Skip to main content

पाण्याच्या टाक्या (गच्चीवरील गमती जमती)

 

पाण्याच्या टाक्या 
   (गच्चीवरील गमती जमती)
                                                                          
                                                                       

                                                                      चौधरी सदनच्या गच्चीवर दोन पाण्याच्या टाक्या आहेत . या दोन्ही जमिनीच्या वर आहेत आणि यांच्या  मधोमध जमिनीखाली आणखी एक टाकी आहे . ही  टाकी म्हणजे खालच्या मजल्यावरील बाथरूमच्या वरचा भाग , ज्या भागाचा खालच्या मजल्यावर माळा न करता ही  टाकी केलेली आहे  आणि ती गच्चीवर जमीनीलगत उघडते . पण या टाकीत पाणी कधीच नव्हते . का ते नीटसे आठवत नाही किंवा ती गळत होती बहुतेक , त्यामुळे असेल . मग या टाकीचा उपयोग जळावू लाकडं ठेवण्यासाठी केला जाई . ही लाकडं म्हणजे गच्चीवर जी भट्टी होती , त्यासाठी लागणारं इंधन .  मग त्यात कोणी पडू नये ,( कोणी म्हणजे मुख्य करून आम्ही मुलंच) म्हणून त्यावर सिमेंट कॉंक्रिटचे एक झाकण ठेवलेले होते . लाकडं काढायची असत , तेंव्हा ते सरकवून  बाजूला केले जाई . मला पण उतरावेसे वाटे त्या टाकीत बऱ्याचदा . पण भीती सुद्धा तितकीच वाटे . एक म्हणजे वर चढताच नाही आले तर ?  आणि दुसरे म्हणजे आत काही पाल , झुरळ , उंदीर यांसारखे काही असले तर ? कारण या सगळ्यांची मला तेव्हाच नाही , अजूनही खूप भीती आणि किळस , दोन्ही वाटते . शिवाय त्यात मोठ्या लोकांना सुद्धा उतरणे आणि चढणे तसे फार सोप्पे नव्हतेच . 
                                                                          पाण्याच्या दोन टाक्यांपैकी एक टाकी थोडी मोठी आहे आणि दुसरी जरा लहान आहे आकाराने , उंची मात्र दोघींचीही सारखीच आहे . मोठी टाकी परत अशाच एक सिमेंट कॉंक्रिटच्या झाकणाने झाकलेली असे  . पण हे झाकण थोडे छोटे होते , त्यामुळे एक छोटी फट उघडी राहत असे . त्यातून त्या टाकीत आत बघता येत असे . टाकी पाण्याने भरलेली असली , तरी वर थोडा भाग रिकामा असे . त्यात काही दोन-तीन प्रकारचे कोळी असत आणि अगदी छोट्या छोट्या शंखाच्या गोगलगायी सुद्धा असत . त्या कुठून येत , याचे  आता लिहिताना आणि आठवताना फारच आश्चर्य वाटते आहे . कोळ्यांची थोडी किळस वजा भीती वाटत असे मला , पण त्या छान गोलगोल वेटोळे असलेले शंख असलेल्या गोगलगायी बघायला मात्र मला खूपच आवडत असे  आणि अजुनही आवडते . कधी कधी चतुर आणि नाकतोडा सुद्धा असे . नाकतोड्याची तर फारच भीती वाटत असे , वाटे खरंच याने आपले नाक तोडले तर ?!!
                                                                            दुसरी टाकी , जी आकाराने थोडी लहान आहे , त्यावर मात्र कसलेच झाकण नसे . ज्या पाईप मधून या टाकीत पाणी पडत असे तो पाच-सहा इंचाच्या अंतरावर होता टाकीच्या भिंतीपासून आणि थोडा उंचावर पण होता टाकीच्या कठड्यापासून . पाण्याचा पम्प चालू केला की ती स्वच्छ पाण्याची टाकीत पडणारी धार लांबूनही दिसे . खूपच आवडे मला ते बघायला , पडणाऱ्या पाण्याचा बदलता आवाज आणि पंपाचा सुद्धा आवाज ऐकायला . याक्षणी सुद्धा सगळं जसंच्या तसं डोळ्यासमोर दिसतंय आणि आवाज ऐकू सुद्धा येत आहेत !
                                                                         या टाकीत पडणाऱ्या पाण्यामुळे या पाईपा वर बरेच पक्षी येऊन बसत आणि पाणी पीत असत . कावळे , चिमण्या , कबुतरं यांची संख्या जास्त असे . कधी साळुंक्या सुद्धा येत असत . या पाईप वर बसलेल्या पक्षांना पाणी पिताना बघायला पण छान वाटत असे . कधी कधी आम्हीच टाकीच्या कठड्यावर बसून पाण्यात पाय सोडून पाणी खेळत असू . पाणी मला लहान पणापासून प्रियही तितकेच आणि भीतीही तितकीच , अगदी आजतागायत ! या टाक्या गच्चीच्या एका कठड्याच्या जरा जवळ आहेत . त्यामुळे खालून कुठूनतरी किंवा आजूबाजूच्या गच्चीवरून कुणी आम्हाला टाकीच्या कठड्यावर बसलेले पहिले की त्यांना खूप भीती वाटे आणि काळजीही.... मग ते आम्हाला ओरडून ओरडून सांगत , खाली उतरा तिथून  म्हणून ....... 
                                                                         काही ठराविक काळाने या टाक्यांची साफसफाई करावी लागत असे . मोठा सोहळाच असे हा अगदी नीट ठरवून आणि योजनापूर्वक  केलेला ! टाक्या साफ करायच्या , म्हणजे टाक्यात खूप पाणी असून उपयोगाचे नाही . कारण मग हे पाणी वाया जाणार . मग पाणी जवळ जवळ संपत आलेले हवे , खाली घरात पाण्याची कामं  संपलेली हवीत आणि थोडे पाणी बादल्या भरून ठेवलेले हवे . मग त्या दिवशी मोठ्या टाकीवरचे झाकण काढले जाई किंवा एक-दोघांना त्यात उतरता येईल इतके सरकवले जात असे आणि तीन-चार मोठाल्या बादल्या स्वच्छ पाण्याच्या भरून ठेवल्या जात असत .  मग त्यात कुणीतरी उतरून तारांचा ब्रश घेऊन आणि टाक्यां मध्ये  उरलेले थोडे पाणी वापरून घास घास घासून टाक्या  स्वच्छ केल्या  जात . मग ते टाक्यांमधील  घाण / गढूळ झालेले पाणी आधी तांब्या-तांब्याने बाहेर काढून फेकले जाई .  जे छोट्या तांब्याने पण काढून फेकता येत नसे , ते पाणी एका मोठ्याश्या फडक्यात शोषून शोषून बाहेर पिळून काढावे लागे . मग आधी काढून ठेवलेले स्वच्छ पाणी टाकून पुन्हा टाक्या धुतल्या जात असत .  शेवटी स्वच्छ फडक्याने छान पुसुन स्वच्छ आणि कोरड्या केल्या जात असत . मग या सगळ्या  कष्टाचे चीज होत असे . टाक्या कशा एकदम स्वच्छ आणि लखलखीत दिसत ! फार भारी वाटे , त्या अशा लखलखीत टाक्या बघायला !
                                                                     आम्हा मुलींनाही वाटे , आपणही उतरावे टाकीत  आणि टाक्या छान साफ कराव्या घासून पुसून . पण ती संधी आम्हाला कधीच मिळत नसे . कारण त्या टाक्या घासून पुसून स्वच्छ करणे फार मेहनतीचे काम होते , आमच्या कडून होण्यासारखे नव्हतेच मुळी . पण तेव्हा काही हे मला तरी समजत नसे आणि जाम राग यायचा मोठ्या लोकांचा ! पण हा सगळा सोहळा चालू असताना आमची सगळीकडे चांगलीच लुडबुड चालू असायची . कधी कुणी शांतपणे बाजूला व्हायला सांगत , तर कधी चिडून मोठ्या आवाजात , तर कधी चांगलाच ओरडा सुध्दा खावा लागे . 
                                                                    अशी ही सगळी धामधूम बराच वेळ चालत असे . आता कळतं  किती छळत होतो आम्ही असे सगळे करून  . जवळ जवळ दोन-तीन तासांचा असे हा सोहळा असे वाटते . मग पाणी आले , की या कोरड्या आणि स्वच्छ लखलखीत टाक्यांत  जेंव्हा पहिले पाणी पडत असे , तेव्हा ते बघायला पण मला खूप आवडे .  एक छान वास सुद्धा येत असे पहिले पाणी पडले की टाकीत ! या दोन्ही टाक्या एका लोखंडी पाईपाने साधारण तळापासून तीन-चार इंच उंचीवर जोडलेल्या होत्या . मग पहिल्या टाकीतील पाणी त्या पाईपाच्या पातळीपर्यंत आले , की मग दुसऱ्या टाकीत पण पडायला सुरुवात होई . मग त्या क्षणी आमचा मोर्चा त्या टाकीच्या बाजूला वळत असे , ते पाहिलं पाणी पडतांना बघायला ! मग हळूहळू करत दोन्ही टाक्या पूर्ण भरून जात असत , स्वच्छ आणि चकाकत्या  पाण्याने ...... फारच भारी हे तर ! 
                                                                   या टाक्या पूर्ण भरून सगळ्या बाजूने पाणी वाहू नये , म्हणून गच्चीच्या एका कठड्याच्या बाजूने लहान टाकीच्या भिंतीला वरच्या बाजूला , एक छोटीशी खाच केलेली होती . मग टाकी भरून त्या खाचे पर्यंत पाणी आले , की पाणी टाकीच्या बाहेर पडू लागे आणि मग पुढे बाहेर वरून एकदम खाली , जे खालच्या मजल्यावरून घरातल्या व्यक्तींना दिसत असे . त्यामुळे समजायला आणि पंप बंद करायला सोयीचे जात असे . शिवाय  पाण्याची नासाडी होत नसे . पण हेच जर आम्ही मुली वरच असू टाकी जवळ , तर पाणी वाहायला सुरवात व्हायच्या आतच ओरडून सांगत असू , मम्मी ! पंप बंद कर ..... 


आनंदी पाऊस 
गच्चीवरील गमती जमती 
३१ मे २०१९






या आमच्या लाडक्या पाण्याच्या टाक्या
आता या अवस्थेत आहेत .
तेव्हा छोट्या टाकीवर काहीही नव्हते , फक्त एकाच पाण्याचा पाईप .
मोठ्या टाकीवर झाकण होते पण ही उघडी फट लांबीच्या बाजूने मागच्या बाजूला होती .
आणि मोठ्या टाकीतून तिरका निघालेला पाईप नव्हता पण त्याच जागी एक नळ होता .

Comments

  1. Chan ahe lekh. I remembered my days of ( taki safai) in Jilha peth ��

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद😍 !!! हो , मला पण आठवतेय गांधी नगर च्या टाकीची सफाई , फक्त तू नव्हतास तेव्हा 😆आणि तू  केलीस सफाई टाकीची तेव्हा मी नव्हते😜 . आता  करते माहित नाही . टाकी सफाई एक अविभाज्य भाग होता जवळ जवळ सगळ्यांच्या आयुष्याच्या !!😊😄

      Delete
  2. Me pan kelya ahet asha prakare takya swacha.Karan aaikade gharatil taki lahan hoty tyat utrayla maja yaychi.

    —Sonal Chaudhari

    ReplyDelete
    Replies
    1. वावा मस्तच💖 !!! खरा तर काम हे मेहनतीचे , पण सगळ्यांच्याच आवडीचे 😍! सगळ्यांनाच मज्जा यायची असं दिसतंय , मला आलेल्या बऱ्याच अभिप्रायांवरून !😊😄😇मनःपूर्वक धन्यवाद😍 !

      Delete
  3. विषय साधाच पण इतक्या सूक्ष्म रीतीने त्याची मांडणी करणे खरंच कौतुकास्पद आहे. पंचवीस-तीस वर्षापूर्वीच्या लहानपणीच्या आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्या, खूप आनंद झाला. आम्ही आता मोठेपणी टाकी साफ करतो, पण दुसऱ्याच दिवशी ते विसरून जातो.

    ReplyDelete
    Replies
    1. नाना मनःपूर्वक धन्यवाद ! तुमच्या या कौतुकाने खरंच अगदी आतून आनंद होतो ! खूपच छान वाटते . !!!

      Delete
  4. अपूर्ण...., साध्या साध्या विषयात काव्य निर्माण करून त्याची नोंद करून ठेवणे हीदेखील एक अवघड कला आहे. संसाराच्या रहाड गाड्यातूनही वेळात वेळ काढून तू ही कला जोपासते आहेस याचे मी कौतुक करतो आणि पावसाच्या निवृत्तीनंतरही आम्हाला "आनंदी पावसा"चा भरपूर आनंद घेता येईल येईल अशी अपेक्षा करतो. पुढील लिखाणा करिता शुभेच्छा! नाना.

    ReplyDelete
    Replies
    1. मी तर उलटच म्हणेन , या सगळ्यासाठी वेळ काढावा लागतो हे अगदी मान्य . पण या सगळ्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जाच संसाराचा रहाट गाड आनंदाने😍😇 ओढायला खूपच मदत होते ! आणि हो मी तुम्हाला खात्री देते , पावसाच्या निवृत्तीनंतरही कायमच तुम्हा सगळ्यांना या आनंदी पावसात कायमच भिजून चिंब होण्याचा आनंद लुटता येईल😊😄😍😇 !!! असेच तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम पाठीशी असू द्या माझ्या !!!🙏

      Delete
  5. मंदा चौधरीDecember 03, 2019 12:27 pm

    वा एकदमच सगळ जसंच्या तसं आठवले!!!

    ReplyDelete
    Replies
    1. tons n tons of love ma!!!!!😇😍💖💕💕💃💃💃

      Delete
  6. ह्या टाक्यांची सफाई मी सुद्धा बघितलीय, पण तेव्हा तू नव्हतीस.
    साधी रूटीन मधली गोष्ट पण खूप छान मांडलीय.

    ReplyDelete
    Replies
    1. कुणाचा अभिप्राय हा ? कृपया याचे उत्तर नक्की द्या . तुमचे मनःपूर्वक स्वागत आणि खूप धन्यवाद !!!🙏😍
      i m very egar to know so pl pl reply n tell me who is this .

      Delete
  7. एल झेड कोल्हेJanuary 27, 2020 9:47 pm

    एखादा कवी विषय साधा घेऊन शब्ध सामर्थ्याने खुलवताे तसाच तू पाण्याच्या जुन्या टाक्यांना कलात्मक कल दिलास खूप खूप छान!������

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप मनापासून धन्यवाद , या कौतुकाबद्दल 🙏😊!! पण खरं सांगायचे तर मी खूप लेख लिहिले आतापर्यंत पण हा लेख लिहिताना मला सगळ्यात जास्त जास्त आनंद मिळाला , खूप जास्त एन्जॉय केला !😍🤩

      Delete
  8. पाण्याचा हौद/टाकी धुण्याचा माझा ही अनुभव आहे. मी स्वत: हे काम बरेचवेळा हौशीने करायचो. �������� नंतर स्वच्छ पाणी येतांना बघण्याचा आनंद, समाधान देऊन जायचा.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय टाकी साफ करण्याच्या मेहनतीचा आनंद असतोच पण ते स्वच्छ पाणी येतांना बघायचा आनंद काही औरच , एकदम भारी आनंद !!!!

      Delete
  9. वा व मस्त छान आठउन लीहीता कीती जुन्या गोष्ठी सौ सावळे

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  10. जितेंद्र महाजनMay 20, 2020 6:44 am

    नेहमी सारखेच खूप छान टाकी धुण्याचा विषय खूप छान प्रकारे लिहला ताई तुमचा भुतकाळी ज्ञान खरच चांगल आहे

    ReplyDelete
    Replies
    1. 😊😁 मनःपूर्वक धन्यवाद 🙏 😊

      Delete
  11. Nilima झोपेMay 20, 2020 6:46 am

    Panyachya taki baddal pan yevdhe sunder likhan keles tu sarv mahiti pan vistrut v chan lihili aahes...... ashich lihit raha

    ReplyDelete
  12. पूजा पाटीलMay 20, 2020 12:49 pm

    वा.. छानच,आठवणी ताज्या झाल्या.असच लिखाण सुरू ठेवा

    ReplyDelete
  13. Sanjita ShrikantMay 20, 2020 7:06 pm

    Really h2o container is "water foundation" of the house.

    ReplyDelete
    Replies
    1. Yessss!!!
      Always very unique अभिप्राय!!!!
      धन्यवाद 🙏 ☺

      Delete
  14. सतीश
    आठवणींना विषयाची कमी नसते .. बंधन तर नसतेच नसते...
    स्मरणात येणं.. आणि ते निरपेक्ष पणे कागदावर येणं .... कुठल्याही अलंकाराशिवाय...
    मग ते प्रत्येकाला आपलंच वाटतं ... भावतं...
    लिहित रहा...

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय सतीश सर !
      प्रत्येकाला आपले वाटणे....
      अणि मग त्यातून आनंद मिळणारच ते काही क्षण तरी!!!
      खुप सारे धन्यवाद 🙏😇😊

      Delete
  15. स्वाती प्रभुणेMay 21, 2020 8:53 pm

    पाणी व टाकी आजकाल सिंटेक्स च्या टाक्या येतात व स्वच्छ करायला आद्ययावत उपकरण टाकीत उतरावे लागत नाही मला तुझे फोटो पाहिल्यावर ते पाणी व सिमेंटच्या टाक्या आठवल्या माझे मैत्रिणी कडे खालच्या टाकीत रंगीबेरंगी मासे टाकले होते पण ते वेगळे टाके होते ते मला कळले नाही मी तिच्या कडून 5ते6 मासे घेतले व गुपचूप खालच्या टाकीत टाकले व बघत होते पण 2 दिवसांनी ते दिसेनासे झाले आणि मग लक्षात आलं ते गेले की कारण मोटरचा शॉक बसला असेल
    ते स्वछ पाणी पडणं तो आवाज खरच आपण आता मिस करतो ना?

    ReplyDelete
    Replies
    1. बापरे लहानपणी तुम्ही बर्‍याच उद्योगी होता असे वाटते.... पण आता अजिबातच वाटत नाही तसेच.
      अशाच तुमच्या आठवणी सांगत जा, मला आवडतात वाचायला!
      हो खरय sintex च्या टाक्या, त्यातील पाण्याला प्लास्टिक चा वास येतो, मला अजिबात आवडत नाही.
      पाणी टाकीत पडण्याचा आवाज खरच खूप miss करते मी...
      सप्रेम धन्यवाद 😍 😇

      Delete
  16. प्रतिभा अमृतेMay 29, 2020 8:14 pm

    गच्चीवरील टाक्यांच्या सफाईच्या गमती वाचून मजा वाटली. प्राैढत्वातही तू शैशव जपले आहेस. खरच तुझं कौतुक. ��

    ReplyDelete
  17. प्रतिभा अमृतेJune 02, 2020 3:04 pm

    गच्चीवरील टाक्यांच्या सफाईच्या गमती वाचून मजा वाटली. प्राैढत्वातही तू शैशव जपले आहेस. खरच तुझं कौतुक. ��

    ReplyDelete
    Replies
    1. आयुष्यभर आनंदी राहण्याची गुरुकिल्ली! 😍💃❤️

      Delete
  18. Amhi suddha kele ahe panyacha takya clean....junya athwani refresh zalya....kharach sunder lekh ahe

    ReplyDelete
    Replies
    1. खरच सुंदर आठवणी असतात या !
      सुंदर अभिप्राय साठी सुंदर धन्यवाद 🙏 😍😇

      Delete
  19. माझ्या आईच्या घरी ही होती अशी च पाण्याची टाकी.मी ती टाकी स्वच्छ करण्यासाठी सहभाग घेत असे. फार मजा यायची या छोट्या छोट्या गोष्टी ची.आणि हो तू ह्या सगळ्या गोष्टी ची आठवण करून देतं असते, त्यामुळे तुझं विशेष कौतुक

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम धन्यवाद! 😍🤩

      Delete
  20. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद! 🙏😇

      Delete
  21. लेख वाचला. सर्वकाही छान लिहिलंय. वाचताना अंतर्मुख झालो. बरेचसे छोटे छोटे अनुभव वाचताना मजा आली, कारण साधर्म्याने असे अनुभव आपल्या बाबतीतही घडले असल्याने नजरेसमोरून तरळून गेले.
    जगण्याच्या राहाटगाड्यात लहान आणि साध्या वाटणाऱ्या गोष्टींनाही आपण आपल्या लेखणीतून छान मांडता.
    सर्व आठवणी छानच! Nostalgic!!👍
    -- दीपक पाटील, पालघर

    ReplyDelete
  22. आत्तापर्यंत, पाण्याची टाकी हा लेखनाचा विषय होऊच शकणार नाही अशी माझी कल्पना होती. पण शब्दप्रभूंना या गोष्टींचा अडसर होत नाही. त्यांची, म्हणजे अर्थात तुझी, स्मरण शक्ति, त्या आठवणींचे बारकावे लक्षात ठेऊन त्यांची तंतोतंत पुनर्मांडणी करणे आणि त्यात खर्या खुर्या अनुभवांची जोडणी देऊन लेखन जिवंत बनवणे, ह्यात तुझी हातोटी खरच प्रशंसनीय आहे. मी माझ्या आयुष्यात तू वर्णन केलेल्या बर्‍याच टाक्या बघितल्या आहेत, त्यात पाणी पडतांना किवा त्यातले मासे, कोळी वगैरे अनुभवले आहेत , पण टाक्या साफ करायचा मला अनुभव नव्हता, तो तुझ्या लेखामुळे आता पूर्ण झाला. माझ्या लहानपणी आमच्या घरातल्या टाकीत मी रस्त्यावर सापडलेलं कासव टाकलं होतं. रोज आम्ही सगळे मित्र ते बघायचो आणि त्याला खायला किडे - माकोडे आणी गांडूळ घेऊन यायचो . असो . तुझा प्रत्येक लेख म्हणजे प्रांजळ अनुभव असतो . तुझ्या लहानपणाच्या आठवणी त्यामुळे सगळ्यांना आपल्या वाटतात. Good luck for Your writing. 👍👍👍

    ReplyDelete
  23. व पु होले सरDecember 19, 2021 9:05 pm

    नमस्कार ,भूतकाळातील बारकाव्यांचं यथोचित वर्णन वाचून आपल्या स्मरणशक्तीचा अभिमान वाटतो.सोबत आपण जे फोटो टाकतात ते हे अधोरेखित करतात.खुपच सुंदर .अभिनंदन

    ReplyDelete
  24. खुप छान आणि बारिक वर्णन केले आहे.👌👌👍👍मस्त लेख आहे.

    ReplyDelete
  25. मनिष चिरमाडेFebruary 28, 2022 11:46 am

    ताई पण त्या टाक्या साफ कराव्या म्हणून नव्हे तर मनसोक्त पाणी खेळायचा आंनद आपल्याला पण लुटता यावा म्हणून टाकीत उतारायचे असते पण हे सगळे लहान असताना वाटणारी धमाल...
    मस्त लेखन पूर्ण जसेच्या तसे डोळे समोर गच्ची आणि टाकी आणि त्या साफ करणे आले������

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...