Skip to main content

वस्तु - खल आणि शंख (वारसा स्पर्धा 2)

 वस्तु - खल आणि शंख 

(वारसा स्पर्धा -2)


                     माझे आजोबा (आईचे वडील) वैद्य होते . आयुर्वेदिक औषधांसाठी लागणारा सगळा कच्चा माल ते स्वतः जाऊन खरेदी करून आणत . त्यानंतर त्यापासून सगळ्या प्रकारचे चूर्ण , भस्म , ते स्वतः , स्वतः च्या हाताने , कुणाच्याही मदतीशिवाय तयार करत . हे चूर्ण तयार करण्यासाठी ह्या खलांचा वापर करत . अगदी छोट्या आकारापासुन ते अगदी मोठ्या आकारापर्यंत असे जवळ जवळ पाच सहा खल होते त्यांच्याकडे . सगळ्यात मोठ्ठे तर खूपच वजनी होते , पण ते स्वतः उचलत गरज लागली तर . ते गेल्यानंतर , आम्ही कुणीही त्या  खलांचा वापर करू शकत नव्हतो . म्हणून एक मोठ्ठे खल , एका वैद्यांना दिले . बाकी उरलेले माझी आई , मामे बहीण आणि मी घेऊन आलो आपापल्या घरी , त्यांची आठवण म्हणून . मी तर त्याचा काहीही वापर करत नाही . पण आजोबा त्या स्वरूपात कायम माझ्या सोबत आहे , ही जाणीव कायम असते . हे सगळे खल शंभर वर्षापेक्षाही जुने आहे . वर्षानुवर्षे कायम वापर होऊनही त्यांना काहीही झालेले नाही . अगदी जसे च्या तसे आहेत . 
                       सोबत असेच मोठाले खुप शंख सुद्धा होते . त्यांनी शंखभस्म करण्यासाठी आणलेले होते . त्यातील हे दोन मी घेऊन आले होते , बाकीचे त्या वैद्यनाच दिले असावे . नेहमी बघतो ते शंख वजनाला खूप हलके आणि त्याच्या भिंती खूप बारीक असतात . हे मात्र खूप जड आहेत आणि त्याच्या भिंती जाड आहेत . 
                        ह्या सगळ्याचे माझ्या आयुष्यात फक्त आजोबांच्या आठवणी म्हणून नाहीत , तर त्याच्यामुळे आणि त्यांच्या आयुर्वेदामुळे मी आज हे जग बघू शकते आहे..........

©आनंदी पाऊस 
(वारसा स्पर्धा २)
मे २०२०



सगळ्यात लहान खल 
अगदी छोट्या चमच्या एव्हढा 



थोडा मोठा खल 



संगमरवरी खल 



त्यापेक्षा अजून थोडा मोठा खल 



शंख 
त्याच्या भिंती किती जाड आहे 



शंख 



















Comments

  1. मस्त जमले आहेत दोन्ही लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे धन्यवाद ! 😇😇😇

      Delete
  2. स्वाती प्रभुणेOctober 23, 2020 7:15 pm

    खल खरच किती सुंदर आहे असे आता दिसणार पण नाही तू वेळ काढ मग आपण नागपूर ला जाऊ व तुला मग मी आशा तुला आवडतात अशा खूप गोष्टी दाखवीन माझे माहेरी

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच नक्की एकदा आपण वेळ काढून जाऊ  नागपूर ला , खूप दिवसाचे माझ्याही मनात आहे . तुमच्याकडून बरेच ऐकले आहे ! धन्यवाद 😊

      Delete
  3. Wa khal chi mahiti khup chan v aajobanchya aathavi pan manala bhidnarya

    ReplyDelete
    Replies
    1. आजोबा आणि त्यांच्या आठवणी , कधीही विसरल्या ना जाणाऱ्या , कायम मनात घर करून आहेत ........ 

      Delete
  4. Nice Information 👍...छोटा खल आणि चमचा सापेक्ष मोजमाप वर्णन आवडले‌ माला.
    शंखाच collectionही अप्रुपच.

    ReplyDelete
    Replies
    1. 😊😇 हो , सोबत चमचा नसता तर समजले नसते किती छोटा आहे तो खल . आणि त्याचे छोटे असण्यातच खूप सौंदर्य आहे , आम्हा बहिणींची तर त्या करीत भांडण झाली होती , शेवटी सगळ्यात धाकटी म्हणून मामे बहिणीला दिला तो . 

      Delete
  5. खल आणि शंखाची आठवणी खूपच छान जोपासल्या
    तुला ड्रॉइंग पण काढता येतं ?
    सुंदर काढल स
    आई आणि मुलीच 👌👌🌹

    ReplyDelete
    Replies
    1. मला स्वतः ला आनंद मिळेल एव्हढ्या प्रतीची चित्रं  शकते आणि काढत असते , बऱ्यापैकी नियमित . आता या ब्लॉग वर बघायला मिळतीलच बरीचशी चित्रं मी काढलेली वेळोवेळी . मनःपुर्वक धन्यवाद !🙏😊

      Delete
  6. एकदम वेगळाच आणि अगम्य विषय असल्यामुळे त्या बाबतीत मी जरा अनभीज्ञच आहे. आजोबांची आठवण म्हणुन तू खल ठेऊन घेतला ते चांगलंच. त्या बरोबर शंख भस्म करायची पद्धत पण शिकून घ्यायची होतीस. आमच्याकडे लहानपणी असाच जाड शंख बघितल्याचे आठवते आहे . पण हल्ली तो शंख घरात दिसत नाही. आवडत्या व्यक्तीची आठवण आणी ती preserve करायची भावना छान आहे. आहे. खल आणि शंखाबरोबर आजोबांचे संस्कार जपून ठेवले आहेस त्याबद्दल कौतुक.

    ReplyDelete
    Replies
    1. आयुर्वेद शिकून घेणे वाटते तेव्हढे   नाहीच आणि त्यांच्या पद्धतीने शिकून घेणे आणि  त्याचा सराव म्हणजे अगदीच अशक्य होते ..... तेच करू जाणे ते सगळे . किती तरी वर्षांचा अभ्यास होता , त्यांचे व्रतच होते जणू ........ असो , मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏

      Delete
  7. भाग्यश्री पाटसकरOctober 29, 2024 8:17 am

    👌🏻👌🏻👌🏻😃
    माझ्या मामीकडे असा संगमरवरी खल होता. रोजच्या भाजीचं आलं, लसूण, मिरची, जिरे वगैरे मसाला रगडून घ्यायची. कधी धने जिरे भाजून भरड कुटून घालायचं असेल तर तो खल उपयोगी पडायचा. त्या मसाल्यांची चव मस्त असायची!

    ReplyDelete
  8. गुलाबराव पाथरकरOctober 29, 2024 10:03 am

    छान आहे, आता वस्तू संग्रहालयात सुद्धा अशा वस्तू बघायला मिळणार नाहीत.

    ReplyDelete
  9. खरच या जुन्या वस्तुंना तर मोल आहेच पण आजोबांचा आशीर्वाद त्या रुपाने मिळतोय हे जास्त महत्वाचे. आजकाल तर पुरातन वस्तू जुन्या बाजारात जाऊन शोधून लोक आणतात, तुम्हाला तर घरीच मिळाल्यात. असे खल आणि तुम्ही वर्णन केलेले शंख मिळणे तर दुरापास्तच.

    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...