Skip to main content

वास्तू -आमचे घर (वारसा स्पर्धा २)

वास्तू -आमचे घर

(वारसा स्पर्धा २)

                        हे आमचे घर , मुळ गावी असलेले घर ! माझ्या पणजोबांनी बांधलेले आहे , साधारण एकोणीसशे पस्तीसच्या आधी . म्हणजे पंच्यायशी वर्षापेक्षा जास्त जुने . जवळ जवळ चार पिढया राहिल्या या घरात . अगदी लहान असतांना मी काही काळ राहिले आहे या घरात . नंतर मात्र निमित्तानेच जाणे होत असे . 
                        अर्धा भाग तळमजला आणि वर दोन मजले आहेत . या भागाचे छत उतरते (स्लोपींग sloping ) आहे . अर्ध्या भागात तळमजला आणि वर एक मजला आहे(हे अर्धे बांधकाम जरा नंतरच्या काळातील आहे . या भागावर मात्र गच्ची आहे . लोड बेअरिंग बांधकाम आहे . भिंती जवळ जवळ एक फूट जाड आहेत . त्याकाळी सुद्धा भिंतीमध्ये लोखंडी तिजोरी बसवलेली आहे . अजून अगदी जशीच्या तशी आहे . 
                         एक महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे या घरात पूज्य साने गुरुजी दोन-तीन दिवस राहिलेले आहेत . हे मला आता या स्पर्धेमुळे कळले . याच घरात आमचा तो पेटी-चरखा आहे . साने गुरुजी या घरात राहिले तेव्हाच त्यांनी त्या आमच्या पेटी-चरख्यावर सुत कताई केली होती . आमच्याच वारश्यांची आमच्या स्वतःशीच ओळख करून देण्याचे मोलाचे काम इंटॅक , सोलापूर करीत आहे , या स्पर्धेच्या निमित्ताने . शतशः आभार त्याबद्दल !!

(पेटी चरखा आणि आमचे घर या दोन्ही प्रवेशिकांना मिळुन पहीले बक्षीस मिळाले आहे )

©आनंदी पाऊस 
(वारसा स्पर्धा २)
मे २०२०


जुन्या भागाच्या बाजुचा फोटो 




प्रमाणपत्र 











Comments

  1. जितेंद्र महाजनDecember 24, 2020 12:42 pm

    फार भाग्यवान आहे ती वास्तु जिला साने गुरुजी चा पदस्पर्श झाला आणि त्या घरातील लोक ही

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच ही सगळी माहीती समजल्यापासुन , ते घर हे घर वाटतच नाही आता , मंदीरच वाटते आहे !!🙏😍

      Delete
    2. Khup chan lucky ahe tumchi family

      Delete
  2. स्वाती चौधरीDecember 24, 2020 1:34 pm

    फार भाग्यवान आहे ति वास्तु

    ReplyDelete
    Replies
    1. ती वास्तु आणि आपणही खुप भाग्यवान आहोत !😍😇😍😇

      Delete
  3. पूजा पाटीलDecember 24, 2020 4:16 pm

    वाह!खूपच लकी आहात अशी वास्तु तुम्हाला लाभली.खूपच छान��������

    ReplyDelete
  4. Sane Gurujiche padsparsh kharach lucky tey ghar, to charkha jala tyancha sparsh, ani tithe rahanare lok

    ReplyDelete
    Replies
    1. स्नेहाळ धन्यवाद !!😇😇😇

      Delete
  5. Khup chan!!! you are so lucky ��

    ReplyDelete
  6. Greatच & Lucky too.. Really Architecture is about time ,space people... तो aura अप्रुपच वर्णिले आहे.. साने गुरुजी यांचा पदस्पर्शाने पावन झालेली वास्तु and Rustic finished Strong Construction of 1935, enriches beauty of the soul in today's time ...

    ReplyDelete
    Replies
    1. totally , feeling very lucky n blessed!!!😇😇😇😇

      Delete
  7. खूप छान. एवढी महान व्यक्ती इथे राहून गेल्यामुळे खरच पावन झाली ती vaastu

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच अगदी पावन झालीय ती वास्तु !

      Delete
  8. भारती फेगडेJune 14, 2025 9:46 am

    आपले घर हीच भावना खुप सुंदर आहे 👼🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती )

  💃गुलाबाईची गाणी💃  (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃  सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...