गोष्ट चकचकीत डब्यांची
(घरातील गमती जमती)
घरातील रोजच्या वापरातील भांडी वापराप्रमाणे दररोजच्या दररोज घासून साफ केली जात . पण घरातील सर्व सामान भरून ठेवण्याचे बरेच डबे होते . ह्यातील सगळ्यात जास्त डबे पितळेचे होते आणि काही अल्युमिनियम आणि स्टीलचे होते . अल्युमिनियम आणि स्टीलचे डबे घासले की पटकन साफ होतात . पितळी डब्यांचे तसे नाही . हे डबे साफ करण्यासाठी बरीच मेहनत आणि भरपूर वेळही लागतो . आज या डबे सफाईची गोष्ट !
हे काम साधारणपणे वर्षातून दोनदा केले जात असे . एकदा दिवाळीच्या आधी आणि एकदा अक्षय्य तृतीयेच्या आधी . एक तर यावेळी बऱ्याच रिकाम्या डब्यांची गरज असे . कारण दिवाळीचा सगळा फराळ भरायला भरपूर डब्यांची आवश्यकता असे . मग या निम्मिताने , ज्या डब्यात थोडे-थोडेच सामान राहिलेले असे ते त्या मोठ्या डब्यातून काढून छोट्या डब्यात काढले जाई . मग हे मोठाले डबे फराळ भरायच्या कामाला येत . हे सगळ्यांना माहितीचे आहेच . पण आमच्याकडे अक्षय्य तृतीयेला घरात पितरांचे श्राद्ध घातले जाते . या साठी सुद्धा फराळाचे काही पदार्थ करावे लागतात . शेव , दराबा लाडू आणि साजऱ्या तरी कमीतकमी कराव्याच लागतात . मेग हे भरून ठेव्यालाही डबे हवेच असतात . दुसरे म्हणजे आमच्या शाळेला सुट्टी लागलेली असे त्यामुळे आमची थोडी मदत होत असे आणि लुडबुड जास्त . या सगळ्या कारंणानी डबे साफ करायला या वेळा सोयीच्या होत असत . अजून एक महत्वाचे कारण म्हणजे या दोन्ही वेळेस छान कडकडीत ऊन असे , जे फार गरजेचे असे या कामासाठी .
हे काम करण्यासाठी सुद्धा थोडे पूर्व नियोजन लागे .या कामासाठी मेहनत आणि वेळ दोन्हीही भरपूर आवश्यक असे . पण बाकीही थोडी पूर्व तयारी करावी लागे . तर हे सगळे डबे माळ्यावर ठेवलेले असत . फक्त काही अल्युमिनियमचे रोजचे लागणारे सगळ्या पिठांचे डबे स्वयंपाकाच्या ओट्याखाली ठेवलेले असत . मग सगळ्यात आधी हे माळ्यावरचे सगळे डबे एक-एक करत खाली उतरवावे लागत असे . ते खाली उतरवायचे म्हणजे मोठ्ठी कसरतच असे . तेव्हा घरात शिडी वगैरे नव्हती . जेवणाची एक लाकडी खुर्ची घ्यायची , मग त्या खुर्चीवर एक लाकडी स्टूल ठेवायचे . त्यानंतर एकीने यावर चढायचे आणि एकीने तो स्टूल नीट धरून ठेवायचा . मग वर चढलेलीने एक-एक डबा माळ्यावरून काढायचा आणि खाली उभं असलेलीच्या हातात द्यायचा . हात पोहोचतील इतके डबे काढून झाले की खाली उतरायचे आणि ती खुर्ची त्या स्टूल सहीत थोडी पुढे सरकावयाची . मग पुढचे डबे काढायचे , असे सगळे डबे खाली उतरवेपर्यंत चालायचे .
मग सगळे डबे खाली उतरवून झाले सगळ्या माळ्यांवरचे की खाली जमीनीवर या डब्यांचा पसाराच-पसारा ! मग त्यात किती जिन्नस आहे हे बघायचे आणि ते बघून त्याप्रमाणे ते गरजेप्रमाणे लहान मोठ्या आकाराच्या भांड्यात , घमेलीत किंवा वाडग्यात काढायचे . मग हे सगळे रिकामे झालेले डबे उचलून भांडे घासायच्या ठिकाणी नेवून ठेवायचे . डब्यातील जिन्नसा काढून ठेवलेल्या सगळ्या घमेल्या , भांडी आणि वाडगे उचलून टेबलवर आणि स्वयंपाकाच्या ओट्यावर उचलून ठेवायचे . एक कारण म्हणजे यात पाणी उडू नये , दुसरे कारण म्हणजे तिकडून येताजाता कुणाचा पाय लागून सांडू नये आणि तीसरे आणि सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे घरातील चिल्ल्या-पाल्ल्यांनी त्यात हात घालून सांडासांड करू नये म्हणून .
आता या सगळ्या डब्यांमध्ये जास्त डबे पितळेचे होते . हे डबे म्हणजे घासले , धुतले की झाले असे होत नसे . हे पितळी डबे स्वच्छ आणि चकचकीत करण्यासाठी थोडी जास्त आणि वेगळी मेहनत करावी लागत असे . तर हे पितळी डबे चकचकीत करण्यासाठी लिंबू किंवा चिंच या पैकी काहीतरी आणि मीठाने हे डबे चांगले चोळून-चोळून , त्यावरील सगळे डाग साफ करावे लागत . काही वेळा घरात खूपच जुने लिंबूचे किंवा कैरीचे लोणचे असेल तर ते सुद्धा वापरले जात असे या कामासाठी . बार एव्हढे करून काम भागात नसे . यानंतर हे डबे लगेच राखेने घासावे लागत . तेव्हा हे डबेच नाही तर घरातील सगळी भांडी राखेनेच घासाली जात असत आमच्याकडे . फक्त काचेची आणि चिनी मातीची भांडी तेव्हढी पांढऱ्या पावडरने घासली जात . भरीताच्या लेखात लोखंडी शेगडीचा उल्लेख आलेला आहेच . तर त्यात जाळलेली शेणाची गौरी आणि लाकडी कोळसा , याची राख तयार होत असेच , पण रोजच्या अंघोळीचे पाणी बंबात गरम केले जात असे तेव्हा आमच्याकडे . यातही शेणाची गौरी , दगडी कोळसा , भुईमुगाच्या शेंगांची टरफलं , लाकडाचे तुकडे आणि भुसा असे सगळे जाळले जात असे . मग याची सुद्धा राख तयार होत असे . बंब रोजच पेटवला जात असे आणि शेगडी अधून मधून काही खास कारणांनी . त्यामुळे घरातच पुरेशी राख तयार होत असे . मग हीच राख सगळी भांडी घासण्यासाठी वापरली जात असे . ज्यांच्याकडे पुरेशी नसे त्यांना ती विकत सुद्धा मिळत असे . आता तेव्हा आजच्या सारख्या निरनिराळ्या घासण्या मिळत नसत . मग नारळ फोडल्यावर त्याच्या बाहेरच्या बाजूला असलेले तंतू घासणी म्हणून वापरले जात असत .
तर हे चिंच/लिंबू चोळून घासलेले डबे मग राखेने या नारळाच्या कुच्चीने घासले जात . मग हे घासलेले डबे चांगले नीट सगळीकडून हात फिरवून दोन ते तीन पाण्यातून धुतले जात असत . मग थोडे पाणी निथळवून स्वच्छ सुती कापडाने आतून बाहेरून चांगले पुसून घेतले जात . असे करण्याचे कारण म्हणजे या पितळी डब्यावर पाणी उडाले किंवा पाण्याचे ओघळ आले तरी त्याचे सुद्धा डाग पडतात . त्यानंतर हे डबे गच्चीवर नेवून उन्हात ठेवले जात , तेही एकमेकांना जराही स्पर्श न होता , थोडे थोडे अंतर ठेवून . म्हणजे सगळ्या डब्यांवर छान ऊन पडेल आणि ते छान कडकडीत वाळतील आणि एकमेकांचा स्पर्श न झाल्याने त्याचे डाग सुद्धा नाही पडणार . किंवा काही वेळा छोट्या गॅलरीत ऊन असेल तर तिथे सुद्धा ठेवले जात . डबे उन्हात नेवून ठेवण्याचे काम अर्थातच आम्हा मुलींचे . मग हळूहळू जसजश्या मोठ्या होत गेलो तसे मग एक एक काम करण्यास मुभा मिळत गेली .
बाकीची स्टील आणि अल्युमिनिअमचे जे डबे होते ते नेहमीप्रमाणे राखेने घासून , चांगले दोन-तीन पाण्यांनी धुवून घेतले जात . त्यासाठी पितळेच्या डब्यांसारखे बाकी काय-काय लावून साफ करण्याची गरज नसते . धुवून झाल्यावर , थोडे निथळले की मग स्वच्छ सुती कापडाने पुसून घेतले जात आणि यांची सुद्धा गच्चीवर कडकडीत उन्हात रवानगी होते असे , कडकडीत वाळण्यासाठी .
मग काही तास हे सगळे डबे उन्हात चांगले कडकडीत वाळले आणि गरम झाले की परत खाली आणले जात असत . अर्थातच हे डबे खाली आणण्याचे काम आम्हा मुलींचे . चक्क चटका लागत असे या डब्यांचा ! मग डब्यांच्या आकाराप्रमाणे त्या-त्या जिन्नसा लहान-मोठ्या डब्यात भरल्या जात आणि शक्यतो सगळे मोठे डबे रिकामे राहतील याची काळजी/सोय केली जात असे . म्हणजे मग सगळे फराळाचे पदार्थ भरायला हे मोठ्ठे रिकामे डबे एकदम तय्यार असत . बाकी भरलेले डबे परत माळ्यावर आपापल्या जागी स्थानापन्न होत असत . असा हा सगळं सोहळा जवळजवळ पाच-सहा तास तरी चाले . पण एकदा का ते छान बाहेरून पिवळे धम्मक आणि आतून चंदेरी चकचकीत डबे पहिले की जो काय आनंद मिळे , त्या आनंदामुळे सगळ्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटे आणि सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जात असे !!!
बाकीची स्टील आणि अल्युमिनिअमचे जे डबे होते ते नेहमीप्रमाणे राखेने घासून , चांगले दोन-तीन पाण्यांनी धुवून घेतले जात . त्यासाठी पितळेच्या डब्यांसारखे बाकी काय-काय लावून साफ करण्याची गरज नसते . धुवून झाल्यावर , थोडे निथळले की मग स्वच्छ सुती कापडाने पुसून घेतले जात आणि यांची सुद्धा गच्चीवर कडकडीत उन्हात रवानगी होते असे , कडकडीत वाळण्यासाठी .
मग काही तास हे सगळे डबे उन्हात चांगले कडकडीत वाळले आणि गरम झाले की परत खाली आणले जात असत . अर्थातच हे डबे खाली आणण्याचे काम आम्हा मुलींचे . चक्क चटका लागत असे या डब्यांचा ! मग डब्यांच्या आकाराप्रमाणे त्या-त्या जिन्नसा लहान-मोठ्या डब्यात भरल्या जात आणि शक्यतो सगळे मोठे डबे रिकामे राहतील याची काळजी/सोय केली जात असे . म्हणजे मग सगळे फराळाचे पदार्थ भरायला हे मोठ्ठे रिकामे डबे एकदम तय्यार असत . बाकी भरलेले डबे परत माळ्यावर आपापल्या जागी स्थानापन्न होत असत . असा हा सगळं सोहळा जवळजवळ पाच-सहा तास तरी चाले . पण एकदा का ते छान बाहेरून पिवळे धम्मक आणि आतून चंदेरी चकचकीत डबे पहिले की जो काय आनंद मिळे , त्या आनंदामुळे सगळ्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटे आणि सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जात असे !!!
©आनंदी पाऊस
घरातील गमती जमती
२५ डिसेंबर२०१९
पितळी डबे
पितळी डबे
अरे वाा.. मस्त.. लेख आहे..आणि हे सर्व pics..tar apratim..khup chhan
ReplyDeleteनेहमीप्रमाणे पहिला नंबर ! खूप सारे धन्यवाद !🙏😇
DeleteMast
ReplyDelete😊😍😍
Deleteलेख वाचून आवडला ऐवढे सगळे फोटो कसे मिळाले खुपच छान
ReplyDeleteमिळवले कुठून कुठून.
Deleteखुप धन्यवाद 🙏
मस्तच वर्णन आहे.खरेच त्या काळी पितांबरी नव्हती चिंच किंवा लिबू व ते पण लिबाचा रस काढून घ्यायचा किंवा खराब लिब घ्यायची चिंचे च पण तसेच कमी खर्च करून करायचे ही पध्दत होती त्याला नीटनेटके पणानी करते बाई असे पण संबोधले जाई नाहीतर उपरी असे मला आठवत आहे .ते वातावरण खूपच वेगळे होते मजा पण असायची आता बरेचदा फराळ विकतच आणले जाते व डायट च्या नावाने कमी खावे म्हणून पण खातो जास्तच������असो
ReplyDeleteपीतांबरीने घासलेल्या भांड्यात ही मज्जा नाही . या पद्धतीने घासलेली एकदम मस्त चकचकीत होतात . काहीही फेकले नये , नये हा कटाक्ष असे , आणि हेच बरोबर तर . पण आजकाल आजकाल मात्र आपण कितीतरी गोष्टी सहज फेकून देतो , वाया घालवतो ..... 😔😔
Deleteसविस्तर अभिप्रायाबद्दल खूप सारे धन्यवाद !! 😍🤩
भाता चे कुकर व आमटी चे आम्ही अजूनही ठेवले आहे कुकर ला कधीतरी भात लावतो
ReplyDeleteहे फारच भारी 😇! मी एकदाही खाल्लेला नाही या कुकर मध्ये शिजवलेला भात ! आम्ही तुमच्याकडे राहत असतांना कुकर पाहिल्याचे मला अजिबातच आठवत नाही . 😀😄
Deleteमस्त ��
ReplyDeleteखुप सारे प्रेम आणि धन्यवाद 🙏 😊
Deleteव्वा, मस्तच !!
ReplyDelete🤗🤗🤗
Deleteविषय अगदीच नेहमी चा आहे पण तु अगदी शब्दांनी चमकवुन टाकला आहे
ReplyDeleteसुप्रिया तुझे अगदी मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात!!! खूपपपपप आनंद झाला तुला इथे भेटुन!
Deleteखुप सारे धन्यवाद 😍
Chan ,👌👌👌
ReplyDelete❤ 😍😘
Deleteलेख खूप छान झाला आहे. माझे लहानपण आठवलं.
ReplyDeleteआमच्याकडे पण असच असायचं. तुमच्या पितळी भांड्याची चकाकी लेखामध्ये उतरली आहे. अगदी छान लेख झाला आहे. पितळी भांडायचं तंत्र वेगळे असते. त्याचे घाट, त्याचे माठ यात विविधता असते. ते बघायला खूप छान वाटतं. तुमचे अभिनंदन��
इतक्या सगळ्या कौतुकाबद्दल खूप सारे धन्यवाद🙏😇 ! आपले बालपण म्हणजे खरंच एक सुंदर आठवणींचा खजिनाच आहे !😍🤩💃
Deletekiti chan chakchakit dabe pahun v vachun mast vatatle sarv aathavani sunder aahe lahanpanichya ��������
ReplyDelete🥰😍खुप सारे प्रेम आणि धन्यवाद 🙏 😊
DeleteKhupch Chan lihle photo Pan Chan dabbyache�������� mast
ReplyDeleteहो ना, पण एक कमी आहे फोटोत... आपली ती गोड वरणाची बटलोइ नाही ना 😢😭 ती इथे आल्या शिवाय काही हा लेख पूर्ण नाही होणार. ..
DeleteNavapramane chakchait lekh
ReplyDeleteEkandarit varanan 👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Deleteवा खुपच छान मला माझ्या माहेरी गेल्या सारखे वाटले हा लेख वाचून
ReplyDeleteवावा कित्ती छान!!
Deleteकोण आपण?
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप छान लेख.वाचुन आठवणी ताज्या झाल्या.
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद 🙏!
Deleteकोण आपण?
Khup Chan... 👌👌👌mla navhta mahit ki tumhi aadhi sagle भांडी रखेने धुवायचे.....
ReplyDeleteवावा खुपच आनंद झाला तुला इथे बघून....
Deleteअग हो, आधी सगळीच लोक साधारणपणे भांडी राखेनेच भांडी घासत.
बाकीही गोष्टी तुला सविस्तर कळतील पुढच्या लिखाणात!!
Stay tuned... 😍
Khupp masttt😍😍😍❤
ReplyDeleteतुझं औपचारिक स्वागत या चौधरी सदनात!!!
Deleteखूप खूप आनंद झाला तुला इथे भेटून!!!
Chakchakitach zalay lekh������ agadi tya dabyansarakha
ReplyDeleteचकचकीत अभिप्रायाबद्दल चकचकीत धन्यवाद 🙏!!
Deleteखूपच छान ... मला आमच्या घरची डब्यांची स्वच्छता आठवली. अगदी काहीच फरक नाही त्यात. एकदम same to same ������ फक्त गच्चीत ठेवल्या ऐवजी आम्ही मागच्या मोकळ्या अंगणात ठेवत असू.
ReplyDeleteवावा छानच ! आपल्या पिढीतील बर्याच जणांच्या अगदी अशाच आठवणी असतील खर तर...😍
Deleteमनःपूर्वक धन्यवाद! 🙏 🙏 🙏
अत्यंत सुरेख लेख. ओघावत्या लेखन शैलीमुळे अगदी त्या काळात आणि त्या वेळच्या पितळी डबे आणि भांड्यांच्या दुनियेत असल्याचा आभास होतो. लेखनातील बारकाव्यांमुळे संपूर्ण दृश्य हुबेहूब मनचक्षुंसमोर उभे राहते. त्या काळातील महिलांमध्ये असणारा गृहकृत्यदक्ष हा गुण अधोरेखित होतो. एकूणच खूपच छान वर्णन.
ReplyDeleteखूप सारे मनःपूर्वक धन्यवाद 🙏 !!
Deleteआपला अभिप्राय आमचा अभिमान !! 😇
Mi pn dabe ghaslet n ajunhi gelyawr krte
ReplyDeleteAaipn lokhandi chuliwr cooking kre jewa rokel milat nse
वावा मस्तच!!!
Deleteरॉकेल ची व्यथा मात्र अगदी खरी मलाही आठवली ती रॉकेल साठीची वणवण.....
Corona ने घरातल्या अन्नाची किंमत परत दाखवली सर्वांना..मस्त वाटलं वाचून आणि बघून.. जुन्या आठवणींना उजाळा पितळेच्या डब्यासारखाच मिळाला :)
ReplyDeleteअगदी खरंय, carona आला चीन मधून, पण त्याने सगळ्या भारतीयांना सांगितले अणि सिद्ध केले आपली संस्कृती सगळ्यात श्रेष्ठ आहे😇😍, तीच आचरणात आणा, दुसर्याचे अंधानुकरण
Deleteकरू नका!
असो. .... 🙂
मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏
Purvi saglyankade pitali dabech asayche. Jastiche vansaman tyat bharun tevat asu n Diwalila pharal n thevnitle padarth. Te ghasanyasathi amhi chinch vaprat asu n rakh n narlachi shendi. Kuchchi word navin vatla. Te chakchit dabe khup must disat. Ata steelchya yugat to chakchitpana harvun gela. Nirniralya akaratalya dabyancha photohi must. ����
ReplyDeleteखरी गोष्ट आहे , पितळी जमाना तो ! हो , काय पण आमच्याकडे भांडे घासण्याच्या नारळाच्या शेंडीला कुच्चीच म्हणत . भांड्यचाच नाही तर सगळा खरा चकचकीतपणा हरवला आहे आजच्या खोट्या चकचकीत जगात ......
Deleteवाह. हा मस्त चमकत्या अणि लखलखत्या डब्यांचा लेख छानपैकी नेहमीप्रमाणे चकचकीत झाला आहे. नेहेमीच्या घरगुती routine गोष्टी पण तुझ्या चपखल मांडणीमुळे ekdum वाचनीय झाल्या आहेत. एरवी हा बायकांचा विषय असल्यामुळे आम्हा पुरुषांना एवढा appeal झाला नसता, पण हल्ली नॅशनल lock out मुळे घरात अडकल्याने, भांडी मी नेमाने घासत आहे, अणि त्या मुळे ती पितळेची आणि स्टीलची भांडी घासण्यात केवढे efforts लागले असतिल ह्याची नेमकी कल्पना आली. एकंदरीत तुमच्या घरात अखंडपणे काही ना काही मेगा कामं चालूच असायची अस दिसतय. त्यामुळे तुमच्या सगळ्या महिला वर्गाला अँड त्यांना थोडीफार मदत करणारा चिल्यापिल्यां बद्दल खूपच respect वाटतो आहे . विशेष म्हणजे हे सगळं तुम्ही आनंदाने आणी हासत खेळत करत होतात हे दिसतय. पितळेची and स्टीलची भांडी सोबत attach केलेल्या images मध्ये मस्त लखलखताहेत. एकच शंका आहे, कारण ते सगळे डबे जर नेहेमी एवढे वर ठेवलेले असत, तर तुम्हा मुलांना त्यात वरचेवर हात घालता येत नसणार (😢😢😢)
ReplyDeleteChhan वाचनीय लेख..... 👍👍👍
तुमच्या अभिप्रायावरून असे वाटतेय की हा लेख योग्य वेळेला प्रकाशित झालाय . त्यामुळे तुमच्यासारख्या लॉक डाउन मध्ये भांडी घासणाऱ्या पुरुषांना , यातील मेहनत नाही कळली . आणि आशा करते की ती कायमची नीट लक्षात राहील . हे मात्र खरे आहे सगळेच जण सगळी काम आनंदाने करीत अगदी हसत खेळत , त्यामुळे कुठलंही काम हे काम राहताच नसे , तो एक आनंदी सोहळाच होऊन जात असे . अरे हे वर ठेवलेले डबे म्हणजे खाऊचे डबे नसत , त्यात सगळा सामान भरलेला असे , खाऊचे सगळे डबे , कोठ्या खालीच असत , त्यामुळे त्याबद्दल काळजी नसावी . खूप सारे धन्यवाद !🙏😇😆
Deleteva farch bhaari photo .. tyasathi aj unha sagale lekh vachale. mast..mast ..mast.
ReplyDeleteवावा मस्तच!! 💃💃
Deleteसप्रेम आनंद....
सप्रेम धन्यवाद!!!
Diwali alya sarkh ch wattla, chaan 💐
Deleteधन्यवाद!!!🤩🤩
Deleteअबब.अबब... एवढी सारी पितळी भांडी!!
ReplyDeleteI never saw ever in the kitchen.
.मी अशी भांडी फक्त तुळशीबागेत पाहिलेली... आणि काही केळकर संग्रहालयात.
पण आपला लेख वाचून माला ही पितळी(copper+zinc)भांडी आवडली. I love this Yellowish Rustique finish color textured vessel.
आणि मला नेहमीच तुझे अभप्राय फार आवडतात ! अगदी वेगळे आणि एकदम छान ! खूप सारे प्रेमळ धन्यवाद !!😍❤😇
Deleteho g mi pan ghasle pitli ani tambyache bhande , khup vel ani shram lagtat
ReplyDeleteखुप सारे धन्यवाद !
Deletewa g tu kashavarahi surekh lihu shaktes . mi gele don athavade bhandich ghasatiye . thakaliy aata ghasun ghasun , etake dabe ani bahndi aahet , ajun ek week jail aawaranyat mag navaratr suru hoil tya aadhi zale pahije
ReplyDeleteकिती सुंदर पावती माझ्या लिखाणाला !!! खुप सारे प्रेमळ धन्यवाद !
Deleteखरंच खुपच खुपच छान !
ReplyDeleteखुप सारे धन्यवाद !
ReplyDeleteKhup chan amhi pn rakhene bhandi ghasaycho. Tyasathi baryach vela halwayachya bhattitil rakh pn anaycho. Majja yaychi pn khup.
ReplyDeleteअरे व्वा ! ही माहिती नवीनच मला , हलवायाच्या भट्टीतील राख! मनःपुर्वक धन्यवाद या माहिती बद्दल !😍😍🙏
Deleteचकचकीत डब्याचा लेख एकदम मस्त झाला आहे अगदी आता दसरा दिवाळी येतच आहे असं वाटतं कि आपण पण घासून बरोबर मांडणीत छान मांडून ठेवले पाहिजे
ReplyDeleteअरे वा , मस्तच ! मनःपुर्वक धन्यवाद !🙏🙏
DeleteKhup mast
ReplyDeleteखूप मनःपूर्वक धन्यवाद !
Deleteखूप छान आठवण. राख अणि नारळाची घासणी (कुंची) राखेने पन एकदम छान चकचकीत व्हायचे डबे. पन हातही तेवढेच काळे व्हायचे ����
ReplyDeleteखरंय , भारी आठवणी आहेत या ! मनःपूर्वक धन्यवाद !🤩🤩
Deleteखूप सुंदर !👌👌
ReplyDeleteआजकाल रेडीमेड पदार्थ आवडण्याचा काळ आहे आणि डब्यामुळे अडचण होतेय असा दृष्टीकोन बळावत चालला आहे
ReplyDeleteआमचे सफाई काम डोळ्यासमोर आले. हुबेहुब वर्णन!! हा तर तुमचा हातखंडा!!! पण आता ट्रालिज व टप्पर वेअर 😀😀 जमाना!
ReplyDeleteखूप सुंदर लेख..लहानपणीची आठवण झाली.👌👌😊
ReplyDeleteतुमच्या लेखाने लहानपण जागे झाले. दिवाळी आली की सर्वात कठीण व न आवडणारे काम म्हणजे पितळी डबे घासणे. माझ्या आईकडे पण ओळीने १२-१५ लहानमोठे डबे आहेत . ते चिंच व राख लावून चमकवणे म्हणजे एक दिव्य वाटायचे. ते बाहेर खाटेवर सुकवायला ठेवले की राखण करायला लहान बहीण असायची. त्यावर जर एखादा ओघळ किंवा डाग पडला की आईचा ओरडा असायचाच. आता वहिनीने ते वर माळावर ठेवून दिले आहे आणि मधूनमधून मोडीत काढायचापण विचार करते . मी सांगितले आहे की मला ते हवे आहेत म्हणून. बघूया. तुमचा लेख नेहमीप्रमाणे मस्तच.
ReplyDeleteप्रा सौ वैशाली चौधरी
ठाणे