आनंदाचा झरा (वारसा स्पर्धा २) आज मी माझ्या थोड्या वेगळ्या वारस्या बद्दल सांगणार आहे . या स्पर्धेतील कुठल्याही सदरात न मोडणारा . माझ्या सतत आनंदाने झिरपत असणाऱ्या झऱ्याबद्दल . हा वारसा भौतिक स्वरूपाचा नसल्याने अर्थातच याचा फोटो मी देऊ शकणार नाही . एकदा मी माझ्या आईशी फोनवर बोलत होते . काही एक गोष्ट मला तिच्यासारखी जमत नव्हती , बहुतेक त्याबद्दल . आणि मी एकदम बोलून गेले , काय ग तुझ्यातले माझ्यात काही उतरले नाही . तू इतकं काय काय आणि उत्तमच करत असते आणि मला त्यातलं फारस काही जमत नाही . तर ती म्हणाली , उतरली आहे की एक महत्वाची गोष्ट , माझ्यातील उत्साह आणि कायम आनंदी रहाणे . काय खुश झाले खरंच मी त्या क्षणी ! आणि जसजसा ...