Skip to main content

गच्चीवरून खाली उतरतांना......



गच्चीवरून खाली उतरतांना......
                                           

                                              गेले जवळ जवळ पाच महिने झाले , गच्चीवर जाम धमाल चाललीय . इतर गमती जमती २ हा सध्यातरी शेवटचा लेख , गच्चीवरील गमतीजमती या भागातील . आता वेळ आलीय गच्चीवरून खालच्या मजल्यावर म्हणजे घराच्या मजल्यावर उतरण्याची . हा मजला म्हणजे तेव्हाचा  तिसरा मजला  आणि आताचा  दुसरा मजला , कारण तेव्हा 'ग्राउंड फ्लोअर' ही संकल्पना नव्हती . एकदम पहिला मजला , दुसरा मजला वगैरे वगैरे . म्हणून तेव्हाचा तिसरा मजला . तेव्हा या मजल्या विषयी थोडी माहिती . आधीच्या एका लेखात उल्लेख केल्या प्रमाणे या इमारतीला तीन बाजुंनी रस्ते आहेत आणि एक बाजू , बाजूच्या इमारतीची सामायिक बाजू आहे . तर या रस्ते असलेल्या तीनही बाजूने एक सलग इंग्रजी अक्षर सी आकाराची संपूर्ण इमारतीला वेढणारी एक सलग गॅलरी आहे . घराच्या वेगवेगळ्या खोल्यातून एकूण आठ दरवाजे या गॅलरीत उघडतात . 
                                         या घरात सुरवातीला , म्हणजे मी जवळ जवळ पाच वर्षांची होईपर्यंत माझे बाबा (आजोबा) आणि लहान बाबा(त्यांचे धाकटे बंधू) असे दोघांचे मिळून एकत्र कुटुंब राहत असे . फक्त लहान आई आणि लहान बाबा आमच्या मूळ गावी राहत असत . म्हणजे घरात एकूण आई-बाबा , त्यांची तीन मुलं - दादा , पप्पा , नाना आणि लहान बाबांची चार मुलं म्हणजे चार काका आणि दोन मुली म्हणजे दोन आत्या . मग क्रमाक्रमाने एकेकाची लग्न झालीत . दोन्ही आत्या सासरी गेल्या आणि चार सुना, एक एक करत घरात येत गेल्या आणि आम्हा नातवंडांचे जन्म . 
                                        नंतर कालांतराने दोन्ही बाबा वेगळे झाले आणि अर्थातच घराचे दोन भाग झाले . तर काही लेखांमध्ये संपूर्ण घराचा म्हणजे एकत्र असतानाचा उल्लेख येईल तर काही लेखांमध्ये वेगळे झाल्या नंतरचा उल्लेख येईल . पुढचे सगळे लेख समजण्यास मदत व्हावी म्हणून हा सगळा प्रपंच . 
                                          गच्चीवरून जीन्याने खाली उतरले की समोरच थोडे बाजूला घराचा प्रवेश आहे . पण इथेही मी आधी मागच्या गॅलरीत नेणार आहे तुम्हा सगळ्यांना , तिथल्या गमती जमती दाखवायला  . चला तर मग आता गॅलरीत , तिकडच्या धम्माल गमती जमती अनुभवायला ...... 


आनंदी पाऊस  
२७ ऑगस्ट २०१९


लांबीच्या बाजूची म्हणजे 
गल्लीच्या बाजूची गॅलरी 




मागची गॅलरी 



मागची गॅलरी 









Comments

  1. अक्का, गच्चीवरून खाली यावंस नाही वाटतयं ग.

    ReplyDelete
    Replies
    1. ग अगदी माझ्या मनातलं बोललीस , तेव्हा सुद्धा गच्चीवरून खाली उतरायची इच्छा होत नसे 😔आणि आता सुद्धा नको वाटतंय गच्चीवरून खाली उतरायला . पण आता खालच्या मजल्यावर जाऊन धम्माल करायची आहे ना , मग खाली यावेच लागेल ! आणि परत अधून मधून जाऊ या की परत गच्चीवर धम्माल करायला ....... 🤩🥰😍

      Delete
  2. रजनी झोपेFebruary 01, 2020 1:44 pm

    Khup chhan jalgaon chi feri maralya sarkhi vatat aahe asecha lihit raha yatunach Navin lekhika tayar hoshil aamacha ashirvad

    ReplyDelete
    Replies
    1. मामी सगळ्यात आधी तुझे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात ! खूप खूप आनंद झाला तुला इथे भेटून🤩🥰 !! अशीच नियमित भेटत जा इथे . हो आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रोत्साहन फारच महत्वाचे आहेत माझ्या साठी . त्यातूनच बळ मिळते मला पुढच्या लिखाणासाठी😇😇 ! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🙏🙏

      Delete
  3. स्वाती प्रभुणेFebruary 01, 2020 8:34 pm

    मस्तच पुढच्या लेखाची वाट बघत आहे
    हा लेख छोटा सा वाटला
    माझे माहेरी 7 काका होते व तू लिहतेस ते मनाला भावत आहे
    छान लिहीत आहेस

    ReplyDelete
    Replies
    1. पुढचा लेख लवकरच येईलच आपल्या भेटीला . खूप छान वाटले तुमची आतुरता बघून😇😇🤩 ! फक्त थोडी माहिती वजा प्रस्तावना आहे ही पुढच्या लिखाणाबद्दल , म्हणून जरा छोटा आहे हा लेख , असो . मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद !!🙏🙏

      Delete
  4. 👍pudhil dhamal lekhachi vatt bhaghtoy
    Lekh thoda chota vatala

    ReplyDelete
    Replies
    1. पुढील  लेख लवकरच आपल्या भेटीला येत आहेतच ! फार वाट बघावी लागणार नाहीच . खूप खूप मनापासून आभार🙏😇 ! आणि खर तर हा लेख नाहीच ही फक्त पुढचे लेख नीटपणे समजावे म्हणून थोडी पार्श्वभूमी .

      Delete
  5. निलिमा झोपेFebruary 04, 2020 11:21 am

    खूप छान

    ReplyDelete
  6. Short introduction...awaiting the next one. ��

    ReplyDelete
  7. Replies
    1. मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद🙏😊😇 !!! can i know who is this pl?

      Delete
  8. पुष्पांजलीFebruary 16, 2020 6:16 pm

    खरेच फिरून आल्यासारखे वाटले...������������या मजल्यावरच्या गमतीची ओढ लागली आहे आता....

    ReplyDelete
    Replies
    1. आता फक्त फोटोतून फिरून आलीस , पण आता खरोखरीच एकदा यायला हवंय तुला चौधरी सदनात फेरफटका मारायला !🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️🤩

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...