वस्तु - खल आणि शंख
(वारसा स्पर्धा -2)
माझे आजोबा (आईचे वडील) वैद्य होते . आयुर्वेदिक औषधांसाठी लागणारा सगळा कच्चा माल ते स्वतः जाऊन खरेदी करून आणत . त्यानंतर त्यापासून सगळ्या प्रकारचे चूर्ण , भस्म , ते स्वतः , स्वतः च्या हाताने , कुणाच्याही मदतीशिवाय तयार करत . हे चूर्ण तयार करण्यासाठी ह्या खलांचा वापर करत . अगदी छोट्या आकारापासुन ते अगदी मोठ्या आकारापर्यंत असे जवळ जवळ पाच सहा खल होते त्यांच्याकडे . सगळ्यात मोठ्ठे तर खूपच वजनी होते , पण ते स्वतः उचलत गरज लागली तर . ते गेल्यानंतर , आम्ही कुणीही त्या खलांचा वापर करू शकत नव्हतो . म्हणून एक मोठ्ठे खल , एका वैद्यांना दिले . बाकी उरलेले माझी आई , मामे बहीण आणि मी घेऊन आलो आपापल्या घरी , त्यांची आठवण म्हणून . मी तर त्याचा काहीही वापर करत नाही . पण आजोबा त्या स्वरूपात कायम माझ्या सोबत आहे , ही जाणीव कायम असते . हे सगळे खल शंभर वर्षापेक्षाही जुने आहे . वर्षानुवर्षे कायम वापर होऊनही त्यांना काहीही झालेले नाही . अगदी जसे च्या तसे आहेत .
सोबत असेच मोठाले खुप शंख सुद्धा होते . त्यांनी शंखभस्म करण्यासाठी आणलेले होते . त्यातील हे दोन मी घेऊन आले होते , बाकीचे त्या वैद्यनाच दिले असावे . नेहमी बघतो ते शंख वजनाला खूप हलके आणि त्याच्या भिंती खूप बारीक असतात . हे मात्र खूप जड आहेत आणि त्याच्या भिंती जाड आहेत .
ह्या सगळ्याचे माझ्या आयुष्यात फक्त आजोबांच्या आठवणी म्हणून नाहीत , तर त्याच्यामुळे आणि त्यांच्या आयुर्वेदामुळे मी आज हे जग बघू शकते आहे..........
©आनंदी पाऊस
(वारसा स्पर्धा २)
मे २०२०
सगळ्यात लहान खल
अगदी छोट्या चमच्या एव्हढा
थोडा मोठा खल
संगमरवरी खल
त्यापेक्षा अजून थोडा मोठा खल
शंख
त्याच्या भिंती किती जाड आहे
शंख
मस्त जमले आहेत दोन्ही लेख.
ReplyDeleteखूप सारे धन्यवाद ! 😇😇😇
Deleteखल खरच किती सुंदर आहे असे आता दिसणार पण नाही तू वेळ काढ मग आपण नागपूर ला जाऊ व तुला मग मी आशा तुला आवडतात अशा खूप गोष्टी दाखवीन माझे माहेरी
ReplyDeleteखरंच नक्की एकदा आपण वेळ काढून जाऊ नागपूर ला , खूप दिवसाचे माझ्याही मनात आहे . तुमच्याकडून बरेच ऐकले आहे ! धन्यवाद 😊
DeleteWa khal chi mahiti khup chan v aajobanchya aathavi pan manala bhidnarya
ReplyDeleteआजोबा आणि त्यांच्या आठवणी , कधीही विसरल्या ना जाणाऱ्या , कायम मनात घर करून आहेत ........
DeleteNice Information 👍...छोटा खल आणि चमचा सापेक्ष मोजमाप वर्णन आवडले माला.
ReplyDeleteशंखाच collectionही अप्रुपच.
😊😇 हो , सोबत चमचा नसता तर समजले नसते किती छोटा आहे तो खल . आणि त्याचे छोटे असण्यातच खूप सौंदर्य आहे , आम्हा बहिणींची तर त्या करीत भांडण झाली होती , शेवटी सगळ्यात धाकटी म्हणून मामे बहिणीला दिला तो .
Deleteखल आणि शंखाची आठवणी खूपच छान जोपासल्या
ReplyDeleteतुला ड्रॉइंग पण काढता येतं ?
सुंदर काढल स
आई आणि मुलीच 👌👌🌹
मला स्वतः ला आनंद मिळेल एव्हढ्या प्रतीची चित्रं शकते आणि काढत असते , बऱ्यापैकी नियमित . आता या ब्लॉग वर बघायला मिळतीलच बरीचशी चित्रं मी काढलेली वेळोवेळी . मनःपुर्वक धन्यवाद !🙏😊
Deleteएकदम वेगळाच आणि अगम्य विषय असल्यामुळे त्या बाबतीत मी जरा अनभीज्ञच आहे. आजोबांची आठवण म्हणुन तू खल ठेऊन घेतला ते चांगलंच. त्या बरोबर शंख भस्म करायची पद्धत पण शिकून घ्यायची होतीस. आमच्याकडे लहानपणी असाच जाड शंख बघितल्याचे आठवते आहे . पण हल्ली तो शंख घरात दिसत नाही. आवडत्या व्यक्तीची आठवण आणी ती preserve करायची भावना छान आहे. आहे. खल आणि शंखाबरोबर आजोबांचे संस्कार जपून ठेवले आहेस त्याबद्दल कौतुक.
ReplyDeleteआयुर्वेद शिकून घेणे वाटते तेव्हढे नाहीच आणि त्यांच्या पद्धतीने शिकून घेणे आणि त्याचा सराव म्हणजे अगदीच अशक्य होते ..... तेच करू जाणे ते सगळे . किती तरी वर्षांचा अभ्यास होता , त्यांचे व्रतच होते जणू ........ असो , मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏
Delete👌🏻👌🏻👌🏻😃
ReplyDeleteमाझ्या मामीकडे असा संगमरवरी खल होता. रोजच्या भाजीचं आलं, लसूण, मिरची, जिरे वगैरे मसाला रगडून घ्यायची. कधी धने जिरे भाजून भरड कुटून घालायचं असेल तर तो खल उपयोगी पडायचा. त्या मसाल्यांची चव मस्त असायची!
छान आहे, आता वस्तू संग्रहालयात सुद्धा अशा वस्तू बघायला मिळणार नाहीत.
ReplyDeleteखरच या जुन्या वस्तुंना तर मोल आहेच पण आजोबांचा आशीर्वाद त्या रुपाने मिळतोय हे जास्त महत्वाचे. आजकाल तर पुरातन वस्तू जुन्या बाजारात जाऊन शोधून लोक आणतात, तुम्हाला तर घरीच मिळाल्यात. असे खल आणि तुम्ही वर्णन केलेले शंख मिळणे तर दुरापास्तच.
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे