Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

श्री क्षेत्र पद्मालय (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ...)

                                                                        श्री क्षेत्र पद्मालय                                                               (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)                                               वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।                                जळगांव पासुन साधारण बत्तीस किमी आणि एरंडोल पासुन साधारण दहा किमी अंतरावर असलेले हे ठिकाण, पद्मालय! याच...

नंदी दुर्ग (नंदी बेट्टा / नंदी हिल्स ) (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ...)

  नंदी दुर्ग (नंदी बेट्टा /नंदी हिल्स) (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)   नंदी दुर्ग, नंदी बेट्टा, नंदी हिल्स ही तिन्ही नावं एकाच ठिकाणाची आहेत.    बंगळुरू पासुन साधारण ६० कि मी    बंगळुरू विमानतळापासुन ३९ कि मी    चिक्कबल्लापूर पासुन २४ कि मी   हा एक टेकडी किल्ला आहे. गंगा राजवटीत बांधला गेलेला. अजूनही सगळे बुरुज मजबुत आहेत.   समुद्र सपाटीपासुन साधारण ४८५१ फुट उंचीवर आहे.  त्यानंतर टीपू सुलतान ने त्याचा उन्हाळी महाल इथे बांधला आहे.  तष्क-ए-जन्नत.   रंगवलेल्या भिंती, किचकट आणि अवघड अश्या कमानी, अत्यंत सुंदर कलाकुसर केलेले छत.    अशा या सुंदर महालात टिपू सुलतान उन्हाळ्यात इथे येत असे. थंड हवेचे ठिकाण असल्याने.                             नंतर ब्रिटिश काळात सर मार्क कब्बन ने (कमिशनर ऑफ म्हैसुरू)  कलोनिअल आर्किटेक्टर पद्धतीचा एक बंगला बांधला (१८००).सर कब्बन चे उन्हाळी घर...

विश्वेश्वरय्या संग्रहालय आणि समाधी (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ....)

विश्वेश्वरय्या संग्रहालय आणि समाधी  (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या ....)      मुद्देनहळ्ळी.   चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील छोटंसं खेडं.   बंगळुरू पासुन साधारण ६० कि मी   बंगळुरू विमानतळापासून ३६ कि मी   म्हणजे...  आदरणीय भारतरत्न, यशस्वी अभियंता, विद्वान, स्टेट्समन आणि दिवाण ऑफ म्हैसुरू,  सर विश्वेश्वरय्या यांचे जन्मगांव.    ते १५ वर्षांचे होईपर्यंत याच गावात शिकले.    त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण बंगळुरू येथे आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पुणे येथे केले.    या गावात त्यांचे घर आहे.    त्यांचा जन्म झाला ते घर आणि नंतर त्यांनी बांधले ते घर, दोन्ही एकाच आवारात आहेत. जन्मघर जुन्या पद्धतीचे उतरत्या छपराचे कौलारू आहे, तर त्यांनी बांधलेले त्यामानाने आधुनिक, दुमजली घर आहे.    ते स्वतः १०२ वर्षाचे यशस्वी आणि आरोग्यपुर्ण जीवन जगले.   यावरून त्यांचे जन्मघर किती जुने आहे ...

व्यक्ती पितापुत्राची जोडी (माझा वारसा)

  व्यक्ती- पितापुत्राची जोडी  (माझा वारसा)                                           आमचे सुरुवातीपासुन एकत्र कुटुंब . आजीआजोबा , आईवडील , दोन काका-काकू आणि आम्ही सात बहिणी , दोन भाऊ . एकत्र राहत असल्या कारणाने सगळी नाती एकदम घट्ट होती . ज्या हक्काने आईच्या माहेरी , आजोळी जात असु सुट्टीचे , त्याच हक्काने काकूंच्या माहेरी सुद्धा जात असु . त्यामुळे आम्हाला तीन आजोळ ! केव्हढी श्रीमंती!                                           ही पितापुत्रांची जोडी म्हणजे माझे पणजोबा आणि आजोबा  , म्हणजे माझ्या सगळ्यात धाकट्या काकूचे आजोबा आणि वडील ! सुका मन्साराम खडके (१८७५-१९८५) पणजोबा , एकशे दहा वर्षांचे निरोगी आयुष्य जगले . शिक्षण अजिबात नाही , शेती हाच व्यवसाय . शिक्षण नसले तरी , देवाचे काय काय तोंडपाठ . मी साधारण सात-आठ वर्षांची असल्यापासून ...

वस्तु - पाळणा (माझा वारसा )

  वस्तू - पाळणा  (माझा वारसा )                               खरंतर हा पाळणा खूप काही कलात्मक वगैरे अजिबातच नाही . पण एका दृष्टीने फारच विशेष आहे . कसा ते पुढे कळेलच . तर हा पाळणा माझ्या वडिलांचा , त्यांच्या जन्माच्या वेळी , त्यांच्या आजोळहुन आलेला . म्हणजे त्यांचाच वयाचा , ऐशीं वर्षाचा ! ते त्यांच्या बालपणी याच पाळण्यात झोपले . त्यांनतर त्याचे दोन्ही धाकटे भाऊ सुद्धा यातच झोपले . आमचे त्याकाळापासून एकत्र कुटुंब . आजोबा आणि त्यांचे धाकटे भाऊ , दोघांची कुटुंब एकत्र . त्यामुळे धाकट्या आजोबांच्या दोन मुली आणि चार मुलं , ही सगळी मंडळी सुद्धा यातच झोपली आपापल्या बाळपणी .                                त्यानंतर आमची पिढी . परत तिन्ही भावांचे एकत्र कुटुंब . सगळे मिळुन आम्ही सात बहिणी आणि दोन भाऊ . आम्ही सगळे सुद्धा आमच्या बालपणी या पाळण्यातच झोपलो . तसेच थोरल्या आ...