गच्चीवरून खाली उतरतांना......
गेले जवळ जवळ पाच महिने झाले , गच्चीवर जाम धमाल चाललीय . इतर गमती जमती २ हा सध्यातरी शेवटचा लेख , गच्चीवरील गमतीजमती या भागातील . आता वेळ आलीय गच्चीवरून खालच्या मजल्यावर म्हणजे घराच्या मजल्यावर उतरण्याची . हा मजला म्हणजे तेव्हाचा तिसरा मजला आणि आताचा दुसरा मजला , कारण तेव्हा 'ग्राउंड फ्लोअर' ही संकल्पना नव्हती . एकदम पहिला मजला , दुसरा मजला वगैरे वगैरे . म्हणून तेव्हाचा तिसरा मजला . तेव्हा या मजल्या विषयी थोडी माहिती . आधीच्या एका लेखात उल्लेख केल्या प्रमाणे या इमारतीला तीन बाजुंनी रस्ते आहेत आणि एक बाजू , बाजूच्या इमारतीची सामायिक बाजू आहे . तर या रस्ते असलेल्या तीनही बाजूने एक सलग इंग्रजी अक्षर सी आकाराची संपूर्ण इमारतीला वेढणारी एक सलग गॅलरी आहे . घराच्या वेगवेगळ्या खोल्यातून एकूण आठ दरवाजे या गॅलरीत उघडतात .
या घरात सुरवातीला , म्हणजे मी जवळ जवळ पाच वर्षांची होईपर्यंत माझे बाबा (आजोबा) आणि लहान बाबा(त्यांचे धाकटे बंधू) असे दोघांचे मिळून एकत्र कुटुंब राहत असे . फक्त लहान आई आणि लहान बाबा आमच्या मूळ गावी राहत असत . म्हणजे घरात एकूण आई-बाबा , त्यांची तीन मुलं - दादा , पप्पा , नाना आणि लहान बाबांची चार मुलं म्हणजे चार काका आणि दोन मुली म्हणजे दोन आत्या . मग क्रमाक्रमाने एकेकाची लग्न झालीत . दोन्ही आत्या सासरी गेल्या आणि चार सुना, एक एक करत घरात येत गेल्या आणि आम्हा नातवंडांचे जन्म .
नंतर कालांतराने दोन्ही बाबा वेगळे झाले आणि अर्थातच घराचे दोन भाग झाले . तर काही लेखांमध्ये संपूर्ण घराचा म्हणजे एकत्र असतानाचा उल्लेख येईल तर काही लेखांमध्ये वेगळे झाल्या नंतरचा उल्लेख येईल . पुढचे सगळे लेख समजण्यास मदत व्हावी म्हणून हा सगळा प्रपंच .
गच्चीवरून जीन्याने खाली उतरले की समोरच थोडे बाजूला घराचा प्रवेश आहे . पण इथेही मी आधी मागच्या गॅलरीत नेणार आहे तुम्हा सगळ्यांना , तिथल्या गमती जमती दाखवायला . चला तर मग आता गॅलरीत , तिकडच्या धम्माल गमती जमती अनुभवायला ......
आनंदी पाऊस
🙂👍
ReplyDelete🤩😍😇
Deleteअक्का, गच्चीवरून खाली यावंस नाही वाटतयं ग.
ReplyDeleteग अगदी माझ्या मनातलं बोललीस , तेव्हा सुद्धा गच्चीवरून खाली उतरायची इच्छा होत नसे 😔आणि आता सुद्धा नको वाटतंय गच्चीवरून खाली उतरायला . पण आता खालच्या मजल्यावर जाऊन धम्माल करायची आहे ना , मग खाली यावेच लागेल ! आणि परत अधून मधून जाऊ या की परत गच्चीवर धम्माल करायला ....... 🤩🥰😍
DeleteKhup chhan jalgaon chi feri maralya sarkhi vatat aahe asecha lihit raha yatunach Navin lekhika tayar hoshil aamacha ashirvad
ReplyDeleteमामी सगळ्यात आधी तुझे मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात ! खूप खूप आनंद झाला तुला इथे भेटून🤩🥰 !! अशीच नियमित भेटत जा इथे . हो आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रोत्साहन फारच महत्वाचे आहेत माझ्या साठी . त्यातूनच बळ मिळते मला पुढच्या लिखाणासाठी😇😇 ! खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद !! 🙏🙏🙏
Deleteमस्तच पुढच्या लेखाची वाट बघत आहे
ReplyDeleteहा लेख छोटा सा वाटला
माझे माहेरी 7 काका होते व तू लिहतेस ते मनाला भावत आहे
छान लिहीत आहेस
पुढचा लेख लवकरच येईलच आपल्या भेटीला . खूप छान वाटले तुमची आतुरता बघून😇😇🤩 ! फक्त थोडी माहिती वजा प्रस्तावना आहे ही पुढच्या लिखाणाबद्दल , म्हणून जरा छोटा आहे हा लेख , असो . मनःपूर्वक सप्रेम धन्यवाद !!🙏🙏
Delete👍pudhil dhamal lekhachi vatt bhaghtoy
ReplyDeleteLekh thoda chota vatala
पुढील लेख लवकरच आपल्या भेटीला येत आहेतच ! फार वाट बघावी लागणार नाहीच . खूप खूप मनापासून आभार🙏😇 ! आणि खर तर हा लेख नाहीच ही फक्त पुढचे लेख नीटपणे समजावे म्हणून थोडी पार्श्वभूमी .
Deleteखूप छान
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद !🙏😊
DeleteKhup chhan
ReplyDeleteसप्रेम🙏🙏😇🤩 !
ReplyDeleteShort introduction...awaiting the next one. ��
ReplyDeletethnk u so much !🙏🙏
DeleteAwaiting for next
ReplyDeleteमनःपूर्वक खूप खूप धन्यवाद🙏😊😇 !!! can i know who is this pl?
Deleteखरेच फिरून आल्यासारखे वाटले...������������या मजल्यावरच्या गमतीची ओढ लागली आहे आता....
ReplyDeleteआता फक्त फोटोतून फिरून आलीस , पण आता खरोखरीच एकदा यायला हवंय तुला चौधरी सदनात फेरफटका मारायला !🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️🚶🏻♀️🤩
Delete