Skip to main content

भरीत रविवार सकाळ (घरातील गमती जमती)

भरीत रविवार सकाळ 
(घरातील गमती जमती)

                                                                      

                                                             हिवाळ्यात खूप महत्वाची आणि सगळ्यांचीच आवडती म्हणजे भरीत सकाळ!  ही सकाळ म्हणजे फक्त हिवाळ्यातच शक्य असते. आणि हो, हे भरीत म्हणजे तेच प्रसिद्ध खान्देशी  वांग्याचे भरीत! हे  जे खास भरीताचे वांगे असतात ते फक्त हिवाळ्यातच मिळत तेव्हा तरी. आता मिळतात जवळ जवळ वर्षभर, पण मग या वांग्यांना आणि भरताला छान चव नसते. खरी चव चाखायची तर ती फक्त आणि फक्त हिवाळ्यातच! या भरीतासाठी लागणारे दोन फार महत्वाचे घटक म्हणजे कांद्याची पाथ आणि भरीताच्या खास जाड मिरच्या! या दोन्ही घटकांशिवाय भरीताला मजाच नाही आणि हे दोन्ही घटक सुद्धा फक्त आणि फक्त हिवाळ्यातच उपलब्ध असतात . त्यामुळे खान्देशी भरीताला हिवाळा शिवाय पर्यायच नाही! 
                                                               आमच्याकडे तेव्हा दर शनिवारी आठवडे बाजार भरत असे. छान मस्त मोठ्ठे मोकळे मैदान होते. त्या मैदानात हा आठवडे बाजार भरत असे, काही वर्षांपूर्वी तिथे मोठ्ठे व्यापारी संकुल आले आहे. आमच्याकडे दर शनिवारीच पूर्ण आठवडभराचा भाजी बाजार, या आठवडे बाजारातूनच केला जात असे. अर्थातच भरीताची वांगी सुद्धा याच बाजारातून आणली जात असत. दुसऱ्या दिवशी रविवार, म्हणजे इतर वारांपेक्षा थोडा शांततेचा दिवस. या दिवशी सगळ्यांना सुट्टी असे, त्यामुळे सकाळी आठच्या ऐवजी नऊ वाजता जेवण मिळाले तरी चाले. हो आमच्याकडे जेवण सकाळी आठ-साडे आठलाच केले जात असे, अजूनही सकाळी सकाळीच अगदी आठ-साडे आठलाच नाही पण नऊ-दहा वाजताच जेवण होते. मग रविवारीच सकाळी भरीत भाकरीचा किंवा पुरीचा  बेत होत असे! 
                                                              भरीत करायलाही बरीच पूर्व तयारी आणि भरपूर वेळ लागतो. तर ही वांगी आणि पापड भाजायला आमच्याकडे एक खास लोखंडी शेगडी होती. या शेगडीत जाळण्याकरिता लाकडी कोळसा वापरला जात असे. हा कोळसा सुद्धा वर्षभराचा भरून ठेवलेला असे घरात. तर ही लोखंडी शेगडी पेटायलाही वेळ लागतो जरा. या शेगडीच्या जाळीवर कोळसे रचून ठेवावे लागतात, कामाच्या गरजेनुसार कमी-जास्त  आणि खालच्या बाजूला एक शेणाच्या गौरीच्या एका तुकड्यावर थोडे रॉकेल घालून पेटवून ठेवले जाते. मग यामुळे हळूहळू वरचा कोळसा सुद्धा पेटतो. या सगळ्या क्रियेत बराच धूर सुद्धा निघतो. मग ही शेगडी पेटवून बाथरूमच्या बाजूच्या छोट्या गॅलरीत ठेवली जात असे. तोपर्यंत घरात बाकी तयारी चाले. आमच्याकडे एक लोखंडी सराटा होता, ज्याचे मागचे टोक अणकुचीदार होते. या टोकाने सगळ्या वांग्यांना ठिकठिकाणी भोकं पडली जात. मग सगळ्या वांग्यांना तेल लावले जाई. आता ही वांगी भाजण्यासाठी तय्यार! मग कांद्याची पाथ चांगली स्वच्छ धुवून ठेवली जात असे. त्या पाथीला पुढे असलेले छोटे छोटे कांदे कापून त्या पाथीपासून वेगळे करून ठेवले जात. हे कांदे म्हणजे सगळ्यांच्या आवडीचे, अगदी जीव की प्राणच म्हणा ना! हे कांदे जेवनातांना तोंडी लावण्यासाठी होत/ हवे असत. बाकी पाथ छान बारीक कापून ठेवली जाई. कापून दोन भागात विभागली जाई, एक मोठ्ठा भाग आणि एक छोटा. भरीतासाठी भरपूर लसूण लागतो, तो सोलून ठेवायचा. तसेच बारीक मिरच्या भाजून ठेवायच्या. भरीतासोबत भाकरी केल्या जात. ज्वारी, बाजरी किंवा कळण्याच्या. ह्या गॅस वरच केल्या जात. मग तवा ठेवला गॅस वर की आधी मिरच्या भाजायच्या आणि मग भाकरी केल्या जात, त्याच तापलेल्या तव्यावर. 
                                                             एव्हढ्या वेळात बाहेर शेगडी छान हवी तशी पेटलेली असे. पण आधी मधेच एकदा तरी बाहेर येऊन, पाहून जावे लागे, शेगडी नीट पेटतेय की नाही. मग ही पेटलेली शेगडी उचलून घरात आणून स्वयंपाक घरात ओट्याजवळ खाली जमिनीवर ठेवायची. या दिवशी साधारण वांगे भाजण्याचे आणि भरीताला फोडणी देण्याचे काम या शेगडीवर केले जात असे. हे सगळे झाल्यावर  सुद्धा, थोडी धग या शेगडीत असेल तर, थोडे पापड भाजले जात. 
                                                            घरात आणून ठेवल्यावर या शेगडीवर बसतील तसे दोन-तीन-चार वांगे ठेवले जात भाजण्यासाठी. एका बाजूला भाजून ठेवलेल्या बारीक मिरच्या, कापून ठेवलेल्या कांद्याचा पाथीचा छोटा भाग, थोडी कोथिंबीर, लसूण आणि मीठ हे सगळे एकत्र 'बडगीत' घालून, लोखंडाच्या ठेचणीने ठेचले जाई व छान एकजीव ठेचा तयार केला जाई. मिरच्या गरम-गरम असतांनाच ठेचल्या की काम पटकन होते, मिरच्या गार झाल्या की मग खूप वेळ लागतो. 'बडगी' म्हणजे एक अखंड लाकडातून कोरून काढलेले लाकडी भांड. ही 'बडगी' खास ठेचा आणि भरीताची वांगी ठेचण्याकरिता असते असते. याच्या सोबत ठेचण्यासाठी एक लाकडी ठेचणी सुद्धा असते, वांगे ठेचायला. तर हा ठेचा ठेचून झाला म्हणजे याला बडगीतून एखाद्या भांड्यात किंवा वाडग्यात काढून ठेवला जातो आणि लोखंडी ठेचणी सुद्धा पुसून ठेवली जाते . 
                                                           तोपर्यंत एका बाजूला वांगे भाजण्याचे काम चालूच असे . ही वांगी सगळ्या बाजूने नीट भाजली जावी म्हणून ती सारखी फिरवून फिरवून ठेवली जात. एकदा का भाजून झाल्याची खात्री पटली की ते-ते वांग शेगडीवरून काढून खाली ठेवलेल्या मोठ्ठ्या स्टीलच्या ताटात ठेवले जाई आणि शेगडीवर त्याजागी दुसरे वांगे ठेवले जात असे, ही सगळी क्रिया शेवटचे वांगे भाजले जाई पर्यंत चालत असे. एकदा का एक वांग भाजून शेगडीवरून खाली ताटात उतरले की मग आमची जोरात लुडबुड चालत असे, ती वांगी सोलण्यासाठी! शेगडीवरून नुकतेच खाली उतरलेले वांगे म्हणजे एकदमच गरम, तरी आम्हाला फार आवडे ही वांगी सोलायला.  बरं शेजारीच पेटलेली शेगडी त्यामुळे मम्मीला वांग्यांसोबत आमच्याकडे सुद्धा नीट लक्ष ठेवावे लागे. भाजलेली वांगी ठेवायला एक ताट असेच, पण सोबत अजून एक ताट वांग्याची काढलेली सालं टाकण्यासाठी. मग एक-एक वांग जसजसे सोलून होई तसतसे ते बडगीत जात असे, ठेचण्यासाठी. वांगी सुद्धा गरम असतांनाच ठेचावी म्हणजे छान ठेचली जातात पटापट. वांगी ठेचण्यासाठी सुद्धा आमची नेहमीच भांडणं होत, प्रत्येकीलाच वाटे मलाच ठेचायला मिळावे. 
                                                           हिवाळ्याची सकाळ! तेव्हा थंडीही भरपूर, त्यामुळे शेगडी जवळ बसून वांगे सोलाणे आणि ठेचणे, ही आवडती कामं करता करता, शेगडीचा मस्त शेक सुध्दा मिळत असे. भारीच छान आणि उबदार वाटे हे सगळे! त्यात भर म्हणून वांगी भाजायला लागल्यापासूनच, सगळीकडे त्यांचा छान वास दरवळायला सुरुवात झालेली असे आणि या वासाने पोटातील भूक जामच खवळत असे! केव्हा एकदा भरीत तयार होते आणि केव्हा एकदा खायला मिळते असे होऊन जात असे. 
                                                        मग सगळे वांगे भाजून झाले की मोठ्ठे पितळी भांडे गॅस किंवा शेगडीवर चढविले जाई. त्यात तेल घालून आधी शेंगदाणे तळून घेतले जात. नंतर जाड भरीताच्या हिरव्या मिरच्यांना मध्यभागी एक चीर पाडून त्यात थोडे मीठ भुरभुरले जात असे. मग ह्या मिरच्या सुद्धा तेलात तळून घेतल्या जात. आता फोडणी त्याच तेलात. फोडणी झाली की त्यात, आधी ठेचून ठेवलेला ठेचा घालायचा आणि छान तेल सुटे पर्यंत परतला जाई. आणि मग कांद्याची पाथ, बारीक चिरून ठेवलेली, ती सुद्धा चांगली परतून घ्यायची.  त्यानंतर त्यावर ठेचलेले वांगे, तळलेल्या मिरच्या आणि मीठ घालून सगळं छान मिसळून घेतले जाई. झाकण ठेवून एक छान वाफ काढली की भरीत खाण्यासाठी तय्यार!!! 
काही वेळा मिरच्या तशाच वेगळ्या ठेवल्या जातात, पण मग त्यांना आणि भरीतालाही छान चव येत नाही. त्या भरीतात मिसळल्याने त्या मिरच्यांची एक छान चव भरीतात उतरते आणि आणि मिरच्यांनाही वांग्यांचा छान स्वाद येतो!!! तळलेले शेंगदाणे सगळ्यांनाच आवडत असले तर भांड्यातच घातले जातात आणि तर प्रत्येकाला हवे तसे जो तो आपापल्या ताटात घेतो. मला मात्र एक खारे शेंगदाणे सोडले तर कुठल्याच प्रकारे शेंगदाणे आवडत नाहीत अगदी आजतागायत! 
                                                         तोपर्यंत एका बाजूला भाकरी, कांद्या-टोमॅटोची हिरवी मिरची घालून दह्यातील कोशिंबीर, एका मोठ्ठ्या वाडग्यात लोणचे, पाथीचा कांदा, मुळा, मुळ्याच्या पाल्याचा खुडा असं सगळं काय काय सुद्धा तय्यार असे . मग एक-एक पंगती बसत, आम्हाला पहिल्या पंगतीला टेबलवर जागा नाही मिळाली की आम्ही खालीच बसून जेवायलाही तय्यार असू या दिवशी. एरवी तर मम्मी शिवाय जेवायचंच नसे आम्हाला, या दिवशी मात्र या गोष्टीचे भानही नसे! कारण जेवायची घाईच तितकी असे!! या दिवशी दिवसातून २-३ वेळा भूक लागे तीही जेवणाचीच!!! बाकी दिवशी मधल्या भुकेला जेवणासाठी केलेले खायला सांगितले की जाम राग यायचा. एवढेच नाही, तर दुसऱ्या दिवशीही भरीत शिळे शिल्लक राहावे आणि दुसऱ्या दिवशीही तेच खायला मिळावे अशी मनात सुप्त आणि तीव्र इच्छा असे!!!
 ।। इति भरीत पुराणम् ।।
©आनंदी पाऊस
(घरातील गमती जमती)
१०डिसें२०१९







भरीताचे वांगे 




हिरव्या मिरच्या 







कोळश्यावर चालणारी 
लोखंडी शेगडी 


काड्यांवर वांगे भाजतांना 


गॅसवर जांभळे किंवा काळे वांगे भाजतांना 


भाजलेले वांगे 



भाजून सोललेले वांगे



बडगी आणि ठेचणी 
हे साधारणपणे फैजपूरच्या जत्रेत 
किंवा नवरात्रीच्या जत्रेत चांगले मिळते 


ही आमची लोखंडी ठेचणी 
तेव्हाची , अजून आहे . कदाचीत 
माझ्यापेक्षा वयाने मोठी असेल 😉



बडगीत ठेचा ठेचताना 


भाजलेले वांगे ठेचताना 


भाजलेले वांगे ठेचुन तयार 


छान स्वच्छ धुऊन बारीक कापलेली कांद्याची पाथ 


तय्यार भरीत 


टमाटम फुगलेली भाकरी 


गरमागरम कढी 


भरीत , भाकरी , दह्यातील  कोशिंबीर 


भरीत , बाजरीची भाकरी , मुळा ,
पाथीचा कांदा , हळदीचं लोणचं 


भरीत , पुरी , कढी , कांदा , लिंबु 
















Comments

  1. रजनी झोपेMarch 27, 2020 11:34 am

    Khup chhan tondala Pani aale

    ReplyDelete
    Replies
    1. 🤤😋💃मनःपूर्वक धन्यवाद !!!🙏

      Delete
    2. खूपच सुंदर
      माझी आवडती डिश😋

      Delete
  2. Nanda wagle

    Bharit bhakriche sachitra vernan khoop chan aagdi barik tips bharit tayyar zalewar basleli pangat mast

    Bharit bhakriche thali aashi sajli ki panch pakwan hi fike


    Badgi pahilendach pahili


    Khoop sunder lekh aasech pudhe chalu rahun mala nawin wachnes aawdel
    All the best

    ReplyDelete
    Replies
    1. लेखातून माझ्या आणि आमच्या कुटुंबाच्या गमती जमती तर सांगतेच आहे मी , पण सगळ्या खान्देशी परंपरा , सण , उत्सव , खाद्यसंस्कृती सह बाकीही सगळ्या गोष्टींची माहिती द्यायचा माझा प्रयत्न आहे 😄! मनःपूर्वक धन्यवाद , नेहमीच माझ्या लिखाणाला छान दाद देता तुम्ही !🙏😇

      Delete
  3. शैलजा चौधरीMarch 27, 2020 1:06 pm

    किती आठवते ग तुला
    जसे तसे वर्णन केल
    तोंडाला पाणी .सुटले
    मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. कसे माहित नाही , पण आठवते सगळे हे नक्की !🤩😇

      Delete
  4. A mouth watering article. इतकी वर्षं भरीत खात आहे पण त्याचा संपूर्ण प्रोसेस अगदी बारीक सारीक डिटेल्स सह, आज कळला. आम्हाला नुसतं खाऊन मट्ट करायला वेळ लागत नाही, पण त्या साठी केवढी तयारी करावी लागते आणी किती जणांना खपावं लागतं याची पूर्ण कल्पना तुझ्यामुळे आली. Description इतकं जिवंत आहे की वाचताना अगदी जिभेवर भरताची चव येतेच. शिवाय ही speciality खान्देश ची आहे त्यामुळे आमच्या माहितीत पण भर पडलो ते वेगळंच. बरोबरच्या फोटों मध्ये केळीच्या पानावर जे पदार्थ मांडले आहेत त्यात प्लास्टिक च्या वाटीत लाल रंगाचं काय आहे?
    एक मस्त टेस्टी लेख..... 👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. हा लेख आणि आमच्याकडचे भरीत एकदम टेस्टी आणि झणझणीत ! पण ते खरोखर चाखून बघितल्याशिवाय नाही कळणार ! कधीतरी पायधूळ झाडा आमच्याकडची , आणि चाखून बघा एकदा तरी !😆🤩😇😉

      Delete
  5. निलिमा झोपेMarch 27, 2020 1:49 pm

    Ka g etake chan lihiles ki pani sutle na tondala khupch sunder varan keles bharit v tyachi tumachi tayariche cha
    Ruchakar v zanzanitch aahe ha lekha ����

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याला भरीत हा एकच शब्द पुरेसा आहे तोंडाला पाणी सुटण्यासाठी ! 😆🤩😇

      Delete
  6. Eti bharti puranam 👌👌👍😋

    ReplyDelete
  7. Kharach ha lekh navapramane chavishta ani zhanzhanit
    Chan varnan ha nusta lekhch nahiter chan receipe sudha👌

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !!!🙏 आपण कळेल का?

      Delete
  8. पूजा पाटीलMarch 27, 2020 4:27 pm

    Abhinandan, khupach chan!!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !!!🙏🤩

      Delete
  9. Kharach khupach chhan ani agdi jasechya tase jashi tayyari karayche tashi. Khup chhan tondala pani
    sutale!!!😋

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं आहे. ... ईथे एक मोठ्ठी नदी वाहायला लागेल नक्कीच 🤤😋😉

      Delete
  10. Khup chhan varshali..warnan agadi perfect..

    ReplyDelete
  11. रामचरण रडेMarch 27, 2020 8:46 pm

    Yes ... after seeing my mouth was watering.... Now Those days will never come back... it is historical events .....

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏 !  आणि खूप खूप धन्यवाद😇 !! अगदी खरंय तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हा अगदी ऐतिहासिक कार्यक्रम झालाय आता

      Delete
  12. नीता महाजनMarch 27, 2020 9:39 pm

    अक्षरशः तोंडाला पाणी सुटले ग तुझा लेख वाचून.... गेली गं ती मजा आता... ��

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय  मजा नाही ..... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🤩

      Delete
  13. व्वा..मस्त भरीत पार्टी घडली..����
    हाॅस्टेलला येणारा भरीताचा डबा आणि पुरवून पुरवून आठवडाभर खाल्लेलं भरीत आजही आठवतंय.. तसं चविष्ट भरीत पुन्हा कधीच नाही खाल्लं. त्यासोबत घट्ट साईचं दही खायला आवडायचं मला..

    ReplyDelete
    Replies
    1. भरीताशी निगडित अनेक आठवणी आहेत . त्यापैकी  कधीही न विसरता येणारी ही आठवण🤩 . तू अगदी ते भरीत जास्त दिवस झाल्यावर थोडे आंबट होत असे , तरी आवडीने खायचीस 😆! भरीतावर अगदी निस्सीम प्रेम तुझे !😇 

      Delete
  14. मंदा चौधरीMarch 27, 2020 9:44 pm

    आणि तुला गच्चीवर घमेलीत काड्या म्हणजे तूरखाट्यावर भाजलेले वागी नाही आठवत

    ReplyDelete
    Replies
    1. अरे खरंच की , मी ही गम्मत विसरूनच गेले होते . हॅट्स ऑफ टु युअर मेमरी ! मनःपूर्वक धन्यवाद ह्या छान आणि भरीताच्या बाबतीतील एक खूप महत्वाची गोष्ट सांगितल्याबद्दल !😇😍🤩💃

      Delete
  15. सायलीMarch 28, 2020 7:37 am

    chhan lihile aahe !! ya lockdown madhe vachunach �� �� �� manayche

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक  धन्यवाद !!!

      Delete
  16. प्राजक्ता डोंगरेMarch 28, 2020 11:46 pm

    स्वादिष्ट अणि झणझणीत लेख
    Tya bharit partychi aathvan zali

    ReplyDelete
    Replies
    1. Yessssss खानदेशी झणझणीत!!
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😇

      Delete
  17. डॉ माया पाटीलMarch 29, 2020 6:51 am

    वा खूपच छान.... भरीताचं वर्णन ऐकून तोंडाला पाणी सुटलं......

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  18. Khupach chan lekh lihilas tai😋😋😋

    ReplyDelete
  19. स्वाती प्रभुणेMarch 30, 2020 8:56 pm

    मस्त लिहल आहेस तोंडाला��पाणी आलं वांग्याचे भरीत तुझे आई बाबा एकदा माझे सासू सासरे नागपूर येत होते स्टेशन ला घेऊन आले होते व मिरची चा खर्डा ते खूप होते व मी ते नागपूर ला खल्याचे आठवते

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोब्बर आठवणीत आहे तुमच्या सगळे😄 , मला वाटले विसरला असाल . छान वाटले 🤩. मनःपूर्वक धन्यवाद !🙏

      Delete
  20. मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीला भरिताची रेसिपी हवी होती व तू फोटोसकट आयते उत्तर दिलेस धन्यवाद
    नशिराबादला त्या दिवसात शुक्रवारी 5 नंतर 80% घरासमोर शेकोटी असायची व वांगे भाजले जायचे पूर्ण गल्ली मध्ये एकच सीन

    ReplyDelete
    Replies
    1. नशीबवान आहेस , एव्हढे सगळे टाईप करण्यातून सुटका झाली😆 , आता मला काही तरी बक्षीस दे त्याबद्दल😇 ! हो आणि तू म्हणतोस ते अगदी खरंय , एकच ओळ लिहिलेस पण पूर्ण चित्र डोळ्यासमोर आले . मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏😄

      Delete
  21. पुष्पांजलीApril 03, 2020 6:07 pm

    व्वा... आता खरंच खान्देशी भरीत खाण्याचा मोह होतोय. मी कधीच खाल्लेले नाही पण हे वर्णन ऐकून राहावत नाही. .....


    ReplyDelete
    Replies
    1. प्रश्नच नाही ! या  जन्माला येऊन खान्देशी भरीत खाल्ले की जन्माचे अगदी सार्थक होऊन जाते !🤩😍😆

      Delete
  22. किशोरी मातेकरApril 13, 2020 1:51 pm

    Ago bai kiti tasty bharit
    Kishor la khup awdte
    Picks kase milwte
    Khup sundar ahet clicks
    Anyway mast
    Netra sukhawle

    ReplyDelete
    Replies
    1. एव्हढ्या सगळ्या कौतुकाबद्दल खुप सारे धन्यवाद!! 🙏 😍😍

      Delete
  23. Bharit anavnya che varnnan khup chan kele ahe , bharit party zalya sarkh vattala, ani Jam pani sutla tondala.😋😋

    ReplyDelete
  24. लीला ताई वानखेडेSeptember 22, 2020 4:00 pm

    भरीत खूपच सुंदर झालेले
    आणि त्याला जोडून तुम्ही जे फोटोग्राफी टाकतात ना त्याच्यामुळे प्रात्यक्षिक दाखवल्या सारखा होतो आणि खूपच सुंदर भरताची टेस्ट सगळ्या पदार्थांपेक्षा वेगळी त्याला तोडच नाही
    जळगाव व खानदेश प्रसिद्ध च आहे भरता साठी आणि तुम्ही भरता ची रेसिपी पाठवून आणि वाढलेलं केळीचं पान बघून����������
    भरीत पार्टी सारखेच वाटते ��

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे धन्यवाद !!🙏🤩😇

      Delete
  25. खाऊ की वाचु... असा Lipsmacking Lekh झालाय.....I enjoyed through out while reading.
    Liked Making procedure,involved traditional ठेचणी and बडगी and shegadi
    I loved the combination arranged on banana leaf...ठेचा I never eat it's too spicy..but like bharit- bhakri

    ReplyDelete
    Replies
    1. ही खास खान्देशी पद्धत आहे , भरीत केल्यावर पान वाढण्याची ! हे सर्व कॉम्बिनेशन एकदम भारी लागते चवीला एव्हढेच नाही तर सगळे अतिशय आरोग्यवर्धक , कुठलाही पदार्थ बाधत नाही आणि कशानेच त्रास होत नाही .
      खूप खूप मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद !🙌🤩😇🙏

      Delete
  26. Amhi katyanvar bhajlelya vangyache bharit khaycho. Mastch ekdam n chulivar fidni dileli mg ky tyachi chav niralich. Sobat tondi lavayala मुळा, methichi bhaji, pawade, lonch ekdam mast bet jamun yaycha. Friend's sobat मळ्यात pn party kraychi. Majjach majja.khup chan athvni dilyas. Thank you.

    ReplyDelete
    Replies
    1. हो ग ! पण मला तर खूप वर्षात त्याची चव चाखायला मिळाली नाहीये ! आठवणी आणि स्वप्न , यातच ही चव चाखायला मिळते !
      खूप खूप धन्यवाद !

      Delete
  27. एकदम मस्त. Katyanvar भाजलेल्या वांग्याचे भरीत tr एकदम छान n तोंडी लावायला kadhi, मेथीची भाजी, मुळा n many more things. Ahhha मस्तच n सोबत कळण्याची भाकरी असली tr मजा काही औरच👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप मनःपूर्वक धन्यवाद!!

      Delete
  28. Dipali WaghuldeMarch 05, 2021 9:10 pm

    एकदम मस्त. Katyanvar भाजलेल्या वांग्याचे भरीत tr एकदम छान n तोंडी लावायला kadhi, मेथीची भाजी, मुळा n many more things. Ahhha मस्तच n सोबत कळण्याची भाकरी असली tr मजा काही औरच����

    ReplyDelete
    Replies
    1. हो ग ! पण मला तर खूप वर्षात त्याची चव चाखायला मिळाली नाहीये ! आठवणी आणि स्वप्न , यातच ही चव चाखायला मिळते !
      खूप खूप धन्यवाद !😍🤩🤩

      Delete
  29. सुचिता कामतDecember 01, 2021 9:21 am

    खूप छान आणि माझा ही आवडी चा बेत . सकाळी वाचून भूक लागली. नक्की बनवणार ह्या पद्धतीने. मस्त

    ReplyDelete
  30. Very nicely penned down, Bharit Bhakri chi bhuk lagli ekdum wachun.

    ReplyDelete
  31. मनीष चीरमाडेDecember 01, 2021 6:25 pm

    ताई मस्तच की... वाचता वाचता लिखाण इतके छान म्हणया पेक्षा चविष्ट की तोंडात चव आली....��
    आपल्या जुन्या घराजवळ भरायचा आठवडे बाजार आता तिथं जुने बीजे मार्केट आहे....
    या जळगाव ला आले की भारितचीच मेजवानी करूया...

    ReplyDelete
  32. Wa khupach chan tondala pani sutale

    ReplyDelete
  33. खुप छान तोंडाला पाणी सुटले😋😋👌👌

    ReplyDelete
  34. प्रा वैशाली चौधरीFebruary 18, 2022 12:10 pm

    मस्त भरीत����
    तोंडाला पाणी सुटले ����

    ReplyDelete
  35. लीला ताई वानखेडेNovember 25, 2022 3:46 pm

    ताई,🙋
    भरीत खूपच सुंदर झालं अगदी
    भरीत पार्टी त बसले की काय भरीत खायला अशी फिलिंग आली आणि खूप टेस्टी झाली भारताची रेसिपी खूप टेस्टी झाली झणझणीत आणि छान जळगावला एकदा जायलाच पाहिजे खायला👌👌👏👏


    लीलाताई वानखेडे 🙏

    ReplyDelete
  36. भारती फेगडेNovember 25, 2022 6:22 pm

    छानच वर्णन!! मी तर शेकोटी आईबाबांसोबत वांगे भाजायची,ती मजा आणखीच वेगळी अनुभवली आहे. त्याची प्रकर्षाने आठवण झाली.

    ReplyDelete
  37. व पु होले सरNovember 26, 2022 10:07 am

    दुस-या दिवशीचं शिळं भरीत खायची मजा काही औरच असते.👌👌👌👌👌👌👌फोटो अतिशय यथायोग्य व सुंदर🙏🙏तोंडाला पाणी सुटले.

    ReplyDelete
  38. आहा हा...खमंग लेख थंडीत सकाळी सकाळी वाचताना खूप भारी वाटतोय...सारेच क्रृती व प्र. चि. मस्त टिपलेत...पारंपरीक शेगडी ते बडगी खूप आवडल्या..तुम्ही केलेल्या भरीतचे अनेक combination आवडले.
    एकदा‌ कांँलेजच्या लंच ब्रेकमध्ये पाँट लकसाठी भरीत केलेलं ..जाम मजा आलेली..खानदेशी वांगं never tried
    पुन्हा ही 'खानदेशी'भरीत भेट' लवकरच होवो..

    ReplyDelete
  39. व्वा! मस्तच! भरताची इत्थंभूत कृती सगळ्यांच्याच परिचयाची पण शब्द न शब्द वाचत रहावासा वाटला. वाचत असतांना तोंडाला पाणी सुटले ते वेगळेच 😋
    त्या वेळेस आई शेगडीवर किंवा घमेलीत कुठूनतरी काड्या आणून त्यावर वांगी भाजायची, त्या वेळचा सुंगंध पण जाणवला. बऱ्याचदा आम्ही फक्त भाजलेले वांगे पण मीठ टाकून खायचो आणि आई पुऱ्या तळतांना मस्त लाल लाल कडक पुरी करून त्यावर न तळलेले भरीत पण द्यायची . ते काय अप्रतिम लागायचे .
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे

    ReplyDelete
  40. रेवती डींगरेNovember 30, 2022 6:38 pm

    भरीत मेजवानी फारच आवडली.खास प्रकार आहे.कष्टही आहेत.भरीत पुराण रुचकर आहेच शिवाय मिष्टान्नाला लाजवेल असेच
    आहे.वर्णनही मुद्देसूद व खमंग👌👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...