Skip to main content

मिरवणुका (गॅलरीतील गमती जमती)

मिरवणुका 
(गॅलरीतील गमती जमती)


                                                                    गच्ची प्रमाणे गॅलरी सुद्धा खूप लाडकी होती आमची ! एकतर इमारतीच्या तीनही बाजूने असल्याने कधी कधी भांडणं झाल्यावर , एकमेकांना पकडण्यासाठी , तर कधी खेळ म्हणून , जोरात धावाधावी करता येत असे . दुसरे म्हणजे गॅलरीची सगळ्यात मागची बाजू , मुख्य रस्त्याच्या बाजूने आहे . सगळ्यात मागची म्हटले , कारण घराचा प्रवेश जिन्याच्या बाजूने , त्या संदर्भात ही सगळ्यात मागची बाजू येते . तर आज या लेखात , मागच्या बाजूच्या गॅलरीतील गमती जमती सांगणार आहे . 
                                                                    बाहेरून थोडाही आवाज आला की आम्ही सगळे लगेच गॅलरीत धाव घेत असू . तेव्हा बऱ्याच प्रकारच्या मिरवणुका असत आणि त्या बघण्यासारख्या सुद्धा असत . एक प्रकारचे मनोरंजनच म्हटले तरी चालेल . हा शहरातील बऱ्यापैकी मुख्य रस्ता होता तेव्हा .  त्यामुळे  जवळ-जवळ सगळ्याच मिरवणुका या रस्त्यावरून जात असत . मग आम्ही छान , आमच्या या गॅलरीत उभे राहून किंवा बाकावर बसून हे सगळे बघत असू . तर या लेखात या सगळ्या निरनिराळ्या मिरवणुकांच्या गमती सांगणार आहे . 
                                                                    एक म्हणजे बाप्पाच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या बऱ्याचशा मिरवणूका , आमच्या या रस्त्यावरूनच जात असत . मग हे दोन अख्खे दिवस आमचा मुक्काम गॅलरीतच असे . छान वेगवेगळ्या आकाराचे , वेगवेगळ्या रूपातील बाप्पा बघायला मिळत . काही वेळा बाप्पा सोबत सजावटीतले देखावे सुद्धा सोबत असत . काही बाप्पा  बरोबर लेझीम पथक असे , काही वेळा ढोल ताशे , काही वेळा बँड, काही वेळा लोक ढोल ताश्याच्या तालावर नाचत ,अशा एक ना अनेक गमती जमती ! एकंदरीतच हे सगळे बघायला जाम मज्जा येत असे . हे दोन अख्खे दिवस छान मनोरंजन होत असे आणि तेही विनामूल्य ! सोबत प्रत्येक बाप्पाला नमस्कार करून , खूप सारे पुण्य मिळे ते वेगळेच !!
                                                                                   ------------------------------------------------------------
                                                                   दुसरे म्हणजे लग्नसराईच्या मोसमात लग्नाच्या दोन्ही प्रकारच्या वराती . एक म्हणजे नवरदेव घोड्यावर बसून आणि फारच तुरळक एखाद्या चार चाकीत बसून जातांना आणि दुसरी म्हणजे बिदाई नंतरची मिरवणूक यात दोन्ही असत नवरदेव आणि नवरी ! मग या वरातींसोबत वेगवेगळे बँड पथक असत . त्या लोकांचे एकसारख्या रंगाचे आणि एक सारख्या पद्धतीचे पोशाख , त्यांचे ते सुरेल वाजविणे , बघायला आणि ऐकायलाही छान वाटे . या सगळ्या वाजवण्याच्या तालावर किंवा बेतालही लोक नाचत . कधी कधी ही नाचणारी मंडळी नवरदेवालाही घोड्यावरून खाली उतरवून नाचायला भाग पाडत . कधी कधी नवरदेव ज्या घोड्यावर बसलेला असे , त्या घोड्यालाहीची नीट , पद्धतशीरपणे  शिक्षण दिलेले असे . मग हा घोडाच छान लयीत आणि तालात नाचे , खूपच भारी वाटे हे बघायला आणि आश्चर्य ही वाटे खूप ! लग्नघरातील जेष्ठ मंडळी खिशातून कोऱ्या नोटा काढून या सगळ्या नाचणाऱ्या आणि नवरदेवावरून ओवाळून बॅंडवाल्या लोकांना बक्षीस म्हणून देत . या सगळ्यांच्या मागे वऱ्हाडी लोक , बायका , पुरुष , मूल ,मुली सगळेच असत . मग या सगळ्यांचे छान छान मनमोहक , उत्फुल्ल , झळाळत्या रंगाचे पोशाख बघायला सुद्धा छान वाटत असे . 
                                                             चौधरी सदनच्या या मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन मोठ्ठे वृक्ष होते . चौधरी सदन ही अक्षर लिहिली आहेत त्या बाजूला एक कडुनिंबाचे झाड आणि चौधरी सदन आणि त्याच्या लगतची इमारत यांच्या सामायिक रेषेत थोडे पुढे एक पिंपळाचे झाड होते . अजून एक पिंपळाचे झाड बोथरा इमारती समोर सुद्धा होते . अशी ओळीने तीन मोठाली झाड होती ही . बहुतेक लग्न उन्हाळ्यात असत .  आमच्या भागात भयंकर ऊन . या तिन्ही झाडांची छान दाट , गर्द सावली पडे . मग या सावलीचा फायदा घेत बँड वाले या सावलीत थांबत आणि दणदणीत बँड वाजवत आणि नाचणारे सुद्धा मनसोक्त नाचत असत  आणि वऱ्हाडी मंडळी सुद्धा या सावलीत थांबत . त्यामुळे आम्हाला हे सगळे बघण्याची छान मजा लुटता येत असे !
                                                                                   ----------------------------------------------------------------
                                                            पंधरा ऑगस्ट , सव्वीस  जानेवारी आणि एक मे हे तीन दिवस . दिल्लीला जसे वेगवेगळे देखावे , बँड आणि कवायतीच्या मिरवणुका असतात तशाच मिरवणुका असत . मग या सगळ्या मिरवणुका सुद्धा आमच्या या रस्त्यावरून जात . आम्हाला हे सगळे गॅलरीतून बघायची आयतीच संधी मिळे . वेगवेगळ्या शाळांच्या प्रभात फेऱ्या सुद्धा निघत . सगळी मुलं छान एकसारखा आणि स्वच्छ  गणवेश घातलेली . एका विशिष्ट तालात आणि लयीत चालत , त्यांच्यापैकीच काही मुलांनी वाजवलेल्या बँडच्या तालावर ! सोबत लेझीम पथक सुद्धा असत . फारच भारी वाटे हे सगळे बघायला . थोडे मोठे झाल्यावर आम्ही सुद्धा याचा भाग झालेलो काही वेळा . मग अशा या दिवशी सुद्धा बराच वेळ आमचा गॅलरीतच जात असे . 
                                                                                   --------------------------------------------------------------------
                                                              अजून एक जरा वेगळाच प्रकार , बऱ्याच लोकांना याबद्दल फारशी माहितीही नसेल . त्याकाळी जैन मंडळींच्या वेगवेगळ्या कारणांनी मिरवणुका निघत . सगळे अगदी पांढरे शुभ्र कपडे घातलेले आणि तोंडावर सुद्धा पांढरे शुभ्र कापड बांधलेले . एक म्हणजे कुणी दीक्षा घेतली तर त्यांची मिरवणूक काढली जात असे . काही वेळा कुणी एकवीस दिवस , सव्वा  महिना असे निर्जळी उपवास करत . मग यांच्या सुद्धा मिरवणुका काढल्या जात . अजून एक म्हणजे त्यांचा क्षमायाचना दिवस असतो या दिवशी , कधी त्यांचे गुरु आलेत तर अशा काही कारणांनी त्यांच्या या मिरवणुका निघत . बाकी मिरवणुका म्हणजे झळाळते रंग , गडबड गोंधळ आणि या मिरवणुका अगदी शांत आणि पांढऱ्या शुभ्र रंगाच्या ! एका वेगळ्याच प्रकारे डोळ्यांना , मनाला एक छान शांत जाणीव देणाऱ्या !
                                                                                   -----------------------------------------------------------------------
                                                                अजून एक म्हणजे काही वेळा अंत्ययात्रा सुद्धा जात या रस्त्यावरून . पण या सगळ्याची मला जाम भीती वाटायची , अजून सुद्धा एक विचित्र प्रकारची अस्वस्थता वाटते मला , अंतयात्रा पहिली की . पण तरी तेव्हा सगळ्यांच्या सोबतीने हे सगळे बघितले जाई . अंत्ययात्रा दिसली की नमस्कार करावा , हे कधी , कोणी सांगितले आठवत नाही . पण ते आजतागायत मनात , मेंदूत पुरते भिनलेले आहे . आज सुद्धा अंत्ययात्रा दिसली की नकळत आपोआप हात जोडले जातात आणि नमस्कार केला जातो .
                                                                                  ------------------------------------------------------------------------
                                                                 चौधरी सदनच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर दोन निरनिराळ्या बँक होत्या . काही वेळा या बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसत . मग त्या मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून ते लोक संप करत . मुख्य रस्त्याच्या बाजूनेच बॅंकचे प्रवेशद्वार होते . मग ते त्या बाजूने बाहेर येत आणि बराच वेळ त्यांची घोषणा बाजी चाले . त्यातील शब्दच कळत नसत बऱ्याच वेळा  आणि कळलेले काही आठवत नाही फारसे आता . फक्त एकच आठवते घोषणा त्यांची , एक जण म्हणे "हम सब" , आणि मग बाकीचे सगळे एकत्र म्हणत "एक हैं ".  सुरवातीला मला हे शब्द सुद्धा नीट कळत नव्हते . नंतर बऱ्याच काळाने समजू लागले आणि आज फक्त तेव्हढेच आठवते आहे !
                                                                                  ------------------------------------------------------------------------
                                                                     अजून एक छान , गोड आणि अतिशय आवडणारा भाग . तो म्हणजे त्या काळी शाळांच्या एक दिवसीय सहली जात . मुलांच्या वयोगटाप्रमाणे लांब किंवा जवळ ते ठरत असे साधारणपणे . म्हणजे लहान मुलांना जवळपासच नेले जाई आणि जरा मोठ्या मुलांना थोडे लांब . याला सुद्धा कारण होते . जिथे सहलीसाठी जायचे ठरलेले असे तिथे पोहोचायला कुठल्याही वाहनांची मदत घेतली जात नसे . मग सगळी मुलं तीनतीन किंवा चारचार च्या रांगा करून एकमेकांचे हात धरून चालत , अगदी शिस्तीत . रहदारीच्या बाजूने शिक्षक चालत असत , या मुलांची वाहनांपासून सुरक्षितता बघत . अगदी समोरच्या मुलांच्या हातात शाळेच्या नावाचा कापडी फलक असे . हा फलक दोन्ही टोकांना दोन लाकडी काठ्यांमध्ये अडकवलेला असे . या दोन काठ्या दोन मुलं धरत असत . पण हा फलक पकडायला सुद्धा सगळ्या मुलांत चढाओढ चाले . मग बऱ्याचदा थोडा थोडा वेळ प्रत्येकाला धरायची संधी दिली  जात असे आळीपाळीने ! फारच छान वाटे हे सगळे बघायला सुद्धा . चौधरी सदनच्या आसपास बऱ्याच शाळा होत्या . त्यामुळे आमच्या या लाडक्या गॅलरीतून ही सुद्धा गम्मत दिसे . आमच्या शाळेची सुद्धा अशी एक दिवसीय सहल जात असे . आम्ही अगदी न चुकता त्यात सामील होत असू . पण आमच्या शाळेतून ठरल्या ठिकाणी जाण्याचा रस्ता मात्र चौधरी सदनच्या समोरच्या रस्त्यावरून नव्हता . त्यामुळे आम्हाला असे सहलीला जातांना आमच्या घराच्या मंडळींना बघता येत नसे . पण आम्ही ज्या रस्त्याने चालत जात असू त्या रस्त्यावर ज्यांची घर होती ती लोकं मात्र आम्हाला बघायला त्यांच्या त्यांच्या  गॅलरीत किंवा घराबाहेर येऊन आमची गम्मत बघत असत !
                                                                                 ------------------------------------------------------------------------

आनंदी पाऊस 
(गॅलरीतील गमती जमती )
१३ सप्टेंबर २०१९





बाप्पाच्या मिरवणुका 



बाप्पाच्या मिरवणुका 



लग्नाची  मिरवणुक



लग्नाची मिरवणूक 



१५ ऑगस्ट / २६ जानेवारी शाळेच्या 
मुलांच्या मिरवणुक


जैन साध्वीची 
मिरवणूक 


शाळेची सहल 





                                            
                                                                  
                     
                                                      

Comments

  1. Wa mastach 👌👍
    Vividh ,vegvegala miravanuk kharach chan varnan
    Tyatun bhetnara aanad, usah vegalach

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद ! अगदी न चुकता प्रत्येक लेख वाचतेस आणि न चुकता अभिप्राय देतेस !! 

      Delete
  2. किशोरी मातेकरFebruary 08, 2020 12:22 pm

    फोटो छान,!
    लेखनही छान!

    ReplyDelete
    Replies
    1. तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत ! आणि खूप खूप मनापासून धन्यवाद !🙏🙏

      Delete
  3. निलिमा झोपेFebruary 08, 2020 8:42 pm

    wa mast chan aathavani lihilya aahet ��������

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद !🙏 खूप सारे प्रेम मामी!!!😍❤

      Delete
  4. अप्रतीम निवेदिकरण

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद आणि प्रेम दा  !❤😍💃🤩

      Delete
  5. पुष्पांजलीFebruary 16, 2020 6:13 pm

    छानच. आमचे बैठे घर आणि तेही गावच्या बाहेर असल्यामुळे ही गम्मत अनुभवता आलीच नाही. पण गणपतीच्या मिरवणुकी वेळी आम्ही ज्या मैत्रिणींचे घर गावात मुख्य रस्त्यावर आहे व ज्याला गॅलरी आहे तिच्याकडे जावून गॅलरीत बसत असू... त्यावेळी तिचा फार हेवा वाटायचा. पण गॅलरीत बसून जीवनाचे हे अनेक रंग बघणे म्हणजे एक जीवन शाळाच खरे तर....

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच , ही गॅलरी म्हणजे एक अगदी झळाळत्या रंगांची रंगीत जीवन शाळाच , अगदी अपरिमित आनंद देणारी !!🤩😍😇

      Delete
  6. दिपाली चौधरीMarch 04, 2020 11:55 am

    मस्त आहे लेखातील मिरवणुका

    ReplyDelete
  7. ज्योती किरंगेMarch 05, 2020 2:26 pm

    वाह....छानच लिहिलय
    रथ सप्तमी ला पण असायची ना एक मिरवणूक
    पण ती इकडून जायची का त्ते माहीत नाही..

    ReplyDelete
    Replies
    1. नाही नाही , ती मिरवणूक इकडून जात नसे , ती तिकडे जुन्या गावात ना , तिकडे जाऊन बघावी लागे . 

      Delete
  8. मंदा चौधरीMarch 05, 2020 2:27 pm

    खुपच मस्त आहे मिरवणूका

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच भारीच असत त्या मिरवणुका !😍😍

      Delete
  9. स्मिता चौधरी खडकेMarch 05, 2020 2:27 pm

    Chhan lihilay������

    ReplyDelete
  10. मनिषा कोल्हेMarch 05, 2020 2:29 pm

    सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या व अनुभवायला मिळाल्या

    ReplyDelete
  11. एल झेड कोल्हेMarch 11, 2020 6:47 pm

    गच्चीत बसून अनेक मिरवणूका, वराती, गर्दी त न जाता बघितल्यात नवरात्र ते दुसऱ्या पर्यंत वहन निघतात तसेच मोहरमचा मानवी वाघ गॅलरीतून पाहिले नाही का

    ReplyDelete
    Replies
    1. मोहरम बद्दलचे काही आठवत ,  नवरात्रीच्या वहनांबद्दल नक्कीच आठवतेय , पण  देवीच्या मंदीराजवळ पाहिलेले , पण त्याबद्दल पण नक्कीच लिहेन अगदी सविस्तर , मनःपूर्वक धन्यवाद !🙏😇

      Delete
  12. खूपच मोठ्ठा bolg आहे. अर्थात इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका असल्यामुळे description वाढणारच. तुमची एवढी मस्त मोठी बाल्कनी होती अणि घर पण ekdum हमरस्त्यावर मग काय तुमची मज्जाच होती. शिवाय सगळ्या प्रकारच्या मिरवणुका नेमक्या तिथूनच pass व्हायच्या, त्यामुळे तुम्हाला छान हुकुमी view मिळायचा. मी लहानपणी कायम तळमजल्यावर राहिलो असल्या मुळे ज्या मित्रांची अशी हमरस्त्यावर घरे असायची ' त्यांची खूप असूया वाटायची😢😢. तू ब्लॉग madhe mention केलेल्या saglya मिरवणुका मी पण काय, सगळ्यानीच पाहिल्या आहेत, पण त्या रस्त्यावरूनच. ब्लॉग बरोबर include केलेले photoes छान आहेत. एका फोटोत तर तू वरातीत नाचताना दिसते आहेस.. 😉😉. एकंदरीत छानच लेख आहे. बहुतेक सगळ्या मिरवणुका to cover केल्या आहेतच. शाळेतल्या सहलीची रांग ekdum appeal झाली, कारण आम्ही पण असेच जायचो सहलीला. Keep it up....... 👍👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. खरं तर ब्लॉग  मोठ्ठा नाहीये , तुम्हाला असे  का वाटले 🤨? असो . सगळा ब्लॉग  प्रत्येक मुद्द्यावर अभिप्राय दिलात , मनःपूर्वक  धन्यवाद 🙏🙏🤩!!!

      Delete
  13. Chaudhri Sadanchya sarv aathavi tu chan v savistar lihit aste khup sunder varanan pan pan dolya samor jase aamhich pahat aahot te sarv ase vatate
    Miravnuki mag bappachya, school ,lagnavhya pahayla aanad yeto aamhi pan pahaycho savdyala v lagnanatar Andheri chya gylari tun pan

    ReplyDelete
    Replies
    1. खरय पूर्वीच्या मिरवणुका म्हणजे निखळ आनंद असे, आता तसे राहिले नाही. कसलीही मिरवणुक असो, अगदी नको होवुन जाते.... असो
      मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺ 😇

      Delete
  14. ��Miravnuk subject warpann tu etaka lihu shaktes kasa suchata tulalihiyala�� khup mast zalay lekh❣️junya aathvani tajhya zalya school chya❤️...

    ReplyDelete
    Replies
    1. खुप सारे सप्रेम धन्यवाद 😍 😇!

      Delete
  15. Photo hi mast & lekha hi chan ahe ��

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  16. अप्रतिमच!!
    आगाशीतून पाहणा-या व्यक्तींच्या चेहर्यावरचा आनंद, सामाजिक-सांस्कृतिक बांधिलकी जपणारी different age group of people and सर्व सणांचे जल्लोष
    असा "colourful urban fabric" अप्रतिम रेखाटलाय. This perspective take us as'time machine' to my child hood time where we had used to see same जल्लोष near सोन्या मारुती and दत्त चौक area.
    Mesmerized..

    ReplyDelete
    Replies
    1. खुप सुंदर अभिप्राय! I will be waiting for, खुप खुप आनंद झाला मला, सप्रेम धन्यवाद 😍 😇

      Delete
    2. खुप सुंदर अभिप्राय! I will be waiting for, खुप खुप आनंद झाला मला, सप्रेम धन्यवाद 😍 😇

      Delete
  17. मला वाटत ..एक तू विसरली .. पुढे एक मुलगा. डफड वाजाचा आणि मागे .. लहान चाक लावलेला ... दोघं बाजूंनी सिनेमाचं. नाव लिहले ला. बोर्ड लोटत असलेला मुलगा.... त्याचा उल्लेख नाही

    ReplyDelete
    Replies
    1. हो ह्याचा उल्लेख नाही केलाय मी यात . पण हे फरक क्वचित पाहिल्याचे आठवतेय मला . पण धन्यवाद ह्याची आठवण करून दिल्याबद्दल ! 🙏🙏

      Delete
  18. Wow very nice. आमच घर आत असल्याने आम्ही दुसर्‍याच्या ओट्यावर जाऊन या सगळ्या मिरवणुका बघायचो अणि comments पन pass करायचो. खूप मज्जा यायची.

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हा ! ही वेगळीच धमाल तुम्ही अनुभवलेली . आम्ही असले काही केले नाही आणि केले असते तरी काही उपयोग नव्हता कारण इतक्या वरून आम्ही काहीही बोललो तर कुणालाच ऐकू गेले नसते . धन्यवाद !😆😆🙏

      Delete
  19. रेवती डींगरेAugust 16, 2022 12:39 pm

    खूप आनंद वाटला.हा एक समृध्द करणारा अनुभव आहे.तुझे स्मरण रंजन अप्रतीम. 👌

    ReplyDelete
  20. मला पण खूप आनंद झाला, तुमचा अभिप्राय वाचून! खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद! 😍🤩

    ReplyDelete
  21. मागची बाल्कनी ,त्या बाल्कनीतून दिसणारा मागचा रस्ता आणी मिरवणुकीचे विविध perspectives & प्रसंग आपल्या आठवणीतुन भारीच visualise होतोय.....कसत ना!!😁 १ बिल्डिंग element म्हणजे बाल्कनी त्यातून मिळणारा anek arieal views... ती गर्द जमाव व मज्जा छान लिहलाय.
    लहानपणी असेच मिरवणुका पाहयला गोरेवाडा परिसर नवी पेठ कधीकधी दत्तचौकात पाहिलेल आठवतय......लहानपणीची आठवण आली.😍.

    ReplyDelete
    Replies
    1. खरय ही बाल्कनी /गॅलरी सगळ्यात महत्वाचा भाग होता आणि अजूनही माझ्यासाठी आहे. आता छोटीशी बाल्कनी आहे माझ्या घराला, पण मी छान रमते तिथे!
      खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद 🙏 ✨ 💫

      Delete
  22. लीला गाजरेAugust 18, 2022 8:11 am

    👌👌👍😄 तु खरचा कमाल आहे वर्षा !Varsha The Great ! खरच नेहमीच आनंदी पाऊस पडत असतो तुझ्या दारात,गॕलरीत .बागेत .सदा हरीत .खूपच छान वर्णन केलाय मिरवणूकीचे सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या प्रसंगाचे प्रसंगानुरूप वर्णन केले आहे .क्षणभर असं वाटलं की तुझ्या बरोबर मी पण तुझ्या गॕलरीत मिररवणूक बघायला ऊभी आहे .खूप छान ,अभिनंदन .आणि धन्यवाद .असे वेगवेगळ्या प्रसंगाचे वर्णन,माहिती वाचायला मिळते .👍👍💐💐🤝👏👏👏😄

    ReplyDelete
    Replies
    1. काकु खूप खूप खूप आनंदी धन्यवाद! तुमची कौतुकाची थाप खूप हवीहवीशी... त्यातून खूप प्रोत्साहन मिळते अणि पुढील लिखाण करण्यासाठी हुरूप येतो!!! 😍💫🤩

      Delete
  23. मला आमची लहानपणच्या मिरवणुकींची आठवण आली. आमचे घर खालीच असल्याने कोणत्याही वाजंत्रीचा आवाज आला की आम्ही घरातून बाहेर धावत जायचो. गणपती नवरात्रीच्या मिरवणुकींमधे आम्हीपण सामील व्हायचो.

    ReplyDelete
    Replies
    1. खरय, आम्ही सुद्धा.... पण हल्ली असे झालेय की बाहेर अगदी कितीही मोठा आवाज आला, तरी कुणालाच काही फरक पडत नाही..... असो
      आनंदी धन्यवाद 🙏

      Delete
  24. ,weg wegle mirawnuka shab chitrach doliyasamor ubhe rahate wachtana
    Lagnachi warat khoopch chan pics 👌😊👍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद काकु 🤩

      Delete
  25. गुलाब पाटील सरSeptember 29, 2023 6:50 am

    बाहेर कुठेही न जाता मिरवणूका बघायला मिळाल्या. अतिशय सुंदर लेख. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आनंद द्विगुणीत झाला.

    ReplyDelete
  26. नरेंद्र नंदेSeptember 29, 2023 6:51 am

    सुंदर, लेखनशैली छान आहे 😊👌सगळे डोळ्यासमोर उभे राहते 👍

    ReplyDelete
  27. रघुदास गर्गेSeptember 29, 2023 11:15 am

    खूप चांगले हितगुज
    शब्दांकीत केले आहे.
    वाचन करताना प्रसंग
    डोळ्यासमोर उभा राहातो.

    ReplyDelete
  28. स्वाती चौधरीSeptember 29, 2023 1:56 pm

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या मस्त

    ReplyDelete
  29. मंजुषा चौधरीSeptember 29, 2023 1:57 pm

    मस्त सगळे डोळ्यासमोर उभे राहिले चित्र ❤️😝❤️

    ReplyDelete
  30. डॉ सुनील पुरीSeptember 29, 2023 2:21 pm

    गॅलरी तील गमती जमती फारच छान आहेत चौधरी सदन पाहण्याची इच्छा होते आहे 🙏

    ReplyDelete
  31. Mast majja aali gallery madhun baghatana, mazya pan junya athawani taajya zalya

    ReplyDelete
  32. रेखा अत्तरदेSeptember 29, 2023 6:46 pm

    आठवणी ताज्पा झाल्या 🤗🤗😊👍🏻🎊🥰🥰👌👌

    ReplyDelete
  33. मंदा चौधरीSeptember 29, 2023 10:19 pm

    सगळ्याच मिरवणूका .पण तरी एक मिरवणूक राहिली ती म्हणजे दसरा गुजराथी लोकांची टिपरी नाचाची गरबा .बाकी सर्व मिरवणूकाचे वर्णन मस्त.सगळ परत दिसायला लागल्या मिरवणूका .

    ReplyDelete
  34. Balcony हा. माझाही आवडता बिल्डिंग element..त्यातून दिसणारी मिरवणूक,जल्लोष,नृत्ये,ढोल ताशाचा ताल-नाद व इतरत्र "activity mapping" लेखातून ,lively वर्णिले आहे.ह्या activity mapping चा माला उपयोग होईल डिजाइन्समध्ये- संजिता

    ReplyDelete
  35. Balcony हा. माझाही आवडता बिल्डिंग element..त्यातून दिसणारी मिरवणूक,जल्लोष,नृत्ये,ढोल ताशाचा ताल-नाद व इतरत्र "activity mapping" लेखातून ,lively वर्णिले आहे.ह्या activity mapping चा माला उपयोग होईल डिजाइन्समध्ये- संजिता

    ReplyDelete
  36. सुनिता पाचपांडेOctober 01, 2023 4:17 pm

    Khupach chhan

    ReplyDelete
  37. खूप छान वर्णन, आपणच बघत आहोत मिरवणूका असे वाटते

    ReplyDelete
  38. खरच , लहानपणी आमचेही असेच होते. कुठूनतरी बॅंडचा, मिरवणुकीचा , विमानाचा आवाज आला की ते पहाण्यासाठी धावत सुटायचो. एवढेच बायकांच्या भांडायचा आवाज आलो ते पण पहायला जायचो. लहानपणची आठवण जागृत झाली.
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete
  39. प्रतिभा अमृतेOctober 30, 2023 2:28 pm

    गँलरीतील गमती जमती वाचल्या. खूप मजा वाटली. (अंतयात्रेची मिरवणूक सोडून) आम्ही पुण्याला काकांकडे जात असू त्यांचे घर वरच्या मजल्यावर आणि लक्ष्मी रोडला असल्याने अश्या वराती, विशेषतः बाप्पा विसर्जनाची मिरवणूक बघायला खूप मजा यायची. 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...