श्री क्षेत्र पद्मालय
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
जळगांव पासुन साधारण बत्तीस किमी आणि एरंडोल पासुन साधारण दहा किमी अंतरावर असलेले हे ठिकाण, पद्मालय! याच्या नावातच याचा सगळा अर्थ आणि त्या ठिकाणाशी असलेला संबंध कळतो. पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे घर. येथे एक तळं आहे आणि या तळ्यात सप्तरंगी कमळं आहेत. सप्तरंगी म्हणजे सात वेगवेगळ्या रंगाची.
हे ठिकाण जवळ जवळ पाच हजार वर्ष जुने आहे. या तळ्याकाठी एक खास मंदीर आहे गणपतीचे. गणपतीच्या अडीच पीठांपैकी अर्धे पीठ आहे. हे मंदीर पेशवाई - उत्तर हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराला लागुन मोठा सभा मंडप आहे. मंडपात शिरताच एक पूर्णांक दोन मी. उंचीचा भव्य दगडी उंदीर दिसतो. हे मंदिर खुप खास आणि अनोखे तसेच जगातील एकमेव असे मंदीर आहे. या मंदीरात एकाच गर्भगृहात एक उजव्या सोंडेचा आणि एक डाव्या सोंडेचा गणपती आहे, आमोद आणि प्रमोद! हे दोनही गणपती स्वयंभु आहे. अतिशय जागृत देवस्थान आहे. या मंदिरासमोर एक भव्य घंटा(वजन ४. ५ क्विंटल) असुन मंदीराच्या प्रवेशद्वारापाशी एक मोठे जातं आहे. या घंटेचा आवाज पंधरा ते सोळा किमी परिसरात ऐकू येतो. हे मंदीर घनदाट जंगलात असल्याने पावसाळ्यात सगळा परिसर छान हिरवागार झालेला असतो. त्यामुळे भाविकांना दर्शनासह पर्यटनाचा देखील आनंद लुटता येतो.
महाभारतातील बकासुर वधाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. पांडव अज्ञातवासात असतांना याच तळ्यात अंघोळीसाठी येत अशी आख्यायिका आहे. पांडव एकचक्री नगरीत राहत, ते म्हणजे आजचे एरंडोल. येथून दोन किमी अंतरावर भीम आणि बकासुराचा युद्ध झाले आहे. या युद्धाचे आधी भीम गाडं भरून अन्न घेऊन आलेला असतो, बकासुरासाठी. तसेच या युद्धात बकासुराचे रक्त सुद्धा सांडले जाते. आम्हाला लहानपणी पद्मालयाची गोष्ट सांगतांना सांगत, अजुनही तिथे भाताची शितं आणि रक्ताचे डाग आहेत खडकावर. आम्हाला फारच कुतूहल वाटे त्याबद्दल. तिथला खडक खरतर बेसॉल्ट या प्रकारचा आहे. पण खरचंच तिथे जाऊन पाहिले तर आजही त्या खडकात बासमती भाताच्या लांबसडक शितांसारखे कण आहे आणि ठीक ठिकाणी लाल रंगाचे डाग सुद्धा आहेत. निसर्गाची ही आगळीच किमया इथे आपल्याला बघायला मिळते आणि त्याला जोडून सांगितलेली बकासुर वधाची आख्यायिका अगदी खरी वाटते.
हे युद्ध झाल्यावर भीमाला प्रचंड तहान लागली. मग त्याने आपल्या हाताच्या कोपराने प्रहार करून एक कुंड तयार केले आणि पाणी काढले. हे पाणी पिऊन त्याने आपली तहान भागविली. हे कुंड अजुनही आहे तिथे आणि पाणी सुद्धा आहे त्यात.
कार्तिकी पौर्णिमेला इथे एक यात्रा भरते. माझ्या अगदी लहानपणापासुन माहीती असलेले आणि खुप आवडते पर्यटन स्थळ! आज त्याबद्दल लिहायची छान संधी मिळाली. इंट्याक सोलापुरचे मनःपुर्वक शतशः आभार!!
शेवट तर गोडच हवा. इथे मिळणारे पेढे प्रसिद्ध आहेत. नक्की भेट द्या आणि पेढ्यांचा स्वाद घ्यायला विसरू नका!!!
।।गणपती बाप्पा मोरया।।
©आनंदी पाऊस
(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या)
२४नोव्हेंबर २०२०
मुख्य गाभारा
एकाच पीठावर डाव्या आणि उजव्या
सोंडेचा गणपती
मंडपातील उंदीरमामा
हीच ती पितळी घंटा
तळं आणि त्यातील सप्तरंगी कमळं
हेच ते भलं मोठ्ठ जातं
सुंदर आणि मुद्देसूद लिखाण ...
ReplyDeleteशाळेत असताना पद्मालय येथे नेहमी सहल जायच्या.
खूप सारे प्रेमळ धन्यवाद !!
DeleteWa sunder mahiti aahe Padmalya chi . Mahabharata chi ktha tyala jod aahe v mandir pan chan
ReplyDeletePan mi ajun pahile nahi pudhchya veli nakki jaun pahu v pedhe pan khau ��
अरे नक्की जा, सगळेच छान आहे अणि बघण्यासारखे सुद्धा, खुप आवडेल तुला!!!
Deleteखूपच मस्त माहिती पुढच्या वेळी जळगांव गेले की नक्कीच बघून येऊ गणपती उजव्या व डाव्या सोंडीचा व भीम व पाच पांडव खूप छान माहिती
ReplyDeleteएवढा मोठा उंदीर व घटां बापरे
हो नक्की. सगळे छान अणि अद्वितीय आहे. प्रत्येकाने भेट द्यावी असे ठिकाण!!!
Deleteखूप सुंदर ताई मी लहानपणी एरंडोल येथे रहात असताना नेहमी पाई पद्मालय येथे जात असे येथील घनटेचा आवाज एरंडोलयेथे ऐकू यायचा असे माझी आई मामा सांगत असत पण त्याचे मधील लोलक चोरीला गेला असे सागितले जाते
ReplyDeleteहो अगदी खरी आहे ही माहीती!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏
Padmalay mandir bhaghitale ahe pan thethil mahabharatashi ashe related chan mahiti kalali pics 👌
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺
DeletePahayachi iccha jali ata vachun sagal. Khup mast
ReplyDeleteनक्की!
Deleteधन्यवाद 🙏
Khupach chchan lihile aahes
ReplyDeleteNandi Hills n Padmalaya che
Mi regular jato Padmalaya la
������
खूप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇 🙏
DeleteKhup chhan zalay lekh. Junta athavanina ujala milala.
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
Deleteमहाभारतकालीन आख्यायिका आणी पद्मालय मंदिराची संरचना हे सारे वर्णन अप्रुपच.
ReplyDelete५००० वर्ष जुन्या मंदिराची माहिती नव्याने लेखातून पाहतां आली.मस्तच....
मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
DeleteKhupach chan ahe lekh.
ReplyDeleteखूप सारे प्रेमळ धन्यवाद !!
Deleteपद्मालय मंदिराबद्दल वाचले. उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा गणपती एकाच ठीकाणी पाहून आश्चर्य वाटले. घंटेचे वर्णन वाचून वाईची घंटा आठवली. मंदिराशी संलग्न महाभारतातील कथा वाचून गम्मत वाटली. आपल्या पुराण कथा पुराव्यानिशी सांगितल्या जातात नाही? भेट द्यायला आवडेल पण मुंबई पासून बरेच लांब आहे. ��
ReplyDeleteबरीच ठिकाण आहेत, चांगला आठवडाभर वेळ काढून या. खूप आवडेल तुम्हाला नक्कीच!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺