      Delete
  7. Chan varnan
    vachatavachata chan bhet deun aale tya sthalala photo pan sunder
    Madhomadh tale, pind, tyat kamale WA ekandarit fhatach chan varnan

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेम पूर्वक धन्यवाद !!

      Delete
  8. प्रतिभा अमृतेFebruary 23, 2021 5:37 am

    विश्वेश्वरय्यांचे जन्मगाव आणि समाधी स्थळाचे वर्णन खूप सुरेख. त्या महामानवाच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी मलाही तिथे जायला आवडेल. ��
    .

    ReplyDelete
    Replies
    1. हो , प्रत्येक भारतीयाने इथे भेट दिलीच पाहिजे . तुम्हीही नक्की या !

      Delete
  9. Khupach chhan..varnan..vastu jivant zali

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे प्रेम पूर्वक धन्यवाद !

      Delete
  10. खुप छान लेख. नविन माहिती मिळाली निसर्ग रम्य वाटते फोटो मुळे कळते. भेट द्यायला आवडेल

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  11. खूपच छान लिखाण .....

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे आनंदी धन्यवाद 🙏 ✨

      Delete
  12. खूप सुंदर वर्णन आणि जागा. एकदा जाऊन पहायला हवे. आज त्यांचा जन्मदिवस. अभियंतादिनाच्या शुभेच्छा👍🏻

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच प्रत्येक भारतीय व्यक्तीने एकदा तरी भेट द्यावीच!
      सप्रेम आनंदी धन्यवाद 😍😇

      Delete
  13. वाहच! टिपलेली विविध फुलझाडे,पाण्याचा‌ Pond & नंदी idol,सभोवलताचा निसर्ग,कौलारू ऊतरत्या छपरांचे घरं हे‌ सारेच वाचताना,आल्हाददायक असं Peace ऑफ Mind देऊन जातं.बंगलोरला ‌परत फिरायला आल्यावर नक्किच पाहू. सारे प्र चि व त्यातील दिसणाऱ्या सावल्या अप्रुपच.

    ReplyDelete
    Replies
    1. ये लवकरच! आपण जाऊ या! मी बरेचदा गेले आहे. पण तरी सारखे जावेसे वाटते 😀!
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 😇

      Delete
  14. व पू होले सरSeptember 15, 2022 8:29 pm

    भारतरत्न पुरस्काराच्या पदकाचा फोटो टाकला असता तर ते आम्हालाही पाहता आले असते.धन्यवाद ,सरांची घरे,तळं,समाधी इ.गोष्टी फोटोतून पाहू शकलो याचा खुप आनंद झाला.🙏🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. संग्रहालय आत जाऊन पाहताना छायाचित्र घेण्यास मनाई आहे. त्यामुळे ते मी दाखवू शकले नाही.
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद सर 🙏

      Delete
  15. Aadariy vishveswarayyacha lekh apratim lekh wachtana barik sarik warnan techi samadhi donhi ghare Sara partisan Paul zade taliyatlte pind sarech Citra doliyasamor ubhe rahate
    Pics khoop sunder
    Sadhi sopi Bhashet lekh janu tu gotcha sangte

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद काकु 🤩 😍 😇

      Delete
  16. प्रफुल्ल पाटीलSeptember 15, 2024 9:23 am

    खूपच सुंदर माहीती,
    पुढे कधीतरी नातवंडे समवेत भेट देईन

    ReplyDelete
  17. उषा पाटीलSeptember 15, 2024 5:04 pm

    खूप छान माहिती, तू एवढी माहिती जमवलीस याचं खूप खूप कौतुक, आणि अभियांत्रिकी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  18. गुलाबराव पाथरकरSeptember 15, 2024 9:36 pm

    आम्हाला जीकडे जाता नाही आले अशा पवीत्र आणि प्रसिद्ध स्थानांची माहीती आपल्याकडून मीळत असते म्हणून आपणास खूपखूप धन्यवाद.

    ReplyDelete
  19. जितेंद्र महाजनSeptember 15, 2024 10:03 pm

    खूप छान तू लिहिते खुप छान फुल छान वाटली 👍👍👌👌

    ReplyDelete
  20. सीमंतीनी चाफळकरSeptember 16, 2024 6:49 am

    खूप छान लेख
    तुझ्यासोबत ते सारं पाहिल्याने संस्मरणीय झालं..

    ReplyDelete
  21. डॉ ज्ञानेश्वरी हजारेSeptember 16, 2024 10:48 pm

    छान लिहलंय...👌🏻🌸🌹

    ReplyDelete
  22. रेवती डिंगरेSeptember 24, 2024 6:31 am

    विश्वेश्वरय्या संग्रहालय व पटखेळ दोन्ही अप्रतिम 👌संग्रहालयाचा प्रत्यक्ष पहात असल्याचा अनुभव आला.अशी थोर व्यक्ती किती साधी व आडंबर रहित होती.पटखेळात सापशिडी व चौपट आम्ही खेळलो आहोत. स्मरण करून दिलेस. छान वाटले.👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...