इतर पापड आणि वाळवणं -१
(गच्चीवरील गमती जमती)
बिबड्यांचे अगदी शिजवण्यापासून , ते वाळेलेले पापड काढेपर्यंत सगळे गच्चीवरच होत असे . बाकी पापड आणि वाळवणाचे तसे नसे . प्रत्येक पापडाच्या आणि वाळवणाच्या गरजा वेगवेगळ्या . त्यामुळे प्रत्येकाची पद्धत वेगळी . तर ज्या पापडांचा आणि वाळणांचा काही अंशी का होईना गच्चीशी संबंध येत असे त्याच्या गमती जमती या लेखात .
गव्हाच्या चिकाच्या कुरडया , यांच मात्र सगळं गच्चीवरच होत असे . आदल्या दिवशी संध्याकाळीच भिजलेला गहू वाटून , त्याचा चीक काढून ठेवलेला असे. तेव्हा मिक्सर वगैरे नसल्याने , भिजलेले गहू पाट्या-वरवंट्याने वाटावे लागत . बाकी सगळ्या प्रमाणे ह्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कराव्या लागतं . त्यामुळे एव्हढे गहू पाट्यावर वाटणे म्हणजे फारच कष्टाचे काम ! बरं वाटल्यावर हे सगळे कमीत कमी तीन वेळा पाणी घालून चांगले पिळून घ्यावे लागे . त्यालाही भरपूर शक्ती , मेहनत लागते आणि गहू म्हणजे अतिशय चिकट . ते हाताला चिकटू नये म्हणून आधीच हाताला चांगले मनगटापर्यंत तेल लावून घ्यावे लागे . मला पाट्यावर वाटणे आणि पिळणे दोन्ही कामे फार आवडत , अगदी मनापासून . थोडे मोठे झाल्यावर ही काम करायची मुभा असे . तेव्हा मात्र मी ती आवडीने केली सुद्धा . पण बऱ्याचदा पाट्यावर गहू वाटून हात इतके दुखत , की हात जरा सुद्धा हलविणे मुश्किल होऊन जात असे .
मग हा चीक रात्रभर झाकून ठेवला जात असे . सकाळ पर्यंत पांढरा शुभ्र चीक तळाशी घट्ट जमून जात असे आणि वर साधारण गढूळ रंगाचे पाणी असे . मग हे पाणी हळूवार ओतून दुसऱ्या भांड्यात काढून घेतले जाई . त्यानंतर खाली छान पांढरा शुभ्र चीक दिसत असे . त्याचा रंग आणि पोत दोन्हीही मला बघायला जाम आवडत असे आणि ह्याला हात लावला की स्वर्ग ! काय छान मऊशार लागे ते हाताला . हात काढावासाच वाटेना . लहान असताना हे काहीच करता येत नसे . पण जरा मोठं झाल्यावर मात्र बऱ्याच वेळा ही संधी मिळाली आणि मी ती अगदी आनंदाने घेतली सुद्धा . हा चीक भांड्याच्या तळाशी इतका घट्ट बसतो की अक्षरशः बोटांनी उकरून उकरून मोकळा करावा लागतो . पण सगळ्यात भारी हे काम ! तो घट्ट बसलेला चीक बोटांनी उकरायचा आणि क्षणात तो छान मऊमऊ होऊन जातो . शब्दात वर्णन करणे केवळ अशक्यच , ते सगळे अनुभवले पाहिजे तरच कळते . मला तर जामच आवडत असे . अजूनही खूप आवडेल पण आता काही ही संधी मिळत नाही .
मग हा मोकळा केलेला चीक गच्चीवर नेला जात असे आणि आमच्या लाडक्या भट्टीवर शिजवला जात असे . आणि मग एकदा का शिजवून झाला की एका भांड्यात , खाली पुरुष मंडळींना खाण्यासाठी पोहोचता होई . आणि मग दोन तीन साचे असत , त्यात भरून भरून कुरडया केल्या जात . ते करणं आम्हाला काही शक्य नसे . पण बघायला सुद्धा फार भारी वाटत असे कुरडया करतांना .
हे सगळे चालू असताना चीक खायची पण जाम घाई असे . तेव्हाच खायचा तर नुसताच खावा लागे . पण चीक म्हणजे त्यात छान दुध आणि साखर घालायची आणि छान कालवून सगळे एकजीव करायचे , मगच खरी मजा चीक खायची . पण हे आम्हाला काही नीट जमेना . छान कालवून देणे हा प्रकार म्हणजे जगात एकच व्यक्ती करून देऊ शकते . ती म्हणजे आमची मम्मी !!! पण ती तर कुरडया करायच्या कामात गुंतलेली असे . मग अगदी मनावर संयम ठेवून मम्मी चे काम पूर्ण होण्याची वाट बघावी लागे .
एकदाचे का सगळे काम संपले गच्चीवरचे की मग सगळी खरकटी भांडी आणि जे काय सगळं साहित्य आणलेले असे ते सगळे घेऊन खाली जायचे , त्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे खाण्यासाठी म्हणून काढून ठेवलेल्या चिकाचे भांडे ! मग एकदाचे का सगळे खाली नेवून झाले की मम्मी लोकांची आणि सगळ्या मुलांची चीक खाण्यासाठी अंगत पंगत होत असे . पण मम्मीला आधी सगळ्या मुलांना चीक, दूध आणि साखर छान कालवून एकजीव करून द्यावा लागे आणि मग सगळ्यात शेवटी ती स्वतः साठी कालवून घेत असे . तेव्हा हे सगळं लक्षातही येत नसे . आता वाटत काय हे करत होतो आपण . पण तिने कालवून दिलेल्या कुठल्याही गोष्टीची चव म्हणजे एकदम स्वर्ग !! अजूनही त्या सगळ्या गोष्टींची चव जिभेवर रेंगाळते आहे आणि तोंडाला पाणी सुटते ....... अगदी आठवणीने सुद्धा !
संध्याकाळी या सगळ्या कुरडया काढून आणाव्या लागत गच्चीवरून . मनातल्यामनात देवाला प्रार्थना चालू असे ......कुरडया अर्धवट ओल्या राहू दे ! कारण या अर्धवट ओल्या कुरडया फार भारी लागतात खायला . आम्ही खूप आवडीने खात असू ह्या अर्धवट ओल्या कुरडया आणि या कुरडया जरी कडकडीत वाळल्या तरी दुसरी एक मस्त मेजवानी असे , ज्या ज्या दिवशी चीक केला जात असे त्या त्या दिवशी . सकाळी चीकावरचे जे पाणी काढून घेतले जात असे , त्या पाण्यापासून सुद्धा पापड केले जात . हे पापड फक्त ओले ओले खाण्यासाठी ! त्यात नक्की काय काय घातले जाते नक्कीचं माहिती नाही . पण शिजवले की फक्त पळीने धोतरावर घालून करतात . त्याला लाटायची किंवा थापायची गरज नसते . संध्याकाळी वाळले की बिबडे जसे काढतात तसे काढायचे आणि ओले ओले खायचे ........स्वर्ग !!!!
गव्हाच्या चीकाचे पापड सुद्धा केले जातात . हे पापड आणि ज्वारीचे एक प्रकारचे पापड , दोन्ही पापड लाटून केले जातात आणि दोघांची लाटण्याची पद्धत सारखीच असते . पण हे सगळं खाली घरात चालत असे . त्यामुळे याच्या शिजवण्याच्या आणि लाटण्याच्या गमती जमती गच्चीवरून खालच्या मजल्यावर गेलो की कळेल . आता फक्त गच्चीवरील गमतीजमती . तर हे पापड वाळत घालायला मात्र गच्चीवर यावे लागते . आमच्या कडे बऱ्याच टोपल्या होत्या, वेगवेगळ्या आकाराच्या आणि मापाच्या आणि सुपं सुद्धा होती तीन-चार . त्यात एक अगदी छोटे सुद्धा होते . ह्या सगळ्या टोपल्या आणि सुपं उलटी करून ठेवली जात . एक एक पापड लाटून झाला की तो अलगदपणे या टोपली किंवा सुपावर टाकला जात असे . यावर टाकताना मात्र दोन पापडात थोडे तरी अंतर ठेवावे लागे . अन्यथा ते एकमेकांना चिकटून जाण्याची शक्यता . असे एक एक करत हे सूप किंवा टोपली जसजशी पापडांनी भरून जाई तसतशी एक एक करून वर घेऊन जावी लागे आणि मग एक एक पापड अलगदपणे उचलून वळत घालावा लागे . उचलून वाळत घालताना काही गडबड झाली की संपले , तो पापड गेलाच म्हणून समजा . त्यामुळे हे काम सुद्धा अत्यंत लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक करावे लागे .
फार लहान असताना सुद्धा सारखे हात शिवशिवत हे सगळे करायला . पण तेव्हा परवानगी नसे काही करायला . मग थोडं मोठे झाल्यावर एक एक टोपली किंवा सूप वर घेऊन दिले जात असे . आणि नंतर पापड वाळत सुद्धा घालू दिले जात असे . पण जर का वाळत घालतांना जर का काही गडबड झाली , की खाली आल्यावर बोलून काही सांगण्याची गरजच पडत नसे . कारण आमच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले स्पष्ट दिसत असत . ते पाहून मम्मी काय ते समजून जात असे . मग कधी समजावून सांगणे चाले तर कधी ओरडा पण खावा लागे . कारण या सगळ्या मागे खूप खूप कष्ट आणि मेहनत असे बऱ्याच दिवसांपासूनची .
त्यातल्या त्यात गव्हाच्या चीकाचा पापड वळत घालताना काही गडबड झाली तर तो गच्चीवरच गट्टम करता येत असे . खऱ्या अर्थाने चूक पोटात घालता येत असे ! एक तर हा पापड आकाराने जरा लहान आणि चवीला तर एकदम भारीच . पण ज्वारीच्या पापडाचे तसे नसे . हा पापड आकाराने फारच मोठा त्यामुळे तो पटकन गट्टम करणे केवळ अशक्य . मग खाली गेल्यावर गडबड कळली की मम्मी लोकांपैकी कुणीतरी वर जाऊन शक्य तेव्हढा तो पापड नीट करून येत . नंतर नंतर आम्हीपण शिकलो गडबड झालेला पापड नीट करायला . मात्र कधी कधी अती उत्साहाच्या भारत धावतधावत जीना चढायला गेलो आणि अडखळलो की संपलेच ....अख्ख सूप किंवा टोपली हातातून पडून जात असे आणि त्यावरच्या सगळ्या पापडाचे काय होत असे याची कल्पना न केलेलीच बरी .........!!!
(टीप - सगळ्या वाळवणांसाठी गच्चीवरील गमती जमती आणि घरातील गमती जमती या दोन्ही सदरात बघावे म्हणजे सगळी माहीती नीट आणि सविस्तर मिळेल )
आनंदी पाऊस
गच्चीवरील जमती जमती
चीक
साचा/सोऱ्या
कुरडया (वाळलेल्या)
कुरडई (तळलेली)
Ag tondala pani sutla khup, ghata bibde, kurdai aani saglyat mahtvach mhanje mummy chya hatcha kalyan. Mala tr tichya hatcha chatni bhakricha kala hi khup aavdaycha rather aata hi aavdel pan bhetat nahi na.
ReplyDeleteAani papa galat ghalaychi majja mhanshil tr mazya veles mi aktixh asaychi na, mi tr papad galat chalta ghaltach 1-2 matkavun takaychi, tyachyamule mala khup aavdaycha papad galat ghalayla😃.
Chan varnan keleyes savistar👌👌👌
मम्मीच्या हातच्या केल्याबद्दल कितीही बोलले तरी कमीच ! आता मला वाटते तोच एक खास कार्यक्रम करावा , मम्मी ला चटणी भाकरी चा काला करून द्यायला सांगायचे आणि आपण सगळ्याजणींनी भोवती गोल करून बसून हल्ला बोल करायचा 🤤🤤👩👩👧👧👩👩👧👧!!! आणि दुसरे म्हणजे तू अगदी नीट समजावून सांगितलेस पापड वाळत घालायचे फायदे !!!😆😆😆😋😋😋
Deleteखूप छान gg वर्षा.. चूक पोटात घालणे तर फारच आवडले. खूप छान लेख.. hats off to you..
ReplyDeleteचूक पोटात घातल्याची सगळ्यांनाच आवडली , अगदी मला सुद्धा शाब्दिक आणि खरोखर दोन्ही !!😆😂😂😃😍
DeleteKhup chan lihiles aatach chik v kurdaya khaychi echa zali mazi farch lahanpanichya aathavani tu agdi sunder lihilya aahes mast ������
ReplyDeleteaata he sarv nahi milat g ��
खूप धन्यवाद !🙏😊🥰
Deleteवर्षा कुरडई करण्याची प्रोसिजर अगदी बरोबर लिहिली आहे वाचतांना तोंडाला पाणी सुटले.इतक्या लहान पणी पण तझी निरीक्षक शक्ति खूप होती मला कौतुक वाटते.
ReplyDeleteअभिप्राय आणि कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद !🙏😊
Delete��khup chhan ,gele te divas rahilya tya aathvani☺
ReplyDeleteआत्या , तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏 ! अभिप्राय आणि कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद ! खूप खूप आनंद झाला तुला इथे भेटून . 😍😇
DeleteKhupach chan khupach chan lihite
ReplyDeleteनीता , तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत🙏 !खूप खूप आनंद झाला तुला इथे भेटून !!😍😇💃❤
Deleteझकास वर्णन वर्षा ��������
ReplyDeleteनीता , तुझे या चौधरी सदनात मनःपूर्वक स्वागत ! अभिप्राय आणि कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद !🙏😊
Deleteगव्हाची कुरडई वा छान आठवन वाचुन मला लहान पण आठवल
ReplyDelete🥰🙏😍 मनापासून धन्यवाद !
Deleteलेख वाचला विषय खूप छान लिहिलेला आहे, छान लिहितेस����������������
ReplyDelete😊😍😇🙏🙏
DeleteKhupch chan lihile ahe akka . Pan tevhasarkhi maja ata nahi rahili.
ReplyDeleteशेवटी काय रम्य तो भूतकाळ हेच खरे !!!😃😃😊
Delete����तोंडाला पाणी सुटले आम्ही पण दुपारी जाऊन हळूच अर्ध वट वाळलेल्या कुरडया खायचो माझे माहेरी तर 7काका काकू होते त्यामुळे खूप मोठं प्रमाण असायचं आता हया गोष्टीच प्रमाण खूपच कमी झाले आहे डायट मुळे���� पोह्याचे पापड व उडीद पापड व त्याच्या लाट्या आठवल्या तू मला माझ्या लहानपणच्या आठवणीत नेऊन सोडलस खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteलहानपणी या चोरून मारून केलेल्या गोष्टींची मज्जाच काही और असते , त्याची सर कशालाच येऊ शकत नाही . 😆😆😂💃💃
DeleteTo chik hatane urkaraicha shanat to mau houn jaicha kharch jane anubhavale tyalach kalel pan tu likhanatun chan varnan👌👍
ReplyDeleteआपली नावं तर सारखी आहेतच , पण दोघीनांही आवडणारे मुद्दे अगदी सारखेच आहेत !!!
DeleteKhupach chan varnan keley kurdaya n papadanche.....������
ReplyDelete😍 मनापासून धन्यवाद !
Deleteतूझा blog वाचला जूने सर्व आठवले . माझे मात्र ओले गहू वाटून हात दूखत नसायचे ����आणी पाटा वरवंटा सोडला तर अजूनही मीहे सर्व करते कारण आमची टेरेसखूप मोठी आहे दूसरे म्हणजे तू खूप छान लेखीका आहेस कारण तू खूप छान लिहिले आहेस
ReplyDeleteआत्या सगळ्यात आधी तुझे अगदी मनःपूर्वक स्वागत या चौधरी सदनात ! कधीचीच वाट बघत होते मी तुझी , खूप खूप आनंद झाला तुला इथे भेटून😍🤩💃💃💃 !! आता या उन्हाळ्यात मी पण येईन तुझ्याकडे हे सगळे परत अनुभवायला !
Deleteसर्व नेमके आणि छान. मला वाटते की जेव्हा तुझे "चौधरी सदन"पूर्ण होईल त्यानंतर तू तुझ्या आवडीच्या एखाद्या विषयावर असेच लिहावे.शेवटी तू एक कलाकार आहे.तू वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतेस, त्या ठिकाणांचे वर्णन.किवा पेंटिंग्ज वगैरे.... हा लेख छान लिहिलं आहे मकरंद
ReplyDeleteमकरंद , तुझ्यासारखे मनापासून प्रोत्साहन देणारे आणि माझ्या लिखाणावर मनापासून प्रेम करणारे आहेत तो पर्यंत माझे लिखाण चालूच राहील . याचा मला खूप खूप मनापासून आनंद आहे !!! 😍😇💃tons of love !
Deleteवाळवणावरील लेख वाचला . बिबडे पापड म्हणजे काय ते कळले नाही . पण कुरडया एकदम सही . चिकाचे वर्णन वाचून खरंच तोंडाला पाणी सुटले . आम्हीही चीक खात असू पण दूध साखर न घालता . वाटून चिकाचा जो भुसा राहत असे त्यात तिखट मीठ घालून काकू त्याच्या पाताळश्या भुसवड्या थापून वाळवत असे . त्या तळून खूप छान लागत . पापडाच्या बोटी तर खात असूच . पण अर्धवट वाळलेले पापड , कुरडया , पापड्या गुपचूप खाण्यात औरच मजा होती . आता सर्व रेडिमेड मिळते . जागे आणि वेळेअभावी वाळवणं हा प्रकारच संपुष्टात आलाय . गेले ते दिन , राहिल्या त्या आठवणी .प्रतिभा अमृते
ReplyDeleteभुसवड्या हा प्रकार मला फारच नवीन आहे , अगदी पाहिल्यानेच ऐकतेय शब्द आणि पदार्थ दोन्हीही ! पण नक्कीच खूप भारी लागत असतील चवीला असे वाटतेय ! आणि हो गुपचूप चोरून खाण्याची मज्जा भारीच , सगळ्यांच्याच आवडीची😆😆😉😉 ! खूप छान वाटले छान अभिप्राय आणि तुमचे अनुभव आणि भुसवड्या बद्दल वाचून !!!🤩🤩🤩
Deleteअगदी समर्पक आणि तंतोतंत वर्णन
ReplyDelete🙏🤩🥰😍😎
Deleteपापड वाळत घालताना किती ओरडा खाल्ला
ReplyDeleteअगणित वेळा!!!
Delete😁😂🤣😆
Delete😢😭
Kup chan
ReplyDelete����
🙏😍🤩
Deleteगव्हाचे पापड करण्याची कृती वाचकाला निश्चित आवडेल.चिक खाणे,पापड वाळत घालणे,सूपखाली पाडणे,माेडलेले पापड गच्चीतच फस्त करणे अशा गमती जमतीतून मिळालेला आनंद आपण सर्वांनी अनुभवलेला दिसताे.
ReplyDeleteखरंच तेव्हा हे सगळे करायला फारच मज्जा येत असे आणि आता आठवून पण फारच मज्जा वाटतेय !
Deleteमस्त... चूक पोटात घालने...�� एकदम भारी��������. यावेळी तुझा लेख मी सगळ्यात आधी वाचून पहिली प्रतिक्रिया मी देतेय...������
ReplyDeleteफारच मज्जा यायची ही चूक पोटात घालायला , अजूनही खूप आवडेल खरं तर अशी चूक पोटात घालायला पण संधीच मिळत नाहीये
Deleteऊत्तम लेख ! ���� माझ्या (किंबहुना सर्वांच्याच) आवडीच्या विषयाला हात घातल्याबद्दल.
ReplyDeleteपापड/कुरडयांच्या चिकात मीठ असल्याने आम्ही नेहमीच फक्त कच्चे तेल व थोडे मीठ (गरजेप्रमाणे ) टाकून खायचो. दूध व साखर टाकून ही खातात हे पहिल्यांदाच वाचले, ऐकले.
कोणीतरी उद्योगी व्यक्तीने जर असे सिझनल पदार्थ (महाराष्ट्रीय डेलीकसी) खाऊ घालण्याचा उद्योग सुरू केला, तर वर्षभराची कमाई होऊ शकेल. ���� पापड करत बसायची भानगड नको. ������
एकदा खाऊनच बघ तू चिकमध्ये दूध साखर घालून ......अगदी स्वर्गसुख ! 😇😇
Deleteगव्हाचा चिक तोंडाला पाणी सुटले ना किती छान तू छान लेखिका झाली����
ReplyDelete😋🤤😋🤤लिहितांना माझ्यापण तोंडाला पाणी सुटते !
Deleteखरच खुपच छान लिहिता तुम्ही
ReplyDeleteसप्रेम धन्यवाद !🙏😇
DeleteGreat खूप छान आठवण. खरच खुप गंमत होती पन त्यात. Kurdayansathi साचा गोळा करण्यापासून सुरवात असायची. मग खाटा जमवायच्या. खूप majja यायची मध्ये मध्ये लुडबुड करायला ����
ReplyDeleteखरी मज्जा लुडबुड करण्यातच आहे !😁😅🤣
Deleteखूप छान, आपल्या हातुन मोडलेला पापड गुपचूप खाण्याची मज्जा वेगळीच!! चूक पोटात घालणे!!😂😂😂 काय मस्त!!!
ReplyDeleteअगदी हाय गर्मीतल्या उन्हात वाळवलेल्या पापडासारखा हा लेख अगदी कडक मस्तच झालाय...सारे पापड शास्त्र आणि त्यासाठी लागणारं शस्त्र पाहून कुतूहल आणि खूप भारी वाटतंय...कच्चा ओला पापडाची चूक पोटात कशी घालायची आज कळले....ओले बिबडे मालाही फार आवडतात..बटाट्याचे वाळलेले पापड आहाहा...तळल्यावर खमंग लागतात.
ReplyDeleteपापडांचा उरलेला चुरा सुद्धा..
आम्ही लहानपणी दुस-यांचे पापड पाहायला/ सांभाळण्यास अधूनमधून गच्चीवर जात असे.
हा "पापड- प्लँटर" जेवतानापुढ्यात असेल तर आनंदच...-सनविवी संजिता
कोरड्यांपेक्षा जास्त मला बिबळे, बिबळ्यांचा घाटा, गव्हाचा चीक (शिजवलेला )आवडतो
ReplyDeleteगव्हाचा शिजवलेला चीक मला त्यात काहीही न टाकता नुसताच आवडतो. दूध साखर बिलकुल आवडत नाही.
मला भिजलेला कच्चा साबुदाणा देखील आवडतो, साबुदाण्याच्या खिचडी पेक्षा.
उडदाच्या पापडाची लाटी, ओले बिबळे...... धुऊन खाल्लेली लोणच्याची फोड, तीळ टाकून खाल्लेली खीशी..... कितीने काय काय होतं त्या बालपणात
कुरडई करताना आलेला आनंद आणि करण्याची मज्जा काही और आहे.खूप छान पद्धतीने कुरडई चे तू वर्णन केलेस.लहानपणी हे करताना केलेली लुडबुड परत आठवली.शब्द रुपी या वर्णनाने परत लहान बनवले.लेख अप्रतिम.
ReplyDelete