Skip to main content

पाचवा वाढदिवस - पिटूचा (गच्चीवरील गमतीजमती)



पाचवा वाढदिवस - पिटूचा 
(गच्चीवरील गमतीजमती)
                                                      

                                                     


                                     तसे चौधरी सदनात बरेच समारंभ झाले . पण गच्चीवर झालेला हा एकमेव समारंभ ! सगळ्यांच्या मनात आधी प्रश्न पडला असेल , आता हा पिटू कोण ? तर पिटू म्हणजे निलेश , माझा धाकटा भाऊ . पण आता तोच थोरला झालाय . सगळ्या चौधरी कुटुंबाची काळजी तोच एकटा घेतो ! तर पिटू हे त्याचे लहानपणीचे आम्ही ठेवलेले लाडाचे नाव . पण थोडा मोठा झाल्यावर आम्ही सगळ्यांनी अगदी ठरवून निलेश नावाने हाक मारायला सुरवात केली . पण खूप प्रयत्न करावे लागले मात्र आम्हाला त्यासाठी . कारण पिटू नावाची इतकी सवय झाली होती , की  पटकन तेच नाव येत असे जीभेवर . मग हळूहळू निलेश नावच सवयीचे झाले आणि पिटू या नावाचा  विसरच पडला . आता काही वर्षांपूर्वी , म्हणजे फेसबुक वापरायला सुरवात केल्यावर एकदम या नावाचा उल्लेख येऊ लागला . कारण अगदी लहान असतानाचे मित्र-मैत्रिणी , शेजारी-पाजारी , एकदम खूप वर्षांनी जोडले गेले . त्यांना 'पिटू' चीच सवय होती  आणि ते त्याची चौकशी करतांना पिटू कसा आहे ? , पिटू कुठे असतो ? वगैरे चौकशी करू लागले . एकदम हसूच आले आणि विचार आला अरेच्च्या , आपण तर 'पिटू' विसरूनच गेलो होतो !
                                                      तर पिटू हा आम्हा तीन बहिणींच्या पाठीवर झालेला , त्यामुळे त्याच्या जन्मापासूनच आम्ही सगळेच खुश होतो . तसाही पाचवा वाढदिवस मोठ्याप्रमाणात साजरा करण्याची पद्धत आहेच , त्यात हा सगळ्यात धाकटा आणि एकुलता एक . पण बाबांच्या (आजोबा) परवानगी - सम्मती शिवाय कुठलीही गोष्ट होत नसे घरात आणि त्यांच्याच मनात हा समारंभ साजरा करण्याच्या बाबतीत आले  .  संध्याकाळचा समारंभ चौधरी सदनच्या गच्चीवर करण्याचे ठरले  आणि त्याप्रमाणे तो पारही पडला . 
                                                      त्याला स्वतःला तर यातले काहीच आठवत नाही आता . मलाही फार थोड्याच आठवणी आहेत या समारंभाच्या , त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे . गम्मत म्हणजे तेव्हा दादांचा कॅमेरा होता घरात चालू अवस्थेत होता , हे हल्लीच कळले मला . सकाळच्या समारंभाचे दोनच फोटो आहेत घरात  आणि आम्ही ते बऱ्याच वेळा पाहिले आहेत , ब्लॅक अँड व्हाईट आहेत . इतके दिवस मला वाटत होते आमच्या शामेन्दू काकांना बोलावले होते फोटो काढायला . पण आता या लिखाणाच्या निमित्ताने लक्षात आले की , सकाळच्या समारंभाचे दोनच फोटो काढले आहेत  आणि संध्याकाळच्या समारंभाचा एकही फोटो नाही , असे का? मग मम्मीला विचारले  तेव्हा कळले , घरच्याच कॅमेऱ्या मध्ये काढले होते हे फोटो . मग कॅमेरा असून संध्याकाळच्या समारंभाचा एकही फोटो का नाही काढला ते  माहित नाही . 
                                                      तर या समारंभाला गावातील नातेवाईक आणि मम्मी-पप्पा लोकांची मित्र मंडळी आलेली होती . फोटो नसल्याने नेमके कोण कोण आले होते माहीत नाही , आठवतही नाही . जेवण वगैरे नव्हते , फक्त अल्पोपहार होता . या संध्याकाळच्या समारंभात केकही कापला होता की नाही हे आठवत नाहीये . आज सारखी तेव्हा बुफेची पद्धत नव्हती . मग गच्चीवरील काका लोकांच्या खोल्यात सगळे पदार्थ ठेवण्याची सोय केलेली होती , तिथेच सगळे पदार्थ गरजेनुसार कागदी ताटली मध्ये घालून ठेवले जात होते आणि  मग येणाऱ्या पाहुण्यांना या भरून ठेवलेल्या कागदाच्या ताटल्या नेवून दिल्या जात होत्या . हे काम आम्ही बहिणी , मंगल आत्याच्या (वडिलांची मावस बहीण) मदतीने करत होतो . ती ताटल्या मध्ये सगळे पदार्थ घालून आमच्या हातात काळजीपूर्वक देत असे आणि मग आम्ही त्या पाहुण्यांपर्यंत पोहोचवत होतो . त्यादिवशीच्या  बेतापैकी मला फक्त फरसाण , बुंदीचा लाडू आणि रसनाचे सरबत एव्हढेच आठवतेय . 
                                                  कोण कोण पाहुणे मंडळी आली होती ते सुद्धा आठवत नाहीये . आम्ही तशा लहानच होतो आणि घरात कायम दंगा मस्ती करत असू . पण पाहुणे आले की मग आम्हाला फार बुजल्यासारखे होत असे , मग पाहुण्यांच्या समोर येणे आणि त्यांच्याशी बोलणे , ही फारच लांबची गोष्ट होती . आता कुणाही वाचकाचा यावर विश्वास बसणार नाही , पण अगदी शंभर टक्के खरे आहे हे . या दिवशी सुद्धा तसेच  केले आम्ही , कशीबशी पाहुण्यांच्या हातात फराळाची ताटली द्यायची आणि तिथून पळ काढून खोलीत येऊन बसायचे . पिटू तर पाचच वर्षाचा झाला होता त्या दिवशी आणि तेव्हा तर तो कायम मम्मीच्या मागेमागे फिरत होता तिच्या बरोबर . 
                                                 तेव्हा भेटवस्तूंचे तितकेसे प्रस्थ नव्हते . शिवाय  परत भेटवस्तू ही कल्पनाच अस्थित्वात नव्हती . सगळे जण सर्वसाधारणपणे सगळ्याच समारंभात पाकीटात पैसे घालून देत असत . या समारंभात किती आणि काय काय भेटवस्तू आल्या होत्या ते काहीच आठवत नाही . तर त्यादिवशी दादांचे एक मित्र , गाजरे काका आले होते या समारंभाला . आमच्या बऱ्यापैकी ओळखीचे होते ते तेव्हा सुद्धा . त्यांना दोन मुली आणि सगळ्यात धाकटा एक मुलगा होता . हा चौथीत असताना माझ्या वर्गात होता आणि माझ्या मागेच बसत असे त्यामुळे त्याच्याशी छान मैत्री होती आणि आजही आहे . तर हे आल्याचे मात्र अगदी ठळकपणे आठवते आहे आणि त्यांनी दिलेली भेट वस्तूही ठळकपणे आठवणीत आहे . त्यांनी ती भेट वस्तू दिल्यावर , ती खोलीत ठेवण्याचे काम माझ्याकडे आले होते . तेव्हा तो खोका बऱ्यापैकी वजनी वाटला होता आणि एक आवाज सुद्धा येत होता ते हलवल्यावर . त्यामुळे तेंव्हापासूनच मला फार उत्सुकता होती काय असेल नक्की यात . 
                                               तर हा खोका नक्की केव्हा उघडला ते आठवत नाही . पण उघडून आत काय आहे हे पाहिल्यावर आनंद मिश्रित आश्चर्याचा धक्का बसला ! त्यात बारा लाकडी  चौकोनी ठोकळे (क्यूब ) होते आणि या प्रत्येक ठोकळ्याला प्रत्येक बाजूला कागदावर प्राण्यांचे छापलेल्या चित्राचे तुकडे चिटकवलेले होते . बरोबर पद्धतीने रचना केली त्या ठोकळ्यांची , की एक-एक प्राण्याचे संपूर्ण चित्र तयार होई . असे सहा बाजूने सहा वेगवेगळे प्राणी होते आणि प्रत्येक चित्रात त्या-त्या प्राण्यांबरोबर त्या-त्या प्राण्याचे एक-एक पिल्लू सुद्धा होते . काय गोड होती ती सगळी पिल्लं ! आता सगळ्या प्राण्यांची रंगीत चमकदार चित्रच काय पण छायाचित्र , चलचित्र  सगळंच सहज उपलब्ध असते . तेंव्हा तर अशी छान-छान रंगीत चित्रं सुद्धा बघायला मिळत नसत . या भेटवस्तूच्या निमित्ताने आम्हाला ही चित्र बघायला मिळाली , ते सुद्धा त्या छान-छान आणि गोड-गोड पिल्लांसहीत ! त्यात कांगारू , जिराफ , झेब्रा , वाघ , सिंह आणि माकड असे सहा प्राणी होते . त्यातल्या जिराफाच्या चित्रात जिराफ आणि त्याचे पिल्लू पाणी पीत होते . तेव्हा कळले ते पाणी कसे पितात नदीचे, इतके उंच असुनही !
                                             माझ्या आठवणीत आमच्याकडचा हा एकमेव बैठा बौद्धिक खेळ ! पण खूप आणि मनापासून आवडायचा मला तो . कित्येक वर्ष जपून-जपून खेळत होतो आम्ही . चित्रांचे कागद थोडे जरी उचकटलेले दिसले , तरी ते लगेच नीट चिटकवत असू . याची रचना म्हणजे तीन स्तंभ(column) आणि चार रांगा(row)  ठोकळे . आधी एक एक ठोकळा रचून चित्र पूर्ण करायला शिकलो  आणि मग त्यात एकदम तरबेज सुद्धा झालो .  मग पुढे हळू हळू लक्षात आले की , एकदा का एका प्राण्याचे चित्र तयार केले की प्रत्येक स्तंभ(column) आणि प्रत्येक रांग(row) एका विशिष्ट दिशेने फिरवून ठेवले की ताबडतोब दुसऱ्या प्राण्याचे चित्र तयार होते !
                                                                                                                      
आनंदी पाऊस 
पाचवा वाढदिवस पिटूचा 
 ८ जुलै २०१९







Comments

  1. वाढदिवस आणि मिळालेली भेट.अप्रतिमच.
    रत्ना भोरे.

    ReplyDelete
    Replies
    1. काकू , मनापासून धन्यवाद अभिप्राय आणि इतक्या साऱ्या प्रेमा आणि कौतुकाबद्दल !!!😍😍

      Delete
  2. 👌chan varanan
    Malapan mazha bhavacha 5 vadhdivas atthavala Tu lihales tyapramane purvi kharach cake 🎂 kapanachi pratha navhati

    ReplyDelete
    Replies
    1. अरे मला बोललेच नाही गणेश च्या वाढदिवसाला 😔😏...... आता त्याच्याशीच भांडावे लागेल मला 😜😫🤪

      Delete
  3. जनार्दन चौधरीDecember 13, 2019 5:01 pm

    शब्दांकनाचि ओघवति शैलि आणि आठवणि चे शब्दांकन भारदस्त आहेच आम्हाला एक परिच्छेद लिहिता लिहिता नाके नौ येत आठवणि तर ईतिहासात जमा झाल्या आहेत असो ऊपक्रम पूर्णांकाचि कास असिच वाढो हि सदिच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या भक्कम शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी असल्यावर हाच काय पण असे अजून कित्येक उपक्रम पूर्णत्वास जातील याची मला खात्री आहे !!😍🥰😇❤💖

      Delete
  4. गौरी महाजनDecember 13, 2019 7:27 pm

    Khupach chan varnan keley tai ������

    ReplyDelete
  5. स्वाती प्रभुणेDecember 13, 2019 7:29 pm

    खूप छान वर्णन केले आहेस खरेच त्या काळी कॅमेरा पण नसायचे असले तरी प्रिंट काढणे पण खूप महाग असायचे व त्याला दिलेले ते लाकडी ठोकळे पण महाग असायचे गाजरे काकांना एक मुलगी पण होती का? नीता ती डॉक्टर आहे का?
    जिराफ व सर्व फोटो पण खूप मस्त आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरंय कॅमेरा आणि फोटो बद्दल तुम्ही सांगितलेले 😊😃! आणि हो हे तेच गाजरे काका डॉ निता चे बाबा. 

      Delete
  6. खूप छान वर्षा.. तुला किती आठवते.. आम्हाला तर काही जास्त आठवत नाही. 😀

    ReplyDelete
    Replies
    1. everyone is saying n asking the same thing ......so now m feeeling m really a blessed soul thats all !!!😇😇😇🤩🤩🤩

      Delete
  7. शैलजा चौधरीDecember 13, 2019 8:54 pm

    खूप छान आहे
    तु किती छान लेखाण करते
    मस्त मस्त❤❤❤
    खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. काकू सगळ्यात आधी तुझे या चौधरी सदनात सप्रेम स्वागत 🙏🌼! आणि कौतुकाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल खूप सारे धन्यवाद !!!😊😍🤩😇

      Delete
  8. पिंटुच्याऐवजी 'पिटू' नाव ऐकून गंमत वाटली. इटुकला पिटुकला 'पिटू' वाढदिवसाच्या समारंभात वावरतांना प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसला, इतके हुबेहूब वर्णन केले आहे.पिटूला हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. कुणाचा बरं हा अभिप्राय 🤔? खर नाव पिटूच पण काही जण पिंटू म्हणत . इटुकला पिटुकला पिटू ..... भारीच आवडलं मला😍🥰🤩 !!! कृपया नाव सांगा कुणाचा अभिप्राय ते 🙏

      Delete
  9. Khupch sundar varnan kele ahe akka . Malapan kalale wadhdiwas kasa sajra zala te

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच नशीबवान आहेस या बाबतीत😇 , असे नवऱ्याच्या पाचव्या वाढदिवसाचे वर्णन मला वाटते फक्त तुलाच वाचायला मिळाले असे😍🤩 !!! stay blessed !!

      Delete
  10. जितेंद्र चौधरीDecember 14, 2019 6:52 am

    Mast. Khup chhan varnan kele ahe function che ani tyatlya tyat te gift. Khup awadle asel saglyanna te. pan apan tar baba pitu ch mhannar ahot ata ;) ;)

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे धन्यवाद !!!😊😍🤩😇 आता त्याला पिटू म्हणायचे की काय ते त्यालाच विचारून ठरवा .... 😊😃😆

      Delete
  11. प्रतिभा अमृतेDecember 18, 2019 12:46 pm

    Pitucha vadhhadivas kupach chhan zala. Pharsan,"Bundi ladoo n Rasana sarabat" menu mast hota. Me rasana 2 vela magun ghetale. Pitucha dress n tuza fraukhi zakas hota. Thaklyacha khel matra tumhi mala dakhavala nahit. Mag pitula shubhashirvad devun amhi parat aalo. ��

    ReplyDelete
    Replies
    1. अहो मॅम , तो ठोकळ्यांचा खोका दुसऱ्या दिवशी उघडला ना , म्हणून तुम्हाला दाखवता आला नाही😊😆😉 . मला खात्रीच होती तुम्हाला माझा फ्रॉक आवडेलच😍 ! सप्रेम धन्यवाद वाढदिवसाला येऊन पिटुला आशीर्वाद दिल्याबद्दल !🥰😇❤

      Delete
  12. Very nice. There are many such happy moments captured in those black n white photos. I really enjoy going through them again n again whenever I can at my mom's house

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्यात आधी तुमचे या चौधरी सदनात अगदी मनःपूर्वक स्वागत ! अगदी खरंय तुम्ही म्हणालात ते . मी सुद्धा तिकडे गेले कि जुने फोटो बघणे हा माझा सगळ्यात महत्वाचा आणि आवडीचा कार्यक्रम असतो . मनःपूर्वक धन्यवाद !🙏🙏🙏😍

      Delete
  13. रंजना राणेDecember 22, 2020 4:21 pm

    खरंच खुपच छान वर्णन केले आहे भावाच्या वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  14. खूप छान वर्णन. लहानपणी वाढदिवस काही कधी साजरा केला नाही पन आता हौस करून घेते ����

    ReplyDelete
    Replies
    1. 😁😀😉मस्तच ! असंच स्वच्छंदी आयुष्य आनंदाने जगले पाहीजे ! कीप इट अप !!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...