Skip to main content

इतर पापड आणि वाळवणं -२ (गच्चीवरील गमती जमती)

इतर पापड आणि वाळवणं -२
 (गच्चीवरील गमती जमती)
                                                              



                                                          यात एक फारच मनोरंजक आणि चित्तवेधक प्रकार म्हणजे कऱ्होडे ! हा खास आमच्याकडचा शब्द . बाकी लोक याला वडे, सांडगे वगैरे म्हणतात . ह्याची गम्मत म्हणजे ह्यासाठी लागणारे मिश्रण एकदा तयार झाले , की हे करण्यासाठी कुठलेही उपकरण लागत नाही . बाकी वाळवणाचे तसे नाही . एकेकाचे एकेक नखरे , कुणाला हे उपकरण लागते तर कुणाला ते . प्रत्येकाचे एक एक खास उपकरण !
                                                             तर एकदा का याचे मिश्रण खाली घरात तयार झाले की ते मिश्रण असलेलं भांडं आणि वाळत घालण्यासाठी प्लास्टिकचा कागद किंवा धोतर घेऊन गच्चीवर आले की झाले . हा प्लास्टिकचा कागद किंवा धोतर गच्चीवर अंथरायचे . मग हातात या मिश्रणाचा मोठा गोळा घ्यायचा आणि त्यातूनच मग छोटे छोटे गोळे कागदावर घालायचे . आमच्या कडे कायम खूप काम आणि कायमची घाई . मग हे काम लवकर लवकर संपायला हवे म्हणून बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे केले जात हे कऱ्होडे . पण हे सगळे करत असताना आणि करून झाल्यावर बघायला फार भारी वाटे . मला तर अगदी लहानपणापासून आवडते हे सगळे बघायला . अर्थातच आता खूप वर्षांपासून बघायला नाही मिळाले मला हे . 
                                                             लहान असताना हे करण्याची अर्थातच संधी मिळत नसे . पण मध्येच केव्हातरी हे करण्याची मला संधी मिळाली . नक्कीच केव्हा आठवत नाही . पण बहुतेक पदवीचे शिक्षण घेतांना किंवा नुकतेच लग्न झाल्यावर असावे . तेव्हा मी मम्मी सोबत केलेले . मी माझी बऱ्याच वर्षांपासूनची हौस आणि इच्छा पूर्ण करून घेतली होती . एका  बाजूने मम्मी नेहमी प्रमाणे मोठे मोठे करत होती आणि मी दुसऱ्या बाजूने अगदी छान बारीक बारीक . बारीक बारीक करण्याची इच्छा लहानपणा पासूनची . पण तोपर्यंत वास्तुशास्त्राचा अभ्यास पण झालेला होता , आणि मी 'रेंडरिंग स्पेसिऍलिस्ट' सुद्धा झालेली . मग काय मनात होते तसे अगदी मन लावून केले . मग मम्मी म्हणाली , काय बारीक बारीक खेळत बसलीय , मोठे मोठे कर पटापट . पण परवाच जेव्हा मी याबद्दल माझ्या मैत्रिणीशी(वर्षा) बोलत होते . तर तेव्हा तिने माझ्या ज्ञानात भर टाकली . ती म्हणाली , 'अग मोठे मोठे करण्यामागे पटापट व्हावे हा एकच हेतू नसतो , मोठे मोठे केले की ते आतून छान पोकळ होतात आणि त्यामुळे पटकन शिजतात सुद्धा !' 
                                                            मग संध्याकाळ झाली , की तोपर्यन्त हे छान वाळलेले असत . मग ते हलक्या हाताने काढायचे आणि खाली घेऊन जायचे . जर थोडे फार ओले असतील तर मात्र परत एखादा दिवस वाळत घालावे लागत . मग छान कडकडीत वाळले की डब्यात भरून बंद होत .
                                                            उन्हाळ्यात भाज्या फारश्या मिळत नाही . मग तेव्हा हे कऱ्होडे  लगेच मदतीला धावून येतात . याची सुकी आणि रस्सा अशी दोन्ही प्रकारची भाजी करता येते . सुकी भाजी खास करून आंब्याचा रस आणि पोळी सोबत केली जाते . पण तळून , अल्पोपहाराचा एक भाग म्हणून सुद्धा छान लागतात . मला मात्र ह्याची सुकी भाजी आजतागायत कधीच आवडली नाही . रस्सा भाजी मात्र आवडते . छान ज्वारीच्या भाकरी सोबत काला मोडायचा , त्यावर कैरीच्या लोणच्याचा खार घालायचा , सोबतीला कच्चा कांदा आणि कैरीच्या लोणच्याची फोड अहाहा ....... स्वर्ग ! 
                                                                           -----------------------------------
                                                             अजून एक म्हणजे भाताच्या चकल्या . माझ्या आठवणी प्रमाणे या अधून मधून केल्या जात . दरवर्षी नाही . ह्याचेही तसेच सगळे मिश्रण खाली घरातून तयार करून गच्चीवर आणले जात असे . आणि ते मिश्रण साच्यात भरून चकल्या केल्या जात . संध्याकाळी वाळल्या की काढून आणायच्या आणि डब्यात भरून ठेवायच्या . मला तेव्हा या फारच आवडत होत्या . म्हणून काही वर्षांपूर्वी मी मम्मीच्या मदतीने केल्या होत्या . पण आता मला त्या फारश्या आवडल्या नाही . कारण मात्र अजुनी नीट लक्षात येत नाहीये . एक तर मला जरा त्या आता थोड्या तेलकट वाटल्या . आम्ही लहान असताना हे सगळे फॅड नव्हते ना तेल कमी खायचे आणि काय काय . आणि दुसरे म्हणजे तांदूळ , असे मला वाटतेय . तांदुळाची चव सुद्धा इतक्या वर्षात नक्कीच खूप बदललीय . तांदूळ तरी किती प्रकारचे . तेव्हा कुठला वापरला जात असे तो आता नक्कीच वापरलेला नव्हता  आणि  महत्वाचे म्हणजे निरागस बालपण ! कायम सगळ्याच बाजून सुंदर असते आणि वाटतेही प्रत्येकालाच !!!

(टीप - सगळ्या वाळवणांसाठी गच्चीवरील गमती जमती आणि घरातील गमती जमती या दोन्ही सदरात बघावे म्हणजे सगळी माहीती नीट आणि सविस्तर मिळेल )
                                                                                                                                                         
आनंदी पाऊस 
 गच्चीवरील गमती जमती 
 ५ ऑगस्ट २०१९

कऱ्होडे 

भाताच्या चकल्या 

भाताच्या चकल्या तळलेल्या 




Comments

  1. Khup chan varnan kela aahe. Itkya saglya goshti kashya kay lakshat thevlya aahet tu Tai? 😊
    Nikhil Mahajan

    ReplyDelete
  2. Karhode My favorite..😁. Tyat ha sundar lekh wachun Ata Ambya cha season chi wat pahawi lagel

    ReplyDelete
    Replies
    1. आंबे येईपर्यंत , मस्तपैकी रस्सा भाजी कर आणि छान काला मोडून खा !!😋😋😋🤤🤤🤤

      Delete
  3. खूप छान.. सर्वच अगदी नीट नेटके.. वर्णन... खूप छान मांडणी..

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी नियमित भेटतेस इथे आणि छान छान अभिप्राय देऊन माझा उत्साह वाढवतेस ! खूप खूप आनंद आहे मला या गोष्टीचा !! love ......😍🥰❤

      Delete
  4. 👌tuzhe varnan etake point to aste ki ekhadala tyatalit ekhadi ghosht visaraila zhale teri tey lakshat yeil mhanje ti vastu banavnatil
    Tondalater panich sutale tuzhe tey varnan bhakaricha kala 😊

    ReplyDelete
    Replies
    1. तू माझे कौतुक  कधीच थकणार नाहीस ! hats off .......!!!!🥰😍

      Delete
  5. प्रिया नारखेडे चौधरीDecember 27, 2019 6:20 pm

    खूप छान वर्णन केले आहे. वर्षा तुझ्या सर्व लक्षात आहे इतक्या लहान पणी च हे खूप विशेष आहे.��������

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी नियमित भेटतेस इथे . खूप खूप आनंद आहे मला या गोष्टीचा !! 🤩🤩

      Delete
  6. खूप छान लिहलेय. नॉस्टॅलजीक झालो.
    -संजय देवरे

    ReplyDelete
  7. Nanda wagle
    Nehmi pramane khoop chan lekh karohde aamhi ghatt sandge bolto aamche hi lahanpani ha kurdya papde seasino suru zala aamchi mothen sobat sandge papad madat karayachi dhandal udaychi
    Sunder aathwani bhutkalat gheun gele

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच रम्य ते बालपण आणि रम्य तो भूतकाळ , त्यात रमण्यासारखा आनंद नाही जगात !!😍💃

      Delete
  8. Khup chan warnan kele ahe .Malalpan karode hatane takayla khup awàdte.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय कऱ्होडे हाताने टाकण्याचा आनंद काही औरच असतो ! i too just love it !!🤩🤩😍😍

      Delete
  9. नीलिमा झोपेDecember 28, 2019 7:03 pm

    Wa khup mast vatale vachun chan lihile aahes ������
    Aata nahi karne hot karhode v chaklya aaytech khato

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय , आता बहुतेक सगळे आयते आणूनच खाल्ले जाते ! कौतुकाबद्दल आभार खूप सारे !😍😍

      Delete
  10. शैलजा चौधरीDecember 28, 2019 7:05 pm

    व्वा खूप च छान वर्णन केल आहे
    किती आठवणी आहे ग

    ReplyDelete
    Replies
    1. हो ग रम्य तो भूतकाळ आणि रम्य त्या आठवणी !!😊😍🤩🥰

      Delete
  11. लीला वानखेडेDecember 28, 2019 9:56 pm

    अतिशय सुंदर रचना
    आणी आवडीचा विषय
    खुप च छान लिहिले आहे����������������

    ReplyDelete
    Replies
    1. लीला मॅम , तुमचे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत ! अभिप्राय आणि कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद !🙏😊

      Delete
  12. Sorry late comment kartey, tuze likhan as usual sunder astech bhutkalat gheun jates pan let comment karnyacha uddesh ha asto ki mala Tuzya blog war alelya comments wachayla jast awdte

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरंय , अभिप्राय वाचण्यात एक छान आनंद असतो . प्रत्येकाचे वेगळे दृष्टिकोन , वेगवेगळी मतं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या आठवणी ! खूप छान मेजवानीच असते🤩😇 ! मनःपूर्वक धन्यवाद🙏 ! पण आपण नावच लिहिले नाहीये त्यामुळे हा अभिप्राय कुणाचा तेच कळत नाहीये , तरी कृपया आपले नाव सांगावे !!! आणि हे सॉरी वगैरे म्हणायची तर अजिबातच गरज नाहीये , प्रत्येकाला आपापले व्याप असतातच  , त्यामुळे आपापल्या सोयीने वाचावे यात काहीच गैर नाही . तर कृपया हा शब्द परत कुणीही वापरूच नका इथे🙏😃 

      Delete
  13. प्रतिभा अमृतेJanuary 01, 2020 3:10 pm

    कर्‍होडे शब्द गमतीशीर आहे. अाम्ही सांडगै म्हणतो. शुभ कार्यात हे गोल रचून मध्ये हळकुंड किंवा सुपारी ठेवून हळद कुंकू वाहात असत. वांग्याच्या भाजीत घालत असत. मात्र ते छोटे छोटेच छान वाटतात. रश्यापेक्षा सुकी भाजीच जास्त टेस्टी लागते.विस्मूतित गेलेल्या सांडग्याच्या अाठवणीने मजा अाली. भाताच्या चकल्या अाम्ही करत नसू. पण अाता एकदा करुन बघणार अाहे.

    ReplyDelete
    Replies
    1. फक्त कर्‍होडे शब्द नाही तर असे बरेच शब्द  आमच्याकडे खास खान्देशी , जे तुम्हाला फार वेगळे आणि गंमतशीर वाटतील . अरे तुम्ही एकदा आमच्या पद्धतीची रस्सा भाजी खाऊन पाहिलीत ना की सुक्या भाजीचे नावच काढणार नाही , इतकी भारी लागते ही रस्सा भाजी !! तुम्ही भाताच्या चकल्या केल्यात कि सांगा , लगेच येईन खायला🤩😋😋🙏🙏

      Delete
    2. कांदा घालून कोरडे कऱ्होडे किंवा तव्यावरचे कऱ्होडे खाल्ले तर चव आयुष्य भर लक्षात राहील

      Delete
    3. हाहाहा 😁😁😁😂
      तुझे एकदम आवडीचे दिसतेय, एन्जॉय!!!

      Delete
  14. मंदा चौधरीJanuary 04, 2020 6:44 pm

    मस्त आहे लेख

    ReplyDelete
  15. ज्योती किरंगेJanuary 04, 2020 6:46 pm

    Articulation is too good....छानच लिहिलय....कदाचीत एक दोन दिवसात भाजी होईलच घरी....
    हे वाचल्या मुळे....������

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून खूप खूप धन्यवाद !🙏😊😁😀

      Delete
  16. मनोज पाटीलJanuary 04, 2020 6:47 pm

    ���� छान लेख लिहिला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून खूप खूप धन्यवाद !🙏😊

      Delete
  17. स्मिता चौधरी खडकेJanuary 04, 2020 6:50 pm

    ����chhan lihilay
    Mala pan karhodyachi bhaji avdat nahi, pan chaklyansarkha tyach kach saran tasty lagat

    ReplyDelete
    Replies
    1. एकंदरीत सारण हा प्रकार फारच रुचकर आणि छान असतोच , नाही का?🥰😃

      Delete
  18. नेहेमीप्रमाणे छान..शेवटची काॅमेंट फारच छान.. न परतून येणारं बालपण..
    त्या पुन्हा कधीच न येणार्‍या दिवसांचा आनंद पुन्हा थोडा तरी घेता यावा म्हणून आपण काय काय करतो..
    जशी ही लेखमाला..

    ReplyDelete
    Replies
    1. बघ ना , लिहायला सुरुवात केली खरी , पण कुठले कुठले काय काय आठवते आहे आणि किती सारा आनंद मिळतोय ! अगदी अपरिमित आनंद , तेव्हढेच हवे असते आयुष्यात !😍🥰😇💃

      Delete
  19. Mast karodhe varche lekan chan lihile aahes sarv
    Mala matra nahi jamat karhode kele mi baryach da pan dagdasarke kadak hotat
    Patal v suki bhaji khup aawdate

    ReplyDelete
    Replies
    1. असु दे, बाकी सगळे छान जमते अणि एकाच गोष्ट नीट जमत नाही तर काही बिघडत नाही 😝

      Delete
    2. नेहमीप्रमाणे उत्तम लेख
      Karhole खरच किती ते उद्योग पन भाजी खायला एकदम मस्त. मला tr खूप आवडते n मी करते पन स्वताच Karhole. खूप छान आठवण

      Delete
  20. छान लेख आहे.आवडता पदार्थ करायला पण आणि खायला पण. मी अजुनही करते

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...