Skip to main content

पुर्वजांचे छायाचित्र

 पुर्वजांचे छायाचित्र


                                              आजकाल उठता-बसता प्रत्येक क्षणी कित्तेक छायाचित्र काढली जातात . आणि कित्येक खोडुन टाकली जातात . याचा परिणाम , इतके छायाचित्र असतात , की त्यातील कित्येक लक्षात सुद्धा रहात नाहीत आणि ठळक कायमचे लक्षात तर एकही राहत नाही . अगदी थोड्या काळापूर्वी म्हणजे अगदी वीस वर्षांपूर्वी सुद्धा तसे नव्हते . मोजकीच छायाचित्र काढली जात , कारण तश्या सोयी सुविधा ही नव्हत्या आणि बरेच खर्चिक सुद्धा होते . भ्रमनध्वनीत ही सुविधा उपलब्ध झाली आणि छायाचित्रांच्या जगात एकदमच ऐतिहासिक क्रांतीच झाली ! 
                                            आमच्या लहाणपणी सुद्धा असे नव्हते .  अगदी मोजकीच छायाचित्र काढली जात . काही वेळा घरात काही खास समारंभ असे तेव्हाच , घरात स्वतःचा कॅमेरा  असला तरीही . त्यामुळे ती मोजकीच छायाचित्र कायमची लक्षात राहत . माझ्या सुद्धा ती जुनी छायाचित्र अगदी नीट लक्षात आहेत अजुनही . पण अगदी अलीकडील छायाचित्र मात्र लक्षात नाहीत , कारण खुप छायाचित्र . 
                                              आज मात्र मी असेच एक खुप जुने ,कृष्ण-धवल छायाचित्र दाखवणार आहे आणि त्याची छोटीशी गोष्ट सुद्धा सांगणार आहे . हे  छायाचित्र माझ्या जन्माच्याही आधीचे आहे . हे छायाचित्र तर माझे वडील अगदी पाच-सहा वर्ष वयाचे असतानाचे आहे . म्हणजे साधारण १९४७-१९४८ च्या काळातील , अगदी ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ठिकाणी घेतलेले . माझे आजोबा आणि त्यांचे मित्र त्यांच्या कुटुंबियांसोबत मुंबईच्या सहलीला गेले होते तेव्हा . त्यांनी सगळ्यांनी काळाघोडा या पुतळ्याच्या बैठकी (pedestal) पाशी बसून काढलेला फोटो आहे . खरं तर माझे आजोबा कायम गांधी टोपी घालत , पण या फोटो नाहीये , कशी माहिती नाही . कदाचित मुंबईच्या गर्मी मुळे असावी . हा मला दोन वर्षांपूर्वीच मिळाला . तो आमच्याकडे नव्हता आजोबांच्या मित्राच्या मुलाकडे होता .  त्यांनी तो पाठवला आणि मी माझ्या आजोबांना इतके तरुण असतांना पाहिल्यानेच पहिले . वडिलांना इतके लहान म्हणजे अगदी सहा-सात वर्षांचे आणि आत्या तर अगदी आजीच्या मांडीवर आहे , एक दीड वर्षांची . अवर्णनीय होता तो क्षण , जेव्हा मी हा फोटो पहिल्यांदा पहिला !.. . 

(या प्रवेशिकेला स्पेशिअल मेन्शन म्हणुन बक्षीस मिळाले आहे. )

©आनंदी पाऊस 
(वारसा स्पर्धा)
एप्रील २०२०


काळा घोडा च्या बैठकीपाशी 
१९४७-४८ मध्ये काढलेले छायाचित्र 


या प्रवेशिकेला मिळालेले प्रमाणपत्र 





आणि हे छायाचित्र त्याच ठिकाणी 
तब्बल ७०-७१ वर्षांनी (१९ऑक्टो१९) 
काढलेले छायाचित्र !
 सुंदर क्षण आहे हा , दृश्य स्वरूपात 
दिसतोय त्यापेक्षा कितीतरी सुंदर , त्याची 
गोष्ट कदाचित वाचायला मिळेल कधीतरी ,
"काही अनुभवलेले" या सदरात !








Comments

  1. Congratulations Akka..Evdha juna photo shodhun kadhlas👍

    ReplyDelete
    Replies
    1. स्नेहपुर्ण धन्यवाद !😍❤

      Delete
  2. खुपच सुंदर आहे फोटो आणि गोष्ट मला सुध्दा आताच समजले तू सांगितले तेव्हा खरच काकांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत
    मंदा चौधरी.

    ReplyDelete
    Replies
    1. !खरंच काकांचे अगदी आभाळभर धन्यवाद !😍🤩

      Delete
  3. सुंदर हे फोटो छान लीहील

    ReplyDelete
    Replies
    1. खुप प्रेमळ धन्यवाद ......!

      Delete
  4. पूर्वजांचे छायाचित्र हा
    मस्त विषय आहे . या विषयावर जेवढे लिहावे तेवढे कमीच. पूर्वीच्या काळी किंवा अगदी आमच्या मागच्या पिढीपर्यंत कुणाचेही फोटो काढणे हा अगदी दुर्मिळ योग असायचा. तुमच्याकडे कॅमेरा तरी होता, बहुसंख्यां कडे तो पण नसायचा. त्यामुळे तुला मिळालेल्या ह्या दुर्मिळ फोटोची किंमत खूप आहे. आपल्या आधीच्या पिढीचे फोटो बघायला मिळणे हीच मुळी एकदम भाग्याची गोष्ट आहे, त्या मुळे त्यांचा सहवास मिळाल्याचा आनंद मिळतो . त्यात हा फोटो काळा घोडा अशा ऐतिहासिक landmark ला घेतला गेलेला आहे हे पण विशेष आहे. पुढच्या पिढीला कदाचित ही गम्मत कळणार नाही, पण आपल्याला त्याची जाणीव प्रकर्षाने आहे. तू प्रयास करून हा फोटो संग्रहित केलास त्यात तुझी जिज्ञासू धडपड दिसून येते. त्यामुळे तुला मिळालेले पारितोषिक एकदम समर्पक आहे... 👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. खरयं , पूर्वजांच्या वस्तू आणि फोटो म्हणजे अमूल्य ठेवा असतो ! प्रत्यक्ष त्यांचा सहवास आणि त्यांचा स्पर्श अनुभवास येतो ! सर्वांगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात ! ह्या सगळ्या वस्तू हाताळतांना ! शब्दांत नाही सांगता येत ह्या भावना , त्या फक्त अनुभवता येतात ! खूप खूप धन्यवाद !

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...