पुर्वजांचे छायाचित्र .
आजकाल उठता-बसता प्रत्येक क्षणी कित्तेक छायाचित्र काढली जातात . आणि कित्येक खोडुन टाकली जातात . याचा परिणाम , इतके छायाचित्र असतात , की त्यातील कित्येक लक्षात सुद्धा रहात नाहीत आणि ठळक कायमचे लक्षात तर एकही राहत नाही . अगदी थोड्या काळापूर्वी म्हणजे अगदी वीस वर्षांपूर्वी सुद्धा तसे नव्हते . मोजकीच छायाचित्र काढली जात , कारण तश्या सोयी सुविधा ही नव्हत्या आणि बरेच खर्चिक सुद्धा होते . भ्रमनध्वनीत ही सुविधा उपलब्ध झाली आणि छायाचित्रांच्या जगात एकदमच ऐतिहासिक क्रांतीच झाली !
आमच्या लहाणपणी सुद्धा असे नव्हते . अगदी मोजकीच छायाचित्र काढली जात . काही वेळा घरात काही खास समारंभ असे तेव्हाच , घरात स्वतःचा कॅमेरा असला तरीही . त्यामुळे ती मोजकीच छायाचित्र कायमची लक्षात राहत . माझ्या सुद्धा ती जुनी छायाचित्र अगदी नीट लक्षात आहेत अजुनही . पण अगदी अलीकडील छायाचित्र मात्र लक्षात नाहीत , कारण खुप छायाचित्र .
आज मात्र मी असेच एक खुप जुने ,कृष्ण-धवल छायाचित्र दाखवणार आहे आणि त्याची छोटीशी गोष्ट सुद्धा सांगणार आहे . हे छायाचित्र माझ्या जन्माच्याही आधीचे आहे . हे छायाचित्र तर माझे वडील अगदी पाच-सहा वर्ष वयाचे असतानाचे आहे . म्हणजे साधारण १९४७-१९४८ च्या काळातील , अगदी ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ठिकाणी घेतलेले . माझे आजोबा आणि त्यांचे मित्र त्यांच्या कुटुंबियांसोबत मुंबईच्या सहलीला गेले होते तेव्हा . त्यांनी सगळ्यांनी काळाघोडा या पुतळ्याच्या बैठकी (pedestal) पाशी बसून काढलेला फोटो आहे . खरं तर माझे आजोबा कायम गांधी टोपी घालत , पण या फोटो नाहीये , कशी माहिती नाही . कदाचित मुंबईच्या गर्मी मुळे असावी . हा मला दोन वर्षांपूर्वीच मिळाला . तो आमच्याकडे नव्हता आजोबांच्या मित्राच्या मुलाकडे होता . त्यांनी तो पाठवला आणि मी माझ्या आजोबांना इतके तरुण असतांना पाहिल्यानेच पहिले . वडिलांना इतके लहान म्हणजे अगदी सहा-सात वर्षांचे आणि आत्या तर अगदी आजीच्या मांडीवर आहे , एक दीड वर्षांची . अवर्णनीय होता तो क्षण , जेव्हा मी हा फोटो पहिल्यांदा पहिला !.. .
(या प्रवेशिकेला स्पेशिअल मेन्शन म्हणुन बक्षीस मिळाले आहे. )
©आनंदी पाऊस
(वारसा स्पर्धा)
एप्रील २०२०
काळा घोडा च्या बैठकीपाशी
१९४७-४८ मध्ये काढलेले छायाचित्र
या प्रवेशिकेला मिळालेले प्रमाणपत्र
आणि हे छायाचित्र त्याच ठिकाणी
तब्बल ७०-७१ वर्षांनी (१९ऑक्टो१९)
काढलेले छायाचित्र !
सुंदर क्षण आहे हा , दृश्य स्वरूपात
दिसतोय त्यापेक्षा कितीतरी सुंदर , त्याची
गोष्ट कदाचित वाचायला मिळेल कधीतरी ,
"काही अनुभवलेले" या सदरात !
Congratulations Akka..Evdha juna photo shodhun kadhlas👍
ReplyDeleteस्नेहपुर्ण धन्यवाद !😍❤
Deleteखुपच सुंदर आहे फोटो आणि गोष्ट मला सुध्दा आताच समजले तू सांगितले तेव्हा खरच काकांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत
ReplyDeleteमंदा चौधरी.
!खरंच काकांचे अगदी आभाळभर धन्यवाद !😍🤩
Deleteसुंदर आठवणी...
ReplyDeleteखुप सारे धन्यवाद !
Deleteसुंदर हे फोटो छान लीहील
ReplyDeleteखुप प्रेमळ धन्यवाद ......!
Deleteपूर्वजांचे छायाचित्र हा
ReplyDeleteमस्त विषय आहे . या विषयावर जेवढे लिहावे तेवढे कमीच. पूर्वीच्या काळी किंवा अगदी आमच्या मागच्या पिढीपर्यंत कुणाचेही फोटो काढणे हा अगदी दुर्मिळ योग असायचा. तुमच्याकडे कॅमेरा तरी होता, बहुसंख्यां कडे तो पण नसायचा. त्यामुळे तुला मिळालेल्या ह्या दुर्मिळ फोटोची किंमत खूप आहे. आपल्या आधीच्या पिढीचे फोटो बघायला मिळणे हीच मुळी एकदम भाग्याची गोष्ट आहे, त्या मुळे त्यांचा सहवास मिळाल्याचा आनंद मिळतो . त्यात हा फोटो काळा घोडा अशा ऐतिहासिक landmark ला घेतला गेलेला आहे हे पण विशेष आहे. पुढच्या पिढीला कदाचित ही गम्मत कळणार नाही, पण आपल्याला त्याची जाणीव प्रकर्षाने आहे. तू प्रयास करून हा फोटो संग्रहित केलास त्यात तुझी जिज्ञासू धडपड दिसून येते. त्यामुळे तुला मिळालेले पारितोषिक एकदम समर्पक आहे... 👍👍👍
खरयं , पूर्वजांच्या वस्तू आणि फोटो म्हणजे अमूल्य ठेवा असतो ! प्रत्यक्ष त्यांचा सहवास आणि त्यांचा स्पर्श अनुभवास येतो ! सर्वांगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात ! ह्या सगळ्या वस्तू हाताळतांना ! शब्दांत नाही सांगता येत ह्या भावना , त्या फक्त अनुभवता येतात ! खूप खूप धन्यवाद !
Delete