वास्तू -आमचे घर
(वारसा स्पर्धा २)
हे आमचे घर , मुळ गावी असलेले घर ! माझ्या पणजोबांनी बांधलेले आहे , साधारण एकोणीसशे पस्तीसच्या आधी . म्हणजे पंच्यायशी वर्षापेक्षा जास्त जुने . जवळ जवळ चार पिढया राहिल्या या घरात . अगदी लहान असतांना मी काही काळ राहिले आहे या घरात . नंतर मात्र निमित्तानेच जाणे होत असे .
अर्धा भाग तळमजला आणि वर दोन मजले आहेत . या भागाचे छत उतरते (स्लोपींग sloping ) आहे . अर्ध्या भागात तळमजला आणि वर एक मजला आहे(हे अर्धे बांधकाम जरा नंतरच्या काळातील आहे . या भागावर मात्र गच्ची आहे . लोड बेअरिंग बांधकाम आहे . भिंती जवळ जवळ एक फूट जाड आहेत . त्याकाळी सुद्धा भिंतीमध्ये लोखंडी तिजोरी बसवलेली आहे . अजून अगदी जशीच्या तशी आहे .
एक महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे या घरात पूज्य साने गुरुजी दोन-तीन दिवस राहिलेले आहेत . हे मला आता या स्पर्धेमुळे कळले . याच घरात आमचा तो पेटी-चरखा आहे . साने गुरुजी या घरात राहिले तेव्हाच त्यांनी त्या आमच्या पेटी-चरख्यावर सुत कताई केली होती . आमच्याच वारश्यांची आमच्या स्वतःशीच ओळख करून देण्याचे मोलाचे काम इंटॅक , सोलापूर करीत आहे , या स्पर्धेच्या निमित्ताने . शतशः आभार त्याबद्दल !!
(पेटी चरखा आणि आमचे घर या दोन्ही प्रवेशिकांना मिळुन पहीले बक्षीस मिळाले आहे )
©आनंदी पाऊस
(वारसा स्पर्धा २)
मे २०२०
फार भाग्यवान आहे ती वास्तु जिला साने गुरुजी चा पदस्पर्श झाला आणि त्या घरातील लोक ही
ReplyDeleteखरंच ही सगळी माहीती समजल्यापासुन , ते घर हे घर वाटतच नाही आता , मंदीरच वाटते आहे !!🙏😍
DeleteKhup chan lucky ahe tumchi family
Deleteफार भाग्यवान आहे ति वास्तु
ReplyDeleteती वास्तु आणि आपणही खुप भाग्यवान आहोत !😍😇😍😇
Deleteवाह!खूपच लकी आहात अशी वास्तु तुम्हाला लाभली.खूपच छान��������
ReplyDeleteअगदी खरयं !
DeleteSane Gurujiche padsparsh kharach lucky tey ghar, to charkha jala tyancha sparsh, ani tithe rahanare lok
ReplyDeleteस्नेहाळ धन्यवाद !!😇😇😇
DeleteKhup chan!!! you are so lucky ��
ReplyDelete. मनःपुर्वक धन्यवाद !
DeleteGreatच & Lucky too.. Really Architecture is about time ,space people... तो aura अप्रुपच वर्णिले आहे.. साने गुरुजी यांचा पदस्पर्शाने पावन झालेली वास्तु and Rustic finished Strong Construction of 1935, enriches beauty of the soul in today's time ...
ReplyDeletetotally , feeling very lucky n blessed!!!😇😇😇😇
Deleteखूप छान. एवढी महान व्यक्ती इथे राहून गेल्यामुळे खरच पावन झाली ती vaastu
ReplyDeleteखरंच अगदी पावन झालीय ती वास्तु !
Delete