खजीना-२
(घरातील गमती जमती)
खजीना दोन च्या या भागात त्याच, मम्मी-दादांच्या कपाटाचा खालचा भाग आणि त्यातील खजीना. ह्या भागाला दोन लाकडी सरकते दरवाजे होते. हा भाग सुद्धा कितीतरी मौल्यवान खजिन्याने खचाखच भरलेला होता! त्यापैकी आधी डावीकडच्या भागातील खजीना पाहू या. आमच्या मम्मीला वाचनाची प्रचंड आवड आहे. अगदी पहिलेपासून ते अगदी आजतागायत तशीच आहे. काय काय वाचून काढत असते. प्रत्येक वेळेला मला थक्क व्हायला होते, तिने काय वाचले हे ऐकून! तर या भागात बरीच पुस्तक होती. मराठी, हिंदी आणि दादांची काही इंग्रजी. बाकी कुठली होती ते काही मला आठवत नाही. पण "रुचिरा"मात्र अगदी ठळक आठवतेय. छान वाटायचे ते पुस्तक बघायला, वाचायला आणि त्यातील चित्र बघता बघता तोंडाला चांगलेच पाणी सुटत असे. नंतर पुण्यात शिकायला गेले तेव्हा ओगले बाईंचा नातू आमच्याच महाविद्यालयात होता. असा वेगळ्याप्रकारे परत ओगले बाईंची आठवण कायम समोर असायची. या पुस्तकातील छायाचित्र हा एक सगळ्यात महत्वाचा आणि आवडीचा भाग! सारखीच पाहावीशी वाटत ही छायाचित्र. काही वर्षांपासून चंद्रमोहन सरांची ओळख झाली. त्यांच्याकडून या सगळ्या छायाचित्रांबद्दल आणि त्या छायाचित्रांच्या चित्रणाबद्दलच्या छान छान आणि रुचकर गोष्टी कळल्या. कारण त्यातील सगळी छायाचित्र त्यांनीच घेतलेली आहेत. त्यामुळे "रुचिरा" अजूनच जिव्हाळ्याचे झाले. एव्हढे सगळे असले तरी आता माझ्याकडे ते पुस्तक नाहीये आणि आजतागाजयत त्यातून वाचून मी एकही पदार्थ केलेला नाही!
दुसरे म्हणजे मम्मी उत्तम शिवणकाम आणि भरतकाम करीत असे. मग या शिवणकामाचे वेगवेगळे पेपर कटिंग्स करून या कपाटात ठेवलेले असत.
त्यातले मला ओ की ठो काळात नव्हते, तेव्हाच नाही, तर अगदी आजतागायत. शिवाय भरतकामासाठी लागणारे छान छान डिझाइन्स, ट्रेसिंग पेपर वर काढून ठेवलेले असत. कधी वर्तमान पत्रामध्ये काही डिझाइन्स येत, तर कधी कुणाकडे बघायला मिळत. मग ती ट्रेसिंग पेपर आणून त्यावर ट्रेस करून ठेवत असे. मग जेव्हा-केव्हा पडद्यावर, आमच्या निरनिराळ्या कपड्यांवर भरतकाम करायचे असे तेव्हा हे सगळे चटकन मदतीला धावून येत असत आणि आमच्या कपड्यांची शोभा वाढवत असत. आम्हाला शाळेत शिवणकला विषय होता. त्यातही थोडेफार भरतकाम असे मग तेव्हा आम्हालाही मम्मी याच संकलनामधून छान छान डिझाइन्स काढून देत असे. या सोबतच मम्मीला गाण्याची फार आवड होती पण आजतागायत तिला शिकता आले नाही. तर या गाण्याच्या नादामुळे तिने गाण्यांची एक वहीच केली होती, मिळतील ती गाणी ती त्या वहीत लिहून ठेवत असे.
आता कपाटाची उजवी बाजू आणि त्यातील खजीना. या भागात बऱ्याच फाईल्स होत्या. दादांच्या कामाच्या असाव्या बहुतेक . पण एक फाईल फार खास होती त्यात. अगदी आत्ता आत्ता पर्यंत होती ही फाईल. बाहेरून गडद चॉकोलेटी रंगाची आणि आतून मात्र थोडी वेगळी होती. साधारणपणे सगळ्या फाईल्स मध्ये कागद ठेवायचे म्हणजे त्याला ठराविक ठिकाणी दोन छिद्र पाडावी लागतात. असे केल्याने बऱ्याचदा तो कागद फाटण्याची शक्यता असते. पण या फाईल मध्ये तसे नव्हते. रायटिंग पॅड ला असते तशी क्लिप होती, मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या दोन्हीवर आतल्या बाजूने, लांबीच्या एका बाजूला मध्य भागी लावलेली होती. त्यामुळे त्यात लावलेले कागद फाटण्याची शक्यता नव्हती. कारण या फाईल तसेच खूप महत्वाचे कागद असत. ते म्हणजे सगळ्यांची वेगवेगळ्या परीक्षांची प्रमाणपत्र आणि गुणांच्या याद्या. अगदी दादांपासून, दोन्ही आत्या आणि सगळे काका, या सगळ्यांची प्रमाणपत्र यात असत सुरक्षितपणे ठेवलेली. नंतर आम्ही मोठ्या होत गेलो, तसे आमचीही सगळी प्रमाणपत्र, वेगवेगळ्या परीक्षांची, खेळांची, याच फाईल मध्ये ठेवली जात असत. आता मात्र जो तो ज्याची त्याची प्रमाणपत्र घेऊन गेलाय आपापल्या घरी आणि ती फाईल सुद्धा नाहीये.
या भागातील दुसरी अतिशय सुंदर गोष्ट म्हणजे छायाचित्रांच्या पुस्तिका म्हणजेच फोटोंचे अल्बम ! जवळ जवळ सगळी छायाचित्र कृष्णधवल, अगदी आमच्या लहानपणीची सुद्धा! मम्मी दादांच्या, आत्यांच्या, मामाच्या लग्नाचे सगळे. या अल्बम मध्ये एक पान जाड असे, ज्यावर फोटो लावले जात आणि या दोन पानांच्या मध्ये एक ट्रेसिंग पेपर असे. त्यामुळे दोन्ही फोटो सुरक्षित राहत असत. या जाड पानांवर फोटोच्या आकाराप्रमाणे, चार कोपऱ्यात जाड कागदाचे चार अगदी छोटे छोटे त्रिकोणी कोन चिकटविलेले असत. मग या चार त्रिकोणी कोनांमध्ये एक फोटो अडकवून ठेवला जात असे. ह्या सोयी मुळे कुठलाही फोटो त्यात सुरक्षित पणे लावता आणि काढता येत असे. हे सगळे अल्बम बघायला आम्हाला फार मज्जा वाटत असे. आणि हे सगळे साधारण कपाटाची सफाई करतांनाच बाहेर निघे आणि बघता येत असे. अल्बम मात्र आम्ही अधून मधून आठवण आली आणि लहर लागली की काढून बघत असू. पण खूप सूचना असत बघतांना. जसे पण सावकाश उलटावा, फोटोला मध्ये बोट किंवा हात लावू नका वगैरे वगैरे. ही झाली खजीना-२ ची गोष्ट पूर्ण बाकी खजिन्यांच्या गोष्टी पुढच्या भागात मिळतीलच वाचायला लवकरच.
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
१२ एप्रिल २०२०
रुचिरा पुस्तक
ओगले बाई
भरतकाम डिझाईन
भरतकाम डिझाईन
भरतकाम डिझाईन
भरतकाम डिझाईन
ब्लॉउज साठीचे पेपर कटींग
फ्रॉक साठीचे पेपर कटींग
प्रमाणपत्र
प्रमाणपत्र
लग्नतील कृष्ण धवल छायाचित्र
लग्नातील कृष्ण धवल छायाचित्र
लग्नातील कृष्ण धवल छायाचित्र
लग्नातील कृष्ण धवल छायाचित्र
याच त्या पेपर क्लिप्स अल्बम
मध्ये फोटो अडकविण्यासाठी
वापरल्या जात .
या पेपर क्लिप्स मध्ये अशा
पद्धतीने फोटो अडकविला
जात असे .
Wow chhan lekh.
ReplyDeleteTons of love 😍
DeleteMasttt
ReplyDeleteखुप सारे प्रेम 😍 😇
DeleteWa chanch varnan
ReplyDeleteAlbum purviche dolasamor ubhe keles
Khajina 👌👌
स्नेहपूर्ण धन्यवाद 🙏 ☺
Deleteखरच वर्षा, वहीनीचे वाचनाचे वेड मला चांगलेच माहीत आहे आम्ही सर्वजण असतांना बर्याच भाकरी कराव्या लागत असत तर भाकरी करतांना वाचन करणारी वहिनी मला अजून आठवते !
ReplyDeleteतुझा अभिप्राय वाचुन डोळ्यात पाणीच आले खळंकन.... 😍
Deleteआभाळभर प्रेम ही आठवण सांगितल्या बद्दल!! ❤ 😇😍💞
अरेच्या आमच्या कडे पण अशीच लाकडी कपाटे होती दार सरकवणारी व काही गोदरेज ची लोखंडी त्या काळी व्हॉट अँप किंवा फेसबुक नव्हते कुटूंब मोठी असायची घर काम व उरलेल्या वेळात पुस्तक वाचन किंवा घरोघरी रेडिओ वर बिनाका गीत माला किंवा रात्री हवामहल ची गोष्ट हा लोकांचा विरंगुळा होता टीव्ही पण उशीरा आले त्यात पण फक्त दूरदर्शन
ReplyDeleteआपल्या सेम सेम गोष्टीत अजुन ही भर... मस्तच !
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊
Richest Treasure and Innovation writing inspires always- Sanjita
ReplyDeleteTons of love n thnks 😍😇
ReplyDeleteखरच ताईला वाचन करायची खूप आवड आहे
ReplyDeleteतिला मी म्हणायची मला पीशवी शिकव तर लगेच सांगायची
शिवण पण आवडत होते
खरच ताईकडून शिकण्या सारखे खुप आहे
सर्वाना सांभाळून घेणारी ताई
आठवणी लक्ष्यात ठेवून पुढे आणा री मुलगी खूप खूप प्रेम तुला
मनापासुन स्नेहपूर्ण धन्यवाद 🙏 ☺
DeleteTons of love 😍 ❤ 😇
khup chan lihilay as usual majhyakade pan aahe ruchira
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇
ReplyDeleteखूप छान लिहीलय...सगळ्या आठवणी ताज्या झाल्यात...संकलनाचा गुण तुझ्यात पण पुरेपूर उतरलाय...आत्याने शिवलले एकसारखे फ्रॉक घालण्यात पण काही वेगळीच मजा होती😍😍😍😘😘
ReplyDeleteएकसारखे फ्रॉक घालण्याच्या मजेला कसलीच तोड नाही या जगात!
Deleteबालपण देगा देवा..... 😍 ❤️ 💖
Tons of love 😍!!!
खुप छान...
ReplyDeleteआपल्या पिढीला ही कपाटं आठवतात ... स्मरणात ठेवुन आठवणी लिहिणं यात कौशल्य .. बारीक सारीक तपशील ... स्मृतींंना उजाळा देतात..
नेहमीप्रमाणे ..फोटोज.. छानच
...
- केशव
हल्ली गोष्टी जपुन ठेवण्या पेक्षा, सारख्या बदलण्याची लहर आहे..... 😢
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏 केशव सर! 😊
Lahanpanicha aathavni ramya astat khajina aawdla aamhala aaichi aawdat pan chanch aahe
ReplyDeleteAamchya lagnacha album pan black & white aahe pan aata photos kharab zalet
खुप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇
ReplyDeleteताई खजीना 2 हा लेख सुंदर वाटला ते जे रुचिरा मासिक मी सुध्या पाहिल होत मामा कडे इतक सविस्तर लिहिते तू साहित्यिक लेखिका च व्हायला पाहिजे होत जूने कृष्णधवल छायाचित्र उत्तम������
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏 ☺ 😇
DeleteTons of love 😍
Khup sunder khajina..,👍
ReplyDelete😍Tons of love!
Deleteखजिन्यातील रूचिरा पुस्तकाने आमच्या कडच्या रूचिराची आठवण झाली. वरण भातापासून सगळे पदार्थ होते त्यात. नंतर आठवण आली ती अल्बमची. असाच एक अल्बम माझ्या आईने आणला होता आणि त्यात माझे 19972 पासूनचे नाटकांतले फोटो लावले होते. तो 26 जुलैला वाहून गेला. खजिन्यातील गमती वाचताना जुन्या स्मृती चाळवल्या. मजा आली.
ReplyDeleteरुचीरा सगळ्याच महिलांच्या मनाच्या जवळचे!
Deleteअरेरे छान आठवणी होत्या, नेमक्या त्याच गेल्या...
जुन्या आठवणी म्हणजे निखळ आनंद..
😍😇 धन्यवाद 🙏
छान लेखन केली. भरतकामासंबंधित वाचन करुण मला माझ्या आठवीच्या शाळेची आठवण झाली. आम्हाला ते करण्यास शिकवले गेले. शाळेतील शिक्षकांनी काहीही शिकवले नाही, परंतु आई आणि आमच्या शेजारच्या काकू.
ReplyDeleteखरंय शाळेत अशीच सगळी धमाल असे आमच्या सुद्धा!
Deleteतुझ्या मुळे मला पण आठवण झाली त्या सगळ्या गोष्टींची!!
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
वर्ग टाकायला सुरुवात सिलाई चालू होण्यापासून कच्ची पर्यंत सुरू झाली. ते पॅचवर्क, मेणबत्ती विकिंग पॅरिएंट जॉन थेपाली. मी आता ते ज्ञान जास्त वापरत नाही, परंतु माझी बहिण "कराबी क्रिएशन्स" आजपर्यंत ते वापरत आहे. मानतात्ना म्हणही शिकले वेस्टजात नाही तेरे खरे आहे
ReplyDeleteकाहीही शिका, त्याचा आयुष्यात कुठेतरी उपयोग होतोच..
Deleteकुठलेच शिक्षण वाया जात नाही हेच खरे!! ☺️😇